भिक मागुन जगणे...

Submitted by mitthu on 12 March, 2009 - 02:01

(फिटे अंधाराचे वर आधारीत..... सर्वांची क्षमा मागून सादर करतो आहे.)

हवे दोन चार पैसे
नाही दुसरी रे आस
भीक मागुन जगणे
माझ्या आहे नशिबात

मायबाप गेलेत सोडून
केले मला रे अनाथ
एकटाच मी रे फिरतो
माणसांच्या या रानात

सारे चौक माहित मला
सारया गल्या पाठ झाल्या
दिन वार कळेना काही
जगणे माझे झाले श्याप

कुणी देतो हाकलून
कुणी देतो मला शिव्या
नशिबी का हे जगणे
माझ्याच रे आले

हाती एक तो कटोरा
बोचके रे ते खांद्याला
फुटपाथ आणि पार्क
माझे बघा घर झाले

गुलमोहर: 

छान. Happy

फक्त काही टायपो झालेत ते दुरुस्त करता आले तर बघा.

छान... चांगला प्रयत्न आहे Happy

हे विडंबन असले तरी विनोदी मूळीच नाहिये..! नुसतं कवितेत हलवा ना!

परिस्थितीसाठी चपखल वाक्यरचना आहे! टायपो सुधरून अजुन येऊ द्यात!

जाईजुई,
तुम्ही वर प्रतिसाद दिलाय त्यावर मला एक शंका आहे, विडंबन हे विनोदीच असावे असा संकेत आहे का?
(मला खरच माहित नाही म्हणुन विचारतेय)

छान.
विडंबन हा एक साहित्यप्रकार आहे. तो विनोदीच असावा असे मुळीच नाही. मूळ साहित्याचा आधार घेऊन केलेली रचना. कित्तितरी विडंबने मूळ साहित्यापेक्षा गाजलेली आहेत, ती त्यांच्या वास्तवतेच्या स्पर्शामुळेच. माझ्या या समजूतीवर जाणकारांनी मार्गदर्शन करावे.

..सुसंगती सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो..

सर्वांचे आभार.
मला पण असच वाटत कि विडंबन हा प्रकार फक्त विनोदासाठीच नाही तर बाकी साहित्यात पण वापरला जाउ शकतो.

जयदीप ओक
**********
मी दुसर्यांन सारखा होऊ शकत नाही कारण मी माझत्वं घालवु शकत नाही.