'मिले सूर मेरा तुम्हारा' सारखं बर्याच गायकांचा सहभाग असलेलं एक गीत करायचं ही कल्पना मला बेहद आवडते. योगेशने लावलेली चाल मस्त उडती होती. स्काईपवर आधी तालीम करायचा प्रयत्न केला पण ते तितकसं जमेना. एवढे चढे सूर माझे लागणार नाहीत याची खात्री होती. त्यामुळे हे गीत काही आपल्या नशीबात नाही असे वाटले. त्यातच माझी बदली दूरदेशी वगैरे वैयक्तिक गोंधळ सुरु होते. रात्र थोडी आणि सोंग फार. पण योगेशने, देवकाकांनी धीर दिला. पहिल्या दोन्ही तालमी झकास झाल्या. चाल शिकावी ती संगीतकाराकडुनच. त्यामुळे मी (उगाचच) निश्चिंत होते. स्टुडियोतल्या त्या बंद काचेआड पाऊल ठेवताच मात्र शब्दश: घाम फुटला. आत डाव्या बाजूला पेटीतबल्याच्या साथीने गाणार्या लताबाईंचे छोटेसे छायाचित्र होते. ते पाहून हदयगती धीरेधीरे वाढु लागली. बरेच दडपण आले.. तरी बरं समुहगान आधी ध्वनीमुद्रित केले त्यामुळे थोडी तरी भीड चेपली.
एकुणात सॉलिड मजा आली. एकतर गीताच्या ढांच्यामध्ये तोपर्यंत वाद्यांनी प्राण फुंकले होते. सतार/ बासरी अशा बहारदार वाजवल्या होत्या की यांच्या तोडीचे आपण कसे गाणार असे वाटावे. दिल खुश हो गया. बाकी योगेशचा पेशन्स अफाट आहे. एकेकाला सतत काय चुकले ते चांगल्या शब्दात सांगणे म्हणजे कमाल आहे खरोखर.
एकेक ओळ सुटीसुटी गाणे म्हणजे 'काय राव... असे असते होय ध्वनीमुद्रण... असे झाले होते नंतर नंतर.' शिवाय इतक्यांदा गाऊन, शेवटी कुठली चांगली आणि का ते कळायला मार्गच नव्हता. हेडफोन्सवर योगच्या सूचना येत, त्याबरहुकुम गात रहायचे. सूचना समजतात, डोक्यात असते, मनातही.... तरी गळ्यातून का निघत नाही तसेच्या तसे? भारीच गंमत. ऑस्सम अनुभव !! आतापर्यंतच्या एकुण कल्पनाविलासाला छेद देत, ध्वनीमुद्रणात तंत्राचा एक मोठा भाग असतो ते समजले.
मध्ये दीड महिना गेला आणि चक्कं पुन्हा ध्वनीमुद्रणाचा योगकृपेने योग आला. देशात असायच्या तारखाही जुळल्या. यावेळेस दडपण कमी होते पण आठवड्याभरात दोन देश, ३ शहरं करण्याचा परिणाम म्हणजे सर्दीखोकला. असो.
या गीताच्यानिमीत्ताने खूप शिकायला मिळाले. फार मजा आली. योगच्या मेहनतीला सलाम. एक गाणे करायचे म्हणजे खायचे काम नाही ते नीटच समजले. केवढा तो सव्यापसय. ९ मिनीटांच्या गाण्याला योगचे शंभर तरी तास गेले असतील खचितच.
आमची टीमही फार मस्त होती. अनिताकाकु , भुंगा, भिडेकाका, देवकाका, सृजन या टीममधल्या प्रत्येकाकडुन काहीतरी शिकायला मिळाले. एवढे ज्येष्ठ असून अनिताकाकु/ देवकाका आमच्याइतकेच (किंबहुना आमच्यापेक्षा जास्तच नेटाने) तयारी करत होते, भिडेकाका एवढ्या लांबून भावनिक आधार देण्यासाठी आवर्जून उपस्थित रहात होते, भुंग्याचीही कामाचे व्याप सांभाळून जोरदार मेहनत सुरु होती. छोट्या सृजनची आई धावपळ करत त्याला घेऊन आली होती. टीममधल्या प्रत्येकाच्या आवाजाची जातकुळी निराळी. तीच तर मजा आहे !!
..अजूनही माझी लहान मुलगी मध्येच 'सहजीच जीवनाचा' वगैरे गुणगुणत असते. आणि 'आईचे गाणे' असे त्याला म्हणते. त्यामुळे आमच्यासाठी हे खरंच 'माय''बोली' गीत ठरले! भरून पावले...
धन्यवाद मायबोली व्यवस्थापन! धन्यवाद योग !
मायबोली शीर्षकगीताची झलक पहा:
झलक मधील गाय़कः
१. मायबोली आलापः भुंगा (मिलींद पाध्ये)
२. धृवपदः अनिताताई (अनिता आठवले), योग (योगेश जोशी)
३. समूहः मुंबई, पुणे, दुबई येथिल सर्व गायक
संपूर्ण श्रेयनामावली:
मुंबई: रैना (मुग्धा कारंजेकर), अनिताताई, प्रमोद देव, भुंगा, सृजन (सृजन पळसकर- मायबोलीकर युगंधर व भानू यांचा मुलगा)
पुणे: विवेक देसाई, सई (सई कोडोलीकर), पद्मजा_जो (पद्मजा जोशी), स्मिता गद्रे, अंबर (अंबर कर्वे), सायबर मिहीर (मिहीर देशपांडे)
दुबई (सं. अरब अमिराती): देविका आणि कौशल केंभावी (मायबोलीकर श्यामली ची मुले), सारिका (सौ. योग), दीया (योग व सारिका ची मुलगी), वर्षा नायर, योग
कुवेतः जयावी- जयश्री अंबासकर
ईंग्लंडः अगो (अश्विनी गोरे)
अमेरिका: पेशवा, अनिलभाई
ऑडियो व्हिज्युअल टीम - आरती खोपकर (अवल), नंदन कुलकर्णी (नंद्या), हिमांशु कुलकर्णी (हिम्सकूल) आणि आरती रानडे (RAR)
रैना, गोड लिहीलं आहेस.
रैना, गोड लिहीलं आहेस. अभिनंदन टीमचे!
मस्त लिहिलेस रैना ! खूपच गोड,
मस्त लिहिलेस रैना !
खूपच गोड, श्रवणीय झालंय ग शीर्षकगीत ! तुम्हा सर्व सहभागी कलाकारांचे अभिनंदन!
आता संपूर्ण गीत ऐकायला फार वाट नाहि बघवणार.
रैना, इतक्या सगळ्या धावपळीतून
रैना,
इतक्या सगळ्या धावपळीतून हे जमवलंस .... ग्रेट
________/\________
रैना, एकदम गोड लिहिले आहेस
रैना, एकदम गोड लिहिले आहेस
रैना , अगदी खर्र खर्र सांगते.
रैना , अगदी खर्र खर्र सांगते. माबो वर रैना नावाची एक हुशार मुलगी आहे असं ऐकलं होतं. तुझं लेखन वाचून खात्रीही पटली होती. या गाण्याच्या निमित्ताने तुझी ओळख होणार म्हणून खूप एक्सायटेड होते.
तुझा गोड गोड आवाज ''गणेश स्तवनात'' ऐकला होता. त्यामुळे या गीताच्या प्रवासाच्या आनंदाबरोबर आपली छान ओळख झाली हा अजून वेगळा आनंद.
जसं गोड गाणं तस्संच गोड लिहिलंयस. सहजसुंदर!
व्वा... छान..नेहमीच्या
व्वा... छान..नेहमीच्या स्टाईलने प्रवाहीपणे व्यक्त झाला आहात... जियो !!!
छान लिहिलयं
छान लिहिलयं
मस्त
मस्त
क्या बात है! तुझा आवज गोड
क्या बात है! तुझा आवज गोड आहेच ,याआधीही ऐकला होताच.यानिमित्ताने परत एक पर्वणीच ! सगळ्यान्च्या आवाजाच्या जातकुळ्या वेगळ्या असल्याने गाण आणखीनच बहारदार झालय.संपूर्ण गाण ऐकायची उत्सुकता वाढलीये आता.
त्यामुळे आमच्यासाठी हे खरंच 'माय''बोली' गीत ठरले! भरून पावले...>> मस्तः)
सुरेख. अभिनंदन आपले,. आलापकार
सुरेख. अभिनंदन आपले,.
आलापकार भुंगेश....... आता पुढचा नंबर तुझा.
मस्तच!
मस्तच!
सर्व सहभागी कलाकारांचे
सर्व सहभागी कलाकारांचे अभिनंदन !!!
आईचे गाणं मस्त
आईचे गाणं मस्त
वा: ! छानच !!! शिवाय आमच्या
वा: ! छानच !!! शिवाय आमच्या 'देवां'चं अधिष्ठान आहेच म्हणा !!!
रैना छान लिहीलंयस
रैना छान लिहीलंयस
बापरे. किती 'गोड,गोड'. मधुमेह
बापरे. किती 'गोड,गोड'. मधुमेह होईल लोकांना आणि माझी भडकु इमेज बिघडवताय ते वेगळेच.
आता तो शब्द वापरायला मनाई आहे. (आज्ञावजा विनंतीनुसार)
धन्यवाद लोक्स. आभारी आहे. (येवढेच 'शिरीयस' आहे. बाकी टीपी.)
खूप खूप आवडले ! 'आईचे गाणे'
खूप खूप आवडले !
'आईचे गाणे' आणि 'माय''बोली' गीत हे तर खासच !
लिहित आणि गातही रहा... शुभेच्छा !
मस्त वृतांत
मस्त वृतांत
Pages