केरळमधील मुन्नार सर्वांना माहित असेलच.. त्यात चंदन (मार्को पोलो) ने अतुलनिय भारत मालिकेत दर्शन घडवले होतेच.. नुकतीच तिथे 'शॉर्ट एन्ड स्विट' स्टाईलमध्ये मुन्नार नि अॅल्लेपीचे बॅकवॉटर इथे भेट देउन आलो.. बघण्यासारखे खूप काही.. पण जंगलातील वळणावळणाच्या रस्त्यांतून जाताना, दोन्ही बाजूला चहाचे मळे बघताना, दुरुन डोकावणार्या डोंगररांगा बघतानाच मन प्रफुल्लित होउन जाते... इथे शक्यतो निवांत वेळ काढून यावे जे मला तरी काही जमले नाही.. इथलेच काढलेले काही प्रचि..
प्रचि १: इथे अनेक धबधबे पण फेब्रुवारीचा महिना.. तेव्हा दिसतील की नाही साशंक होतो.. कोचीनहून मुन्नारला जाताना पहिला लागलेला 'Cheeyappara' (ह्यांचे उच्चार करायच्या भानगडीत पडणार नाही) नावाचा धबधबा एकदम सुका होता.. अगदी तेथील पाण्याखाली दडलेल्या सातच्या सात नैसर्गिक दगडी पायर्या दिसत होत्या.. ! पण नशिबाने ह्याच्या पुढे अगदी जवळच एक 'Valara' नावाचा वॉटरफॉल नजरेस पडला.. त्यातच समाधान
मुन्नार येण्याअगोदर पल्लीवासाल नावाचे गाव लागते.. नि हरित रंगाच्या डोंगररांगाचे दर्शन सुरु होते.. आम्ही सायंकाळी चारच्या आसपास पोहोचत होतो.. पण आकाशातील उपस्थित काळे ढग, पसरलेले धुके यामुळे सहा वाजून गेले की काय असे भासत होते.. काहि अवधीतच चहाचे मळे दिसू लागतात..
प्रचि २:
पुढे आम्ही वाटेत लागलेल्या 'Punarjani Traditional Village' ला मार्शल आर्टच्या शोजची तिकीटे बुक केली..
इथे कथ्थकली (वेळ सायंकाळी ५ वा. - दर प्रत्येकी रु. २००/-) आणि पारंपारिक मार्शल आर्टस (वेळ सायंकाळी ६ वा. - दर प्रत्येकी रु. २००/-)असे दोन शो आहेत..
तुम्हाला दोन्ही पहायचे नसेल वा वेळ नसेल पण फोटो दोन्हीकडचे घ्यायचे असतील सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास तिथे हजर रहायचे.. अर्थात तिकीट मार्शल आर्टची घ्यावी लागेल.. असे केल्यास कथ्थकलीचा शो संपत आलेला असतो.. नि तो संपला की त्या कलाकारांबरोबरदेखील फोटो काढायला मिळतात.. हे संपले की बाजूलाच मार्शल आर्टस सुरु होते.. पण कथ्थकलीमधील कलाकारांचा मेकअप बघायचे असेल तर मग सरळ सायंकाळी ४ ला कथ्थकलीच्या शो चे तिकीट काढून हजर रहायचे.. मला हेच पहायचे होते पण वेळ चुकली..
अधिक माहितीसाठी त्यांचे हे संकेतस्थळ जरुर पहावे..
http://www.punarjanimunnar.org/
प्रचि ३:
प्रचि ४:
प्रचि ५:
प्रचि ६:
प्रचि ७: जल्ला आपल्याला पण भयानक पोझ सहज देता येते काय.. ..
(अर्थात वरील फोटो सौ. रॉक्स यांनी काढला आहे.. त्यामुळे अजून भयानक भाव दर्शवणे जमले नाही
Kalarippayattu (जल्ला अचूक उच्चार समजलाच नाही) ट्रॅडिशनल मार्शल आर्टस सुरु.. या खेळाचे वैशिष्ट्य सांगायचे तर त्यांचे सादरिकरण आवडले.. गोल लाल मातीची रिंग.. नि तिन्ही बाजूंनी प्रेक्षकांसाठी छोटे स्टेडियम.. नि मार्शल आर्टसला पुरक असे वाजत असलेले पार्श्वसंगीत. या गोष्टींमुळे अधिक मजा घेता आली.. खरे तर त्यांचे खेळ बघून मला आपले 'मराठी पाउल पडते पुढे' आठवले.. असो, इथे फोटोग्राफीचे कसब लागते हे खरे.. नि साहाजिकच अॅक्शन कॅच करताना माझ्या डिजीकॅमच्या मर्यादा (वा कॅमेरा हाताळण्याच्या मर्यादा) उघडया पडत होत्या.. पण आजुबाजूच्या काही लोकांच्या डिजीकॅमचे फोटो बघून मात्र थोडे हायसे वाटत होते.. आपले तरी बरे असे वाटत होते.. लेन्सवाल्यांकडे मात्र ढुंकून पण पाहिले नाही..
प्रचि ८:
प्रचि ९:
प्रचि १०:
प्रचि ११:
प्रचि १२
प्रचि १३:
प्रचि १४:
खेळ संपला की इथे पण प्रेक्षकांना वस्तू(तलवार, ढाल, भाला इत्यादी) हाताळण्यास, फोटो काढण्यास मुभा देतात.. त्या कलाकारांच्या उडया बघून मलाही तलवार नि ढाल घेउन उडी मारायचा मूड आला पण थोडे वळले तरी ह्याला त्याला धक्का लागेल अशी फोटो काढून घेण्यासाठी गर्दी झाली.. मग काय शिस्तीत उभे राहून फोटो काढून घ्यावा लागला..
मुन्नारमध्ये फिरताना चहाचे मळे दिसतात खूप.. नि चंदनने म्हटल्याप्रमाणे खरेच इथे त्यांनी डोंगरावरचा कुठलाही कोपरा सोडला नाहीये चहाच्या शेतीसाठी..
प्रचि १५:
प्रचि १६:
प्रचि १७:
प्रचि १८:
प्रचि १९:
प्रचि २०:
प्रचि २१:
प्रचि २२:
डोळे झाले का हिरवे ?? इथे चहाचे म्युझियम व कारखाना आहे जिथे चहा कसा बनवला जातो याची माहिती दिली जाते.. इथे तुम्हाला कंटाळा जरी आला तरी इकडे मिळणारी चहा हमखास प्यावी.. बस्स.. अशी चहा पुन्हा कुठे भेटणार नाही सो दोन- तीन कप आरामात पोटात
आमचा मुक्काम मुन्नारमध्ये 'सिल्वर टिप्स' या हॉटेलमध्ये होता.. उल्लेख करावासा वाटतो कारण हॉटेल एकदम मस्त आहे.. वैशिष्ट्य म्हणाल तर त्यांनी बॉलिवूड, टॉलीवूड व हॉलिवूड या तिन थीम वापरून हॉटेल एकदम बघेबल केलेय.. प्रवेशद्वारातच एक मोठा प्रोजेक्टर मांडलाय.. नि हॉटेलमध्ये संपूर्ण आवारात चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कलाकारांचे फोटो आढळतात.. प्रत्येक रुमसाठी एक गाजलेला चित्रपट निवडला आहे.. सो चित्रपट शौकींनाना हे वेगळेपण निश्चीतच आवडेल.. हॉटेल जितके पॉश तितके जेवणपण.. तेव्हा यापेक्षा मुन्नार टाउनमध्ये 'महावीर' हॉटेल गाठावे.. सर्व प्रकारच्या थाळी मिळतात.. नि चवीलाही उत्तम..
प्रचि २३: सिल्वर टिप्स हॉटेलमध्ये प्रवेश करताच..
प्रचि २४:
प्रचि २५:
प्रचि २६: मनमोहक सजावट
क्रमश :
आगामी : माटटूपेट्टी डॅम परिसर
व्वा! मस्तच आहेत सगळे फोटो
व्वा! मस्तच आहेत सगळे फोटो
किती मस्त ......!!! मला माझे
किती मस्त ......!!!
मला माझे हमु आठवले
योग्या फोटो मस्त आलेत रे.. ते
योग्या फोटो मस्त आलेत रे.. ते कथ्थकलीचे तर खासच
जोरदार ट्रिप झालेली
जोरदार ट्रिप झालेली दिस्तेय.
प्रचि मस्तच.
क्रमशः पाहुन बर वाटल
अच्छा, म्हणजे हनुमानचे फोटो
अच्छा, म्हणजे हनुमानचे फोटो आहेत तर

मस्तच रे..
झकासच आलेत सगळे फोटो. त्या मार्शल आर्टसबद्दल अजुन वाचायला आवडेल
पुढील भाग टाकलास का?
सगळे फोटो क्लास!! आमच्या
सगळे फोटो क्लास!!
आमच्या मुन्नार च्या ट्रिप ची आठवण झाली... तिथुन परतल्यावर सुध्धा आठवडा भर ती हिरवाई डोळ्या समोरुन जात नव्हती
माझा नवरा म्हणाला होता की इथे जे रहात असतील त्यांना डोळ्याचे काही आजार होत नसतील
खुप सुंदर प्रचि
खुप सुंदर प्रचि
सर्वांना एकसाथ धन्यवाद
सर्वांना एकसाथ धन्यवाद






बित्तूसरजी.. पेशल थँक्स त्या मार्शल आर्टसच्या माहितीबद्दल
कवे
त्यांना डोळ्याचे काही आजार होत नसतील >>
विकू.. लवकरच !
तुला हेल्पिंग हँड भेटला आता >> yess
मस्त रे
मस्त रे
'यो ग्रीन'
'यो ग्रीन'
योगेश ~ मन प्रसन्न करून टाकले
योगेश ~
मन प्रसन्न करून टाकले तुमच्या "हिरवळ स्पेशल" फोटोग्राफ्सनी, इतके की दिवसभराच्या कामाने आलेला थकवा दूर झाल्याची जाणीव झाली. 'केरळा ब्युटी रॉक्स' म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
कोची कोलम मार्गे आम्ही कन्याकुमारीला गेलो असताना तिथे असेच नागपूर भागातील तुमच्यासारखे काही युवक आमच्या गटाला भेटले असताना त्यानी 'तुम्ही जाताना मुन्नार मार्गे जावे' असा सल्ला दिला होता. त्यावेळी [म्हणजे ८८-८९] आम्हाला या गावाच्या नावाने काही विशेष असा बोध झाला नव्हता. मदुराई पर्यंत जरूर गेलो, पण तोपर्यंत मुन्नारचा विषय मागे पडला होता; कारण तिथून कोईमतूर गाठायचे होते. मात्र आता तुम्ही केलेले वर्णन तसेच ते जादुमय फोटो पाहून ह्या रत्नासारख्या गावाला भेट दिली नाही याची हळहळ वाटत आहे, इतकेच म्हणता येईल.
धन्यवाद
अशोक पाटील
छान रे.. ईंडोनेशिया मधे अशीच
छान रे.. ईंडोनेशिया मधे अशीच दाट हिरवळ आहे. मीही चढवतो माझे फोटो.
यो, मस्त फोटो.
यो, मस्त फोटो.
नेहमी प्रमणे, प्रचि मस्तच !
नेहमी प्रमणे, प्रचि मस्तच !
यो, पहिल्या फोटोतला धबधबा असा
यो, पहिल्या फोटोतला धबधबा असा तिरका का झालाय...का मलाच तसा वाटतोय...
प्रचि ७ मध्ये यो च्या शेजारचा माणूस पहा...काय बेक्कार टरकलीये त्याची...चेहर्यावरूनच कळतयं
बाकी प्रचि खल्लास
सगळ्यांचे धन्यवाद का मलाच
सगळ्यांचे धन्यवाद

का मलाच तसा वाटतोय...>> मलापण वाटतोय.. मी दोनदा फोटो काढून पाहिला.. तरीपण तसेच..
प्रचि ४ मध्ये आहेत ते यो
प्रचि ४ मध्ये आहेत ते यो रॉक्स आणि सौ रॉक्स का?
नाच पहायला हवा :-).
प्रचि ७ मधली भयानक पोझ आवडली, तुझ्या बाजुला पांढरा शर्ट घालुन कोण उभा आहे ते कळले नाही.
मस्त फोटो आणि माहिती
मस्त फोटो आणि माहिती
मस्त फोटो, प्र ची ८
मस्त फोटो,
प्र ची ८ मधिल हत्यारात बिछवा प्रकर्शाने जाणवतो.
शिवाजी महाराज्यांच्या ईतिहासातील फोटोमध्ये सर्वांनी पाहीला असेलच. ह्या कलरीपायत्तु लोंकांनुसार
महाराज्यांच्या सेनेला प्रशिक्षण त्यांनीच दिले होते.
कलरी पायट्टु च एक workshop
कलरी पायट्टु च एक workshop अत्ताच पुण्यात झाल. मे महिन्यामधे परत आहे. कोणाल उत्सुकता असेल तर... http://www.facebook.com/profile.php?id=1774231543
केवळ अप्रतिम फोटो - रच्याकने
केवळ अप्रतिम फोटो -
रच्याकने तो प्र चि १५ मधला बंगला मी ऑलरेडी बुक केलाय हां - ४-५ वर्षात जाईनच रहायला....
>>>
पण मी जाऊ दिले पाहिजे ना..
तुम्हे मेरी लाशके उपरसे गुजरना होगा शशांक सेठ..::फिदी:
Pages