प्रश्नमंजुषा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 17 January, 2012 - 22:05

'जनगणमन' या आपल्या राष्ट्रगीताची शताब्दी साजरी करण्यासाठी, आणि 'जन गण मन' या चित्रपटाचं स्वागत करण्यासाठी मायबोलीवर आयोजित केली आहे प्रश्नमंजुषा!!!

खाली पंधरा प्रश्न दिले आहेत. या अगदी सोप्या प्रश्नांची उत्तरं लिहून पाठवा, आणि मिळवा आकर्षक बक्षिसं!!!

१. 'राष्ट्रीय साक्षरता मिशन' हा उपक्रम किती साली सुरू झाला?

२. 'सर्व शिक्षा अभियान' हा उपक्रम कुठल्या वयोगटातल्या मुलांसाठी आहे?

३. २०११च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यात साक्षरतेचं प्रमाण किती?

४. 'राईट टू एज्युकेशन' कायदा भारतीय संसदेने कधी संमत केला?

५. इंग्रजांच्या राज्यात फासेपारधी जमातीला कुठल्या कायद्यानुसार गुन्हेगार ठरविण्यात आले होते?

६. शिक्षणक्षेत्रातल्या महान कार्याबद्दल पंचम जॉर्जाने १९३१ साली एका भारतीय विद्वानांना ’सर’ ही पदवी बहाल केली होती. हे थोर व्यक्तिमत्त्व कोणते?

७. कुठल्या देशाचा शिक्षकदिन कम्युनिस्ट देशांतल्या शिक्षणतज्ज्ञांच्या ऐतिहासिक सभेची आठवण राहावी म्हणून २० नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो?

८. हुबळी या शहराचा आपल्या राष्ट्रध्वजाशी असलेला महत्त्वाचा संबंध स्पष्ट करा.

९. ‘शिक्षणसेवक : कृष्णा डोळसे’ ही कादंबरी शिक्षणसेवकांच्या आयुष्यावर, त्यांच्या समस्यांवर प्रकाश टाकते. या कादंबरीचे लेखक कोण?

१०. ’भारतसभा’ या वास्तूचं महत्त्व विशद करा.

११. ’जनगणमन’ हे गीत सर्वप्रथम जाहीर सभेत कोणी गायले?

१२. कुठल्या आशियाई देशात ध्वजारोहणाच्या आधी राष्ट्रगीत गायले जाते?

१३. आदिवाशांच्या हक्कांसाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही तीन समाजसेवकांची आणि त्यांच्या संस्थांची नावे लिहा.

१४. १९४५ साली प्रदर्शित झालेल्या कुठल्या चित्रपटात ’जनगणमन’ या गीताचा समावेश केला गेला होता?

१५. मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जावे, ही मागणी सर्वप्रथम भारतात कोणी आणि कधी केली होती?

***

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी तुम्हांला काही नियम लक्षात ठेवावे लागतील. Happy

१. या प्रश्नांची उत्तरं कृपया या बाफवर लिहू नका. या बाफवर उत्तरांची चर्चा केल्यास, किंवा उत्तरं लिहिल्यास त्या स्पर्धकाची उत्तरं ग्राह्य धरण्यात येणार नाहीत. प्रश्नांव्यतिरिक्त काही शंका असतील तर मात्र इथे जरूर विचारा. Happy

२. या प्रश्नमंजुषेची उत्तरं तुम्ही माध्यम_प्रायोजकांना संपर्कातून पाठवायची आहेत.

३. जास्तीत जास्त बरोबर उत्तरं देणार्‍या दोन स्पर्धकांना 'जन गण मन' या चित्रपटाचं प्रत्येकी एक तिकीट किंवा मुंडु टिव्हीचं सबस्क्रिप्शन देण्यात येईल.

४. दोनापेक्षा अधिक स्पर्धकांनी जास्तात जास्त योग्य उत्तरं दिल्यास लकी ड्रॉ पद्धतीने विजेते निवडण्यात येतील.

५. उत्तरं पाठवण्याची शेवटची तारीख - २३ जानेवारी, २०१२ रात्री १२ वाजेपर्यंत (भारतीय प्रमाणवेळेनुसार)

***

तुम्हां सर्वांना शुभेच्छा Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users