’हा भारत माझा’ - २३ फेब्रुवारी खेळ - हाऊसफुल!!

Submitted by admin on 11 February, 2012 - 01:42

’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!! हा धागा तुम्ही पाहिलाच असेल. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archives of India) येथे हा खेळ होणार आहे. मायबोलीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा खेळ मायबोलीकरांसाठी प्रदर्शीत करत आहोत. चित्रपटाचे दिग्दर्शक, कलावंत तसेच अनेक मान्यवरांसोबत हा चित्रपट पाहाण्याची संधी तुम्ही नक्कीच चुकवणार नाही याची खात्री आहे. तुम्ही स्वतः पुण्यात सध्या जरी नसलात तरी तुमच्या आप्तस्वकीय आणि मित्रमंडळीना जरूर कळवा.

प्रवेशिका वाटप :
गुरुवार - १६ फेब्रुवारी - संध्या ६:३०-७:३० - हॉटेल पंचमी - सातारा रोड

शनिवार व रविवार - १८ व १९ फेब्रुवारी - संध्या. ५ - ८ - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातल्या पारावर.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक -

चिनूक्स - ९९७०८ ४२४०५
अरभाट - ९८६०९ ८९३४२

२३ तारखेला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथे प्रवेशिका विक्री होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला मी धरुन किमान पाच प्रवेशिका हव्यात Happy
यापेक्षा जास्तीच्या हव्या असल्यास, आज-उद्या निश्चित करुन सान्गतो Happy
जिथे कुठे (नॉर्मली बालगन्धर्वाचा पार वगैरे ठिकाण) वाटप करणार असाल तिथे येऊन सायं ७ पासुन पुढे घेऊ शकेन. Happy (सहाला कम्पनी सुटते म्हणून सात).

माझ्या व्यतिरिक्त, पिंपरीचिंचवडचे जे कोणी इच्छुक असतील, त्यांनी इथे त्यांची मागणि नोंदविली-सांगितली, तर त्यांच्या प्रवेशिकाही त्याचवेळेस पुण्यातुन घेऊन पिंपरीचिंचवडमधे पोच करण्याची व्यवस्थाही ठरविता येईल.

१. एकूण हव्या असलेल्या प्रवेशिका.- ४
२. कुठल्या भागातून ह्या प्रवेशिका घेणे तुम्हाला सोईचे पडेल. - बंडगार्डन रोड/ सिंहगड रोड.

१. एकूण हव्या असलेल्या प्रवेशिका.-२
२. कुठल्या भागातून ह्या प्रवेशिका घेणे तुम्हाला सोईचे पडेल : स्वारगेट, पुणे स्टेशन किवा डेक्कन.

नमस्कार मंडळी,

'हा भारत माझा' या चित्रपटाचा खेळ मायबोलीकरांसाठी आयोजित केला आहे. या चित्रपटाच्या प्रवेशिका उद्यापासून, म्हणजे मंगळवार दि. १४ फेब्रुवारीपासून, मिळायला सुरुवात होईल.

मंगळवार - १४ फेब्रुवारी - संध्या. ६ - ८ - सिटीप्राइड चित्रपटगृहाशेजारच्या बिग बझारबाहेर.

बुधवार - १५ फेब्रुवारी - संध्या. ६ -८ - कॅफे कॉफी डे, परिहार चौकाजवळ, औंध.

शनिवार व रविवार - १८ व १९ फेब्रुवारी - संध्या. ५ - ८ - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारतल्या पाराखाली.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक -

चिनूक्स - ९९७०८ ४२४०५
अरभाट - ९८६०९ ८९३४२

याशिवाय पुण्यातल्या इतर भागातून (पिंपरी चिंचवड, हिंजवडी, हडपसर, सातारा रस्ता) तुम्हांला प्रवेशिका घेणं सोयीचं असेल, तर कृपया या धाग्यावर तुम्हांला किती प्रवेशिका हव्यात, व त्या कुठून घेणे सोयीचे आहे, ते लिहा, म्हणजे आम्ही त्या भागात प्रवेशिका उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

२३ तारखेला कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशिका मिळणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.

हा कार्यक्रम सर्व मायबोलीकर, त्यांचे नातेवाईक आणि मित्र यांच्यासाठी आयोजित केला आहे. फक्त मायबोलीकरांनाच प्रवेशिका मिळतील, अशी कुठलीही अट नाही. काही कारणामुळे तुम्ही येऊ शकत नसाल, किंवा पुण्यात नसाल, तर कृपया आपल्या नातेवाइकांना, मित्रमंडळींना या चित्रपटाबद्दल सांगा. Happy

१. एकूण हव्या असलेल्या प्रवेशिका.- १
२. कुठल्या भागातून ह्या प्रवेशिका घेणे तुम्हाला सोईचे पडेल. - बालगंधर्व सोयीचं पडेल सगळ्यात

माध्यम_प्रायोजक, धन्यवाद Happy

१. एकूण हव्या असलेल्या प्रवेशिका.- ३
२. कुठल्या भागातून ह्या प्रवेशिका घेणे तुम्हाला सोईचे पडेल : १५ फेब्रुवारी - संध्या. ६ -८ - कॅफे कॉफी डे, परिहार चौकाजवळ, औंध.

माझा एक प्रश्न लहान मुलाला आणले तर चालेल का चित्रपट पहाण्यास? माझा मुलगा साडेचार वर्षांचा आहे. त्याच्यासाठी वेगळी प्रवेशिका घ्यावी लागेल का?

१.एकूण हव्या असलेल्या प्रवेशिका - २
२. सिटी प्राईड जवळच्या बिग बझार ची जागा एकदम सोयीची. Happy

स्वप्ना_तुषार,

तुम्ही तुमच्या मुलाला आणायला हरकत नाही. मात्र NFAIला प्रेक्षागृहात खाण्यापिण्याच्या वस्तू नेण्यास सक्त मनाई आहे. तसंच तिथे आवारातही खाद्यपदार्थांची सोय नाही. एवढ्या एका गैरसोयीचा कृपया विचार करावा. Happy
तुमचा मुलगा वेगळ्या खुर्चीवर बसणार असेल तर त्याचं वेगळं तिकीट काढावं लागेल.

माझी बहीण आणि तिचा १२ वर्षांचा मुलगा यांच्यासाठी २ प्रवेशिका, हव्या आहेत. ती उद्या सिटी प्राईड येथुन कलेक्ट करेल.

मुग्धानंद,

सिटीप्राइड चित्रपटगृहाच्या शेजारी बिग बझार आहे. तिथे बाहेर कट्ट्यावर मायबोलीचे स्वयंसेवक असतील, मायबोलीचा टीशर्ट दिसेलच. Happy काही अडचण आल्यास वर फोन नंबर दिले आहेत.

सातारा रोडवर कुठे मिळु शकतील का? कारण शनिवार , रविवार ऑफिसला सुट्टी असल्याने मुद्दाम
बालगंधर्व ला जाऊन प्रवेशिका घेंणे जमणार नाही.. मी बिबवेवाडीत राहते.

१. मला २ प्रवेशिका हव्या आहेत.
२. १८ व १९ फेब्रुवारी - संध्या. ५ - ८ - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारतल्या पाराखाली.

१. एकूण हव्या असलेल्या प्रवेशिका - अजुन ठरायचे आहे पण एक तरी नक्कीच
२. कुठल्या भागातून ह्या प्रवेशिका घेणे तुम्हाला सोईचे पडेल : शनिवार १८ फेब्रुवारी - संध्या. ५.४५ - ६ च्या दरम्यान - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारतल्या पाराखाली(वर???).

’हा भारत माझा’ चित्रपटाचा खास खेळ मायबोलीकरांसाठी!!! हा धागा तुम्ही पाहिलाच असेल. पुण्यात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (National Film Archives of India) येथे हा खेळ होणार आहे. मायबोलीच्या आतापर्यंतच्या वाटचालीत पहिल्यांदाच एखाद्या चित्रपटाचा खेळ मायबोलीकरांसाठी प्रदर्शित करत आहोत. चित्रपटाचे दिग्दर्शक, कलावंत तसेच अनेक मान्यवरांसोबत हा चित्रपट पाहण्याची संधी तुम्ही नक्कीच चुकवणार नाही याची खात्री आहे. तुम्ही स्वतः पुण्यात सध्या जरी नसलात तरी तुमच्या आप्तस्वकीय आणि मित्रमंडळीना जरूर कळवा.

प्रवेशिका वाटप :

शनिवार व रविवार - १८ व १९ फेब्रुवारी - संध्या. ५ - ८ - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातल्या पारावर.

संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक -

चिनूक्स - ९९७०८ ४२४०५
अरभाट - ९८६०९ ८९३४२

२३ तारखेला राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय इथे प्रवेशिका विक्री होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

१. एकूण हव्या असलेल्या प्रवेशिका.- २
२. कुठल्या भागातून ह्या प्रवेशिका घेणे तुम्हाला सोईचे पडेल. - बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारातील पारावर.

मला एक प्रवेशिका हवी आहे.
मी विमाननगरला राहातो. त्याच्या आसपास बालगंधर्व रंगमंदिर सोडून काही सोय आहे काय. मला १८ वा १९ ला सायंकाळी तेथे यायला जमणार नाही म्हणून...

Shashikant_Oak आणि चिमुरी,

आपण कृपया चिनूक्स यांच्याशी ९९७०८ ४२४०५ या क्रमांकावर संपर्क साधा.

'हा भारत माझा'च्या खास खेळाच्या सर्व प्रवेशिका संपल्या!!!
या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

२३ तारखेला, म्हणजे येत्या गुरुवारी, संध्याकाळी ६.२० वाजेपासून प्रेक्षागृहात प्रवेश दिला जाईल.
कार्यक्रम ठीक. ६.४५ वाजता सुरू होईल.
प्रास्ताविकानंतर दिग्दर्शक श्री. सुनील सुकथनकर चित्रपटाबद्दल बोलतील.
ठीक ७ वाजता चित्रपट सुरू होईल.
चित्रपटाचा अवधी - सलग दोन तास.
चित्रपटानंतर तंत्रज्ञ व कलाकारांची ओळख आणि दिग्दर्शक सुमित्रा भावे - सुनील सुकथनकर गप्पांचा कार्यक्रम होईल.

विशेष सूचना - प्रेक्षागृहात खाद्यपदार्थ किंवा पेय नेण्याची परवानगी नाही.

पुन्हा एकदा भरभरून प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!

'हा भारत माझा'च्या खास खेळाच्या सर्व प्रवेशिका संपल्या!!!
या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.>>>>>>सह्हीए!!!! मस्तच Happy

वॉव, मस्तच. माबोचे सगळे कार्यक्रम असेच हाउसफुल्ल जावोत.
तुम्हा सर्वांनी घेतलेल्या श्रमांबद्दल (जे खरंतर 'लष्करच्या भाकर्‍या' विभागात मोडतात..) आणि पुणेभर हिंडून आमच्या सोयीने तिकिटवाटप केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद Happy

तुम्हा सर्वांनी घेतलेल्या श्रमांबद्दल (जे खरंतर 'लष्करच्या भाकर्‍या' विभागात मोडतात..) आणि पुणेभर हिंडून आमच्या सोयीने तिकिटवाटप केल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद >> +१ आणी मायबोलीचे अभिनंदन!! Happy

Pages