एकसंध..

Submitted by मी मुक्ता.. on 26 November, 2011 - 01:33

हा एक तुकडा तुझा..
आणि हा तुझा..
हा माझा खूप आवडीचा आणि लखलखता,
हा तुझ्याचपाशी असला पाहिजे..
आणि बाकी राहिलेलं सगळं तर आहेच माझं..
नाही का?
.
.
.
.
आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं,
गहाळ होऊन गेलय कदाचित ते कधीच,
आणि असेलच तर ते बाकी तुकड्याशिवाय पूर्ण होत नाही,
सगळे तुकडे वेगवेगळ्या दिशांना ओढतात आता,
त्यांना जोडून ठेवण्यात दमछाक होते
आणि हाती काहीच लागत नाही..
कोणे एके काळी जन्माला आले तेव्हा एकसंध होते मी कदाचित...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

मुक्ता,
प्रभावी लिहिलं आहेस!
<कोणे एके काळी जन्माला आले तेव्हा एकसंध होते मी कदाचित...>
अगदी खरं असतं कदाचित सगळ्यांच्याच बाबतीत.... नंतर होणारे असंख्य तुकडे आणि गहाळ झाल्यामुळे पूर्ण न होणारं कोलाज!
वाह! Happy

छान!

छान. पण मुक्ते हे सर्व ते घालवून दिले कि आपण आपल्याला भेटतो ते ही जास्त एकसंध होउन.
ती घडी फार मोलाची आहे जीवनात. स्व तंत्र सुरू करायाचे.

सर्वांचे खूप आभार.. Happy

आनंदयात्री, नक्की काय कमी वाटलं हे कळलं तर बरं होईल.. Happy

अश्विनीमामी,
काय मनातलं बोललात अगदी... Happy

आनंदयात्री, नक्की काय कमी वाटलं हे कळलं तर बरं होईल..

हम्म्म...
माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं - अतिरिक्त / अनावश्यक ओळ?

बरेचदा एखादी ओळ / शब्द नसता तर अधिक मजा आली असती, असं वाटतं... तुझ्या या कवितेबद्दल माझं थोडंसं तसं झालंय...

चुभुद्याघ्या..

ह्म्म...

मी असा विचार केला,
You are part/imp part/ very imp part of my life असं आपण जेव्हा म्हणत असतो तेव्हा कुठेतरी PART वर जोर असतो म्हणजे imp असला तरी तो पार्टच आहे हे आपण स्वत:ला पण सुचवतो. सो दॅट, या पार्टशिवाय देखिल बरंच काही आहे आणि ते तुम्ही स्वत: आहात. पण मग असं करता करता स्वतःचं असं फारच कमी उरलय असं लक्षात येतं. असा अर्थ पोचायला हवा होता म्हणून ती ओळ लिहिली. लिहिली नसती तर कदाचित हा अर्थ नसता पोहचला..

बरेचदा एखादी ओळ / शब्द नसता तर अधिक मजा आली असती, असं वाटतं... तुझ्या या कवितेबद्दल माझं थोडंसं तसं झालंय>> कदाचित मजा कमी झाली असेल खरच.. ह्म्म...

सहमत. तो अर्थ आधीही लागला होताच...

कारण "आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं,"
यावरून
तुझ्या "या पार्टशिवाय देखिल बरंच काही आहे" या प्रतिसादातलं 'बरंच काही', जे कवितेमधल्या "आणि बाकी राहिलेलं सगळं तर आहेच माझं.." इथे नाहीये, ते पोचतंय... सो, कवितेमधल्या त्या दोन ओळी कनेक्टेड आहेतच.

पण शेवटच्या चार ओळी हाच कवितेचा गाभा आहे असं मानलं (हो ना?) तर मग "आता लक्षात येतय, माझं म्हणून जे ठेवलेलं ते फारच कमी होतं" यातला विचार इथे एक्ट्राच वाटला मला.. थोडंसं विषयांतर करून पुन्हा मूळ मुद्द्यावर आल्यासारखं वाटलं...

चुभुदेघे.

छान Happy

“सगळे तुकडे वेगवेगळ्या दिशांना ओढतात आता,
त्यांना जोडून ठेवण्यात दमछाक होते
आणि हाती काहीच लागत नाही..”
……… हे अगदी पटण्यासारखं