उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)

Submitted by जिप्सी on 16 November, 2011 - 22:56

या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:

१. कलर्स ऑफ उत्तर कन्नडा

२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर

३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )

===============================================
===============================================
उत्तर कर्नाटकच्या तिसर्‍या भागात आपण भेट देणार आहोत ते सौंदत्ती शहरातील पारसगड या ठिकाणाला. पुणे-बंगळुरू हायवेपासुन (सौंदत्ती एक्झिट) काही अंतरावर सौंदत्ती शहर येण्याच्या आधीच हा किल्ला आपले लक्ष वेधून घेतो. या गडाच्या नावावरून पूर्वी सौंदत्ती शहराला पारसगड हे नाव होते. शहरापासुन अगदी जवळच एका टेकडीवर पारसगड वसला आहे. या किल्ल्याचा इतिहास काही माहित नाही. भर शहरात असुनही किल्ल्याच्या आत कमालीची शांतता आणि गारवा आहे. किल्ल्याच्या वरच्या भागात मंदिर आहे. मंदिराच्या काही भागाला सफेद रंग लावल्यामुळे त्याचे मूळ सौंदर्य कमी होत आहे. गडाच्या भक्कम तटबंदीवरून संपूर्ण किल्ला, प्रत्येक कोनातुन न्याहळता येतो, फोटो काढता येतात :-). किल्ल्यावरून सौंदत्ती शहराचे, एका धरणाचे विहंगम दृष्य पहाता येते.

प्रचि ०१

प्रचि ०२

प्रचि ०३

प्रचि ०४

प्रचि ०५

प्रचि ०६

प्रचि ०७

प्रचि ०८

प्रचि ०९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१
(क्रमश:)

गुलमोहर: 

फोटो ३ मधे त्या आजींनी वाट करुन दिली का जिप्सी आला म्हणुन पोज दिली Happy

बाकी मस्त. त्या किल्याची कित्त्त्त्ती निगा राखलेली दिसत आहे. बोध घेण्यासारखे आहे ते.

किल्याची कित्त्त्त्ती निगा राखलेली दिसत आहे. बोध घेण्यासारखे आहे ते.>>> खरंच खूपच निगा राखलेली दिसते - बहुतेक फार उंचीवर नसल्यामुळे असेल का / का सुजाण नागरिक वा गडप्रेमींमुळे ?
बरेच मूळ बांधकाम - तटबंदी, इ. खूप चांगल्या स्थितीत आहे - बरं वाटलं हे पाहून......
प्र चि - नेहेमीप्रमाणेच अप्रतिम
भर शहरात असुनही किल्ल्याच्या आत कमालीची शांतता आणि गारवा आहे.>>प्र चि २१ मधे जे पंखे लावलेले दिसतात बागेत त्यामुळे तर गारवा आहे किल्ल्यात एवढा.........;) Wink Wink

सुं...........द...........र. Happy
फोटो ३ मधे त्या आजींनी वाट करुन दिली का जिप्सी आला म्हणुन पोज दिली >>>> Lol

मोनाली Proud Happy

एकदम राजस्थानकडच्या किल्ल्यांची आठवण करुन देणारे रंग आहेत दगडांचे...>>>>हिम्स, अगदी हेच मनात आलं होतं किल्ला पाहताना. Happy

इकडे फिरताना त्या गार्डन मधुन यायच मन नव्हत करत... आणि किल्ला सुद्धा मस्तच साफ सुथरा ठेवला आहे...
बाकि फोटो तर सगळे सुंदरच...

एकदम राजस्थानकडच्या किल्ल्यांची आठवण करुन देणारे रंग आहेत दगडांचे

अगदी अगदी....निळ्या आकाशाच्या बॅकग्राऊंडवर तो किल्ला किती मस्त दिसतोय...अप्रतिम फोटो रे...