हरिश्चंद्राची फॅक्टरी

Submitted by जिप्सी on 7 December, 2011 - 23:19

गेले कित्येक दिवस, महिने आणि वर्षापासुन मनात असलेला आणि ट्रेकर्सची पंढरी म्हणुन ओळखल्या जाणार्‍या हरिश्चंद्रगडाची वारी अखेरीस संपन्न झाली. इतके दिवस फक्त फोटोतच त्याला पाहत होतो, भेटत होतो आणि आंतरजालावर, पुस्तकात त्याच्याविषयी वाचत होतो, पण खरं सांगायच तर हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आणि परीसर, महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर "तारामती", रौद्रभीषण कोकणकडा यांना प्रत्यक्ष पाहिल्यानंतर "जो बात तुझमें है तेरी तस्वीरमें नही" असाच काहिसा फिल या दोन दिवसात आला आणि पुन्हा एकदा सह्याद्रीच्या प्रेमात पडलो.

खरंतर मी वृत्तीने जिप्सी, पण हाडाचा ट्रेकर्स नाही, त्यामुळे आत्तापर्यंत जेव्हढे झेपेल, जमेल , सोसेल तेव्हढेच ट्रेक केले. त्यातही हरिश्चंद्रगडाविषयी आकर्षण खुपच होते, पण त्याला भेटण्याचा योग अजुन काही येत नव्हता. तोच योग ३-४ डिसेंबर रोजी जुळुन आला. अहमदनगर, पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या या गडाचा विस्तार मोठा असल्याने येथे पोहचण्याच्या वाटाही वेगवेगळ्या आहेत.माळशेज घाट, खुबी फाट्याहुन खिरेश्वर मार्गे येणारी ५-६ तासाची वाट, साहसाशीच ज्यांची नाळ जोडली आहे त्यांची नळीची वाट, आमच्यासारख्या ट्रेकर्ससाठी सोप्पी पाचनईची दोन तासाची वाट, अशा विविध मार्गाने गड सर करू शकतात. वारकर्‍याला जशी विठठ्ल भेटीची ओढ असते तशीच ओढ प्रत्येक ट्रेकर्सला हरिश्चंद्रगडाची असते. असं म्हणतात कि या गडाचा इतिहास कुतुहलजनक तर भूगोल विस्मयकारक आहे. इतर सर्व किल्ल्यांना ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे तर हरिश्च्चंद्रगडाला हजारो वर्षापूर्वीची पौराणिक पार्श्वभूमी लाभली असुन याचा उल्लेख अग्नीपुराण आणि मत्स्यपुराणात आढळतो. हिच हरिश्चंद्राची फॅक्टरी जैवविविधतेनेही नटली आहे. गडाच्या पायथ्याचा परीसर कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य म्हणुन ओळखला जातो.

हरिश्चंद्रगड आणि परीसरः
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर: येथेच हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर आहे. तारामती शिखराच्या उत्तर पायथ्याला लेणी कोरलेली आहे. सोळा मीटर आहे. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोरच एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो यालाच `मंगळगंगेचा उगम' असेही म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा रहाण्यासाठी योग्य आहेत तर काही गुहांमध्ये पाणी आहे. या गुहांमधील पाणी थंडगार व अमृततुल्य आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथर्‍यात जमिनीत खाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. हरिश्चंद्रेश्वर मंदिराच्या दारात एक पुष्करणी
आहे. त्यामधील कोनाड्यांमध्ये पूर्वी मूर्ती होत्या. मंदिराच्या समोर नंदी आहे. साधारण दहाव्या अकराव्या शतकात झांज राजाने बांधलेल्या १२ मंदिरांमधील हे मंदिर आहे. मंदिरावर कोरीव गुहा आहे. मंदिराच्या उत्तरेकडे पाण्याच्या प्रवाहाने झालेली धळ आहे. या धळीमध्ये केदारेश्वराची लेणी आहे. यामध्ये भलीमोठी पिंड आहे. पिंडीच्या बाजूला पाणी भरलेले असते.प्रदक्षिणा मारता येते. गडपणाच्या खाणाखुणा लोप पावत असल्यातरी निसर्गाची मुक्त उधळण, त्याचे रौद्रत्व, निसर्गाचे वेगवेगळे आविष्कार आपल्याला हरिश्चंद्राच्या भटकंतीमध्ये पहायला मिळतात. मात्र हे सर्व पहाण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण किमान दोन दिवसांची सवड हाताशी ठेवणे गरजेचे आहे.

तारामती शिखर: उंची साधारणतः ४८५० फूट्.. शिखराच्या पोटात एकूण सात लेणी आहेत. त्यापैकी एका गुफेत गणेशाची सुमारे साडेआठ फुटाची भव्य आणि सुंदर मूर्ती आहे. याच गणेशगुहेच्या आजूबाजूला अनेक गुहा आहेत. त्यातही राहण्याची सोय होते. गुहेच्यासमोर उभे राहिल्यावर डावीकडे जाऊन पुढे वर जाणारी वाट आपल्याला अर्ध्या तासाच्या चढाईनंतर तारामती शिखरावर घेऊन जाते. या शिखरावरून समोरच दिसणारे जंगल, घाटावरचा आणि कोकणातील प्रदेश न्याहाळता येतात. शिखरावर जाताना वाटेत अनेक गोमुखे लागतात. माथ्यावर दोनतीन शिवलिंगे आहेत.

कोकणकडा: या किल्ल्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे येथील कोकणकडा. हा कडा महाराष्ट्रातील सर्वांत उंच कडा आहे. हा कडा रोमन लिपीतील यू 'U' या अक्षराच्या आकाराचा आहे. हा इतर कड्यांसारखा ९० अंशात नसून बाह्य गोल आकाराचा आहे. समोरून बघितला तर नागाच्या फण्यासारखा दिसतो.
(आंतरजालाहुन साभार)

चला तर मग आज हरिश्चंद्राच्या या फॅक्टरीतील विविधतेची एक सफर करूया.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६
मंदिर आणि परीसर
प्रचि ०७

प्रचि ०८
पुष्करणी
प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७
गणेशगुहा
प्रचि १८

प्रचि १९
केदारेश्वर गुहा
प्रचि २०
तारामती शिखरावरून दिसणारी सह्याद्रिची डोंगररांग
प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८
तारामती शिखरावरून दिसणारी श्री हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर
प्रचि २९

प्रचि ३०
रौद्रभीषण कोकणकडा
प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२
आभार्स
प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

गुलमोहर: 

भन्नाट.... झक्कास.... उत्तम..... जबरी फोटोज....... Happy
कोकणकडा तर... लै भारी..

सगळे फोटो सुंदर, पण तू प्रवासाबद्दल लिहिले नाहीस. ते पण लिही. वाटेवरचे फोटो असतील तर ते पण टाक.

४४ मस्त व शेवटच्या कोलाजमधले २ फोटो आवडले.

खाली जे धरण आहे तिथे खिरेश्वर मंदिर आहे. रोहीत पक्षी पण येतात त्या धरणावर. दिसले का?

आम्ही प्रचि २३ समोरील मंदिरातील अरुंद जागेत चार जण झोपलो होतो.

सगळे प्रचि मस्तच... कोकणकडा बेस्टच.... नळीच्या वाटेने करायचाय.

वा वा जिप्सी....... मस्त फोटो आणि सुरेख वर्णन....... पण दोन्ही जरा अपुरं का वाटतंय.......
का तुझ्या कन्नड ट्रिपचे सविस्तर वर्णन व भरपूर फोटो नुकतेच पाहिले यामुळे इथे असं चुकल्या चुकल्यासारखे वाटतंय........
या मंदिराचं फारच नवल वाटतंय - एक म्हणजे एवढ्या उंचीवर बांधलेलं आणि कोरीवकामही किती सुंदर - इतक्या काळानंतरही बर्‍याच प्रमाणात टिकलेलं...........
खरं तर, हा गड पहायची माझी फार इच्छा आहे - पण आता या जन्मात का पुढल्या कळत नाही........

तुला सांगतो जिप्स्या... हरिश्चंद्रगडावर लिहिलेली इतकी विस्तृत पोस्ट वाचायला मज्जा आली. पण कुठल्या वाटेने गेलास ते लिहिले नाहीस? तोलार/टोलार खिंडीने गेलास? खिरेश्वर गावाच्या बाहेर एक जुने मंदिर आहे. त्याच्या छतावर अप्रतिम कोरीव काम बघायला मिळते.

प्रचि २०.. त्या शिवलिंगाला थंडगार पाण्यात उतरून अर्ध प्रदक्षिणा मारायला धमाल येते.

बर.. जरा हे बघ.
कळसुबाईनंतर महाराष्ट्रातील क्रमांक दोनचे सर्वोच्च शिखर म्हणजे तारामती शिखर.
>>> अरे दुसऱ्या क्रमांकाचे शिखर परशुराम शिखर (साल्हेरचा माथा) तो किल्ला म्हणून तू त्याला वगळले आहेस का?

आणि तिसरे शिखर बालाघाट-घनचक्कर मध्ये आहे रे.. Happy तेंव्हा ह्याचा नंबर चौथा.. Happy

सदर बाफ उघडुन १० मिनिटे झाली केवळ ४ ते ५ प्रदि पाहता आली
एकदम ४५ टाकल्या बघणे कठीन झाले आहे.
जी पाहीली ती अर्थात चांगली होती.
मोजकी टाकत चला किंवा २ रा भाग करा.

मस्त फोटो नेहमीप्रमाणेच..

TCS मुंबई वाल्यांचा लाडका गड आहे हा... दरवर्षी साफसफाई मोहिम काढतात...

योगेश्...फोटो आणि वर्णन.. दोन्ही झक्कासsss
खरं तर तुला झब्बु देण्याच्या लायकीचे फोटो नाहीत माझे....पण.. मी पण हरिश्चंद्रगड सर केला आहे हे दाखवुन द्यायची खुमखुमी शांत बसु देत नाही राव... गोड मानुन घे Wink

हिम्सकुल... TCS मुंबईवाल्यांनी बहुदा हा गड दत्तक घेतला आहे..

ह्या तुझ्या फॅक्टरिला माझ्यातर्फे ऑस्कर बहाल. >>> अरेवा मस्त कल्पना Lol

जिप्स्या - काय बघु नि काय नको झालय , भारीच आहेत सर्व प्रचि Happy

यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. या खोलीत `चांगदेव ऋषींनी' चौदाशे वर्ष तप केलेले आहे असे स्थानिक गावकरी सांगतात. >>> ह्याचा प्रचि असेल तर टाकना Happy

शापित गंधर्व -झब्बु मस्तच Happy

हं......... मी मनात म्हणतच होते की अजून हरिश्चंदगडाच्या स्वारीचे फोटो कसे नाही टाकले जिप्सीने! शेवटी आज मी बघितले. सही फोटो, आणि वर्णन.
प्रचि ३९ मधला डोळा वाटतोय.
जिप्सी, तुला एक काळजीपोटी सांगू का, असे खूप उंचावरून नका रे खाली बघत जाऊ; फोटो बघून मलाच चक्कर यायची बाकी आहे. रागावू नकोस पण मला खरंच भिती आणि काळजी दोन्ही वाटली रे.........

माझेपण झब्बू...
जिप्स्याचे फोटो पाहून माझेही हात शिवशिवायला लागले आहेत...
जिप्स्या लेका - काय अप्रतिम फोटो...
पण कुठल्या वाटेने गेला...वाटेचा एकही फोटो नाही...टोलार खिंडीचा एकपण फोटो का नाही...??

Pages