ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस - २०१२

Submitted by Adm on 10 January, 2012 - 13:40

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, येत्या सोमवार पासून (१६ जानेवारीपासून) सुरू होणार आहे. सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविक आणि डेन्मार्कची कॅरोलाईन वॉझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीत अग्रमानांकन मिळालं आहे.

ड्रॉ येत्या शुक्रवारी जाहीर होणार आहेत. मानांकन यादी इथे पहाता येईल.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षात मयूरेश ??? किती स्पर्धांनंतर उगवलास? आता ये ही स्पर्धा सुरू असे पर्यंत..

हिम्या.. काल मटामध्ये बातमी वाचून खरचं एकदम जागं व्हायला झालं. मग लगेच धागा काढला... Happy

>>मटामध्ये बातमी वाचून
हे काय बरोबर नाही. १ जानेवारीलाच जाग येते. यावेळी क्रिकेट मॅचच्या मध्येच जाहिरात यायची तेव्हा डिसेंबरमध्येच जाग आली.

धाग्याला शुभेच्छा म्हणून-
fedi_n.jpg

जिंकणार गं बाई जिंकणार
ज्योकोविक ही सुद्धा जिंकणार

राफा, फेडरर, वॉझनियाकी, क्लायज्टर्स सरळ जिंकले काल..

आज क्विटोव्हा, ज्योको, शारापोव्हा, सेरेना.. चांगल्या मॅचेस आहेत सगळ्या..

क्विटोव्हाची सुरूवात जरा अडखळत झालीये पण आता चांगले फटके मारत्ये.

कालच्या दिवसात काही सीडेड झोपलेच पण... लौकिकाला जागतेच ही स्पर्धा.. पहिल्या दिवशी ३२ सीडेड पैकी चार पाच तरी बाहेर जातातच...

अरे बघतय की नाही कोणी ?
काल राफाची मॅच चांगली झाली. किम जोरदार खेळून फक्त ४८ मिनीटांत जिंकली..
वॉझनियाकीनी सुरूवात चांगली केली होती.. दुसर्‍या सेटच्या मध्यावर ढेपाळली जरा पण सावरली नंतर.
फेडररला वॉक ओव्हर मिळाला !
आज रॉड लिवर अ‍ॅरेना वर शारापोव्हा, सेरेना आणि ज्योको..

काला सेरेना आणि शारापोव्हा जोरदार खेळल्या.. ! ज्योकोही मॅच पुढे गेली तसतसा पेटला..
त्सोंगाची मॅच जरा टफ झाली. पण जिंकला.
आज पण चांगल्या मॅचेस आहेत संध्याकाळी.

हो जबरी झाली ती मॅच !!
किम दोन मॅच पॉईंट्स वाचवत जिंकली. तिच्या पायाला दुखापतही झाली होती पहिल्या सेटमध्ये.
राफाची मॅचपण चांगली झाली. दोघांनाही पहिले दोन सेट समोरच्याची सर्व्हिस ब्रेक करणं अवघड जात होतं.. तिसरा सेट त्यामानाने एकतर्फी झाला.
फेडरर टॉमिक अगदीच साधी झालेली दिसत्ये.
आज ज्योको वि हेविट आहे. मेन्समध्ये बरेच सिडेड प्लेयर अजून आहेत...

सेरेना हरली !
तिने बहूतेक आऊट मारायचा रेकॉर्ड करायचं ठरवलं होतं. सेरेनाला कधी असं बॉलच्या मागे धावताना पाहिलं नव्हतं!

निशिकोरी आणि त्सोंगाची मॅचपण जबरी चालू आहे. २ सेट्स इच !

मघाशी क्विटोव्हा दोन सेटमध्ये जिंकली पण इव्हानोविकने अगदीच सोडली नाही मॅच. बरी खेळली तशी..

काल त्सोंगाची मॅच जोरदार झाली. हरला बिचारा.. ! Sad
मी साधारण साडेचार सेट्स पाहिले. तो जपानी खेळाडू निशिकोरी छान खेळत होता. त्सोंगाचे ताकदवान फटके सहज परतवत होता अगदी.
आत्ता ज्योको हेविट सुरू आहे. बर्‍यापैकी एकतर्फी चालली आहे.
शारापोव्हाला लिसिकीने झुंजवलेलं दिसतय.

ती त्सोंगा इशीकोरी मॅच झाल्यावर फेडरर ची मुलाखत होती .. त्यात तो काय काय कोपरखळ्या मारत होता कोणाकोणाला .. खेळात योग्य ते बदल करायचे म्हणून कोणी डाएट बदलतो वगैरे वगैरे .. आणि नादाल चौथा फेव्हरेट (मी आणि मरे नंतर) कसा काय ह्याचं मला आश्चर्य वाटतंय वगैरे ..

:|

किमने ३९ विनर्स मारले आणि जवळजवळ तेव्हड्याच एरर केल्या :|
तिचा चेहेरा केव्हडा लाल झाला होता उन्हाने. वॉझनियाकी फार काही करत नव्हती पण किमच्या चुकांमुळेच तिला बरेच पॉईंट्स मिळाले.
मघाशी अझारेंका राडावान्स्का मॅच पण मस्त झाली. पाहिला सेट टायब्रेकर मध्ये हरल्यानंतर अझारेंका पेटलीच एकदम !! दुसरा ६-० घेतला आणि तिसराही बराच सहज जिंकली.
आता पुढच्या फेरीत किम वि अझारेंका...

पग्या तू उगाच कोणताही घोडा पकडत असतोस.. डेल पोट्रो सरळ सेट मध्येच हरतो आहे बघ...

काल जोकोची मॅच मस्त झाली.. तिसर्‍या सेट मध्ये हेवीट एकदम हेवीवेट सारखा अंगावर आला होता.. पण फायनली जोको जिंकलाच...

राफा शेवटचे दोन्ही सेट कसला भारी खेळला.. जबरी पासेस आणि क्रॉस कोर्ट फोरहँड मारले.. !!

अरे.. डेल पोट्रो घोडा बिडा नाही रे.. पण दुखापतीतुन सवरल्यापासून पहिल्यांदाच इतका चांगला खेळलाय ग्रँड स्लॅम स्पर्धेत म्हणून जरा तरी फाईट देईल अशी आशा होती...

काल बायांनी फार वेळ घेतला. नुसत्या बेसलाईनवरुन मारत बसलेल्या. अझारेंका-राडावान्स्का फडतूस खेळत होत्या, एकीलाही सर्विस टिकवता येत नव्हती. त्यापेक्षा किम- वॉझनि मॅच बरी झाली.
पोट्रो- फेडीचे ३ गेम्स बघून मी झोपले.

मेन्स सेमी मध्ये मज्जा येणार आणि लेडीज सेमी मध्ये पण मज्जा येणार.. मेन्स मध्ये १,२,३,४ आणि लेडीज मध्ये २,३,४,११ सीड चे प्लेअर्स एकमेकांविरुद्ध खेळणार...

विजय अमृतराजचं भाकित... मरे जोको ला ४ सेट मध्ये हारवणार...

फेडेक्स - राफा मॅच जबरी व्हायला पाहिजे.. २००९ मध्ये झाली तशी ५ सेटर...

लेडीज मध्ये नेमक्या किम आणि मारिया सेमी मध्येच एकमेकींविरुद्ध खेळतायेत.. ह्यांच्यातली विजेतीच बहुतेक फायनल जिंकणार..... मारियानी आज जबरीच खेळली.. चवथी फेरीच तेव्हढी अवघड होती तिच्या साठी.. सेमी पण अवघडच आहे..

Pages