कि सांगा, खराखुरा भ्रष्टाचारी बिनचुकपणे कसा ओळखायचा?

Submitted by दामोदरसुत on 28 January, 2012 - 03:54

तुकोबाराय म्हणतात,
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा !
देव कसा ओळखावा यासाठी सामान्यांसाठी किति सोपे, स्पष्ट आणि नेमके मार्गदर्शन आहे हे!
फ़क्त शासकीय कर्मचारी आणि निर्वाचित लोकप्रतिनिधी यांच्यातील भ्रष्टाचारी ज्या आधारे बिनचुकपणे शोधता येईल व ज्याचा शेवट ’भ्रष्टाचारी तेथेचि जाणावा’ असा असेल असा चार ते आठ ओळींचा अभंग लिहिण्याच्या तयारीला आम्ही लागलो.
असा प्रयत्न करण्याचे कारण घडले राळेगणसिद्धीत!
’गली गली चोर है’ हा चित्रपट अण्णांना दाखवला गेला त्या प्रसंगी "लोकशाही व्यवस्थेने भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जे मार्ग उपलब्ध करून दिलेले आहेत त्याद्वारे केलेले प्रयत्न अपुरे पडत आहेत. अशा परिस्थितीत निराश झालेल्या व्यक्तिंसाठी भ्रष्टाचाऱ्यांना थप्पड मारून आपल्या भावना व्यक्त करणे एवढाच मार्ग शिल्लक आहे." असे विचार त्यांनी व्यक्त केल्याची वार्ता २६ जानेवारीच्या वृत्तपत्रांमधून वाचली. अहिंसावादी महात्माजींचे एक श्रेष्ट अनुयायी, जे त्यांनी पुरस्कारलेल्या उमेदवाराचा पराभव करून कॉंग्रेसचे अध्यक्ष झाले, ते पुढे अहिंसक मार्ग त्यागून चक्क ब्रिटिशांविरुद्ध लढणाऱ्या सशस्त्र अशा ’आझाद हिंद सेने’चे सेनापती झाले.
आता भारतीय सशस्त्र सेनेतून निवृत्त होऊन गेली कांही तपे राळेगणसिद्धीसारख्या ग्रामीण भागात गांधिजींचा मार्ग अनुसरून आदर्श कार्य करणाऱ्या अहिंसक गांधीवाद्यावर, आपल्याच लोकांविरुद्ध, असे हिंसक विचार मांडण्याची पाळी का आली? या विषयावर प्रवक्ते, विष्लेषक अशा शहाण्यांचा जो वर्ग दूरचित्रवाणीवर सध्या रोजचे रतीब घाल्तो तो अण्णा टीम कुठे चुकते यावर तोंड फाटेस्तोवर बोलेलच! पण खराखुरा भ्रष्टाचारी बिनचुकपणे कसा ओळखायचा हे मात्र हा वर्ग कधीही सांगणार नाही. त्यामुळे आम्ही हे काम स्वतःच करायचे ठरवले.
पण या आमच्या कामात ’प्रथम ग्रासे मक्षिकापातः’! आम्हाला भ्रष्ट नसलेला माणूस शोधून सापडेना. उदा. आम्ही स्वतः! केशरी रेशनकार्डावर कार्ड मिळाल्यापासूनच नियमात बदल झाल्याने कांहीही मिळण्यास आम्ही अपात्र ठरलो. त्यामुळे कार्डावर आजवर कांहीही घेतलेले नाही. पण उद्या अण्णांच्या आंदोलनात आम्ही वाहिन्यांवर प्रसिद्ध होऊ लागलो तर केशरी कार्ड परत करून पांढरे कार्ड न घेतल्याचा जो प्रचंड भ्रष्टाचार आम्ही केला आहे तो पुराव्यानिशी शोधून काढला जाईल. वाहिन्यांवरून आम्ही अद्याप ए-राजांबरोबर कसे नाही असे विचारले जाईल आणि ज्यांना दोन्ही भ्रष्टाचार तितकेच गंभीर वाटतात असे वाहिन्यांवरील प्रवक्ते व विश्लेषक आम्हाला पहिला थप्पड मारण्यायोग्य भ्रष्टाचारी ठरवतील. त्यामुळे अण्णांच्या आंदोलनामुळे दुखावले गेलेले बलदंड लोक अण्णांचे समर्थक बनून आम्हालाच मरेस्तोवर थप्पडदान करतील. मेलो नाही तर शासन आमच्या गंभीर भ्रष्टाचा्राबद्दल आम्हाला तिहारयात्रा घडविणारच! म्हणजे ए राजा जामिनावर तरी सुटेल पण आम्ही मात्र शिक्षा भोगूनच!
बरे आमच्या विरुद्ध पुरावा तरी आहे. पण ज्याच्यावर भ्रष्टाचाराचा एकही एफ़ आय आर नाही, अशा एका नेत्याला सर्व शासकीय सुरक्षा असूनही वाहि्न्यांच्या समोर थप्पड खावी लागली. तीही भ्रष्टाचाराची चीड आली असे म्हणणाऱ्याकडुन! कागदोपत्री स्वच्छ माणूसदेखील भ्रष्टाचारी असल्याचे त्याला कसे कळले आणि आम्हाला का नाही? बरे हा थप्पड-कार्यक्रम होताच ज्यांनी त्यांच्यावर ’भुखंडाचे श्रीखंड’ ओरपल्याचा आरोप केला होता त्यांनाच या थपडेचा प्रचंड राग का आला? आरोप खरा असता तर खरे म्हणजे समाधान वाटायला हवे होते. त्यामुळे तर आम्ही आणखीच गोंधळून गेलो. थप्पड देणारा खरा कि आरोप करणारे खरे कि पीडित नेता खरा निर्दोष?
आम्ही निदान कागदोपत्री तरी भ्रष्टाचारी असल्याचे सिद्ध होईल पण स्वच्छ नेताही भ्रष्टाचारी असल्याचे कांहीजणांना कोणत्या यंत्राद्वारे कळले? अशा निराशाजनक परिस्थितीत आठवली ’मायबोली’! काखेत कळसा आणि गावाला वळसा! साक्षात ’मीअण्णाहजारे’ आणि इतर अनेक जाणते मायबोलीवर उपलब्ध असतांना आपण का म्हणून हतबल व्हावे? म्हणून टाकला हा प्रश्न सरळ मायबोलीवर! कि सांगा, खराखुरा भ्रष्टाचारी कसा ओळखायचा?

गुलमोहर: 

एखादी व्यक्ती काँग्रेस किंवा तत्सम समानधर्मी पक्षात असेल (उदा. राष्ट्रवादी), तर तो/ती नक्कीच भ्रष्टाचारी आहे हे खात्रीपूर्वक सांगता येईल. पण एखादी व्यक्ती भ्रष्टाचारी असेल, तर तो/ती नक्कीच काँग्रेस किंवा तत्सम समानधर्मी पक्षात असेल असे खात्रीपूर्वक सांगता येणार नाही.

एकदा भ्रष्टाचारी पकडण्याचं यंत्र तयार होते. जगभरातले भ्रष्टाचारी पकडले जातात. जेव्हा ते मशीन भारतात येते तेव्हा त्या मशीनच्या खरेदीतच आपले नेते 'भ्रष्टाचार' करतात, आता बोला.

सेनापति, मास्तुरे व अन्टीम्याटर यांना धन्यवाद!
मास्तुरेजी आपल्या म्हणण्यात खूप तथ्य आहे. पण सध्या भ्रष्टाचार्री नेते स्वताला इंपोर्ट-एक्सपोर्ट करवून घेतात आणि कमावतात असे वाटायला लागले आहे. त्यामुळे तुमच्या व्याख्येत योग्य बदल करून अशा नेत्यांचाही समावेश करावा.
अन्टीम्याटर यांनी फारच मार्मिक लिहिले आहे. पुढे जाऊन असेही म्हणता येइल कि हे यंत्र घेतांना यंत्र विकणार्‍याशी हातमिळवणी करून त्या यंत्रात 'भ्रष्ट नसलेलाच भ्रष्टाचारी म्हणून दाखवला जाईल' अशी व्यवस्थाही करून घेतली. त्यामुळे झाले काय की सगळ्या अण्णासमर्थकांचे 'जेल भरो ' आंदोलन शासनानेच १००% यशस्वी करून दाखवले. कोर्टानेही प्रत्येकाला कायद्यातील तरतुदीतील जास्तीत जास्त शिक्षा दिली. सगळेजण शिक्षा भोगूनच बाहेर आले. तोवर नेत्यांनी सर्व कायदे मनासारखे करून घेतलेले होते.

एखादी व्यक्ती काँग्रेस किंवा तत्सम समानधर्मी पक्षात असेल (उदा. राष्ट्रवादी), तर तो/ती नक्कीच भ्रष्टाचारी आहे हे खात्रीपूर्वक सांगता येईल.>>>>>>>>>>>. मास्तुरे तुमचा भाजपा तर दुधाचा धुतलेला ना ? ते तर शवपेट्यांमधेही भ्रष्टाचार करतात.. टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा.
अडवाणी, बंगारु, येदुरप्पा, फर्नांडीस, वाजपेयी, आणि सर्वात मोठा $%^ महाजन !!!!असले तुमचे आदर्श ?

त्यांच्याच घरात येउन त्यांनाच लाथा देण्यातच मजा असते

कळले

मी असाच आहे

त्यांच्याच घरात घुसुन त्यांच्याच भाषेत उत्तर देणारा !!

मायबोलीवर मला खरी मार्गदर्शक चर्चा अपेक्षित आहे. प्रतिसाद देणार्‍यांनी कृपा करून पक्षाचे/व्यक्तीचे नाव शक्यतोवर चर्चेत न आणता भ्रष्ट लोकप्रतिनिधी/शासकीय कर्मचारी ओळखण्याच्या सोप्या युक्त्या सांगाव्या. या बहुतेकांना माहीत असतात. उदा. पगारात करता येणार नाही अशी चैन करणारा, पगारात शक्य नसूनही महागड्या शाळांमध्ये मुलांना शिकविणारा शासकीय कर्मचाही भ्रष्टाचारी असण्याची शक्यता फार मोठी!
येथे फक्त त्या एकत्रित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिवाय किरकोळ, सामान्य, श्रेष्ठ, श्रेष्ठतर, श्रेष्ठतम, असामान्य भ्रष्टाचारी अशा वर्गवारीत त्यांना बसवायचे आहे.

>>> प्रतिसाद देणार्‍यांनी कृपा करून पक्षाचे/व्यक्तीचे नाव शक्यतोवर चर्चेत न आणता भ्रष्ट लोकप्रतिनिधी/शासकीय कर्मचारी ओळखण्याच्या सोप्या युक्त्या सांगाव्या.

पक्षाचे नाव चर्चेत न आणता चर्चा होणे अशक्य आहे. "The mother of corruption and corrupts" अशा काँग्रेसचे (आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी, राजद, द्रमुक, अद्रमुक, समाजवादी, बसप इ. समानधर्मी टोळ्यांचे) नाव भ्रष्टाचारावरच्या चर्चेत आले नाही, तर त्या चर्चेत राम नाही. भ्रष्ट लोकप्रतिनिधी ओळखण्याची सोपी युक्ती म्हणजे तो वरीलपैकी कोणत्यातरी पक्षाचा असेल तर तो भ्रष्टाचारी आहे हे डोळे झाकून सांगता येईल.

पक्षाचे/व्यक्तीचे नाव शक्यतोवर चर्चेत आणू नये असे म्हणण्याचे कारण एवढेच की पक्षही पैशाला पासरी झाले आहेत. शिवाय येथे प्रतिसादात एकाने भाजप मधील भ्रष्टाचार्‍यांची यादी दिली आहे. आता नैसर्गिक प्रतिक्रीया म्हणून कोणी काँग्रेस/राष्ट्रवादीमधील भ्रष्टाचार्‍यांची यादी करायला घेतली तर ती सामावून घेणे ईंटरनेटला शक्य तरी होईल का? द्रमुक, राजद वगैरे सोडाच.
शिवाय मागच्या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणारा एका रात्रीत काँग्रेस् /राष्ट्र्वादीत दिसायला लागतो तो काय बेगडी धर्मनिरपेक्षता आवडली म्हणून? भाजपत होता तोवर तो भ्रष्ट नव्हता आणि राष्ट्र्वादीत जाताच त्याला भ्रष्ट म्हणणे सुसंगत नाही. त्यामुळे पक्ष/माणसे यांचा उल्लेख शक्यतो टाळावा असे म्हटले. '[कोठल्याही कारणाने ] पक्ष बदलून तिकिट मिळविणारा भ्रष्ट समजावा ' असे लक्षण मांडून
असले लोक कव्हर करता येतील. यासाठी लक्षणे मांडायचा प्रयत्न करावा असे लिहिले. ही लक्षणे सिद्ध करण्यासाठी उदाहरण म्हणून पक्ष/व्यक्ति यांची नावे न देणे नेहमीच कदाचित शक्य होणार नाही हे मान्य!

>>> शिवाय मागच्या निवडणुकीत भाजपकडून निवडणूक लढवणारा एका रात्रीत काँग्रेस् /राष्ट्र्वादीत दिसायला लागतो तो काय बेगडी धर्मनिरपेक्षता आवडली म्हणून?

बेगडी धर्मनिरपेक्षता आवडली म्हणण्यापेक्षा, भाजपात असताना त्याला भ्रष्टाचाराची संधी मिळाली नसेल म्हणून तो एका रात्रीत काँग्रेस्/राष्ट्रवादीच्या टोळीत जात असणार.

भाजपात असताना त्याला भ्रष्टाचाराची संधी मिळाली नसेल म्हणून तो एका रात्रीत काँग्रेस्/राष्ट्रवादीच्या टोळीत जात असणार. >>>>>>>>>>>>>>. अडवाणी जास्त शेअर मागत असेल म्हणुन सुध्दा गेला असेल ना ........ Happy

टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा
टाळुवरचे लोणी खाणारा पक्ष म्हणजे भाजपा

फादर of corruption and corrupts लालकृष्ण अडवाणी .......देशाला जातिय दंगलीत ढकलारा अडवाणी..
देशात बॉम्बस्फोटाचे सत्र अडवाणी मुळे चालु झाले......काश्मीर पेटवणारा अडवाणी......

फादर of corruption and corrupts लालकृष्ण अडवाणी उभ्या ५० वर्षांच्या राजकीय जीवनात ज्यांच्यावर फक्त एकदाच हवाला प्रकरणात फक्त आरोप झाला. जो आरोप सी.बी.आय ने केला जी सी.बी.आय त्याही वेळेला कॉग्रेसच्या पंतप्रधानांच्या तालावर नाचत होती.

सी.बी.आय ने आरोप करताना हवाला चा सुत्रधार याच्या डायरीत एल्.के.ए नावाची चिठ्ठी ( नोंद सुध्दा नाही ) मिळाल्याचे सांगीतले.

पुढे आरोप होताच लालकृष्ण आडवाननींनी खासदारकीचा राजीनामा दिला. एक वर्षांनी जेव्हा आरोपपत्र सुध्दा निश्चित होईना तेव्हा अडवानिंनी आरोप मागे घ्यावे यासाठी सुप्रिम कोर्टात धाव घेतली. कोर्टाने त्यांना वरील पुराव्याने आरोपपत्र सुध्दा ठेवता येणार नाही सबब दोषमुक्त असा निकाल दिला व त्यापुढे ते पुढची लोकसभा निवडणुक लढले.

हीच नोंद http://en.wikipedia.org/wiki/L._K._Advani विकिपिडियावर याच शब्दात आहे.

Advani was charged in a Hawala scandal where he allegedly received payments through hawalabrokers. He and others were later discharged by the Supreme Court of India, because there was no additional evidence which could be used to charge them.[8] According to the judicial inquiry by Central Bureau of Investigation (CBI) they could not find any substantive evidences; the Supreme Court ruling stated that no statement even mentioned Advani's name and that evidence against him was limited to the mention of his name on a few loose sheets of paper.[8]

जितका तो आरोप हास्यास्पद तितकीच सुमित यांची फादर of corruption and corrupts लालकृष्ण अडवाणी म्हणणे हास्यास्पद , बालीश.

अडवानिंनीच मशीद पाडली. मुसलमानांच्या पोटात खुलेआम सुरा भोसकुन दंगलीला सुरवात केली अस म्हणायला मात्र माझी काहीच हरकत नाही.

नितीनचंद्र,

तुमची कमाल आहे. असलं काही तरी विनोदी वाचून स्वतःचं मनोरंजन करून घ्यायचं सोडून कशाला हे फालतू आरोप सिरीयसली घेताय? Biggrin

बेफिकीर सर कसे एन्जॉय करताहेत, तसंच तुम्ही पण करू शकता.

भष्ट्राचारी कसा ओळखावा?, हा प्रश्नच चुकीचा आहे. सदाचारी कसा ओळखावा?, असा खरा प्रश्न विचारला पाहीजे.

एक प्रतिसादी भयानक कावीळग्रस्त दिसतोय! त्याची कावीळ लिव्हर सिर्‍होसिसवर जाईल अशी लक्षणे वाटतात. अशा पीडित व्यक्तीकडे दुर्लक्ष करून त्याला रोगमुक्त होण्याची सर्वांनी संधी द्यावी.
अँटीमॅटर जी, 'सदाचारी कसा ओळखावा?' याचे उत्तर देणे तुलनेने कदाचित सोपे जाईल. संतमंडळींनी यावर प्रचंड काम केलेले आहे. त्यांच्याभोवती सज्जनच गोळा झाल्याने त्यांनी त्यांचाच अभ्यास केला. आपण सर्वजण मात्र भ्रष्टाचार्‍यांनीच वेढले गेलेलो आहोत त्यामुळे भ्रष्टाचार्‍यांना खूप जवळून ओळखतो आहोत. त्यामुळे भष्ट्राचारी कसा ओळखावा? याचे सोपे उत्तर आपल्यालाच शोधायला लागेल.

लेख काय, प्रतिसाद काय ? Angry

@दामोदरसुत :
भ्रष्टाचाराचे पहिले लक्षण: माणूस वापरत असलेली गाडी !
माणसाच्या गाडीची किंमत जर त्याच्या अधिकृत वार्षिक उत्पन्नापेक्षा 10+ लाखाने जास्त असेल तर तो माणूस नक्कीच भ्रष्टाचारी समजावा (खाजगी नोकरीत असेल तरीही) !
आता नुसते गल्लीत पजेरो, फोर्चूनर, रेंज रोव्हर इ. फिरवणारे लोक बघा आणि यादी करायला लागा. Proud

टीप: मी वापरत असलेली म्हणलंय ! मालकीचीच असेल असे काही नाही.
नाहीतर आमच्या साहेबांकडे गाडीच नाही म्हणून सुरु होतील लोक.

>>>>खराखुरा भ्रष्टाचारी बिनचुकपणे कसा ओळखायचा? <<<<
म्हणल तर प्रश्न सोप्पाहे, म्हणल तर अवघड आहे. का अवघडे?
आता अस पहाऽऽ, की एखाद्या स्त्रीला समोरील एखादा पुरुष "लम्पट" वाटतो, व ती तत्काळ स्वतःला "सुरक्षित" करुन घेते, पण त्या स्त्रीला जर विचारले की "कस काय ग तू ओळखलस की तो पुरुष तस्साच लम्पट/चालू आहे" तर त्या स्त्रीला ते नेमक्या शब्दात सान्गता येत नाही. तिनी तिचा उपजत सिक्स्थ सेन्स वापरलेला अस्तो. तर, अगदी तस्सच, सिक्स्थ सेन्स द्वारे देखिल "भ्रष्टाचारी" माणूस सहज ओळखता येतो. पण मी अस कै म्हणल ना, की लग्गेच ते अन्निसवाले बुप्रालोक धावत पळत येतिल बघा "विज्ञान बुडाले" चा आक्रोश करीत Proud तेव्हा हे एकन्दरीत अवघडच प्रकरण आहे.
भ्रष्टाचारी व्यक्ति ओळखणे सोप्प आहे, पण त्याने भ्रष्टाचार केलाय हे सिद्ध करणे अवघड आहे!
अन समजा सिद्ध करू शकत असलो, तरी पुढे काय? गावात शिल्लक रहायचय ना मला? माझ्या पोराबाळान्ना?

>>>>> शिवाय किरकोळ, सामान्य, श्रेष्ठ, श्रेष्ठतर, श्रेष्ठतम, असामान्य भ्रष्टाचारी अशा वर्गवारीत त्यांना बसवायचे आहे. <<<<
आयल्ला! कृष्णाचा चातुर्वर्ण्य या भ्रष्टाचार्‍यान्ना देखिल लागू पडतो की क्क्वॉय? Wink अर्थात त्यात नवल ते काय? चातुर्वर्ण्यं मया सृष्ट्यं असच तर आहे ना? Proud

आतापर्यंतच्या प्रतिसादांमधून हे प्रतिसाद विचार करण्यायोग्य वाटतात
[१] अँटीमॅटर म्हणतात- एकदा भ्रष्टाचारी पकडण्याचं यंत्र तयार होते. जगभरातले भ्रष्टाचारी पकडले जातात. जेव्हा ते मशीन भारतात येते तेव्हा त्या मशीनच्या खरेदीतच आपले नेते 'भ्रष्टाचार' करतात, आता बोला.
[२] हिप्पो म्हणतात- भ्रष्टाचाराचे पहिले लक्षण: माणूस वापरत असलेली गाडी !
माणसाच्या गाडीची किंमत जर त्याच्या अधिकृत वार्षिक उत्पन्नापेक्षा 10+ लाखाने जास्त असेल तर तो माणूस नक्कीच भ्रष्टाचारी समजावा (खाजगी नोकरीत असेल तरीही) !
[३] limbutimbu म्हणतात-एखाद्या स्त्रीला समोरील एखादा पुरुष "लम्पट" वाटतो. कसा?तिनी तिचा उपजत सिक्स्थ सेन्स वापरलेला अस्तो. तर, अगदी तस्सच, सिक्स्थ सेन्स द्वारे देखिल "भ्रष्टाचारी" माणूस सहज ओळखता येतो.
बाकी लिंबुटिंबू , तुमचा बोली भाषेच्या अंगाने जाणारा प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचावासा वाटला.
[४] मास्तुरे म्हणतात- "भ्रष्ट लोकप्रतिनिधी ओळखण्याची सोपी युक्ती म्हणजे जो The mother of corruption and corrupts" अशा काँग्रेस (आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी, राजद, द्रमुक, अद्रमुक, समाजवादी, बसप इ. समानधर्मी टोळ्यांचा) पक्षाचा असेल तर तो भ्रष्टाचारी आहे हे डोळे झाकून सांगता येईल.
मास्तुरे यांचा प्रतिसाद अतिशयोक्त वाटला तरी या वर उल्लेख केलेल्या पक्षांच्या भ्रष्टाचारी दिग्गजांची यादी व या पक्षांमध्ये शिरण्यासाठी जी तुंबळ गर्दी आणि हाणामारी चालू आहे त्यावरून तेथे कमाईला आणि ती पचविण्याला खूप संधी असावी. त्यामुळे भ्रष्टाचारीच या पक्षांच्या गाडीत (यातल्याच एका पक्षाच्या डब्यातून दुसर्‍या पक्षाच्या डब्यात देखील) घुसण्याचा प्रयत्न करताहेत असे म्हणायला जागा आहे. पण यातलेच कांही वरच्या कोणत्याच पक्षांच्या डब्यात घुसता न आल्याने भाजपच्या डब्यात जागा का मिळवीत आहेत?