दादा म्हनले ..... !

Submitted by विशाल कुलकर्णी on 26 March, 2009 - 07:30

दादा म्हनले
आंदोलन करा
आमी बशी जाळ्ळ्या...

दादा म्हनले
चळवळ करा
आमी दुकानं फोळ्ळी...

दादा म्हनले
सत्याग्रेव करा
आमी फॅक्टरी बंद पाळ्ळी...

दादा म्हनले
त्यो लै बोलतुया
तेची जीभ तोळ्ळी ...

दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो.............?

विशाल

गुलमोहर: 

विशाल दा you are great simply !
I have no words to say !!!
मी पण अशीच आता वो.............? विचार करीत !!
Happy
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

नाव आणि सुरवातिची कडवी वाचुन मी म्हणार होतो तुला बाधा झाली का? पण शेवटच कडव वाचलं आणि तु वाचलास Happy

मस्त .. आवडली....

आता घ्या सभा ! Happy

करा मतदान !

प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

काय राव, आमाले वाटलं बुथ जाळाचे असतील ! Sad

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

Happy
जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.

छान विशाल....शेवटला खरंच आता वो...? म्हणुन विचार करावा लागतोय Happy
मज्जा आली वाचुन

*****************
सुमेधा पुनकर Happy
*****************

विशाल, उपरोध परिणामकारकरीत्या व्यक्त केला आहे तुम्ही. छान.
मुकुंद कर्णिक
माझ्या कविता इथे दिसतील - http://mukundgaan.blogspot.com

विशाल,
आता वो.... बुथ जाळले नाही तरी आमचं मत तुमास्नीच
जे.डी. भुसारे

आता वो.............?

आता दुसरा दादा शोधा.

भन्नाट आहे.

हरीश

-----------------------------
Have You Saved a Life Yet?
http://hridayjyot.synthasite.com/
------------------------------

छान आहे कविता, विशालदा (कि विशालदादा ?) Happy

०----------------------------०
!!गुढिपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!!
०----------------------------०

मला वाटलं तुला प्रो चावले की काय ??? पण नाही. अजून आहेस....
.........................................................................................................................

http://kautukaachebol.blogspot.com/

>>>>> आता वो.............? Lol
(आता वो काय? तर तेलही गेल, तुपही गेल, हाती आल धुपाटण)

शेवटच्या ओळिने मजा आली!
अगदी डोळ्यासमोर चित्र उभे राहिले माझ्या, केविलवाण्या नजरेने आशाळभूतपणे "आता व्वोssss" म्हणणार्‍यान्च! Happy
...;
****** इतिहास घडवायचा तर आधी तो शिकणे अपरिहार्य ******
*** कबुतरे हवेत सोडून शान्ती पसरते यावर माझा विश्वास नाही! ***

आता वो? - अगदी फर्मास!!
खूपच मजा आली...

कौतुक विशाल आहे;पण प्रोफेश्वर आहेत का बघावे लागेल.

आता वो????
खरंच जबरी..... Happy
..................................................
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा...
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा... Sad
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो.... Lol

आता वो.....एकदम झ का स!
विशाल, तुझ्या प्रतिभेला सलाम!
जयन्ता५२

कसचं, कसचं....
आ(लै)भारी हाये, भारतातील तथाकथित दादांचा आणि त्यांच्या निष्ठावान चेल्यांचा ! Sad

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

अभिनंदन वो तुमचे Happy
मार्चची सर्वोतम कविता म्हणून मान मिळ्ळा तुमच्या या कवितेला... Happy
टाळ्या...

मस्त.. जबरी! Happy

शेवटचा "आता वो..?" अगदी काळीज छेदून म्हणतात तसा गेला की! Sad

लगे रहो विशाल राव .............

----------------------------------
If friendship is your weakest point then u r the strongest person in world........... ....

तू पण जा..........दादा म्हणतोय ना!

विशाल,
कवितेचा शेवट विशेष आवडला

विशाल, एकदम आवडली! सगळे म्हणतात त्याप्रमाणे शेवट जबरी.

बरे झाले मार्च साठी निवडली गेली, नाहीतर सापडलीच नसती.

दादा म्हनले
आमी दिल्लीला चाल्लो
आता वो.............?
ईशालने दुसरा नंबर लावला Happy

अभिनंदन वो Happy

Pages