गॉसिप - 3D visualisation

Submitted by मुरारी on 29 January, 2012 - 22:42

Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.
पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे.
नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत.
पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!!
आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो
--------------------------------------------------------------------------------------------
बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला,
माझ्या एका designer मित्राने , मला एके दिवशी एक international ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही.
काहीतरी international लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत
१० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला
आणि खालील काही स्केचेस फायनल झाली.
हा साईट चा प्लान
१.

२.

३.

४.

५.

६.

लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता...
चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळही देता येत नव्हता.
पण हळू हळू काम जमायला लागलं. ३D सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल.

७.

८.

९.

मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ...
पण प्रयत्न सोडले नाहीत .
हे मी केलेले 3DViews

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघायला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित )

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती....
काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे
स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. ..
client कि हवा टाईट हो गयी हे Lol

२२.

गुलमोहर: 

जबरदस्त!!!!!
3DViews फार भारी.... आणि प्रत्यक्ष साकारलं गेलेलं स्टोरतर बेस्टंच

अप्रतिम!! हे 3DViews आहेत!!! भन्नाटच.. प्रत्यक्षाहून भारी!! लायटिंग, टेक्श्चरिंग.. कम्माल!! Happy
प्रसन्न, अभिनंदन तुमचे!!

प्रसन्न gr8 work!!!!! शाब्बास!!.. अगदि नावातल्याप्रमाणे प्रसन्न! Happy

धन्स सर्वांचे ....
पण माझ्यापेक्षाही.. ज्याने हे स्वप्न प्रत्यक्षात आणलं..
त्याचा जास्त हक्क आहे माझ्यापेक्षाही Happy

उत्तम

छान

खरंच भन्नाट!! डिझाईन्स काढणाराही महान आणि ते प्रत्यक्षात उतरवणाराही!! अभिनंदन!

तुम्ही कुठली graphics cards वापरता का डिझाईन्स साठी?

अजून त्या ठिकाणी गेलेलो नाही... Happy त्या फिनिक्स मॉलमध्ये गेलो की कौतुकाने बघणारच.. Happy आणि आताही जाणार... Wink

वॉव! अप्रतिम. फारच सुंदर केलय.
डिझाईन आणि खरे स्टोर दोन्ही अल्टिमेट दिसताहेत.
अभिनंदन Happy

हा मस्त. दिसल्या सगळ्या इमेजेस आता.
मस्त केलंयत. तेवढ्यासाठी कुर्ल्याच्या फिनिक्सला जायला पाहिजे आता.

Pages