साद देती हिमशिखरे. भाग -२ : फागू ते मनाली.

Submitted by शोभा१ on 3 December, 2011 - 02:54

http://www.maayboli.com/node/30435

आवरून, चहा-नाश्ता संपवून, आम्ही मनालीच्या दिशेने आगेकुछ केले. आता सगळ्यांच्या माना १८० अंशाच्या कोनातून फिरत होत्या. ३६० अंशाच्या कोनातून फिरवता येत नाही, याचे दुख: होते. सोनेरी किरणं सगळ्या झाडांवर, डोगररांगांवर विसावली होती. पक्षी आनंदाने विहार करत होते. हिरवीगार
वृक्षराजी, विविध प्रकारची फुले मन मोहवून टाकत होती. प्रत्येक घराच्या अंगणात फुलझाडे लावलेली होते. आणि आपल्याकडे पूर्वी जसे, प्रत्येक घराच्या अंगणात तुळशीवृंदावन असायचेच तसे इथे आणि गुलबाचे झाड होतेच. घर कितीही लहान असूदे, पण गुलाबचे मोठे व फुलानी बहरलेले झाड आहेच. किती विविध रंगी गुलाब होते तिथे. पण मला गाडीतून जास्त फोटो नाही काढता आले. Uhoh
इथे मला सर्वात जास्त आठवण झाली ती माझ्या निग. मित्र-मैत्रिणींची. असं वाटत होत, अख्खी निग टीम बरोबर असती तर कित्ती मजा आली असती. दिनेशदानी, विविध झाडांची, पाने, फ़ुले, फ़ळे, खोड, मुळे, यांची सविस्तर माहिती दिली असती, जिप्सीने भरपूर फोटो काढले असते, साधना, जागू, शांकली, शशांक, व बाकीच्या माहितगार लोकांनी आमच्या शंकाच निरसन केल असत. आणि मी, प्रज्ञा, अनिल, गिरी, आर्या, प्रिती, अशा निगच्या बालवाडीतील मुलानी सर्वाना अनंत प्रश्न व शंका विचारून भंडावून सोडल असत. (आता परत जाणार ते सगळ्या 'निग'टीम बरोबरच.) आता जास्त लिहीत बसत नाही. प्रत्यक्ष फोटोत पहाच. Proud
१.
२.
३.
५. आणि हे गुलाब बघा.
६.
मी आता जास्त फोटो टाकणारच नाही.(मन मारून :डोमा:)
आमच्या चक्रधरानी नंतर आम्हाला कुफरी येथे नेले. ज्या ठिकाणी आपण अपरिचीत असतो, तिथे काही लोक आपल्याला कसे फ़सवतात याचा अनुभव इथे आम्हाला आला. आम्हाला घोड्यावरूनच इथे फ़िराव लागणार. अस सांगण्यात आल. मनात नसतानाही नाईलाज म्हणुन आम्ही तयार झालो. प्रत्येकी ३८० रुपये, प्रमाणे आमचे १० जणाचे ३८०० रुपये, आमच्या विकास महाशयानी "मी देतो" असे सांगून घेतले. नंतर पटापट बरेच घोडे तिथे आणण्यात आले. एका घोड्याच्या मागे दुसरा घोडा बांधलेला होता. असे दोन घोडे एकच माणूस सांभाळत होता. घोड्यावर बसताना ज्या गमती-जमती झाल्या त्या अवर्णनीयच.
’आकुमि’च्या मुलीच्या किंकाळ्य़ानी आसमंत दणाणून गेला. तर माझी स्थिती याच्या उलट होती. आम्ही दरीच्या बाजूने चाललो होतो. मी घोड्यावर बसले होते.(जीव मुठीत घेऊन :डोमा:)आणि मागे बांधलेली घोडी, घोड्याला मागे खेचते, असे त्या घोड़ेवाल्याच मत होते. म्हणून त्याने घोड्याचे लगाम, त्याच्या(घोड्याच्या) गळ्यात टाकुन, घोडीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. तो तिला ओरडत होता आणि एक फटका पण दिला. त्याबरोबर ती घोड़ी थोड़ी पुढे सरकली आणि हा घोड़ा दरीच्या कड़ेला सरकला. मला वाटले, आता हा घोड़ा आपल्याला दरीचे विराट रूप जवळून दाखवणार. त्यामुळे "अरे आस्ते, आस्ते. अरे देखो,ये इधर जा रहा है. " वगैरे माझे अर्धवट शब्द मला खूप खोल खोल गुहेतून आल्यासारखे वाटले. रस्ता फारच दागद-धोंड्यांचा होता. त्यामुळे घोड्याचे पाय घसरत होते. आणि 'मन चिंती ते वैरी न चिंती' या म्हणीप्रमाणे अनंत वाईट विचार माझ्या मनात येऊ लागले. हे कमी म्हणून की काय, समोरून अनेक घोड़े धावत येत होते. तेव्हा यातला एक तरी येउन आपल्याला धड़कणार असही खात्रीच झाली. आम्ही चढ चढून जात होतो. शेवटी देवाचे नाव घेत तशीच बसून राहिले. वाटेत आमच्याकडून परत १०/- रु. घेण्यात आले. (जकात नाका :फिदी:) एकदाचे इच्छित स्थळी पोहोचलो. आणि दरीत पसरलेल्या
सफरचंदाच्या झाडांकडे बोट करून, सर्व घोडेवाल्यानी एका सुरात सांगीतल " ये सब ऐपल के पेड़ है". झाल जे दाखवायच होत ते एका दाखवून झाल. आम्ही घोड्यावरून उतरलोही नाही. इथे मी एकही फ़ोटो काढला नाही. कारण कॅमेरा पर्समध्ये होता. आणि तो बाहेर काढण्या्साठी माझा हात रिकामा नव्हता. (मुठीत जीव होता ना. :डोमा:)
तसेच मागे फिरलो. वाटेत एका ठिकाणी, "उधर एक मंदिर है ! देखके आओ! " अस त्यांनी सांगीतल म्हणून घोड्यावरून उतरलो. आणि काही अंतरावर असलेल्या मंदिराजवळ जावून, लांबूनच दर्शन घेतले. Proud आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य न्याहाळून काही फ़ोटो पण काढले.
१.
२.
३.

आणि हे आहेत याक. पण याच्यावर मात्र आम्ही बसलो नाही. (आता वाटतय़, ती ही सफ़ारी
करायला पाहिजे होती.)
५.
६.
आता सगळ्याना राग आलेला होता. ३९० रुपये देऊन येवढ काहीच पाहण्यासारख नव्हत. पण एकमेकाना समजावून परत सर्व अश्वारूढ झालो. येताना उतार होता. थोडीशी भिती कमी झाली होती. मग त्या बरोबरच्या मुलाला काही प्रश्न विचारले. त्यातून, दिवसातून ६-७ अशा खेपा होतात हे समजले. आणि त्या मुलांचे व घोड्यांचे पण वाईट वाटले. आमच्या ३९०० रूपयांमधले किती रुपये, या मुलांना व घोड्यांसाठी वापरले जाणार होते, कुणास ठाऊक. येतानाच कळल, की ती घोडी जी लंगडत होती, तिच्या पायाचा नाल नीट बसलेला नव्हता. बिच्चारी. तसेच तिच्याकडून काम करून घेत होते. मी येतानाच मी ज्या घोड्यावर बसले होते त्याची क्षमा मागितली. माझ्यामुळे त्याला जो त्रास झाला त्याबद्दल. परत येताना खरं तर माझ्या मनात आलं होत, की आता चालतच जावं. पण पुढे जायला उशीर झाला असता म्हणून गप्प बसले. एकदाचे सुखरूप परत आलो. आणि मी जाहीर केल. "मी कधीही वैश्णव देवीला कधीही जाणार
नाही." पटापट गाडीत बसून सगळे निघालो. आजूबाजूची रंगीबेरंगी फुले, उंचच उंच झाडे, पाहून मन प्रसन्न झाल.


कड्यावरच बांधलेली घरे, पाहून तर आश्चर्य वाटल. .
९.
१०.
११.
दुपारी एका हॉटेलात ऊदर भरण करून, पुढे निघालो. आजुबाजुला सफरचंदाची झाडे दिसत होती. पण चालत्या गाडीतून फोटो काढता येत नव्हते. आणि जे आले ते मी इथे देणार नाही. Proud प्रत्येक झाडावर प्लास्टिकच्या पिशव्या बांधलेल्या होत्या. ड्रायवरने सांगितले की, "झाडाना पाण्याचा पुरवठा करण्यासाठी ह्या पिशव्या बांधलेल्या आहेत. त्यात पाणी भरलेले आहे. " हे एक नविनच पहात होतो आम्ही.
निसर्गाची विविध रुपे पाहून मन फारच आनंदित झाल.
आणि ही आहे घरांची गर्दी .
१२
१३
१४
असा सगळा नजारा न्याहाळत आम्ही चाललो होतो. त्यातले काही तुमच्यासाठी.
ही आहे बियास नदी. ही सतत आम्हाला सोबत करत होती.
१५. href="https://picasaweb.google.com/lh/photo/UQ51tayscgYFQqkYPY08VthCDmEoVI_fLt...">
हे आणखी काही फोटो.
१६.
१७.हे आहे भातसू धरण.

हा सगळा प्रवास करताना एकच गोष्ट त्रासदायक वाटत होती, आणि ती म्हणजे एका ठिकाणाहून, दुसया ठिकाणी पोहोचायला आम्हाला ८-१० तास लागत होते. त्यामुळे निसर्गाचा आनंद आम्हाला शांतपणे घेताच आला नाही. सतत गाडीतून जातानाच सृष्टीसौंदर्य पहाव लागत होतं. Uhoh
एक आश्चर्यकारक गोष्ट पहाण्यात आली, ती म्हणजे, इथे एकही दवाखाना दिसला नाही. चौकशी करताच असं समजल की इथल्या स्वच्छ, हवेमुळे इथे शक्यतो कोणी आजारी पडत नाही आणि आजारी पडले तरी निसर्ग औषधाने आजार बरे होतात. इथे त्रास झालाच तर दातांचा होतो. अस समजल. आणि खरोखरच एक दातांचाच दवाखाना दिसला.
हा आहे मनालीचा सूर्यास्त.

इथेही प्रवासातच आम्हाला रात्र झाली. हे आहेत लोकांच्या घरातील दिवे.

आम्ही ज्या रस्त्यावरून जात होतो, त्या रस्त्याच्या एका बाजूला नदी होती, दुसर्‍या बाजूला कडा होता. ह्या अरुंद रस्त्यावर, एकही लाईट नसल्यामुळे, गुडुप्प अंधार होता आणि असंख्य चांदण्यांचे छप्पर मात्र फारच सुंदर दिसत होत.
रात्री ९-९३० वाजता हॉटेलवर पोहोचलो. थंडी तर 'मी' म्हणत होती. पटापट जेवून आणि गरम गरम पाणी पिऊन निद्रेच्या अधीन झालो.

गुलमोहर: 

गिरी, तुझे आभार मानीन तेवढे थोडेच आहेत Happy
पण एक सांगू का, अजून हिमालयात पोहोचलेच नाही आहे. अजून वाटेतच आहे. Proud

शोभा, छान लिहिलंस गं. खरंतर तु सिमल्याहून आल्यापासून आपल्या गप्पा अश्या झाल्याच नाहीत. पण आता वाटते. आधी हे फोटो पाहिले असते तर आताची गंमत वाट्ली नसती ! फोटो छान आहेत.

शोभा, मस्तच आलेत फोटो. आणि सगळे वर्णर्न पण.. खुप आवडले.. Happy
मनालीला आंम्ही पण गेलो होतो, तेव्हा, आंम्हाला घोडे करावे लागले नव्हते. १ गाडी करुन त्या पौईंट
पर्यन्त नेले.तेथुन चालतच मस्त मजा करत गेलो आणि १-२ गेम्स होते. ते खेळताना खुपच धमाल आली
होती. त्या सगळ्यांची तु खुप खुप आठवण करुन दिलीस. खुप छान वाटले.
पुढ्च्या भागाच्या प्रतिक्षेत... लवकर टाक.. Happy

छान ग.

इथे एकही दवाखाना दिसला नाही. चौकशी करताच असं समजल की इथल्या स्वच्छ, हवेमुळे इथे शक्यतो कोणी आजारी पडत नाही आणि आजारी पडले तरी निसर्ग औषधाने आजार बरे होतात. >>> बिच्चारे डॉक्टर Proud
मनालीचा सूर्यास्त प्रचि आवडला वर्णनही मस्तच Happy

छान वर्णन आणि प्रचि. Happy
त्या मंदिरात का नाही गेलात? ६००-७०० पायर्‍या आहेत पण मंदिर छान बांधलय.

शोभे काय्य गं...आम्हाला सांगितले असते तर तुझ्या मागे नसतो लागलो Angry
बाकी फोटो मस्तच Happy

आशुतोष, धन्यवाद.
आर्या, स्मितू, आपण परत जाऊ या हा. हाकानाका. Proud
रागवू नका. (खर तर तुम्ही अस रागवाव, म्हणून तर तुम्हाला सांगितल नव्हत. Proud )
शहाण्या ना तुम्ही. Wink

शोभा, काय झालं गं ! परत वेळ मिळत नाही का? काही मदत हवी असली तर सांग पण लवकर लिहि ! फार वेळ वाट पाहायला लावु नकोस Uhoh

Chan
sangankavar jase F5 dabale ki kase rifresh hote
tase prvasala jaun aalo ki hotech hote

सुंदर वर्णन, सुंदर प्रचि - फारच छान लिहिलंय.
फक्त एक गोष्ट जरा खटकली - <<< साधना, जागू, शांकली, शशांक, व बाकीच्या माहितगार लोकांनी आमच्या शंकाच निरसन केल असत.>>>> या सर्वांमधे माझे नाव का टाकलय ? कारण मी ही बालवाडीतच आहे अजून.
डॉ. करता पूर्ण सहानुभूती..