मराठी चित्रपट : मला काय वाटतं????

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मराठी चित्रपट हा तसा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. अति जुने, जुने, नवे, आगामी अशा सगळ्याच चित्रपटांविषयी आपण बरीच चर्चा करत असतो. काही चित्रपट आपल्या पसंतीस उतरतात, तर काही अजिबात नाही. एक मात्र आहे, की चित्रपट कसा असावा किंवा कसा असू नये, याबाबत प्रत्येकाची स्वतंत्र अशी एक विचारधारा असते. त्याला अनुसरूनच प्रत्येक जण चित्रपटाचे मुल्यांकन करत असतो.

गेल्या काही वर्षांमध्ये या अशा मराठी चित्रपटांमध्ये एक प्रकारचा बदल झाला आहे. मध्यंतरीच्या काळातील विनोदी चित्रपट (???) आणि त्याआधीचे तमाशापट यांपेक्षा थोडे वेगळे प्रयत्न होत आहेत. त्यापैकी बरेचसे बदल हे सुसह्य आहेत. तरीपण अनेकदा असा विचार मनात येतो की मराठी चित्रपट पाहणारे प्रेक्षक म्हणजे तुम्ही आणि मी यांना नक्की काय पाहिजे याचा हे मराठी चित्रपट निर्माते दिग्दर्शक विचार करतात का? माझ्या मते असा विचार नक्कीच केला जात असणार.

या अनुषंगाने काही दिवसांपुर्वी एका नविन मायबोलीकराने मराठी चित्रपटांमध्ये काय काय सुधारणा करता येतील अशा आशयाचा मेसे़ज टाकला होता. त्या दृष्टीने विचार करताना खालील काही मुद्दे सुचले.

१. तंत्रज्ञान : तांत्रिक बाबींमध्ये सध्याच्या मराठी चित्रपटांमध्ये लक्षणीय सुधारणा आहे. त्यामुळे चित्रपट बर्‍याच वेळा बघणेबल होतो. जुन्या काळातले (म्हणजे अगदी ब्लॅक अँड व्हाईट च्या जमान्यातले) चित्रपट आठवून बघा. अर्थात त्या काळातील तंत्रज्ञानानुसार तितकच शक्य असेल कदाचित. पण सध्याच्या जमान्यात या तांत्रिक बाबींमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. अर्थात अजूनही इथे improvement ला वाव आहे. पण जे आहे, तेही नसे थोडके.

२. पटकथा : पटकथेच्या बाबतीत मात्र अजून सुधारणा आवश्यक आहे असे वाटते. सुदैवाने आज मराठी कथाविश्व बरेच समृद्ध आहे. त्यामुळे नवनवीन विषयांवरील कथा मिळविण्यास अडचण येऊ नये. नविन कथेवरचा चित्रपट लोकांच्या पसंतीस उतरेल की नाही, ही रास्त शंका निर्मात्याच्या मनात येउ शकेल, पण निदान गेल्या काही वर्षातील चित्रपटांवरून असं दिसून येतं की, केवळ नविन कथा आहे म्हणून चित्रपट पडला असं होत नाही. चित्रपटाची मांडणी व सादरीकरण, कथा, चित्रपटात वापरलेलं तंत्रज्ञान इत्यादी अनेक बाबींवर चित्रपटाच भविष्य ठरतं.

३. नविन चेहरे : त्याचप्रमाणे अजून एक खटकलेली एक गोष्ट म्हणजे, मराठीत नाटक, चित्रपट आणि सध्या टीव्हीवर चालु असणार्‍या असंख्य मालिका यामध्ये दिसणारे तेच तेच चेहरे. इथे नविन चेहरे असले की कलाकृती (नाटक, चित्रपट किंवा मालिका) अजून फ्रेश वाटते. सध्याचे आघाडीच सर्वच कलाकार या तीनही माध्यमांमध्ये इतके दिसतात, की कितीही चांगला अभिनय करत असले तरी ते कलाकार नकोसे वाटतात. मराठी च्या सुदैवाने अजूनतरी फ्रेश कलाकारांची वानवा नाहीये. दरवर्षी भरणार्‍या पुरुषोत्तम किंवा तत्सम स्पर्धांमधून कितीतरी नवीन कलाकार बाहेर पडतात, त्यांना पण अशामुळे संधी मिळेल.

४. संख्यात्मक आघाडी v/s गुणात्मक आघाडी : बॉलीवूड मधील मोठमोठे बॅनर्स मराठी चित्रपट निर्मितीत उतरले असल्यामुळे, इथे बर्‍यापैकी चांगली स्पर्धा निर्माण झाली असल्याचे वाटत आहे, पण या स्पर्धेमध्ये नुसतीच चित्रपटांची संख्या वाढून उपयोगी नाही, तर त्यांचा दर्जा (कथा, तंत्रज्ञान या सर्वच बाबतीत) सुधारला पाहिजे असे वाटते. नुसतेच "दे धक्का" टाईप चे चित्रपट येऊन उपयोगी नाही.

५. शहरी v/s ग्रामीण प्रेक्षक : मराठी चित्रपटांमध्ये पुर्वीपासून चालत आलेला हा भेद आहे. बर्‍याचवेळा असं होतं की शहरी प्रेक्षकांना भावलेली गोष्ट ग्रामीण प्रेक्षकांच्या गळी उतरत नाही, किंवा otherwise. पटकथा लेखकाला याचा विचार करावा लागेल.

६. चित्रपटगृह : मोठमोठ्या शहरांमध्ये सध्या नवनवीन multiplexes उभी राहात आहेत. पण यापैकी किती ठिकाणी मराठी चित्रपट प्रदर्शित होतात. पुण्यासारख्या मराठमोळ्या शहरातही आपण याची खात्री देउ शकत नाही, मग मुंबईसारख्या शहरांची काय कथा?

ही झाली माझी (एका नगण्य प्रेक्षकाची मते). तुम्हाला काय वाटते??????

विषय: 
प्रकार: 

अरुण,छान मुद्देसुद लिहिलयस रे... तू मांडलेले मुद्दे मला तरी पटले... मराठी चित्रपटांचा दर्जा दिवसेंदिवस सुधारतो आहे.. नविन नविन विषय हाताळणारे गुणी तरुण दिग्दर्शक,लेखक पुढे येत आहेत.. अजुन बर्‍याच बाबतीत सुधारणा होणे आवश्यक आहे पण तरी हळुहळु प्रगती होतेय हेही नसे थोडके. मुख्य म्हणजे मराठी लोकं आवर्जुन पहायला जात आहेत.. काही चित्रपट हाउसफुल होत आहेत.. एकुणात मराठी चित्रपटांचे भविष्य उज्ज्वल आहे अशी आशा करायला हरकत नाही..

नमस्कार मंडळी,
मराठी चित्रपट हे मुख्यत्वये विनोदीपट , राजकारण , सामजिक प्रश्न या विषयांवरच निघतात...
मला असे वाटते की, विनोदी चित्रपटांची संख्या कमी जाली पाहिजे.
मराठी मध्ये हिंदी चित्रपटांची कॉपी करने सोडले पाहिजे उदा:- साडे मादे तीन...( दिगदर्शन उत्तम होत..)
सद्या संगीता मध्ये अजय-अतुल , अवधूत गुप्ते , सलील कुलकर्णी सारखे तरुण संगीतकार आहेत, म्हणुन काही गाणी नक्कीच चांगली होत आहेत, मराठी मध्ये म्यूजिक नेहमीच चांगले असते... ( सनई चौघडे मधले नोथिंग इस इम्पोस्सीबले हे गाने जुन्या राजेश खन्नाच्या मेरे सपनोकी रानी च्या सिमिलर आहे ते avoid करायला हवे )
मराठी चित्रपट हे मल्टीपलेक्सला लागायला हवेतच...
तुम्हाला काय वाटत...

सध्याचे मराठी चीत्रपट बघायला ठीक असतात. पण तेच तेच कलाकार आणी तोच पांचरट वीनोदीपणा बघवत नाही.
वीषेशतः भरत जाधव, मकरंद अनासपुरे यांच्या ऑक्टींगचा त्रास होतो. बाकी मराठी चीत्रपट कात टाकत आहे हे नक्की.

मुख्य म्हणजे, नक्कल थांबली पाहीजे. हिंदी चित्रपटाची मराठी नक्कल करताना प्रेक्षक मूर्ख आहेत किंवा मागचे संदर्भ विसरले आहेत असा परस्पर समज करून घेऊन ते केले जातात. उदा. नवरा माझा नवसाचा हा सिनेमा तसा बरा होता.. पण त्यात, बाँबे टू गोवा, साधु और शैतान यातला मुख्य गाभा उचलला होता हे आपल्या लक्षात येतंच. तरीही सचिनने तसा तो सिनेमा बराच सुसह्य केला आहे. थोडा स्वतःच्या अभिनयाने, उरलेला अशोक सराफच्या अभिनयाने. पण साडे माडे तीन हा काय सिनेमा आहे? चलती का नाम गाडी ची थेट नक्कल, ती ही असंख्य चुकांनी भरलेली.

हो मी तुझ्याशी सहमत आहे दक्षिणा, मराठी चित्रपटांना स्वतःची ओळ्ख आहे. वळु, टिंग्या, कदाचीत हे चित्रपट फार छान आहेत आणि हिंदी चित्रपटांना सुद्धा मागे टाकणारे मला वाटले. पण आजुन मराठी चित्रपट लावणी, गाव, सरपंच, गावाकडची भाषा यातच अडकुन बसला आहे. आणी त्यामुळेच मुंबई, ठाणे सारख्या शहरांमध्ये जास्त मराठी चित्रपट रीलीज होत नाहीत.

मला जेंव्हा कळतं कि अमुक अमुक सिनेमा जुन्या कुठल्याशा चित्रपटाची नक्कल आहे, तेंव्हा तो मी ढुंकुनहि बघत नाहि, असे बरेच जण असतिल, तेंव्हा जर मराठि चित्रपटांची पत वाढवायची असेल तेंव्हा कथा , संवाद यांमधे विविधता ही आलिच पाहिजे. खूप तरुण मराठि मंडळि आहेत, (उदा. चेकमेट) दर वेळेस अगदि भरतलाच घेतले पाहिजे हा अट्टहास का? त्याला शोभेशी भुमिका असलि तर जरुर घ्या त्याला. म्हणजे जरा तो पण ताळ्यावर येइल.

मला तर वाटतं की भरत जाधव त्याच त्याच भुमिका करून खरोखरचा तो स्वतः कसा आहे विसरूनच गेला असेल. आणि प्रत्यक्ष जीवनी पण तो तसाच यडपटा सारखाच वागत असेल.

१. तंत्रज्ञान
इथे २ पातळींवर या मुद्द्याचा विचार केला पाहिजे. पहिला म्हणजे बजेट. मराठी चित्रपटांची बजेट्स कितीही म्हणालात तरी मर्यादित असतात. त्यामुळे अनेकदा काही तंत्रांच्या बाबतीत हात आवरता घ्यायला लागतो. पण नुसतंच बजेट आहे म्हणून अनेक तांत्रिक बाबी वापरल्या आहेत असं होऊन चालत नाही. साधी सरळ गोष्ट आहे आणि पैसे आहेत म्हणून स्पेशल इफेक्टस वापरले तर त्याचा काहीच उपयोग नाही. तेव्हा दिग्दर्शकाला तंत्राची उत्तम माहिती त्याचे पर्याय आणि वापरायचे तारतम्य असावे लागते.

२. पटकथा
अजून सामान्य प्रेक्षक उत्तम कथा म्हणजे उत्तम पटकथा असं सरळ गणित मांडतो. दुर्दैवाने अनेक दिग्दर्शकांचे आणि अनेक पटकथाकारांचेही हेच म्हणणे आहे. पटकथा हे संपूर्ण वेगळे प्रकरण आहे. फुसक्या कथेवर उत्तम पटकथा बांधता येऊ शकते आणि उत्तम कथेवरची पटकथा अशक्यरित्या फसू शकते. पटकथा लिहिणार्‍याला चित्रपटाची भाषा अवगत असणे महत्वाचे आहे.

३. नवीन चेहरे
नवीन चेहरे ही एखाद्या चित्रपटाची जमेची बाजू होऊ शकते तशीच दुर्दैवाची गोष्टही होऊ शकते. एखादा नेहमीचाच चेहरा एखाद्या वेगळ्या आणि नव्या भूमिकेत असा काही चमकून जातो की बस्स!! त्यामुळे नवीन चेहरे म्हणून फ्रेशनेस आणि म्हणून यश असं समीकरण मांडू शकत नाही. मात्र सेलेबल चेहरा म्हणजे बरा धंदा हे समीकरण बर्‍याच प्रमाणात खरे ठरत असल्याने वापरले जाते.

४. संख्यात्मक, गुणात्मक इत्यादी
हा वाद चिरंतन आहे. पण मुळात एका चित्रपटाशी संबंधित लोक जर तग धरायला हवे असतील तर कुठलाही चित्रपट घातलेले पैसे आणि वर नफा मिळवून देईल हा विचार केला गेलाच पाहिजे. नुसत्या सबसिडीच्या गाजरावर अवलंबून राहून चांगली चित्रपटनिर्मिती होणार नाही. चित्रपट ही कला असली तरी महाखर्चिक कला आहे. आणि मराठी चित्रपटांनी चांगला धंदा करणे हे अत्यंत महत्वाचे, गरजेचे आहे. आणि चांगला धंदा करण्यासाठी प्रामाणिक फिल्ममेकिंग हे गरजेचे आहे कुठलीही समीकरणे नव्हेत.

५. शहरी, ग्रामीण इत्यादी
काही गोष्टी ठराविक प्रेक्षकांनाच आवडतील तर काही दोन्ही प्रेक्षकांना. दोन्हीकडच्या प्रेक्षकांना आवडतील असं करण्याचा प्रयत्न असणं चांगली गोष्ट आहे. पण म्हणून संपूर्ण शहरी किंवा संपूर्ण ग्रामीण सेन्सिबिलिटिज असूच नयेत चित्रपटात असे नाही.

६. चित्रपटगृहे
महाराष्ट्रातल्या सर्व चित्रपटगृहांच्यात मराठी चित्रपट लावणे सक्तीचे आहे. आणि तुम्ही एक्झिबिटर/ डिस्ट्रिब्युटर शी योग्य पद्धतीने बोललात तर तुमचा चित्रपट प्राइम टाइम ला मल्टिप्लेक्सेस ला लागू शकतो असा आमचा अनुभव आहे. आता तर अजून थोडं सोपं झालंय. पण इथेही धंद्याचा मुद्दा येतोच. ओपनिंगलाच किंवा वीकेंडला ५०% च्या वर न जाणारा चित्रपट किती दिवस ठेवावा त्यांनी?

असो मला म्हणायचं इतकंच आहे. की मराठी चित्रपटांवर अन्याय होतो इत्यादी तथाकथित व्हिक्टिम मानसिकतेचे प्रदर्शन करणे ही फक्त पळवाट आहे. चांगली (प्रामाणिकपणे केलेली) फिल्म योग्या त्या मार्केटिंगच्या तंत्राने बाजारात आली तर उत्तम खपते. धंदा आणि पुरस्कार या दोन्ही पातळींवर यशस्वी होते.

प्रामाणिक फिल्ममेकिंगची गरज मात्र नक्की आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

अररारा... काय तो भरत जाधव!
"मुख्यमंत्री गणप्या गावडे" पाहिला का कोणी?.... मराठी चित्रपटांच्या नावाला बट्ट्या लावतात हे लोक...
काय अभिनय... काय संवाद आणि काय दिग्दर्शन... सगळाच आनंद आहे!
मॉबसीन तर सगळेच कॉमेडी.... कुठली पात्रे धरुन आणली आहेत कुणास ठाउक...
(मजा बघायची असेल तर यातला भरतचा अंगरक्षक बघा Happy )
फुकट, ऑनलाइन बघायच्या पण लायकेचा नाहिये हा (सो कॉल्ड) चित्रपट!

स्वरूप तु बहुतेक भरत चा "यांचा काही नेम नाही, मुक्काम्पोस्ट लंडन, माझा नवरा तुझी बायको" हे चित्रपट बघीतलेले दीसत नाही. कधी अपचन झाल असेल तर नक्की बघ. एकदम रामबाण उपाय :). असले चित्रपट कोणता मराठी माणुस मल्टीप्लेक्समध्ये जावुन बघणार? पैसे आणि वेळ दोन्हीं वाया. आणि म्हणे मराठी चित्रपटांना सावत्रपणाची वागणुक देतात मुंबईत.

मराठी चित्रपटांवर अन्याय होतो इत्यादी तथाकथित व्हिक्टिम मानसिकतेचे प्रदर्शन करणे ही फक्त पळवाट आहे. चांगली (प्रामाणिकपणे केलेली) फिल्म योग्या त्या मार्केटिंगच्या तंत्राने बाजारात आली तर उत्तम खपते. धंदा आणि पुरस्कार या दोन्ही पातळींवर यशस्वी होते.
------------------------------------------
अतिशय समर्पक स्पष्टीकरण्...वेल सेड..

मी ही अज्जुकाच्या बहुतेक सर्व मतांशी सहमत आहे.
परवा झी मराठी वर 'एवढंसं आभाळ' नावाचा सिनेमा लागला होता. तो ही चांगला होता, थीम, मांडणी, मुख्य म्हणजे सिनेमच्या विषयावरचा 'फोकस' हा अगदी शेवटापर्यंत कुठेही थोडा सुद्धा सैल पडला नाही. अर्थात काही त्रुटी होत्या, पण त्या नजरेआड करणं सहज शक्य होतं.

इथे बर्याच दिवसांपासून कोणी आलेले दिसत नाही....असो. मराठी चित्रपटांबद्द्ल चर्चा चालू आहे म्हणून एक लिंक टाकते...

http://loksatta.com/daily/20081013/mp02.htm

काही करता येईल का?

.

मराठी पिक्चर सुधारले हे चांगलं लक्षण आहे. पण आता गोड गोड कथांचा मारा होतोय. वेगळा, धाडसी विषय आताळला गेला पाहीजे. नव्या कथाकारांकडे खूप पोटेन्शियल आहे. आताच सीमा गैलाड वाचत होते. अशा विषयांवर मराठी सिनेमे निघू लागले तर तोच तोच पणा जाऊन मराठी सिनेसृष्टी कात टाकेल.

१ ] मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या गटांची आवड व अभिरुची यात खूपच तफावत असावी, नव्हे आहेच, व म्हणूनच सिनेमा मुख्यतः त्यातल्या कोणत्या गटाला समोर ठेवून काढला आहे याचा अंदाज घेऊनच तो पहावा लागतो. जोपर्यंत या सर्व गटांची आवड व अभिरुची यांची एक साधारण तरी समान पातळी येत नाही, तोपर्यंत तरी संपूर्ण मराठी चित्रपट खूप वरच्या दर्जाचा होण्याची अपेक्षा नाही करता येणार.[वर 'बघवणेबल' नसलेल्या ज्या सिनेमांचा उल्लेख केलाय त्यानाही प्रचंड प्रेक्षकवर्ग आहेच !]. चांगल्या दर्जेदार सिनेमांचं प्रमाण वाढतं आहे हे त्या दृष्टीने खूपच अशादायक आहे ;
२ ] हल्ली माझ्या मनात एक पाल मात्र चुकचुकत असते; दर्जेदार सिनेमा देण्याची ईच्छा व कुवत असलेली मंडळी प्रेक्षकाना दर्जेदार सिनेमा द्यावा यापेक्षाही आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या सिनेमाची दखल घेतली जावी या हेतूने तर भारावली जात नाही आहे ना ! कथानकाला किंवा व्यक्तीरेखेला उठाव येण्यासाठी अजिबात गरज नसलेल्या कांही गोष्टी एरव्ही चांगल्या असलेल्या सिनेमात या हेतूने घुसडल्या गेलेल्या पाहिल्या कीं हे खूपच खटकतं.

र्जेदार सिनेमा देण्याची ईच्छा व कुवत असलेली मंडळी प्रेक्षकाना दर्जेदार सिनेमा द्यावा यापेक्षाही आंतराष्ट्रीय पातळीवर आपल्या सिनेमाची दखल घेतली जावी या हेतूने तर भारावली जात नाही आहे ना !

+१

व्ह्यूअरशिपचं साधं गणित आहे.
१. बाकायदा पैसे देऊन थिएटरला जाऊन चित्रपट बघणारी मराठी मंडळी किती?
२. मराठी सॅटेलाइट चॅनेल्सची व्ह्यूअरशिप किती?
तुलनेत हे दोन्ही साउथ इंडस्ट्रीपेक्षा खूप कमी आहे.

परराज्यात रहाणार्‍या मराठी मंडळींची संख्या इतकीही प्रचंड नाही की त्या त्या ठिकाणी सिनेमा बॉक्स ऑफिसवर चालेल.
तमिळ, तेलुगु, मल्याळी आणि कानडी या चार भाषा बोलणार्‍या लोकांना यातली आपली मातृभाषा सोडून जनरली इतरपैकी एक तरी कळत असते आणि त्या भाषेतले सिनेमे बघायला आवडत असतात.
त्यांना काय मला भाषा कळत नसून आवडतात बघायला मल्याळी सिनेमे (माझ्यासारखे भरपूर आहेत!)
मराठी मातृभाषा नसूनही मराठी सिनेमा बघणारे किती? नगण्य.

इथे बजेटची गणितं आहेत.

बाकायदा पैसे देऊन थिएटरला जाऊन चित्रपट बघणारी मराठी मंडळी किती?
>>
यावर विवाद होऊ शकतो. मुळात दिलेल्या पैशाचे मोल वसूल होईल अशी सकस करमणूक आपण देतो का हा ही प्रश नाही का? नुस्ताच ताइमपास असेल तर लोक म्हनतात जाऊ द्या टीव्हीवर पाहू नाहीतर सीडी आणू. त्यासाठी तडमडत थेटरात जायला नको. देऊळला कुठे प्रेक्षक कमी पडले? गेल्या ३०-४० वर्षात थेटरात पाऊल टाकलेल्या आमच्या मातोश्रीना बसत उठत थेटरचा जिना चढत आम्ही देऊल दाखवला. का तर त्यानी तो पाहिला(च) पाहिजे अशी आमची इच्छा होती. असा 'च' लावावा असे किती चित्रपट येतात. ? फार कशाला आपला 'श्वास' लोकांनी थियेटरवर उड्या घेऊन पाहिलाच ना.? त्यात हा 'च' होता म्हणूनच ना?

आणि बजेतचा प्रश्नच गैरलागू आहे. लोकानी बायकांचे दागिने गहाण ठेउन /विकून तुटपुंज्या बजेटमध्ये कृष्णधवल चित्रपट काढून राष्ट्रीय व आन्तराष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले आहेत. प्रश अकलेचा आणि प्रतिभेचा आहे...

हिंदीत जसे प्रयोग होतात तसे मराठीत व्हायला हवेत. रामुने सहा कथांचा एकच पिक्चर बनवला होता. तसं काहीतरी

बाळू जोशी,
मी फक्त साउथपेक्षा मराठीची बजेटस कमी का याचं उत्तर दिलंय.

दिलेल्या पैशाचे मोल वसूल होईल अशी सकस करमणूक <<< ही हिंदीत मिळते की साउथच्या प्रत्येक फिल्ममधे मिळते? माझ्या पाहण्याप्रमाणे सकस करमणूक आणि संवंग करमणूक याच प्रमाण सर्व भाषांमधे साधारण सारखंच आहे.

मराठी चित्रपटसृष्टीविषयी एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते की, तिच्यात काळापैसा फार कमी आहे. हिंदी चित्रपटव्यवसाय पूर्णपणे माफियांच्या ताब्यात गेलाय. तशी वेळ मराठीवर येऊ नये.

-गा.पै.