न जाणो कधी...

Submitted by shuma on 31 March, 2009 - 04:13

तुला रंगांची आवड नाही
म्हणून आजतागायत मी
विटक्या मनाने जगत राहिले
अगदी शक्यच असतं तर
कदाचित रंगांधळी ही झाले असते
पण मग आतूनच उमटणारं
हर एक रंगावर्तन
मी आजवर मनांतच सावरुन घेत आलेय
पण आजकाल मला भिती वाटते रे
तुझ्या नजरेला नजर देताना
न जाणो कधी अचानक...

माझ्या पांपण्यातून इंद्रधनू सांडलं तर??

शमा

गुलमोहर: 

क्लास Happy
****************
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान! Happy

मस्तच.

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

... शुमा, अतीव (अतीव) सुंदर.

कवितेचा शेवट इतका म्हणजे इतका परिणामकारक असू शकतो? मी कविता आधी वाचली आणि बसून राहिले. ही प्रतिक्रिया दुसर्‍यांदा वाचून देतेय.

माझ्या पांपण्यातून इंद्रधनू सांडलं तर??>>>>आईशप्पथ कसला भन्नाट पंच आहे हा!

शुमा...पुढच्या कवितेची वाट बघतेय. Happy

(असं काही छान वाचलं की जुना गुलमोहोर आठवतोच आठवतो)

कविता आवडली. श्यामलीला अनुमोदन.

~~~~~~~~~

माझ्या पांपण्यातून इंद्रधनू सांडलं तर??........... अहाहा...... !!

शमा.... जबरदस्त !!

~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

खल्लास एकदम, शेवट तर लय भारी. आवडेश Happy
-------------------------------------------------------------------------------
राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

क्या बाsssत है!!
____________________
-Impossible is often untried.

खल्लास !!

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

कविता आवडली. अतिशय छान.

कवितेने शेवटचे वळण छानच घेतलय.

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

फारच सुंदर! 'विटक्या मनाने','रंगांधळी', 'रंगावर्तन','इंद्र्धनू' सारे सन्दर्भ खूप सुन्दर आहेत.

एक्दम भन्नात. अगदि मनात सथवुन थेववि अशि. लता

न जाणो कधी... - छान

पण मग आतूनच उमटणारं
हर एक रंगावर्तन
मी आजवर मनांतच सावरुन घेत आलेय

आवडलं...

श्यामलीला खूप मोदक!!! जुना गुलमोहोर आठवला!

कस्सली घुसली यार कविता! मार डाला!!

केवळ अप्रतिम!

पांपण्यातून इंद्रधनू सांडलं तर??>>>>>
जबरदस्त.......

शुमा,
फॉर्मल प्रतिक्रीयेची गरज नाही(च) तुझ्या कवितांन्ना.. तरिही, "निखालस सुंदर"..
टेक्निकली, पापण्यांच्या जागी "नजरेतून" अधिक चपखल बसेल का?

(ही कविता कशी काय मिसली याची मात्र हळहळ...)

पुन्हा एकदा सर्वांची आभारी आहे.
योग ,,खर्‍या अर्थाने नजरेतूनच योग्य आहे पण पांपण्यातून जरा अलंकारीक वाटलं म्हणून वापरलं आहे

जबरदस्त शमा!!!!
खरंच इतका परीणामकारक शेवट.......मस्तच!!!

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

खुपच छान!!!!! ह्रदयस्पर्शी....कौतुक करायला शब्द अपुरे आहेत.......
........मानसी

शमा,
किती छान कविता लिहीली आहे!
खरच ह्रदयस्पर्शी....

**********************************
लोग कहते थे की ओ मेरे जनाजे पे रोये नही !
मुझे तो खुशी इस बात की,की हमने उन्हे आख्रीर तक रुलाया नही|
गणेश कुलकर्णी (समीप) ९७६४७७३२५७, पुणे-२७
**********************************