भारता मधे सामान विस्थापणाचे पर्याय.....

Submitted by अतरंगी on 4 January, 2012 - 12:01

मला पुण्याहुन गुजरात मधे घरगुती सामान शिफ्ट करायचे आहे.
अशी सेवा पुरविणार्‍या companies कोणाला माहित आहेत का ?

मला एकाने सरळ बॉक्स भरुन रेल्वे मधे टाकायचा सल्ला दिला....

कोणाला याचा चांगला वाईट अनुभव असल्यास कृपया ईथे लिहा.

धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी त्यांना चौकशी चा ई मेल पाठवला आहे. पण बरेच महाग आहे म्हणे...... माझ्या एका मित्राने शहरातल्या शहरामधे सामन शिफ्ट केले होते तर ३५०० बिल झाले होते. त्या मानाने मला मग चांगलाच खर्च होइल असे दिसते.....

कमी खर्चात करायचे असेल तर...
सामानाचा आवाका पाहून ४०७ किंवा ट्रक भाड्याने घ्या. तारपोलीन असलेली गाडी बुक करा.
मजूर नाक्यावरून ४ मजूर आणा. सामानाची निट बांधाबांध करा. जुन्या साड्या, गाद्या, चादरी यांमध्ये काचेच्या बाटल्या आदी लपेटा. काचेचे कपाट गच्चीतून खाली आणायचे असेल तर पहिल्यांदा काचेला गादी लावा. जिन्यातून काही प्रॉब्लेम नाही. सर्व सामान गाडीत न हालेल असे दोरीने बांधा. दोरी गाडीमध्ये असते.
सामान गाडीत लागले की नंतरच मजूरांना मजूरी देवून मजूर सोडून द्या. लाज न वाटता गाडीत बसा. घरच्या मंडळींना गरज असेल तर आधीच पाठवा किंवा नंतर. तुमची सोय. तेथे जावून हाच उपद्व्याप उलट करा. तेथील मंडळी मजूरांबाबत सहकार्य करतीलच. प्रत्येक शहरात मजूर मिळतात. पैसे भरपूर वाचतील. ते लगेच अक्कलखाती फिक्स डिपॉझीट मध्ये ठेवा.

सर्वा॑ना धन्यवाद....

Movers & Packers मधुन अगदी भरपुर फोने आले. तीन चार जणांनी चांगली quotations दिली आहेत. बघू आता कसे जमतंय ते....