लाडू हे जुल्मी गडे

Submitted by cool_vaidehi on 21 March, 2009 - 05:53

बाजूच्या जोश्यांकडे लग्न झाले आणि काही दिवसांनी उरलेले सगळेच लाडू आमच्या कडे शेजारधर्म म्हणून वाजतगाजत आले. झालं!!! आता त्या लाडवांचं काय करायचं हा प्रश्न आमच्याकडे चहाच्या पेल्यातल्या वादळासारखा गाजू लागला.

ते लाडू जसे दगडी काम केलेले दगडी कोळसेच. देवाच्या कृपेने त्याच संध्याकाळी ( न आवडणारे) पाहुणे घरी आले. देवासारखे धावून आल्या सारखे वाटले... सकाळी आलेला तो फराळ आईने मस्त सुरेख प्लेट मध्ये भरला आणि पाहुण्यांच्या पुढयात ठेवला. त्यातल्या दोन प्लेट उपासाच्या कारणाने साभार परत आल्या. (हाय रे हमारा बॅडलक!!)
पण उरलेल्या दोन प्लेट खपल्यामुळे आनंद होताच. तो फराळ खातांना पाहुण्यांचे मुखचंद्र प्रेक्षणीय स्थळासारखे झाले होते. पाहुण्यांचा निरोप घेतला आणि आम्ही घरची मंडळी एकत्र आलो व तो लाडू संपवण्याची रणनीती तयार करू लागलो.
सर्व प्रथम एका चांगल्या मिठाईच्या डब्यात चार पाच लाडू टाकून पॅक केले शिवाय वर पन्नास ची नोट ठेउन ते पॅकेट मोलकरणीस नव वर्षाची भेट म्हणून खपविले..त्या दिवसापासून ती मोलकरीण आमच्या घरी परतलीच नाही. नंतर माहीत झाले तिला गॅस्ट्रो झाल्याने ती घरीच आराम करते आहे..
ही बातमी आम्हास कळताच उरलेल्या लाडूंमध्ये आम्हाला साक्षात यमराजाचे दर्शन घडू लागले. अनुभवी असलेल्या आजीच्या सांगण्यावरून आईने त्यातले काही सुस्थितीत असलेले दोन तीन लाडु निवडले व वरवंटयांने ठेचले व बंगालच्या काली माते चा प्रसाद म्हणुन कॉलनी भर वाटला. तरीही बरेच लाडू अस्तित्वात होते. मी आईला सुचवले की डोळे मिटून नित्यनेमाने रोज 1 लाडू रात्री कोणाचे लक्ष नाही हे पाहुन फेकुन दे. पण हे आईला जमण्या सारखे नव्हते.. अखेर काही झाले तरी ते अन्न होते असे कसे फेकून दयायचे ह्या आइच्या पापभीरू विचारांमुळे ते लाडू आमच्या स्वयंपाक घरातला एक डबा अडवून बसले होते.
आईचे त्या लाडवांवर प्रयोग करणे सुरूच होते . एका दिवशी आईने काही लाडु घेतले व एक पातेलीत गरम पाणी करून त्यात रात्र भर भिजवून ठेवले.. दुसऱ्या दिवशी वरवंटयाने चांगले ठेचुन घेतले व नंतर ते मिक्सर मध्ये घातले (न ठेचता लाडू टाकले असते तर पॉट चे ब्लेड तुटण्याची दाट संभावना होती) ...
मग आईने त्या लाडवाची चांगली पेस्ट करून घेतली व नंतर ते कणकीत घालून त्याच्या गोड पोळया करून एकीचे डोहाळे जेवण उरकून टाकले... नंतर त्या वहिनींना जो मुलगा झाला तो सुद्धा योगायोगाने त्या लाडवांच्याच रंगाचा!!
पण बाळ बाळांतीण सुखरूप ..

तरीही दोन लाडू काही ड्ब्याचा साथ सोडत नव्हते..आता या दोन लाडवांचे काय करायचे हा मोठ्ठा प्रश्न होता. तसा त्या लाडवाचा धाक सर्वानाच होता.. आम्ही अभ्यास न केल्यास ''बघ हां अभ्यास नाही केलास तर तो लाडू खायला देईन'' अश्या आइच्या सरळ सरळ धमकी मुळे कधी नव्हे तो आम्ही मन लावून दोन दोन तास अभ्यास करायला लागलो...

अखेर एका रात्री आईने ते दोन लाडू डब्याच्या बाहेर काढुन ठेवले.. रात्रभर ते लाडू कडक थंडीत बाहेरच कुडकु्डत होते... जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा समजले की ती कुडकुड थंडीची नसुन उंदरांची होती.... ते लाडु उंदराने फस्त केले होते आणि त्याच बरोबर त्या फराळाचा समारोप झालेला होता व सोबतच आमच्या घरातील उंदरांचा ज्वलंत प्रश्नही हातोहाती सुटला होता....

...............
वैदेही....

गुलमोहर: 

पाहुणे पुन्हा तुमच्या कडे फिरकलेही नसतील नंतर...
अकाली (दिवाळी सोडुन) फराळ कोठुन आला याचाही अंदाज लागला असेल.... Wink

>>काली माते चा प्रसाद Proud
तसं जुन्या लोकांची श्रद्धा/अंधश्रद्धा अशी उपयोगाला आली... Happy

मजा आली जाम्..........वाचायला.

----------------------------------
हे जीवन सुंदर आहे....

छान आहे. खरेच हसू आले. ( लाडवांची पाककृति मिळेल का, जोश्यांकडून ? )

दिनेश, (नक्की) कोणाला खाउ घालनार आहात ? Wink

नंतर त्या वहिनींना जो मुलगा झाला तो सुद्धा योगायोगाने त्या लाडवांच्याच रंगाचा!! Lol

आवडले. Rofl
आता अजुन मोठ हवय.
- अनिलभाई
It's always fun when you connect.

Proud
धन्स सगळ्यांना...... पुढच्या वेळी नक्की मोठं लिहिण्याचा प्रयत्न करेन ...
...................................................................

निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

मी तुमच्या घरी चुकुनही पाहुणा म्हणून येणार नाही ! Happy

Lol मस्त जमलंय. मजा आली वाचायला.

बरं तू न्यु जर्सीत नाही ना रहात? नाहीतर पुढच्या जीटीजीला लाडूच आणेन म्हणून हट्ट धरशील Wink

>>>>मी तुमच्या घरी चुकुनही पाहुणा म्हणून येणार नाही ! >>>>

मी आलो तरी चुकूनही काही खाणार नाही. पण आता आमच्याकडे काही राहिलं तर चा प्रश्न मात्र वैदेही नक्की
सोड्वेल.
Lol

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

छान लिहिलंय... मजा आली.... Happy

छान लिहिलय. अनीलभाई म्हणतायत तसं खूप वेळ हसवणारं येऊदे आता.

वाह !! मस्तच लिहीले आहे! खल्लास! Rofl
तेव्हापासुन तुमच्याकडे येणार्‍या (न आवडणार्‍या) पाहुण्यांची संख्या कमी झाली असावी बहुतेक!!

कधी तुमच्याकडे आलोच तर (लाडु सोडून) काहीही खायची तयारी ठेऊन येतो. Happy

----------------------------------------------------

If you follow all the rules, you miss all the fun!
http://www.mokaat.blogspot.com/

आमच्या कडचे "ते लाडू" संपलेत आता....त्यामुळे आता तुम्ही बिनधास्त या आमच्या कडे पाहुणे म्हणून...
काही धोका नाही तुम्हाला.... कारण बाजुच्या जोश्यांकडे इतक्यात कोणाचं लग्न नाही... Wink
आणि आमची आई लाडू छान करते बरं का!! Proud
........................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

नंतर त्या वहिनींना जो मुलगा झाला तो सुद्धा योगायोगाने त्या लाडवांच्याच रंगाचा!! >>>

भन्नाट. पण अजुन जास्ती लिही ना, फार लवकर संपल्यासारखे वाटले. Wink
(मी ललित बद्दल बोलतोय, लाडवांबद्दल नाही :-P)

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

मस्तच गं Happy
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

बर झालं बाई मी तुला भेटायला नाही आले.......... वैदेही या पुढे लिहितानां एक लक्षात ठेव

-------------------------------- कृपया ऑफीस मधे वाचू नये असे लिहावे

हे विनोदी आहे? कुठच्या पातळीचा?

@ रश्मी ताई
काय रश्मी ताई...तुला नसते दिले गं मी ते लाडू!!! Proud
ते लाडू फक्त "न आवडणार्या पाहूण्यांसाठी " राखीव होते,,, Wink
.........................................................................
@विशाल दादा...
दादा... मी हे वाढवण्याचा प्रयत्न केला... पण ते काही खास जमलं नाही...
आता पुढच्या वेळी मोठं लिहिण्याचा नक्की प्रयत्न करेन..

.........................................................................

..............................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

विनोदी लिहिण्याचा हा छोटासा प्रयत्न होता....सांभाळून घेतल्याबद्दल आणि कौतुक केल्याबद्द्ल
सगळ्यांना धन्स..:)
................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

मला ह्यात काहीही विनोद दिसला नाही.

ज्यांना विनोद दिसला नाही त्यांनी क्रुपा करून विनोदाची व्याख्या समजावून द्यावी आणि प्रॅक्टीकल सुद्धा करून दाखवावे म्हणजे मी पुढच्या वेळी लिहिताना सुधारणा करू शकेन.
..........................................
निवडणुकीव्यतिरिक्त माझे मत फारसे कुणी विचारात घेत नाही... Wink

अरे कुल्_वैदेही, तु का चिडतेस ? बि कुल कुल...

यात विनोद काय आहे ते काही कळले नाही. वर शेजारचेच लग्न आणि तरी मोलकरीण, कॉलनीतील लोक यांना ते लाडू कुठून आले हे कळणार नाही हे पटत नाही. आणि आपल्यालाही जे खाववत नाही ते इतरांना खपवण्यात काय विनोद आहे हे कळत नाही.

वैदेही,चिडू नको.लाडू उरला असेल तर खाऊ घाल प्रेमाने बकणाभर्.तोंड आपोआपच बंद होईल

सव्या, exactly हेच मी आधीच्या पोस्टमध्ये लिहिले पण आजकल स्थिती पाहून वाद नको म्हणून काढून टाकले. (पुन्हा लिहिते जे काल लिहिले ते)तर पॉइंट हाच होता, जे तुम्ही खात नाही इतके खराब अन्न दुसर्‍याला द्यायचे ही कुठली वृती. कहर्(मला वाटलेला कहर) ते लाडू एका गरोदर बाईला खायला घातले. एकीकडे लाडू खावून लोकाना पचले नाही(मोलकरीण) मग ते लाडू इतके जपून ठेवून दुसर्‍याला खायला का घालावे? सरळ फेकून द्यायचे ना...

आता कळला का लेखिकेला की मला ह्यात विनोद का वाटला नाही. (हे लिखाण 'खर्‍या' अनुभवावरून तुम्ही लिहिले आहे असे मानून मी पोस्ट लिहिली. तसे नसेल तर दुर्लक्ष करा माझी पोस्ट्स, तरीही खोटे असले तरी ह्यातली वृती बरी नाही.)

मनुस्विनि,मुद्दा बरोबर. वास्तवात असेच अपेक्षित आहे पण हे काल्पनिक आहे आणि ज्यांना हसावे वाटले ते हे वगळून बाकीच्या गोष्टींना हसले असतील कदाचित. आता कशाला हे विचारणे आवश्यक नाही असे मानून चालावे ही विनंती.

Pages