गॉसिप - 3D visualisation

Submitted by मुरारी on 29 January, 2012 - 22:42

Architectural Animation हा प्रकार आता Design क्षेत्रात चांगलाच रुळला आहे, आता तर तो त्याचा एक अविभाज्य घटकच झाला आहे.
3D visualisation हे एक करिअर होऊ शकत यावर माझा स्वताचाही आधी विश्वास नव्हता, किंबहुना मला त्याविषयी काही माहिती देखील नव्हती. Animation म्हटल कि डोळ्यासमोर कार्टूनच उभी राहायची, किंवा 3D गेम . पण त्यापुढेही हे क्षेत्र किती अफाट आहे , हे हळू हळू आता कळायला लागलंय.
पूर्वी एखाद्याला बिल्डींग, स्टोर, किंवा interior करायचं असेल, तर त्याला संपूर्णपणे interior designer किंवा Architect च्या भरोसे रहाव लागायचं. तो त्याला प्लान, एलीवेशन, इथून तिथून ढापलेले रेफरंसेस इत्यादी दाखवून समाधान करण्याचा प्रयत्न करी. पण माझी बिल्डींग, स्टोर, घर, हे झाल्यानंतर कस दिसेल हे त्या बिचार्याला शेवटपर्यंत कळत नसे.
नंतर हळू हळू visualisation प्रकार वाढायला लागला. जे. जे ची वेग्रे मुल हाताने चित्र काढून बिल्डींग्स कशा दिसतील हे दाखवण्याचा प्रयत्न करू लागली. पण हे काम खूपच किचकट आणि वेळखाऊ होत. बर त्यात काही बदल करायचे म्हटले तर ते लगेच शक्य नसायचं, पुन्हा पहिल्यापासून चित्र काढा. फारच खर्चिक काम होत.
पण जेव्हा या कामासाठी सोफ्टवेर ची मदत घेतली जाऊ लागली, तेंव्हा काम करण्याची पद्धतच बदलली, clients न आपल प्रोडक्ट कस दिसेल ते कळायला लागलं, त्यात हवे ते बदल लेवेन्थ अवर ला सुद्धा करता यायला लागले, कितीही ऑप्शन बनवा.. डोक्याला ताप नाही. सर्वात शेवटी जो ऑप्शन फायनल होईल, तो approve झाल्यावरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात. झाली कि नाही पैशाची आणि वेळेची बचत !!!!
आता नक्की यात होत काय ते खाली सविस्तर सांगतो
--------------------------------------------------------------------------------------------
बरेच दिवस एकाच टाईप च काम करून कंटाळा आलेला,
माझ्या एका designer मित्राने , मला एके दिवशी एक international ब्रांड(Gossip - Shoe brand ) साठी काम करशील का म्हणून विचारल. ऑफिस च भन्नाट प्रेशर होत, पण काहीतरी वेगळ करायला मिळेल, म्हणून होकार दिला. आम्ही अजून एक दोन जणांची टीम बनवली. सर्वात आधी concept , त्याशिवाय गाडी पुढे हलत नाही.
काहीतरी international लेवेल च काम करायचं डोक्यात होत, साधी बुटांची दुकान लाखोने असतात, आपण काय वेगळ देऊ शकू. काही सुचत नव्हत
१० वाजता हापिसातून घरी अल कि जेवून ..२ २ वाजेपर्यंत जागून स्केचेस बनवायला लागलो . नेत वर शोधाशोधी केली ,२ ३ वह्या भरल्या .. पण काही मजा येत नव्हती . शेवटी एक भन्नाट विचार मित्राच्या डोक्यात आला
आणि खालील काही स्केचेस फायनल झाली.
हा साईट चा प्लान
१.

२.

३.

४.

५.

६.

लगेच 3d वर काम सुरु केल , त्यातही वेळ जात होता...
चायला कितीही ऑप्शन केले तरी client ला अजिबात आवडत नव्हत, काय करू कळेनास झालेलं, शिवाय ऑफिस च्या कामामुळे जास्त वेळही देता येत नव्हता.
पण हळू हळू काम जमायला लागलं. ३D सुरु होताच.. साईट वर हि काम सुरु झाल.

७.

८.

९.

मध्ये मध्ये चेंजेस येतंच होते, काम सोडून द्यावास वाटत होत. मित्र कुत्र्यासारखा मागे लागलेला .... त्याला म्हणालो "साले तू मेरा दोस्त हे या दुश्मन.. त्याच्यावर ढिम्म परिणाम झाला नाही.. त्याला अपेक्षित output येई पर्यंत तो 3D करून घेतंच होता . अतिशय हतबल झालेलो.. भिक नको पण कुत्र आवर तशी गत ...
पण प्रयत्न सोडले नाहीत .
हे मी केलेले 3DViews

१०.

११.

१२.

१३.

१४.

१५.

३ ते ४ महिन्यानंतर १० दिवसांपूर्वी कुर्ल्याच्या फिनिक्स मॉल मध्ये हे स्टोर उघडल . बघायला गेलो आणि डोळ्याच पारणच फिटल, मित्राला मिठी मारायचीच बाकी होती... भयानक कष्ट उपसून त्याने client ला दिलेला शब्द पाळला होता... हुबेहूब 3D मध्ये दाखवल्यासारख त्याने खरच स्टोर बनवलेलं होत . अक्ख्या मॉल मध्ये हेच एक स्टोर वेगळ दिसत होत .. हे खालचे साईट चे फोटू (मोबिल ने काढलेत , इतके खास दिसणार नाहीत कदाचित )

१६.

१७.

१८.

१९.

२०.

२१.

सर्वांनी आमच विशेष अभिनंदन केल .. पण स्टोर उघडेपर्यंत झालेली हालत आम्हालाच माहित होती....
काल त्याचा फोन आलेला, म्हणत होता साले लोचा हुआ हे
स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. ..
client कि हवा टाईट हो गयी हे Lol

२२.

गुलमोहर: 

अप्रतिम..!!!अजुन काय बोलायचे... प्रसन्न तसा या क्षेत्राशी कधी संबंध आला नाही पण याबाबत अजुन वाचायला व माहिती करून घ्यायला आवडेल..
>>लगेच 3d वर काम सुरु केले<< ते कसे, त्यासाठी तुम्हाला काय काय input मिळाले, कोणते softwares वापरले, मॉडेल मधे इतक्या बारीक-सारीक गोष्टी कशा आणल्या..ई.ई...
तुमच्या मित्राचे, स्वप्न प्रत्यक्षात उतरवत असतांनाचे अनुभव पण नक्कीच खुप वाचनीय असतील.

@ चम्बु :

ते कसे, त्यासाठी तुम्हाला काय काय input मिळाले, कोणते softwares वापरले, मॉडेल मधे इतक्या बारीक-सारीक गोष्टी कशा आणल्या..ई.ई...

मी 3D modelling साठी, माया, 3d max वापरतो .

मला इनपुट्स CAD मधून मिळतात

बरीच तांत्रिक माहिती आहे
सवडीने एकदा लिहून काढीन
बरीच मजा आहे Happy

आम्ही इंजिनिअरिंगला असताना ३डी मॅक्स वापरून कसलेतरी बोरिंग प्रोजेक्ट्स केले होते. हे अस्लं काही जमतं कळलं असतं/ अक्कल असती तर काय मजा आली असती!!

अप्रतिम केलय 3D मॉडेलींग अणि तुमच्या मित्राने ते तितक्याच ताकदीने वास्तवात उतरवलय. ते झुंबर मॉडेलींगबरहुकुम असते तर जास्त छान दिसले असते हे माझे मत.

ते झुंबर मॉडेलींगबरहुकुम असते तर जास्त छान दिसले असते हे माझे मत.

ते बनवायचा खर्च २ लाखाहून अधिक येणार होता..
म्हणून मग हे साध झुंबर घेतल Happy

स्टोर इतना ढासू बना हे कि.. लोग अभी अंदर आनेसे भी डर रहे हे .. ..
client कि हवा टाईट हो गयी हे >>> आता अंदरकी बात कळल्यामुळे मी जाईन अंदर .... Proud

फारच भारी आहे ही कन्सेप्ट आणि डिझाईन. त्याचं प्रत्यक्ष रूप पाहून एकदम भारी वाटलं.
(मूळ स्केचमध्ये तुम्ही मध्यभागी स्पायरल डिझाईन केलं होतं, ते प्रत्यक्षापेक्षा जास्त चांगलं आहे असं वैम :))

स्केचेस आणि त्याचं प्रत्यक्ष रूप.. फारच देखणं प्रकरण आहे.

(ब्रँडाचं नाव जरी जिव्हाळ्याचं वाटलं तरी अशा दुकानांत चपला विकत घ्यायला जायचं म्हंटलं तर छाती दडपणारच. Happy )

गॉसिप असं वाचून ठेवलं बाजूला... आज बघितलं (आधीच न वाचण्याचा केव्हढा मूर्खपणा)...
सुंदर... अतिशय सुरेख डिझाईन.
ते s/w मधलं किती जिवंत... आणि खरच प्रत्यक्षात हुबेहूब...
सलाम बाबा, तुमच्या टीमला...

सुपर्ब!!!! Happy

तेवढ्यासाठी कुर्ल्याच्या फिनिक्सला जायला पाहिजे आता.>>>>अगदी अगदी Happy

Pages