hmmm..

Submitted by देवनिनाद on 31 December, 2011 - 01:16

लोकपालचं काय झालं, झालं का पास ?
असं विचारत कसाबनं घेतला दिर्घ श्वास
`जाऊ दे ना, - उत्तर आलं
`तरीही, ? ... पुन्हा कसाब
कसलं लोकपाल अन् कसलं काय !
भ्रष्टाचाराशिवाय हा देश जगूच शकत नाय.
निर्णय क्षमतेलाच लागलेय फाशी ... चांगुलपणाची झालेय काशी
तू आधीचा, जूना राहतोयस मजेत हे नाही खटकलं
नंतर आलेलं लोकपाल मात्र भ्रष्टाचाराच्या चर्चेनेचं लटकलं
`मग आता काय होणार, .. पुन्हा कसाब
हे इश्शु चालतचं राहणार दर दिवशी .. कळेलच तूला ही
कारण आता तू ही या देशाचाच रहिवाशी, काय ?
hmmm.. इति कसाब ..
जनहाल बघणार्‍यांना काय कळणार लोकपाल ?
हे बघा उगाच सरकारला वाट्टेल ते बोलू नका,
मी गुन्हेगार असून माझी किती काळजी घेतायत ते
त्यांना थोडा वेळ द्या - तूमची ही काळजी ते नक्की घेईल.
तूझा हा विश्वास खरा ठरणार असेल तर
तर मग जशी तूझी फाशी टांगणीवर .. तितकचं लोकपाल लांबणीवर
hmmm.. इति कसाब ..
मी निघतो, ... अरे थांबा `माझ्या तिकडच्या बांधवाना हॅप्पी न्यु इयर सांगा'
हो त्याची गरज आहे खरी. कारण तू दिर्घायुषी व्हावंस असं इथल्या सरकारला वाटतयं
तूला काय वाटतयं ते इथल्या जनतेला कळवतो ..
hmmm.. इति कसाब ..
जीव राहात नाही, आणि वर्षाचा शेवटचा दिवस म्हणून तेच तेच चघळायचं, आणि पुढचा प्रवास आशावादी रहावा म्हणून म्हणायचं .. हॅप्पी न्यु इयर ! काय ?
hmmm.. हॅप्पी न्यु इयर
एक बिर्याणी सांगता ! ... काय ?
नाही म्हणजे न्यू इयर सेलिब्रेशनला मी तोंडाचं मौन पाळलं तर उगाच तो `निषेध' वाटेल म्हणून म्हटलं.
hmmm.. ते ही खरचं. पाठवतो.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

निनाद...

खरंच समर्पक लिहिलंय... लेखन उपहासात्मक असलं तरी विचार करायला लावणारं आहे...
नेहमी प्रमाणेच आवडलं....

धन्यवाद !! विवेक. इतर लिखाणाच्या व्यापातून मा.बो. पुर्वीसारखं लिहायला जमत नाही, हो पण मा.बो.मित्रांचे प्रतिसाद वाचले की लिखाणाचा मोह ही आवरत नाही.

सस्नेह !!
देवनिनाद

छान

धन्यवाद मित्रांनो. जागो अरे डॅशच्या कवितेचे नाव ही घेऊ नकोस. मा.बो. आता ही मी एक तशी कविता केली तर, सुप्तावस्थेत असलेले जागे होतील, आणि अनावश्यक प्रतिसादांची लेखमालिका सुरु होईल, आणि हा अनावश्यक ताण मायबोलीच्या सर्वेरसाठी अतिशय धोकादायक ठरेल. असो.

बाकी काय चाललयं नवीन ?

सस्नेह !!
देवनिनाद

हो त्याची गरज आहे खरी. कारण तू दिर्घायुषी व्हावंस असं इथल्या सरकारला वाटतयं>>>खरय बाबा,
आवडली.

hmmm..
ह्याहून वेगळा काय प्रतिसाद देऊ? फक्त 'त्याने' ज्या अर्थाने तो हुंकार भरलाय, त्याहून अर्थ मात्र नक्कीच वेगळा आहे!

ह्म्म्म्म्म्म्म्म्म

खरंच समर्पक लिहिलंय... लेखन उपहासात्मक असलं तरी विचार करायला लावणारं आहे...>>>>>>>> अगदी

hmmmm इथल्या सरकारला त्यांच्या हातुन पाप करुन घ्यायचे नाहिये. मग ते काय पाप करणार नाही आणि कसाब तु काय लवकर मरणार नाही. एक एक करुन सगळ्यांना मारशीर पण तु दिर्घ आयुष्य जगशील रे बाबा..