मागणे हेचि

Submitted by pulasti on 27 March, 2009 - 15:42

फार जुनी कविता आहे.. ९४/९५ साली कधीतरी केलेली

मागणे हेचि

करीन साजरे, अपयशाचे सण,
यशाचे उधाण, पचवीन

रिचवीन कुम्भ, बेधुन्द क्षणांचे,
तीव्र वेदनांचे, आनंदाने

मात्र कधी मला, मिळू नये एक,
वांझ कफ़ल्लक, क्षण असा -

मागल्या क्षणाचा, भार वाहणारा,
वाट पाहणारा, पुढल्याची...

गुलमोहर: 

वार्‍याची बात !
वार्‍यावरची नाही !! ---
" सुंदरच ! "

सुरेख !

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

अप्रतीम!!!!

सुमेधा पुनकर Happy
**************************************
पतंग्यानेच का जावं आगीजवळ ?
ज्योतीला सांग, नमन कर ना एकदा
**************************************

सुरेख, पुलस्ती.
मात्र कधी मला, मिळू नये एक,
वांझ कफ़ल्लक, क्षण असा -

मागल्या क्षणाचा, भार वाहणारा,
वाट पाहणारा, पुढल्याची...
क्या बात है!

मात्र कधी मला, मिळू नये एक,
वांझ कफ़ल्लक, क्षण असा -

मागल्या क्षणाचा, भार वाहणारा,
वाट पाहणारा, पुढल्याची......................... तथास्तु Happy
~~~~~~
इथे डोकवा. http://jayavi.wordpress.com/
आणि कविता.... इथे http://maajhime.blogspot.com/

सुंदरच.
..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

छान!!

कफल्लक... व्वाह! क्या बात!

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद!

आवडेश Happy

-------------------------------------------------------------------------------
राग लोभ, अन खेद खंत हे
दिले घेतले इथेच ठेऊ
"तिथे" न लागे ह्यातील काही
आलो तैसे निघुन जाऊ

मात्र कधी मला, मिळू नये एक,
वांझ कफ़ल्लक, क्षण असा -

मागल्या क्षणाचा, भार वाहणारा,
वाट पाहणारा, पुढल्याची...

अप्रतिम.
************
निजरुप दाखवा हो, हरि दर्शनास या हो |