फेसबुक : अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वयंनियंत्रण

Submitted by असो on 8 December, 2011 - 00:41

सध्या चर्चा चालू आहे ती कपिल सिब्बल यांनी गूगल आणि फेसबुक या कंपन्यांना स्वयंनियंत्रणाबाबत केलेल्या सूचनेची. नेमकं काय झालंय ?

१. आताच अशी गरज का भासावी ?
२. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा अतिरेक होतो का ?
३. अभिव्यक्तिस्वातंत्र्याबरोबर काही जबाबदा-या येतात का ?
४. आपण मतप्रदर्शन करणे आणि दुस-याच्या मताचा आदर करणे याबाबतीत पुरेसे प्रगल्भ आहोत का ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> भाजपा आणि काँग्रेस या पलिकडे जे कुणी असतील त्यांचा दृष्टीकोण काय आहे ?
या प्रश्नाला वरचे हे उत्तर
>>>मौन पाळावे तोंडाने
>>>कळ दाबावी बोटाने
अचूक आहे Proud
अन इथे वा नेटवर लिहीणारे भाजपा अन कॉन्ग्रेस यापैकी कुणाच्या तरी दावणीला बान्धलेत असा गर्भितार्थ या प्रश्नातुन निघतो, त्याचा निषेध! Proud Light 1 सामान्य जनता बराचकाळपर्यन्त दोनवेळच्या जेवणाच्या नि सुरक्षित भविष्याच्या दावणीला बान्धलेली अस्ते. पण कधी कधी ती नेमका निर्णय घेण्याकरता त्या दावण्या तोडूनही टाकते. (विचारवन्त मग् त्यात "क्रान्ती" वगैरे शोधू लागतात Wink )

मौन पाळावे तोंडाने
कळ दाबावी बोटाने

अशा प्रकारच्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आदरच आहे. पण गांभिर्यपूर्ण चर्चांमधे अशा खिल्ली उडवणा-या पोस्टसवर स्वयंनियंत्रण असावे का ?

( एखादा लेखक सातत्याने चिमटे काढणारे / विनोदाचा आश्रय घेणारे लिखाण करत असेल तर इतरांच्या सहनशक्तीचाही विचार व्हावा )

भाजपा आणि काँग्रेस या पलिकडे जे कुणी असतील त्यांचा दृष्टीकोण काय आहे ?

या वाक्यातून अनर्थ होईल असं वाटलं नव्हतं Proud . असो. या विषयावरची चर्चा पाहता त्यात राजकिय अनुषंगाने आलेले मुद्दे काँग्रेस आणि भाजपा यांचे समर्थक / विरोधक यांचा दृष्टिकोण पुरेसा स्पष्ट करून गेलेले आहेत असं वाटतंय. या शिवाय नवीन मुद्दे असतील तर स्वागतच आहे.

पण ज्यांचा समावेश वरीलपैकी गटात होत नाही त्यांच्याकडून नक्कीच वेगळे मुद्दे येऊ शकतात असं वाटलं. असो...

पण ज्यांचा समावेश वरीलपैकी गटात होत नाही ..

ते कधीच काही बोलत नाहीत हाच तर प्रॉब्लेम आहे. नगरपालिकांचा निकाल बघताय ना ?

Pages