जातकुळी

Posted
12 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

काही वर्षापूर्वी बार्न्सच्या पुस्तकभांडारात
आवडतीच्या सिंगलशॉट मोका सकट मी.
दिशाहीनतेचे डर्टी हॅरी पोईंट फोर्टी फोर मॅग्नम खेळवत...
आजूबाजूची टेबले एकटेपणाच्या गर्दीने व्यापलेली
तेव्हा भेटले होते पहिल्यांदा दहा तोंडाचे ते मूल
लॅगरांज बिंदूचा रोग झालेले...
लहानपणी आईने सांगितलेली धृवाची कथा...
अढळपदातला अध्याहृत बंदिवास...
डर्टि हॅरी रोखल्यावर आत्मभानाला सुटलेली घाण
ह्यांच्यात बुडवून घेतले होते सारे वेडेबागडे शब्द
दहा तोंडाच्या मुलाने रचलेल्या रचना
रशोमोन सावल्यांचा खेळ...
माझे हरवलेले डर्टी हॅरी, विभक्त झालेले एकटेपण
आणि फोस्टर केअर मध्ये असलेले ते मूल
माझा अढळपदाकडाचा बुर्ज्वा प्रवास
कालच्या पानावरून पुढे आता निर्धोक....

विषय: 
प्रकार: 

ओह, आधी दिलेल्या नव्हत्या का? मला दिसल्या नसाव्यात बहुधा! आता प्रयत्न करतो पुन्हा!

अर्थात, न समजणे हे माझे अपयश या अर्थाने म्हणालो, कविता जबरदस्त असणार हे नुसत्या समाविष्ट संदर्भांवरून जाणवत आहे.

छान !
बाकी संदर्भाच्या लिंक्स नसत्या दिल्या तरी चाललं असतं. लगरांज मात्र देवनागरीत वाचून Lagrange पॉइंट्स हे कळलं नसतं

AAPRATIM....
ADBHUT....
ASAAMANYA BUDDHIMATTECHE UDAHARAN AAHE...
AATA PARYANT CHYA SARVAAT (?) KAHICHYA KAHI KAVITET CHHAN....
.
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
. BUS ZALE AATAA.........
.
.
.
.
NIT SAMJEL ASHYA BHASHET LIHAA AATAA...

मला लागलेला अर्थ

बार्न्स आणि नोबल मध्ये कॉफी पिताना मी माझ्या पुर्वग्रहदुषित डोळ्यांचे पिस्तुल
फिरवत होते आजुबाजुंच्या टेबलांवरुन. न्याहाळत अनेक (१०) व्यक्ति एकाच चश्म्यातुन.
तेन्व्हा मला झाली जाणिव माझ्या स्थैर्यबिंदुंची. ते स्थिर अढळपद ध्रुवाचे लहानपणी आईने सांगितलेले.
द्रुष्टीच्या मागे असलेल्या आत्मभानाला पोहोचलेला तडा (वा लागलेली घाण?)
त्याचे वर्णन करणारे असंबद्ध विचार आणि शब्द.
जसा राशोमान सिनेमात दाखविलेल्याप्रमाणे पडद्यामागे साम्उराइंच्या सावल्यांचा खेळ, तसेच होते माझे आत्मभान या विचारांमागे दडविलेले. माझे एकटेपण नष्ट झाले. त्या दहा तोंडांच्या विचाराचे मातृत्व नाकारुन मी पुन्हा प्रवास चालु केला पुढे माझ्याच आत्मभानाच्या तंद्रीत.

नाही आवडली.
ओढुनताणून वाटली थोडी. नुसत्याच सुंदर संदर्भाने जसा लेख सजत नाही तसे काहीसे वाटले.

अं, हो नाविन्य नमुद करण्यासारखे.