मायबोली शीर्षकगीताच्या बद्दल सई कडुन समजल ,तेव्हा सर्वप्रथम मायबोलीची वाटचाल खरोखर एका कॉर्पोरेटच्या साऱखी चालली आहे ह्याची खात्री पटुन खुप छान वाटलं.त्यावेळी माझा ह्यात काही सह्भाग नसणार होता ,तेव्हाच पुण्यातल्या रेकॉर्डिंग बद्दलही समजल ,त्याला moral support द्यायला जमल नाही ह्याची थोडी हुरहुरही वाटत होती.पुढे ह्या गाण्यात आपला काही सहभाग असणार आहे हे ध्यानीमनीही नव्हत.
काही दिवसानी सईचा फोन आला,तिच्याकडुन समजल,की अजुन पुण्यात थोड रेकॉर्डिंग होण बाकी आहे,त्या करता तिने मिहिर बरोबर माझही नाव योगला सुचवलय.लगेच योगची मेल आलीच्,पाठोपाठ track आला,आणि मिहिर कडे रात्री बसुन skype conference करायची ,अस ठरलही.तो दिवस येई पर्यन्त पुन्हा गाण्याचा विचार शुन्य झालेला.मग गाण्याचा विचार करायला लागलो,मग त्याचा पुर्वानुभव काय्?तर कॉलेजच्या गेटटुगेदर मधला गाण्याचा अनुभव गाठीला आहे, हुस्श.. पण त्याला आता जमाना झाला ना राव्..आता शॉप फ्लोलअरवर बोम्बलुन आवाजाची पार वाट लागल्ये ना !!!(कशाला आरडाओरडा करतोस गड्या,आता लागणार समस्त कामगार चळवळीचे शिव्याशाप )
पण त्या योगला काय माहिती आपला आवाज कसा आहे ते?
अरे यार पण ते कळाल्याशिवाय काय तो आपल्याला वाइल्ड कार्ड एन्ट्री देणारे?
सईला जरा मस्का मारावा तर बाईसाहेबानी आधीच ''सवाइ चालु आहे मला काही Distrub करायच नाही ''अशी तम्बी दिलेली,आता आवाजाच सोन्ग आणायच कस ? पडोसन मधल्या सुनिल दत्त सारख करायच पण त्याला तरी आपल्याला Playback द्यायला कुठला किशोर कुमार येणारे ?बस्स आता शेवटचा आधार मिहिरच फक्त त्याला भेटलो तर त्याचीही अवस्था माझ्यापेक्षा फार वेगळी नाही ....आता ?
आता आम्हाला दोघानाही आधार फक्त कधीही न भेटलेल्या योग चाच ..
तर ठरल्या प्रमाणे बरोबर रात्री ९ वाजता हे योगी बाबा मिहीरच्या laptop screenवर प्रगट झाले,प्रथम बहुतेक त्यानेच आमची एकन्दर अवस्था ओळखली ,आणि पहिल्या २ मिनिटातच आम्हाला नॉर्मल केल .
काही ओळी गुणगुणल्यावर लगेच आम्हाला आमच्या कुवती नुसार कडवी देवुन ह्या माणसानी पुढच्या २० मिनिटात २-३ वेळा त्याच्या रिहर्सलही करुन घेतल्या..बास योग म्हणजे फक्त योगच ..
१-२ वेळा केलेल्या सिटिन्ग्स्चा उपयोग नक्किच झाला ,आवाज थोडा का होइना पण गाण्यालायक झाला (अस निदान स्वत:ला तरी वाटायला लागल) हे ही नसे थोडके.आता योगला आमच्या रे़कॉर्डिन्ग करता पुन्हा भारतात याव लागणार आणी आम्हाला मुम्बैत जायला जमणार नसल्यानी पुण्यातच याव लागणार हेही नक्कि झाल.लगेच पुढ्च्या हालचाली करुन स्टुडिओ मिळाला,३१ ला रे़कॉर्डिन्ग च्या आधी भरल्यापोटी आम्हाला धरुन योग गुरुजीनी तालिंम पण मस्त घेतली,खरतर तोच येवढा छान गात होता कि आम्ही न रहावुन तु तुझाच आवाज का नाही ठेवत? अस विचारल.
तालीम आमच्या घरी झाल्यांमुळे मी जास्त बिन्धास्त होतो,रे़कॉर्डिन्गमधे बहुतेक track volume जास्त असल्यानी सुरुवातीला जरा घोळ झाला,पण योगनि कायम टेम्प्रामेन्ट छान ठेवण्यात मदत केली,त्याच्याशिवाय निदान मलातरी नसत गाता आल(म्हणजे सचिन पार्टनर असल्यावर ऐरागैरा पण खेळुन जातोना तसच काहिस..)त्यातुन जरा वेळानी आम्हाला धीर द्यायला सई पण हजर झाली.
मिहिरनी आणि योगनी एकत्र शेवटचा एक अन्तरा गावुन मजा आणली.
आता ह्या प्रकल्पाचा मला झालेला उपयोग असा की मला स्वत:ला माझे Skill Set डेव्हलप करायची आवड आहे,गाण म्हणजे तर विक पॉइन्ट ,येवढे वर्ष ऐकण्यापुरताच मर्यादित होता,ह्या निमित्तानी रेकॉर्डिन्ग करुन झाल,हा माझा वैयक्तिक फायदा मानतो,ह्या झालेल्या फायद्यात वाटेकरी खुप आहेत सई,जर तिनि माझ नाव सुचवल नसत तर मला ही सन्धी मिळालिच नसती ,मिहिर्,आणि विशेष म्हणजे मिहिरच्या घरच्यानी (त्याच्याबरोबरच्)माझाही आवाज सहन केला.
सगळ्यात महत्वाचा योगेश ,त्याची अफाट मेहनत ,त्याचे ह्या प्रकल्पामधले Dedication प्रचन्ड होत,
आणि हे सगळ असुन त्याची न चिडता,वैतागता,प्रत्येक बाब समजावुन घेणे आणी देणे आणि हे करताना स्वतः काहि खुप करतोय हे दुसर्याला जाणवुन सुद्धा न देता अपेक्षित काम करुन घेण हे मला वाटतय ह्या प्रकल्पाच्या यशाचे मुळ कारण आहे.
मायबोलीच्या पुढच्या अशा कुठ्ल्याही प्रकारच्या उपक्रमामध्ये मला वाटतय ''योग्'' हवाच!!
मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:
झलक मधील गाय़कः
१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)
तरी आपल्याला Playback द्यायला
तरी आपल्याला Playback द्यायला कुठला किशोर कुमार येणारे ? >>>:हाहा:
>>आता आवाजाच सोन्ग आणायच कस ?
>>आता आवाजाच सोन्ग आणायच कस ? पडोसन मधल्या सुनिल दत्त सारख करायच पण त्याला तरी आपल्याला Playback द्यायला कुठला किशोर कुमार येणारे ?
हाहाहा...
आवाजाचं सोंग खरच नाही आणता येत..
बाकी गुरूजी (किशोर दा) हयात असते तर अगदी हाता पाया पडून, घर गहाण टाकून (गुरूंचा काही भरवसा नाही अशा विक्षीप्त मागण्या करण्याच्या त्यांच्या कहाण्या प्रसिध्द आहेतच!) सुध्दा हे गाणं त्यांना गायला पटवलच असतं... आता ते वरून आपल्याला एव्हडच म्हणतात- भोले नीचे से!!!
मजा आली वाचताना....छान लिहीले
मजा आली वाचताना....छान लिहीले आहे....एक नवा अविस्मरणीय अनुभव...
मस्त लिहिलंस अंबर.
मस्त लिहिलंस अंबर.
छान लिहीलं आहे, अंबर्..कॉलेज
छान लिहीलं आहे, अंबर्..कॉलेज चं गेट टूगेदर मध्ये गाणं ते शॉप फ्लोअर वर बोंबलणं ते स्वतःच्या गाण्याचं रेकॉर्डींग्...व्वा..प्रवास भारी आहे !! पुढच्या टप्प्यासाठी शुभेच्छा!
योग, <<... आता ते वरून आपल्याला एव्हडच म्हणतात- भोले नीचे से >> मस्तं..
मस्तच भोले नीचे से!!! >>>
मस्तच
भोले नीचे से!!! >>>
मज्जा आली वाचताना छान केला
मज्जा आली वाचताना
छान केला आहेस तुझा अनुभव शब्दबद्ध !!
बाकी योगेश्वराबद्दल जे काही लिहिलं आहेस ते अगदी अगदी !!!!!!!
योग, तुझ्या किशोरकुमारप्रेमाबद्दल शंकाच नाही. खरंच टाकलं असतंस बाबा तू घर गहाण
अस काहीतरी खर्डायचा हा खर तर
अस काहीतरी खर्डायचा हा खर तर माझा पहिलाच प्रयत्न ,रेकॉर्डिन्ग तरी पाहिली आहेत आधी ,पण कुठ्ल्या लेखकाला लिहिताना पाहिलेल नाहिये कधी :))त्यामुळे लिहायच टेन्शन जास्त होत.त्यातुन मायमराठी नुस्ती लिहीणे आणी टाइप करणे ह्यात माझ्यासाठी तरी जमीनअस्मानायेवढे अन्तर आहे,व्याकरणातल्या चुका दिस्तायत आणी दुरुस्त करता येत नाहियेत असली चिडचिड होत्ये आइशप्पथ.
पण नाइलाज आहे मित्रहो
त्यामुळे गाण्यापरास लिहिणे ही कला महान आहे हे कोणाच तरी विधान मला उगाचच मान्य आहे.
समस्त चुका माफ करुनही हे तुम्हाला आवड्ल ह्याच्यात माझ्या पेक्ष्या तुमच क्रेडिट जास्त आहे.म्हणुनच
श्यामली ,योग्,सुलेखा ,शैलजा,युगन्धर्,जयवी,Indradhanushya .. धन्यवाद म्हणण्यापेक्ष्या तुमचेच अभिनन्दन.
मस्त !
अंबर, अगदी सहज ओघवतं
अंबर, अगदी सहज ओघवतं लिहिलंय.... आवडलं.
या निमित्ताने तुमच्यासारखे जुने मायबोलीकर परत अॅक्टिव्ह झाले ही फार आनंदाची गोष्ट आहे.
अंबर छान लिहिलयस
अंबर छान लिहिलयस
(No subject)
(No subject)
मजा
मजा
या निमित्ताने तुमच्यासारखे
या निमित्ताने तुमच्यासारखे जुने मायबोलीकर परत अॅक्टिव्ह झाले ही फार आनंदाची गोष्ट आहे.>> +१
मजा आली वाचायला
छान लिहिलंय. आता दोन दिवसांत
छान लिहिलंय.
आता दोन दिवसांत संपूर्ण गाणं प्रकट होईल आणि सर्वांचे आवाज ऐकायला मिळतील.
रैना ,सुजा ,अगो,अनिताताई
रैना ,सुजा ,अगो,अनिताताई मनापासुन धन्यवाद
अम्बर? तूऽ आणि गाऽऽणेऽऽऽ? आँ?
अम्बर? तूऽ आणि गाऽऽणेऽऽऽ? आँ? त्या रोबोटीक्स वगैरेमधुन इकडे कुठे आला? हे कॉम्बिनेशन काय पटत नै बुवा!
मी बघितलेला तेव्हान्चा अम्बर तो तसा, अन आत्ता तोन्डापुढे माईक धरुन गाणे म्हणतोय असे चित्र मला कल्पनेत पण रेखाटता येत नाही रे भो! हे म्हणजे त्या सीआयडी मालिकेमधला दया नैतर अभिजित माईक घेऊन गाणे म्हणताहेत अस दिसल तर कस वाटेल, तस वाट्टय.
असो, म्हणलास ना ब्येस? व्हेरी गुड्ड!
चान्गल लिहीलय.
धन्यवाद रे.आता गाणारा ऱोबो
धन्यवाद रे.आता गाणारा ऱोबो बनवायचा म्हणतोय
मस्त रे अंबर........
मस्त रे अंबर........
अरे वा! आत्ताच मी संपूर्ण
अरे वा! आत्ताच मी संपूर्ण गाणं ऐकलं. तुझा एक नवाच पैलू समजला. पुण्यात आलो की प्रत्यक्ष भेटेनच!
Bhunga,Manoj-Khup Khup
Bhunga,Manoj-Khup Khup Dhanyawaad:)
अंबर मस्त लिहलयस. आणि गाणं ही
अंबर मस्त लिहलयस. आणि गाणं ही ऐकले आता. काय ते रोमांच बिमांच वगैरे उभे रहातात तसं झाले.
अभिनंदन तुझे आणि सगळ्यांचेच. अत्यंत सुंदर टीमवर्क !!
निलूताई तू म्हणलीस ते अगदी
निलूताई तू म्हणलीस ते अगदी खरंय ..टीमवर्क आहेग,तरी आमच्या सेशन ला तर आम्ही ३ जणच होतो पण मजा आली,,खुप धमाल केली आम्ही