निव्वळ विनोदः गाण्यातच बोला

Submitted by pradyumnasantu on 27 January, 2012 - 22:38

गाण्यात बोला

तरूण कवीचा एका राज्याभिषेक झाला
गादीवर येताच त्याने हुकूम एक काढला
जो जो कोणी सांगू काही पाहे
गाण्यातुनच सांगणे आवश्यक आहे
जो कोणी गद्यात बोले
तयाचे शीर होईल धडावेगळे

गोंधळ जोराचा माजला
कवींना डिमांड आला
प्रत्येक जण लागला
अर्ज गाण्यात करण्याला
"सरका---र, सर----का-र, काही नसे खाण्या----ला---
किंवा
महा-----रा--ज, --- चोर बहुत झा----लेत... काय हवे करण्याला"

महाराज ते नवे नवे
खुष बहुत झाले
प्रजानन जे कवी नव्हते
त्रासुनि ते गेले

एक दिवस एक सैनिक
महाराजांकडे आला
दु:खी मुद्रेने तो उभा तिथे राहिला
आज्ञा झाल्यावरती
काव्य घोळुन गाउ लागला

"महा-----राज, महा--------राज
काय सां----गू महा----राज
आपला प्रिय राज-------वाडा
आपला प्रिय राज-------वाडा
आपला प्रिय राज-------वाडा

राजा आता खवळला
जोराने ओरडला
"काय झाले राजवाड्याला?"

आपला प्रिय राज-------वाडा
आपला प्रिय राज-------वाडा

"अरे मुर्खा लौकर बोल.."

ज---ळु---नी-- खा----क-- झा------ला हो
ज---ळु---नी-- खा----क-- झा------ला

(अकस्मात दुस-या दिवशी
हुकूम रद्द झा--------ला)

शब्दखुणा: 

आवड्..........ली हो........आ......................वड्ली जी जी जी जी.