''क्षय''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 February, 2012 - 02:11

समूळ उपचाराचा निश्चय
खाऊ गोळ्या संपविण्या क्षय

पूर्वीगत तब्येत जहाली
डीओटीचा कराल जयजय

छोट्या छोट्या क्षयजंतूंना
''सुराक्षनीका'' मोठा आशय

क्षयरोगाची भिती दाटता
डीओटी बनविणार निर्भय

क्षयरोगाचा प्रसार रोखू
जीवन जगू निरोगि निरामय

डीओटी = डायरेक्टली ऑब्झर्व्हड ट्रीटमेंट
सुराक्षनीका = सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम

( महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य पत्रिकेत ''क्षयरोग'' विषयावर मार्च-२०१२ च्या अंकात येणारी माझी गझल Happy )

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: