बाजूच्या जोश्यांकडे लग्न झाले आणि काही दिवसांनी उरलेले सगळेच लाडू आमच्या कडे शेजारधर्म म्हणून वाजतगाजत आले. झालं!!! आता त्या लाडवांचं काय करायचं हा प्रश्न आमच्याकडे चहाच्या पेल्यातल्या वादळासारखा गाजू लागला.
ते लाडू जसे दगडी काम केलेले दगडी कोळसेच. देवाच्या कृपेने त्याच संध्याकाळी ( न आवडणारे) पाहुणे घरी आले. देवासारखे धावून आल्या सारखे वाटले... सकाळी आलेला तो फराळ आईने मस्त सुरेख प्लेट मध्ये भरला आणि पाहुण्यांच्या पुढयात ठेवला. त्यातल्या दोन प्लेट उपासाच्या कारणाने साभार परत आल्या. (हाय रे हमारा बॅडलक!!)
पण उरलेल्या दोन प्लेट खपल्यामुळे आनंद होताच. तो फराळ खातांना पाहुण्यांचे मुखचंद्र प्रेक्षणीय स्थळासारखे झाले होते. पाहुण्यांचा निरोप घेतला आणि आम्ही घरची मंडळी एकत्र आलो व तो लाडू संपवण्याची रणनीती तयार करू लागलो.
सर्व प्रथम एका चांगल्या मिठाईच्या डब्यात चार पाच लाडू टाकून पॅक केले शिवाय वर पन्नास ची नोट ठेउन ते पॅकेट मोलकरणीस नव वर्षाची भेट म्हणून खपविले..त्या दिवसापासून ती मोलकरीण आमच्या घरी परतलीच नाही. नंतर माहीत झाले तिला गॅस्ट्रो झाल्याने ती घरीच आराम करते आहे..
ही बातमी आम्हास कळताच उरलेल्या लाडूंमध्ये आम्हाला साक्षात यमराजाचे दर्शन घडू लागले. अनुभवी असलेल्या आजीच्या सांगण्यावरून आईने त्यातले काही सुस्थितीत असलेले दोन तीन लाडु निवडले व वरवंटयांने ठेचले व बंगालच्या काली माते चा प्रसाद म्हणुन कॉलनी भर वाटला. तरीही बरेच लाडू अस्तित्वात होते. मी आईला सुचवले की डोळे मिटून नित्यनेमाने रोज 1 लाडू रात्री कोणाचे लक्ष नाही हे पाहुन फेकुन दे. पण हे आईला जमण्या सारखे नव्हते.. अखेर काही झाले तरी ते अन्न होते असे कसे फेकून दयायचे ह्या आइच्या पापभीरू विचारांमुळे ते लाडू आमच्या स्वयंपाक घरातला एक डबा अडवून बसले होते.
आईचे त्या लाडवांवर प्रयोग करणे सुरूच होते . एका दिवशी आईने काही लाडु घेतले व एक पातेलीत गरम पाणी करून त्यात रात्र भर भिजवून ठेवले.. दुसऱ्या दिवशी वरवंटयाने चांगले ठेचुन घेतले व नंतर ते मिक्सर मध्ये घातले (न ठेचता लाडू टाकले असते तर पॉट चे ब्लेड तुटण्याची दाट संभावना होती) ...
मग आईने त्या लाडवाची चांगली पेस्ट करून घेतली व नंतर ते कणकीत घालून त्याच्या गोड पोळया करून एकीचे डोहाळे जेवण उरकून टाकले... नंतर त्या वहिनींना जो मुलगा झाला तो सुद्धा योगायोगाने त्या लाडवांच्याच रंगाचा!!
पण बाळ बाळांतीण सुखरूप ..
तरीही दोन लाडू काही ड्ब्याचा साथ सोडत नव्हते..आता या दोन लाडवांचे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न होता. तसा त्या लाडवाचा धाक सर्वानाच होता.. आम्ही अभ्यास न केल्यास ''बघ हां अभ्यास नाही केलास तर तो लाडू खायला देईन'' अश्या आइच्या सरळ सरळ धमकी मुळे कधी नव्हे तो आम्ही मन लावून दोन दोन तास अभ्यास करायला लागलो...
अखेर एका रात्री आईने ते दोन लाडू डब्याच्या बाहेर काढुन ठेवले.. रात्रभर ते लाडू कडक थंडीत बाहेरच कुडकु्डत होते... जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा समजले की ती कुडकुड थंडीची नसुन उंदरांची होती.... ते लाडु उंदराने फस्त केले होते आणि त्याच बरोबर त्या फराळाचा समारोप झालेला होता व सोबतच आमच्या घरातील उंदरांचा ज्वलंत प्रश्नही हातोहाती सुटला होता....
...............
वैदेही....
...
...
मनस्विनी,
मनस्विनी, अगं हे विनोदी लिखाण आहे. इतकं नको सिरिअसली घेऊस. जे विनोदी लिखाण मधे आहे ते प्रत्यक्षातही घडले पाहीजे असे कुठे आहे?
आणि घरातला एखादा पदार्थ बिघडला तर नक्कीच असे / अशा टाईप्सचे विनोद घडतात घरात!
मला खूप खळखळून हसू नाही आले, पण स्मितहास्य आले.. प्रयत्न छान वाटला.. सगळे म्हणाले तसं थोडं वाढवलं असते तर मजा आली असती..
आणि मेन म्हणजे सव्यसाचीचा मुद्दा पटला.. विनोदी जरी लिखाण असले तरी काही तपशीलात चूक नकोच ना.. शेजारच्या घरात लग्न झालेले, तिथले लाडू , कॉलनीमधेच देवीचा प्रसाद म्हणून कसे वाटता येतील ?
तिथे कॉलनीच्या ऐवजी ऑफीस मधले वगैरे टाकले की तीही चूक(जी वाटू शकते) ती निघुन जाईल..
पुढच्या लेखनास खूप शुभेच्छा! मस्त विषय आहेत तुमचे सद्ध्याचे..
ह्म्म.
ह्म्म. खरेच मी सीरीयसली घेतले खरे मग.
वार्याची
वार्याची बात !
वार्यावरची नाही !! ---
" ते लाडू जसे दगडी काम केलेले दगडी कोळसेच ! वरकरणीच असे लाडू दिसले तर हजम कसे होतील ? लाडूंचा रंग तेव्हडा बदला. ओळखीचा रंग दिसलाना की मग हातोड्याची आठवणही न होता सारे होतील. काय खरंयना मंडळी ! "
वरच्या
वरच्या सगळ्या प्रेमळ सुचनांबद्द्ल आणि प्रतिक्रियांबद्द्ल आभार.... तपशीला बद्द्ल यापुढे नक्की काळजी घेइन....

पण फक्त इतकंच सांगावसं वाटतं की लेखातील घटना व पात्रे पूर्णपणे काल्पनिक आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात एखादा बिघडलेला पदार्थ दुसर्यांच्या माथी मारून त्यांचे आरोग्य धोक्यात घालणे चुकीचे आहे हे एक जबाबदार नागरिक ह्या नात्याने मलाही (आम्हालाही ) कळतं!!
..............................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही...
अरे बस ना
अरे बस ना आता... लाडु मधला विनोद संपला तरी अजुन किती चघळताय त्याला ?
वैदेही,
वैदेही, मस्त लिहीले आहेस.आवडले
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
येवढी
येवढी मज्जा नाही आली हां.. प्रसंग अजुन जरा खुलवायला हवे होते... मोलकरीण घेताना कशी खुश झाली मग घरी जाउन काय झाल असेल लाडावाच असा जरा कल्पना विस्तार हवा होता... काल्पनिक आहे का? बरं मला वाटलं तुम्ही पुण्याच्या असाल
पण लाडावाच्या डब्याबरोबर पन्नास रुपये म्हंटल्या मुळे मी संभ्रमात आहे.. 
वैदेही, लाडु, आणि विनोदी लेखन माथळा वाचुन वाटलं डिंकाच्या जागी हिंगाचे लाडूची कथा असावी .. ही ही..
लाडु मधला विनोद संपला तरी अजुन किती चघळताय त्याला ? > हे फार विनोदी आहे... लाडू फेकुन मारल्या सारख वाटल अगदी
वैदेहि
वैदेहि अभिनन्दन! चान्गले लिहिले अहेस. विशेश्तः लेखाचे नाव खुपच catchy आहे. (क्रुपया catchy ला मराथी शब्द. सुचवा)
catchy -
catchy - लक्षवेधक, आकर्षक
वैदेही,
वैदेही,
लाडू हे जुल्मी गडे

फेकूनी मज मारू नका
असे काहितरी असेल असे वाटले होते.
असो. पु.ले.शु.
ठेविले अनंते तैसेची रहावे
चित्ती असू द्यावे समाधान!
वैदेहि...
वैदेहि...

हसुन हसुन डोळ्यतुन पाणि अले...
आणि हो क्रुपया... विनोदि लेखन कारतान... office मधे वाचु नये... असे लिहा....

कारण लोक माझ्यकडे बघायला लाग्ले... इतकि मि हसत होते
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आयुष्य सुन्दर आहे, त्याला आणखि सुन्दर बनवुया....!!!!!
Donate Eye - Bring Light to Blind...!!!
छान लेखन,
छान लेखन, कदाचीत सत्य प्रसंगावर असावे, म्हणुन थोडेच हसवते आहे. कल्पनाविस्तार अजुन जमला असता. जसे, कुणाची दृष्ट लागुनये म्हणुन घरावर टांगले, वगैरे.
पुढच्या लेखनासाठी, शुभेच्छा.
धन्यवाद.
Pages