आफ्रिकेत रहाणार्‍या मायबोलीकरांच्या गप्पा

Submitted by जागोमोहनप्यारे on 19 November, 2008 - 10:42

आफ्रिकेत कुणी मायबोलीकर नाही का ? आफ्रिकेचा बी बी कुठे आहे..? नेमस्तक कृपया हे पोस्ट योग्य तेथे हलवावे...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आफ्रिकेत यायला व्हीसा लागत नाही ही माहिती नवीनच आहे माझ्यासाठी दिनेशदा. धन्स त्याबद्दल Happy

चला, आता फक्त पारपत्र काढतो आणि तिकीटासाठी एक रिकरिंग डिपॉझीट अकाउंट उघडतो. Proud

MH12 असाल तर वेगळ्या व्हिसा ची गरज नाही. फक्त एक तोंडी परीक्षा देउन अस्सल MH12कर आहात हे सिध्ध कराव लागेल Wink

आजची एक मजा.
आम्हाला केनयातून काँगोला एक्स्पोर्ट ऑर्डर पाठवायची होती. आधीची सँपल्स विमानाने पाठवली होती, पण यावेळी एक कंटेनर भरुन पाठवायचा आहे. मी माझ्या
मदतनीसाला ट्रान्स्पोर्ट्स कडे चौकशी करायला सांगितले. तो माझ्यासमोरच फोन करायचा आणि ठेवून द्यायचा. मी विचारल्यावर म्हणाला, सगळे म्हणताहेत काँगोला इथून रस्त्याने जाता येत नाही.. (नकाशात तर जरा पल्याड दिसतो.) इथून मोंबासाला रस्त्याने, मग बोटीने पाठवावे लागेल. त्यात एक/दोन महिने जातील.

मंदार, भारतीयांना केनयात यायला व्हीसा लागत नाही. इथे आल्यावर मिळतो (५० डॉलर्सना ) आणि आता लो कॉस्ट एअरलाईन, एअर अरेबिया (व्हाया अबुधाबी ) येते.

हो रे, आणि एकदा केनयात आल्यावर. युगांडा / टांझानियात जायला व्हीसा लागत नाही. बाय रोड, बाय ट्रेन, बाय बोट जाता येते.
(आताचे माहित नाही, पण पुर्वी नैरोबीतून एक ट्रेन किसुमुला जायची, मग तिथे ती ट्रेन एका बोटीत शिरायची मग ती बोट, व्हिक्टोरिया लेकमधून, इन्टेबे (युगांडा) ला जायची.)

गंधर्वा, रोडने ७/८ तास लागतात. नैरोबी नॅशनल पार्क शहरापासून फक्त ८ किमी वर आहे. मसाई हे टोळीचे नाव तर मारा हे नदीचे नाव आहे. नैरोबी सोडल्यावर आपण रिफ्ट व्हॅलीत उतरतो. लेक नारोक, लेक नाकुरु, लेक व्हीक्टोरिया हे सगळे या व्हॅलीचाच भाग आहेत. आणि मसाई मारा पण त्यातच येते. रस्ता अगदी सपाटीवरुन जातो आणि छान आहे.

मी पण आलो इकडे....

मंदार, भारतीयांना केनयात यायला व्हीसा लागत नाही. इथे आल्यावर मिळतो (५० डॉलर्सना ) >>>>>>>>> हे, माहीतीच नव्हतं. माहीतीबद्दल आभार दिनेशदा... Happy

मंदार, भारतीयांना केनयात यायला व्हीसा लागत नाही. इथे आल्यावर मिळतो (५० डॉलर्सना ) >> सही Happy

रोडने ७/८ तास म्हणजे नॉट बॅड. एकदा ट्राय करयाल हरकत नाही. पण विचार करतोय क्रुगर आणि मसाई मारा मधे वेगळे काय आसेल.

७/८ तास सुद्धा साध्या गाडीने. इथले टुअर ऑपरेटर्स त्यापेक्षा लवकर नेतात.
मला अजून जमलेले नाही, पण ट्रेकिंगची आवड असेल तर माऊंट केनया ट्राय कर (आठवड्याभराचा ट्रेक आहे तो.) माऊंट एल्गॉन (युगांडा केनया सीमेवर ) पण फोटोत छान दिसतो.

मसाई माराची झलक, नैरोबीच्या नॅशनल पार्कमधेच मिळू शकते.

patralekhan-1_neelampari.jpg

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.

लिहिताय ना मग? Happy

नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947

आफ्रीका ग्रुप मधे सिक्रेट पान कशासाठी उघडलंय ?
एक पान उघडून त्यात नको त्या लोकांना नको म्हणत असताना बोलवून धर्मशाळा करायची आणि नंतर वेगळं पान म्हणून रडत बसायचं. आहे त्या पानावर स्वतःच्या शैलीतून लिहीण्याऐवजी जिथून हकालपट्टी झाली त्या पानावरच्या लोकांची उअबगवानी शैली कॉपी करायची. आपले ते हे वाले पाचकळ जोक्स मारत बसायचे, यामुळं त्या पानाचं प्रयोजन काय हे आपोआपच लक्षात आल्याने इंटरेस्ट जाणारच की.

जोपर्यंत त्यांच्या पानावर येऊ देत होते तोपर्यंत आपण जगातले तीव्र बुद्धीवादी या गोड गैरसमजातून बाहेर पडले असतील तर ठीक. त्यात ते एक विदूषक प्रोफाईल. इतरांना सांगणार प्राणपणाने लढा दिला पाहिजे आणि यांची साथ करणा-यांना मरण्यासाठी सोडून पहिलं पळ काढणार. धन्य लोक आहेत.