ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस - २०१२

Submitted by Adm on 10 January, 2012 - 13:40

यंदाच्या वर्षीची पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा, अर्थात ऑस्ट्रेलियन ओपन, येत्या सोमवार पासून (१६ जानेवारीपासून) सुरू होणार आहे. सर्बियाचा नोव्हाक ज्योकोविक आणि डेन्मार्कची कॅरोलाईन वॉझनियाकी ह्यांना अनुक्रमे पुरूष आणि महिला एकेरीत अग्रमानांकन मिळालं आहे.

ड्रॉ येत्या शुक्रवारी जाहीर होणार आहेत. मानांकन यादी इथे पहाता येईल.

ह्या स्पर्धेसंबंधी चर्चा करण्यासाठी हा धागा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टीपी करू नका. मुद्द्याच बोला.
कोण जिंकणार सेमी आणि फायनल.

माझ्यामते. फेडरर वि. मरे फायनल. जिंकणार फेडरर.

तसे पण ऑस्ट्रेलियात घडणार्‍या गोष्टींबद्दल भाकित करण सध्या धाडसच आहे. ४-० कुणाला वाटल होत.

हिम्या नाही रे... किम वि अझारेंका आहे आणि क्विटोवा वि शारापोव्हा आहे.
हो.. काल शारापोव्हा जबरी खेळली. पण किमचं झालं साधारण तसचं शारापोव्हाचं झालं.. विजयाच्या अगदी जवळ आल्यावर अचानक मॅच संपवायची घाई केल्यासारखं खेळल्या आणि मग एरर केल्या !

निशिकोरी अगदीच झोपला मर्‍यापुढे..
राफा वि. फेडरर इव्हिनिंग सेशन ला ठेवली आहे.. ३ ल उठावं लागणार आता !!

मरे हरवणार ज्योको ला? मला नाही वाटत तसं होईल असं ..

ज्योको आणि फेडरर होईल फायनल असं मला तरी वाटतंय ..

इवान लेंडल ची मुलाखत पाहिली का? लेंडललाही पूर्ण काँफिडन्स वाटला नाही मरे फायनल ला जाईल ह्याबद्दल ..

काल फेडरर आणि रॉड लेव्हर ह्यांची बातचीत होती मरे-निशिकोरी मॅच संपता संपता .. फेडरर shrewd आहे ..

पग्या.. बरोबर रे.. काल काही तरी चूक झाली बघण्यात... लेडीज फायनल शारापोव्हा आणि अझारेन्का मध्ये होणार..

कविताला काय जमले नाही...
सध्या दोन जुने (वयस्क) खेळत आहेत.. (असं वाटतंय) Proud

वा वा वा मजा आली.. जागत बसल्याचं सार्थक झालं.. दुसरा सेट सोडून बाकीचे तीनही मस्त झाले.. टिपीकल राफा आणि टिपीकल फेडरर शॉट्स बरेच बघायला मिळाले.. राफाची सर्व्हिस एकंदरीत खूपच सुधारली आहे.. गेल्या दोन्ही मॅचेसमध्येतर हे प्रकर्षाने जाणवलं.. तिसर्‍या आण चौथ्या सेटमध्ये फेडररला सर्व्हिस राखणं बर्‍यापैकी अवघड गेलं त्याच्या नेहमीच्या मानाने.. चौथ्यासेटमध्ये वाया घालवलेले ब्रेक पॉईंट्स राफाला भोवतात का काय असं वाटायला लागलं होतं..

एकंदरीत कालच्या तीनही मॅचेसमध्ये जास्त विनर्स मारण्यापेक्षा कमी एरर्स करणं महत्त्वाचं ठरलं..

किम जिंकायला हवी होती फक्त.. ती गेल्या तीनही मॅचेसमध्ये ज्योको स्टाईलने स्ट्रेच करून मारत होती..!

क्विटोव्हा हरली ते बरं झालं..! अर्थात शारापोव्हाला अझारेंका विरूद्ध एकदम प्लॅन करून खेळावं लागेल.. नाहितर अझारेंकाच्या ताकदवान खेळापुढे शारापोव्हाचा टिकाव लागणार नाही..

बायदवे.. त्रिविक्रम कुठे दिसत नाहीत ते ??? Happy

एकंदरीत कालच्या तीनही मॅचेसमध्ये जास्त विनर्स मारण्यापेक्षा कमी एरर्स करणं महत्त्वाचं ठरलं.. >>>पराग,एकदम बरोबर बोललास. फेडररला हेच भोवलं आजच्या मॅचमध्ये... :(. पण एकुण मजा आली मॅच पाहताना.

महिलांमध्ये मला तरी वाटतय की अझारेंका जिंकेल बहुतेक शारापोव्हाविरूध्द.

उद्या जोको आणि मरे. मरे जोकोला फाइट देईल का?लेंडल गुरू म्हणुन मरेला खरोखर किती
फायद्याचा ठरला आहे ते उद्या कळेल. :).

पेस पुरूष दुहेरीच्या फायनलमध्ये आणि मिश्र दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये तर भूपती आणि सानिया मिश्र दुहेरीच्या सेमीफायनलमध्ये पोचलेत. Happy

>>राफाची सर्व्हिस एकंदरीत खूपच सुधारली आहे
आजची सुधारलेली होती?? Proud

मरेवर फार विश्वास दाखवू नये. अजूनतरी. तो अवसानघातकी माणूस आहे.

बायकांची फायनल म्हणजे कुथाकुथी मॅच असणार. Proud

फेडरर-नदाल सामने पूर्वीसारखे होत नाहीत आता. फेडररची सर्व्हिसमध्ये सातत्य आणि पॉवर राहिलेले नाही. तसेच तो बर्‍यापैकी लगेच ढेपाळतो आजकाल. त्यामुळे तो नदालला इथून पुढे कधीही हरवू शकेल असं वाटत नाही. पूर्वी जरा टफ व्हायच्या मॅचेस. आता अपेक्षित निकाल लागतो.

नद्दूने काल फर्स्ट सर्व्ह बर्‍यापैकी चांगल्या केल्या. तसेच दुसर्‍या सेटमध्ये काहीकाही फटके अप्रतिम मारले. फेडरर दुसरा सेट हरल्यावर मी झोपलो, कारण तो पुढचे दोन्ही सेट हरणार हे माहित होते.

फेडरर फॅन लोकांनी दुसरा घोडा शोधा आता, तुमचा घोडा म्हातारा झाला. Proud
गो जोको ! Proud

मर्‍या कृपया जिंकू नये. नदाल त्याला सहज काढेल.

पेस भूपती आणि मिर्झा हे भारतीय आहेत ह्या गोष्टीचा पूर्ण आदर राखून मला असे म्हणावेसे वाटते की दुहेरी आणि मिश्र दुहेरी हे टेनिसमधले अत्यंत बोरिंग प्रकार आहेत. त्यामुळे ह्यांचे विशेष कौतुक वाटत नाही.

त्यापेक्षा निशिकोरी हा आशियाई खेळाडू एकेरीच्या क्वार्टर फायनलपर्यंत पोचला ह्याचा जास्त आनंद झाला. कित्येक वर्षे एकेरीमध्ये कोणताही आशियाई चांगला खेळाडू नाहीये.

>> मर्‍या कृपया जिंकू नये. नदाल त्याला सहज काढेल.

खाऊन टाकेल. माझ्यामते ज्योको सरळ सेटमध्ये धुणार आहे मर्‍याला.

काही असो, आजची मॅच सॉल्लिड झाली. आणखी एक सेट व्हायला हवा होता. चौथ्या सेटच्या शेवटी फेडरर अगदीच अनपेक्षितपणे ढेपाळला पण तरी आजचं स्कोअरकार्ड डझण्ट डू जस्टिस टू द फियर्स कॉण्टेस्ट!

फायनल झकास होणार आता!

नदाल त्याला सहज काढेल. >>>> चांगलय की मग Proud

तो अवसानघातकी माणूस आहे. >>> अगदी अगदी !

आजची सुधारलेली होती?? >>> कालची त्याची सर्व्हिस चांगलीच होती की! ७७ % पहिली सर्व्हिस बरोबर आणि त्यातला ६९ % वेळा पॉईंट्स मिळवली.. फेडरर, ज्योको वगैरेंसारख्या धपाधपा एसेस राफा कधीच मारत नाही. पण काल त्याने स्वतःची सर्व्हिस सहज राखता येण्याइतपत चांगली केलीच की. दिशेमध्ये पण चांगलं वैविध्य होतं.

सशलने का राजिनामा दिलाय वर ? तिला कोणी घालूनपाडून बोललं का? Proud

तो राजिनामा नाही ..

फेडरर प्रेमींसाठी दिलेलं सांत्वनपर स्मित आहे ..

ज्योको धपाधप एसेस् कधीपासून टाकायला लागला?

अरे तो किरकोळीत हरेल नदालकडून. सरळ सेटमध्ये. मग काही मजा येत नाही. जोको नदाल कमीतकमी ४ सेटची तरी होईल.

नेहमीप्रमाणे मरेला सेमीफायनलला येईपर्यंत अगदी सहज ड्रॉ मिळालेला आहे. आता सेमीफायनलमध्ये दणकून मार खाईल.. Proud

आहे आहे. मी अजून आहे. Happy

मॅच अगदी वन सायडेड झाली नाही. अगदी चौथ्या सेटला सुद्धा फ्रेडीने ब्रेक पॉईट घालवले. एक तर केवळ अशक्य मटका लॉब मुळे राफा ब्रेक होण्यापासून वाचला. (क्रेडिट टू राफा फॉर ट्रायींग दॅट). असो.

ऑस्ट्रेलियात सध्या चांगल्या लोकांचे जिंकायचे दिवस नाहीत.

आता एकदम जुलै मधे भेटू. Happy
धन्यवाद.

अहो कोण म्हणतय की फेडरर किरकोळीत हरला म्हणून ? तो तसा कधीच हारत नाही.. पण शेवटी जिंकला राफाच ना.. ? Happy

ऑस्ट्रेलियात सध्या चांगल्या लोकांचे जिंकायचे दिवस नाहीत. >>> Lol

आता जुलैपर्यंत कुठे गायब होताय ? फ्रेंच ओपन आहे की मधे !

२-२ झालेले आहेत.. ४थ्या सेट मधे.. मरे ढेपाळलाच... काहीच प्रतिकार नाही एकदा सर्व्हिस ब्रेक झाल्यावर.. शेवटच्या सेट साठी दम वाचवणे चालू होते वाट्टं...

Pages