कृष्णमयी..

Submitted by प्राजु on 19 March, 2009 - 13:27

ऐन त्या दुपारी, कालिंदीच्या तिरी
खेळतो मुरारी, पाठशीव

हसत खेळत, अल्लड गोपिका
अव्खळ राधिका, कान्हा पाही

घट डोईवर, चाले भराभर
नदी तीरावर, पाण्यासाठी

भरूनिया कुंभ, घेता डोईवर
खडा घटावर, ट्णकारला

भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग
निरखे श्रीरंग, राधिकेला

चोरून ती उभी, अव्घड ओलेती
सावळ्याची मिठी, अंगभर

मिटले नयन, सुटला पदर
थरारे अधर, चुंबताना

म्हणा कृष्णसखी, अथवा सानिका
झाली ही राधिका, कृष्णमयी

पावरीचा सूर, आज दूर दूर
प्रणयाचा पूर, गोकुळात

- प्राजु

वि. सु. = अव्खळ, अव्घड मात्रा सांभाळण्यासाठी लिहिले आहे.

गुलमोहर: 

प्राजू कविता खूप मधुर्,मखमली. थेट गोकुळात नेलंस!सौंदर्य्,भक्ती,श्रृंगार सगळं मुक्तपणे उधळलस गं.

छान उतरलीये कविता, प्राजू... अगदी दृश्यस्वरूप. मांडणीही खूप आवडली.
भिजुनिया चिंब, शहारे सर्वांग
निरखे श्रीरंग, राधिकेला

चोरून ती उभी, अव्घड ओलेती
सावळ्याची मिठी, अंगभर
बहोत खूब!

प्राजू एकदम नादमय सानिके सारखी

मस्त! आवडली.

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

प्राजू, कविता वाचताना खरच कृष्णच समोर उभा राह्तो ... मला पण कृष्णमय झाल्यासारख वाट्लं!!
Happy

---------
रुसुन रुसुन रहायच नसतं, हसुन हसुन हसायच असतं !

थेट गोकुळात नेलंत >>अगदी अगदी !....दृश्यस्वरूप ...खुप सुंदर !

-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com

राधा ही माझी सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा आहे, त्यामुळे त्यावर लिहीलेलं काहीही आवडतंच. आणि ते अशा सिद्धहस्त लेखणीतुन उतरले असेल तर मग सांगायलाच नको. प्राजु, खुप सुंदर. असंच काहीतरी मीराबाईंवर पण लिहा ना. ती पण कृष्णमयीच होती.

____________________________________________

आता मी बोलणार नाही. (पण बोलल्याशिवाय मला राहवणार नाही Happy )

प्राजु खुपच छान ग.

प्राजु अप्रतिम लिहीलयस ग ,खरच गोकुळात नेलस, मस्त, नि:शब्द झाले

सुंदर Happy
************
विविध घटकांतून बाहेर पडणार्‍या ऊर्जेच्या उत्सर्जनाचा अभ्यास. तापमानाबरोबर उत्सर्जन लहरीमधेही फरक पडतो - "लॉ ऑफ डिस्प्लेसमेंट" - विल्यम विन - फिजिक्स नोबेल (१९११)

खुप सुंदर... खुप आवडली...
प्रतिसादासाठी शब्द कमी पडावेत....

अप्रतिम सुंदर.
-मुकुंद कर्णिक

कविता छान आहे...

मिटले नयन, सुटला पदर
थरारे अधर, चुंबताना >> पण कृष्णाच आणि राधिकेच नातं ह्या जगाला कळाल नाहि ह्याच फार दु:ख होतय. प्राजु पुन्हा एकदा वाचा. ही चुक मीही केली आहे Sad कारण आपण सगळी कडे हेच वाचतो. राधा ही कृष्ण सखी होती प्रेयसी नाही , कृष्ण राधेच नातं खरं फार वेगळ आणि अपार मैत्रीच आहे. Happy

पण हे ,सगळी कडे असचं का लिहीलं जात? अगदी सगळ्या संतांनाही नातं कळु नये? स्त्री आणि पुरुषाच नातं मैत्रीच असु शकत हे नकळणारा समाज राधेकृष्णाला ही त्याच तराजुत तोलतो Sad हे त्या पुर्णपुरुषाच दुर्दैव आणि काय?

असओ तुझ्या कवितेवर माझा आक्षेप नाही, "थरारे अधर, चुंबताना" कृष्णाने राधेचे अधर चुंबणे हे पटल नाही येवढच Happy माझी एक मैत्री वरची कविता आहे ती पोस्टेन कधीतरी.

राग मानु नये ही विनंती.

नादमय. धुंद. कदाचित श्रीकृष्ण - राधा मैत्रीच्या असीम टोकाला पोचले असावेत, जिथे मैत्रीचं प्रेमात रुपांतर होण्यास सुरुवात होते. मला गैर नाही वाटले. सर्वस्व देण्याची तयारी असलेली नि:स्सीम राधा आणि जिला ते द्यावेसे वाटले असा तो तेजस्वी श्रीहरी. इथे शरिर असा संदर्भ न घेता तन्-मन्-सर्वस्व समर्पण असा अर्थ घेतला तर?

इतकी सुंदर कविता मी मायबोलीवर कधीच पाहिलेली नाही.. अहाहा, वाचताना अगदी डोळ्यासमोर चित्र उभं राहावं इतकी सुंदर कविता मायबोलीवर प्रथमच वाचनात आली.

सहज