खाजवल्या खाजेला जागा!!! म्हणजेच उकाळ्या पाकळ्या

Submitted by सत्यजित on 13 March, 2009 - 04:51

खाजवल्या खाजेला जागा!!! म्हणजेच उकाळ्या पाकळ्या

हल्ली माबोवर फक्त वाद चालु आहेत,
नवोदित-निर्वाचीत,
जुने-नवे,
प्रतिभावंत- प्रतिभाखंत,
रोचक-भोचक,
शुद्ध-अशुद्ध,
इंग्रजि-मराठी.
वाद करावेत की करु नयेत
दर्जेदार-महाभिकार..
स्त्रीतारक-स्त्रीमारक
पुरुषतारक-पुरुषमारक
असलेले-नसलेले ..
खाजखुजली-खाजकुठली
यादी संपत नाही- यादी संपली

आधि बरेच लोक इथे येत, नुसते वाचत आनंद घेत निघुन जात. मायबोलीचे गुण गात.
पण पुर्वापार भारतियांचा एक मुलभूत गुणधर्म आहे तो म्हणजे भेद-भाव, उच्च-निचता , स्पृश्य-अस्पृश्य असे गट करणे. कोणी कंपूबाजिस तयार नसेल तर आपणच काही लोकांना हिन तर काहीनां चांगली वागणुक द्यावी आणि आपलं वरच्स्व सिद्ध कराव. मग काही लोक घाबरुन आपल्या गटात येतात तर काही चिडुन दुसर्‍या गटात जातात. मग काय...आपला गट झाला की जोरदार चिखलफेक चालू करावी. आपलं इस्पित साध्य.. साहीत्यिक अत्याचार आणि साहीत्यिक पुलिसींग असं काहीस... शेवटी पोलिस चांगले अस प्रत्येक पोलिसाला वाटतं. पण सगळेच पोलिस नाही होउ शकत त्याला बॅकअप लागतो, मग ज्याची पोलिसात भरती होत नाही ते आपसुक चोर होतात...

बरेच बुद्धू(!!!) लोक येथे,.. येतात इथले वाद, चिखलफेक, वयक्तीगत आकस, आत्मप्रौढी, कंपूबाजी , गटबाजी पाहुन निघुन जातात. पण काही हुश्शार... चातुर्याने एखाद्या गटात शामिल होउन लगेच निर्वाचीत होतात Happy काहींना ते नाही जमत ते वाळीत टाकले जातात, तर काही जण निकाराचा लढा देत निर्वाचीत होतात, काहीनां उबग येतो ते निर्वासित होतात. आजचा नविन उद्या नविन रहात नाही आणि वाद इथले संपत नाही.
रोज मायबोलीवर यायला काहीतरी कारण हव ना... आणि आपण रोज जेथे जातो तिथे आपली स्वतःची एक वेगळी ओळख हवी म्हणुन काहीतर करावं. सु नाही तर कु पण चालेल पण ओळख महत्वाची.
प्रत्येकाचा आनंद वेगळां कुणी सदासंतोषी तर कोणी विघ्नसंतोषी... कुणी आपली गाजवायला येतो, तर कुणी आत कुठतरी खरुज खाजतय म्हणुन खाजवायला येतो.

चार दिवस आपण दुसर्‍याला खरुज होई पर्यंत खाजवल की तो न रहावुन आपल्याला खाजवायला लागतो आणि इतरांनाही खाजवायला लागतो, असं करुन खाज महामारी पसरते, मुळचे खाजाळू खुश. खुजली खुजाओ बत्ती बुझाओ.. काही खाजेला घबरुन निघुन जातात, काहींना मुळात खाज असते (आमच्या सारखे) ते येत रहातात खाजवा खा़जवी बघायला, खाजवल्याने टीआरपी वाढतो रे आधी खाजवलेची पाहीजे...!!!! हा नवा मंत्र शिकतात.

खच खच.. खस खस... मग खसा खस मग...खाचा खाचा...
"ह्या बाफवर ही माझी शेवटची खाज..." १००दा खाजवुन चिघळु लागल की अस करावं म्हणजे दुसरीकडे खाजवायला मोकळे, असे नविन संकेत तयार करावेत म्हणजे समोरचा काही तरी सिद्ध करतो न करतोच तर त्याला ठेचल्याचा आघोरी आनंद मिळवावा . नविन कोणी आला की त्याला खाजवावे.

तर सर्व जुन्या, नव्या, प्रतिभाशाली आणि प्रतिभाखाली माबोकरांन्नो. तुम्हाला जर खजवा खाजवी जमत नसेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही खाजवाखाजवीच्या शिकवण्या चालू केल्या आहेत.
खाजवा खाजवी कार्यशाळा चालू केली आहे..त्यासाठी एका ड्यू आयडी घ्यावा उदा. खाजखुजली, खरुज, खुजवा, खाजाखाजी.. खज्जू, खाज्जूकाका, खाजवुका, खाजानजी, खाजवेन_हां, खाजेरी, खाजुल्या, ई.
येथे नविन स्माइली पण तयार केला जाईल :
:खाखका: -खाजवुन खरुज काढणे
:कखा: कचाकच खाजवतोय
:मखासू: मला खाज सुटलीय
:मखा: मला खाजवा
:खुखाबका: खुप खाजतय बरं का..
:मजुखाआ: मला जुनी खाज आहे
ई...
आता हे लिहायची मला खाज काय? तर इकडेतिकडे खाजवा खाजवी करण्या पेक्षा काय ते समोरासमोर खाजवुया ... ज्यांच्यांत खरिच धमक असेल त्यानी याव आणि खाजवाव इथे... :मजुखाआ:

पण हे ललित? हो ललितच आहे... नसेल तर तस सिद्ध करा...

गुलमोहर: 

अशी तिसरी आघाडी
---- अगदी माझ्या मनातील.... पण मी देवेगौडा नाही ! त्यान्च्या अथक परिश्रमाची फलश्रुती म्हणजे तिसरी आघाडी.

सध्या वाटत्य की 'बोंबाबोंब' असा एखादा बाफ असावा. त्यावर जी काही बोंबाबोंब करुन जाव. (कुणीही याव आणि टीचकी मारुन जाव तस ) म्हणजे इतर बाफ /गुलमोहर ह्यावरील वातावरण निर्मळ राहील.
देवळात शिरताना नाही का आपण चपला बाहेर ठेवून येतो. त्या पायात घालून किंवा हातात घेउन येतो का आत ? Happy
(अर्थात हे माझ स्वतःच खाजगी अस वैयक्तीक मत आहे बर Proud )

------------------------
देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो

च्यामारी, साठसत्तर पोस्ट्स?????? छ्या, हल्ली लोकान्पाशी खुपच मोकळा वेळ अस्तो अस दिस्तय! Happy असो
मी यातल्या कोणत्या "एका बाजुने" बोलू शकत नाही!
पण माझ्या गाठीशी गेल्या दहा-बारा वर्षातले नेटवरचे अनुभव आहेत, तसेच येथिलही काही वर्षान्चे अनुभव आहेत
त्यावरुन माझ्यापुरते मी काढलेले निष्कर्ष व त्यावरील भाष्य येणेप्रमाणे
१ कम्पु आहेत वा नाहीत या वादात मी पडतच नाही! Happy कम्पु आहेतच, व असणारच! किम्बहुना मी म्हणेन की कम्पु नस्तील तर काय अर्थ हे? जन्मजात आरपार कम्युनिस्ट बनलेला माणुसच "कम्पु" नको असे म्हणू शकेल, जे निसर्गालाही मान्य नाही! एनिवे, निसर्ग बाजुला ठेवू थोडावेळ
कम्पु म्हणजे तरी काय? समान आवडीनिवडिच्या वा विचारान्च्या लोकान्चा एखादा जवळ आलेला समुह! Happy असा समुह बनला म्हणजे काय पाप घडले की काय?
आयला, नविन नविन लग्न झाले की नवराबायको दोघान्चाच एक "कम्पु" बनतो, हो, अगदी भरल्या घरात देखिल. कालान्तराने एकमेकान्चा कण्टाळा आला, नाविन्य सम्पले, किन्वा अपत्यप्राप्तीने नाविन्याची नविन सुरुवात झाली की, जोडप्यातला पुरुष एकटा पडतो व आई अन अपत्य यान्चे वेगळे विश्व सुरू होऊन एक कम्पु बनतो! एकटा पडलेला पुरुष नोकरी-चाकरी धन्दापाणी यात गुरफटुन स्वतःचे बाहेरचे विश्व निर्माण करुन त्यात जगू लागतो. होता होता पोरे मोठी होतात, त्यान्च्या विश्वाची कक्षा रुन्दावते, आईची गरज भासेनाशी होते, अन ती त्यान्चे वेगळे घराबाहेरील कम्पु करुन त्यात मश्गुल होतात. यावेळेस आई एकटी पडायला लागलेली अस्ते! पुरुषही हळू हळू नोकरीविश्वातील त्याच त्या वातावरणामुळे भन्जाळून गेलेला अस्तो, दोघान्चेही बाबतीत चाळीशी पार होऊन अपरिहार्य शारिरीक बदल येऊ घातलेले अस्तात, अन अशा वेळेस, एकमेकान्ची गरज भासल्यामुळे, वा एकमेकान्ची ओळख "नव्याने" पटल्यामुळे, ते दोघे त्यान्चा कम्पु पुन्हा जमवितात! Happy
घरातल्या घरात भावण्डान्मधे देखिल कम्पु अस्तात! आम्ही ज्योतिषी, बारा राशीन्मधे जनसमुह ढोबळमानाने विभागतो, मित्र राशीन्च्या व्यक्तिना कम्पु बनतो असा सर्वसाधारण अनुभव! इतरही बरेच आडाखे अस्तील, मुद्दा मात्र हाच, की सख्ख्या रक्ताच्या नातेसम्बन्धात देखिल कम्पु अस्तित्वात अस्तात, ते असणे गरजेचे असते, तर मायबोलि सारख्या साईटवर विविध विचार्/धर्म/जात्/प्रान्त/वयोगट्/शिक्षण अशी वैशिष्ट्ये घेऊन आलेली माणसे त्यान्चे विविध कम्पु बनविणार नाहीत तर काय मिलिटरी शिस्तीने वा कम्युनिस्टान्ना अभिप्रेत अस्लयाप्रमाणे एका छापातील गणपतीप्रमाणे बनुन रहातील?????
कैच्याकैच अपेक्षा! Happy
तर, कम्पु हे अस्तातच, असणारच, अन हवेतच! Happy
माझ्यापुरते बोलायचे तर जेव्हा ज्योतिष हा विषय निघतो तेव्हा माझ्या आवडीच्या आयडीज वेगळ्या अस्तात! Happy त्यान्च्याबरोबर माझा एक खास कम्पु बनतो
तेच जर कोणत्या कलेचा विषय निघाला, तर त्या त्या कलेमधले आयडीज मिळून माझे काही वेगळेच कम्पु तयार होतात
वादविवादामधे तर विषयागणीक वेगवेगळे कम्पु आहेत माझे! Happy
अन कधी कधी यस्जिरोडसारख्या ठि़काणी तर माझा मीच एकखाम्बी कम्पु अस्तो! Proud हे पूर्वीही सान्गितले आहे!
पण मग प्रॉब्लेम कुठे अस्तो?
तर मी वा माझा कम्पु सोडून बाकी ते सगळे टाकाऊ अशी भावना असेल तर निश्चितच खडाखडी होऊ शकते. एक लक्षात घ्या, गेली तीनचार वर्षे एस्जीरोडवरील माझा एकखाम्बी कम्पु चालवित असताना मी कधीही, कुठेही तेथिल अन्य आयडी वा त्यान्चे कम्पु यान्चेबद्दल द्वेष्/मत्सर्/तिरस्कार्/हेवा इत्यादी भावनान्चे प्रकटीकरण केले नाही वा त्या वापरल्या नाहीत! जर हे भान पाळले गेले तर प्रॉब्लेम निर्माणच होत नाही! माझ्या विरुद्ध बाजुचे कम्पु, अर्थात ज्यान्ना मी माझा "शत्रुपक्श" असे सम्बोधत जरी अस्लो तरि कायम, ती माणसेच आहेत, तीही माझ्याइतकीच किन्वा काकणभर अधिकच चान्गली आहेत, हुषारही आहेत आपापल्या क्षेत्रात, अन जरी शत्रु असली तरी "बुद्धीबळाच्या पटावरील शत्रु आहेत", वास्तविक जगातील शत्रु नव्हे, याचे भान कायम ठेवले! Happy
अन हे भान जर कायम असेल तर मला नाही वाटत की अस्तित्वात असलेल्या कोणत्या कम्पुचा काही एक त्रास व्हावा! Happy
येथिल अनेक आयडीज अशा आहेत की अन्यथा विशिष्ठ विषयात्/धोरणात मला त्यान्ची मते अजिबात पटत नाहीत, मात्र त्याच वेळेस त्या आयडी विशिष्ठ क्षेत्रात येवढे चान्गले काम केलेल्या आहेत की आदरास प्राप्त आहेत! Happy अशा वेळेस मतभेदाच्या विषयाचे पुर्वग्रह बाजुला ठेवुन त्या त्या आयडीबरोबर वावरणे अगदीच अशक्य आहे का? माझ्या अनुभवाने तरी अशक्य नाही! Happy
आता कोणि अगदीच बालिश आक्षेप घेईल की आमच्या लेख/कविता यान्चेवर केवळ टीकाच होते, स्तुति कधीच होत नाही वगैरे वगैरे! माझ्या मते या गोष्टी होत असतीलही तरी दुर्लक्षीण्या जोग्या आहेत! माझा अनुभव तर असा की, गणेशोत्सव स्पर्धेत भाग घेतल्यास "मतान्च्या" सन्ख्येत देखिल फरक पडतो! अन का पडू नये? ज्याने जेवढी माणसे, पक्षी आयड्या जोडलेल्या अस्तील, तेवढे त्याच्या मागे उभे रहाणारच! माझ्या मागे फारसे कुणी उभे नाही असे म्हणून गळा काढण्यापेक्षा, माझ्या मागे देखिल बरेचजण उभे रहातील या करता स्वतःमधे सुधारणा घडवुन आणणेच केव्हाही श्रेयस्कर नाही का?
माझ्यापुरते मी देखिल असेच केले! २००५ च्या सुमारास येथे मी अगदी "एकटा" पडल्याचे माझे मलाच भासायला लागले! तेव्हा मी मूळापासून विचार केला, माझ्या वागण्यातले अनावश्यक टोकदार कन्गोरे काढून टाकायचा प्रयत्न केला, जे जे चान्गले ते तेच माझ्याकडून दिले जाईल याची दक्षता घेऊ लागलो व सगळ्यात महत्वाचे म्हणजे, माझ्या मनाच्या कोपर्‍यात प्रत्यही उभी रहात असलेली वैचारीक द्वन्द्वाचे परीणामस्वरुप मी दुसर्‍यान्ना प्रतिक्रिया देणे टाळू लागलो, त्यापेक्शा वस्तुनिष्ठ, योग्य ते काय याचा त्रयस्थ नजरेने विचार करुन वागू लागलो, अन बघता बघता, एकटा पडलेला लिम्ब्या परत भरघोस पाठिम्ब्यावर उभा राहू लागला! आमच्या शत्रु पक्षातल्या कुणी कुणी त्यास "सहानुभूती मिळविण्याची कला" असेही नाव ठेवुन बघितले Proud खरेही असेल ते कदाचित, मी तेही नाकारित नाही, पण ते जे काय होते ते होते व परिणामकारक ठरत होते!
पण तात्पर्य काय, तर जर एक भान ठेवले की येथिल आयडीज, भले त्या ड्युप्लिकेटही असोत, त्यान्चे मागे एखादी भावना असलेली जिवन्त व्यक्ति आहे! अन जेवढे मी माझ्या भावना तळहातावरील फोडाप्रमाणे जपु पहातो तसेच दुसर्‍याच्या भावनान्चा आदर करण्यासही मी शिकले पाहिजे, येवढेच नव्हे तर मी तसा आदर करतोय हे दुसर्‍यान्ना जाणवलेही पाहिजे! जर असे वागले गेले तर बरेचसे प्रश्न निर्माणच होत नाहीत.
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंबूदा, केवढी मोठी पोस्ट ही!! Happy

>>>> केवढी मोठी पोस्ट ही!!
मग???? उगा जळक्या उदबत्तीच्या काड्यान्ची येवढुश्शी होळी रचू म्हणतेस की काय???? Proud
...;
आपला, लिम्बुटिम्बु

लिंबुटिंबु याच्याशी मी अगदी सहमत आहे....आत सगळे म्हणतिल .. हा कोण आला उपट्सुंभ??...तर तसे मलाही मायबोली वर येउन दोन्-तीन महिनेच झालेत्..म्हणजे मी नवोदितच आहे... Happy

मायबोलिवर मी दिवाळी अंक वाचत होतो...त्यातले काही लेख खूप आवडले...त्याना मग प्रतिसाद देण्यासाठी सभासद झालो...पण नंतर मग नियमित इकडे येउ लागलो..त्यात मला आवर्जुन नमूद करावेसे वाटते, की इथल्या काही (so called??) जुन्या लोकानीच माझ्याशी संपर्क केला, चर्चा झाल्या, ग्रूप मधे सामिल झालो....मला माझ्या भागातिल काही मित्र भेटले..बरे वाटले..
पाकक्रुती सारख्या विभागात मी एक प्रश्ण टाकला तर खरडवही मधे ७-८ नोंदी आल्या..ते सगळेच so called )जुने लोक होते..आणि त्यात्ल्या खूप्श्या लोकाना मी ओळखत ही नाही..तरीही त्यानी मला आपलेसे केले..

आता मी म्हणतो..कि जिथे १० टारकी जमली, तर त्यात कंपुबाजी-गटबाजी वैगेरे चालणारच्!!..मी सुद्धा इथे माझी wavelength ज्यांच्याशी जमते. माझ्या आवडी-निवडी एक आहेत अश्या लोकांशी संपर्क केला..अजुनही करतोय..त्यामुळे हे चालूच रहाणार्..पण त्यामुळे जर नवोदित लोक असे म्हणत असतिल कि, मला प्रतिसाद येत नाहित, जुनी लोक नावे ठेवतात ....तर तो पळपुटे पणा होइल्...असे म्हणतात कि निंदकाचे घर असावे शेजारी..त्याप्रमाणे त्यानी ते खिलाडुव्रूत्तिने घेतले पाहिजे..सुधारणा करत राहिले पाहिजे..आणि हेच जुन्या लोकाना पण लागु होते... Happy

आता काही असेही म्हणतात कि सध्या कमी दर्जाचे भरमसाठ साहित्य माबो वर येत आहे..तर मी म्हणतो. याचे मुख्य कारण लोकांकडे फावला वेळ खूप आहे (यात मी पण आलो... :))..पुर्वी ऑफिस मधे यायची वेळ फिक्स, पण जायची वेळ फिक्स नसायची...अश्या साइट्स फक्त लंच टाइम किन्वा टी टाइम मधे बघितल्या जायच्या..पण आता रिकामा वेळ आहे, घरोघरी ब्रॉड्बँड आहे....त्यामुळे जे सुचेल ती लोक पोस्ट करत आहेत्..काही वेळा ते चांगले जमते..काही वेळा नाही जमत....काहिना आवडते..काहिना नाही....पण यामुळे माझ्यासारख्या लोकांचे मनोरंजन होते...लोकांचे विचार समजतात्..तेवढाच वेळ काव्य्-शास्त्र्-विनोद यामधे निघुन जातो..

इथे काहि नवोदित लोकानी मी आता प्रतिसाद द्यायला घाबरतोय असे पण लिहिले आहे..मी तर म्हणेन घाबरायचे काय त्यात??....जे मनापासुन आवडले त्याला दाद द्यायला हवी..आणि नाही आवडले तर तसेही सांगायाला हवे..यात कोण नवे-कोण जुने असा का फरक करावा?

---आपला(मायबोलिवर अजुनही पाळण्यात असणारा..)
केदार
०---------------------------------------०
जमले अथवा जमले नाही.. खेद खंत ना मज काही,
अद्रुश्यातिल आदेशांचे ...ओझे फक्त वहाणे...

पण तात्पर्य काय, तर जर एक भान ठेवले की येथिल आयडीज, भले त्या ड्युप्लिकेटही असोत, त्यान्चे मागे एखादी भावना असलेली जिवन्त व्यक्ति आहे! अन जेवढे मी माझ्या भावना तळहातावरील फोडाप्रमाणे जपु पहातो तसेच दुसर्‍याच्या भावनान्चा आदर करण्यासही मी शिकले पाहिजे, येवढेच नव्हे तर मी तसा आदर करतोय हे दुसर्‍यान्ना जाणवलेही पाहिजे! जर असे वागले गेले तर बरेचसे प्रश्न निर्माणच होत नाहीत.
-----------------------------------------------------------------------
लिंबुदादा,

हे इतक्या समर्पक शब्दात मला मांडता आले असते तरः)

तुमची पोस्ट्स मला आवडतात. तुम्ही आवडले नाही तर लिहिता पण कधिही तुमची पोस्ट्स कुणाची अवहेलना करणारी मला वाटली नाहीत.

धन्यवाद.

लिंबुदादा खरंय हो, गटतर तयार होणार, ते बरोबर आहेच पण त्याचबरोबर सत्तासंघर्ष नको ना. सुचना द्याव्यात, मतं मांडावीत पण ते करण्यामागे कुटील भावना किंवा काही विशिष्ठ उद्देश नसावा. चांगल्या पद्धतीने दिलेल्या सुचना, सल्ले कोणाला नको असतील?

"तु हे चुक केल, याला अर्थ नाही, हे घाण आहे...." अस सांगण्या पेक्षा "तु हे अस केल असतस तर अधिक चांगल झाल असत, त्याला चांगला अर्थ आला असता वा ते चांगल वाटल असत..." ई. ई. अश्या (सौम्य, सभ्य) भाषेत हि चुका दाखवता येतात आणि ह्या positive way of showing negative मुळे positive रिझल्ट जास्त आणि लवकर मिळतात... अर्थात हे माझ मत Happy

चांगले वा चांगलेच प्रतिसाद द्या हे म्हणण/मागण नाही... चांगल्या शब्दात (मन दुखविणार्‍या, सौम्य, सभ्य शब्दात) (विषयाला धरुन) प्रतिसाद द्या हि विनंति आहे Happy

थोडक्यात कडु, कठोर, अपमान कारक, विषयांतर करणारे, वाद निर्माण करणारे वा वाढविणारे प्रतिसाद नको हि कळकळी चि विनंती आणि ईच्छा Happy

खाजेवर विचार फार झाले प्रत्यक्ष कॄती होऊ शकते का?

तर ती होऊ शकते! टाळी दोन्ही हातांनी वाजते. तेंव्हा दोन्ही हात सम प्रमाणात एकत्र आणणे जर शक्य असेल तर चांगले नाही का?

याउपर काय बोलावे सुज्ञास अधिक सांगणे न लगे.

*********************
All desirable things in life are either:
1.Illegal
2.Banned
3.Fattening or
4.Married to Others.
Wink Biggrin

नवोदितांच्या चुका कशा दुरुस्त कराव्यात? मनात येईल ते मनमोकळेपणांन लिहायचं म्हणजे झालं. मी शक्यतो एक पथ्य पाळतो. जर सूचना द्यायच्या असतील किंवा चुका काढायच्या असतील तर त्या त्या कवी कवयित्रीच्या पानावर जाऊन सांगतो. म्हणजे त्याला किंवा तिला ती विचारपूस खोडून टाकता येते किंवा मेल डिलीट करता येते. स्तुती करताना भरभरून शब्द वापरावेत व चुका काढताना नेमक्या काढाव्यात. बस्स! इतकेच!

शरद

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

पुलंच्या भाषेत हे म्हणजे--
दाढी करावी जरूर पण जखम होणार नाही ह्याची काळजी घेऊन..

वाद नको..संवाद असावा आणि शक्यतो तो सुसंवाद असावा.

लिंब्याभाऊ,तुमचा नाद खुळा (नेहमीप्रमाणेच!)
माझाही अनुभव या जपानी केदारसारखाच आहे.माबोवर माझी सुरुवातच 'शिवाजी महाराजांचे गुरु कोण?' वरच्या खडाखडीने झाली.तिथेही अनेक जुने आयडी होते पण त्यांनी माझे विरोधी मत समजून घेण्याचाच प्रयत्न केला,'आमच्या मताला हो ला हो कर' असा प्रकार झाला नाही म्हणूनच इथे येत राहावेसे वाटले.हाच अनुभव इतर अनेक स्फोटक विषयांच्या चर्चेदरम्यान आला.
मुख्य वादाची जागा कविता आहेत आणि त्यात मला फार गम्य नसल्याने नो कॉमेंटस!!
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

<<आपल्या कवितांना नावं ठेवतात म्हणून रडणारे हेच विशाल कुलकर्णी आता प्रा. चौधरींच्या कवितांना नावं ठेवत आहेत. म्हणजे प्रस्थापितांची पुढची पिढी तयार होते आहे म्हणायचं की काय!>>

काय गंमत आहे बघा, इतके दिवस मला धरुन जवळपास बरेच जण प्राध्यापकांच्या कवितावर उलटसुलट प्रतिक्रिया देताहेत, इतकावेळ त्या कुणाच्या खिजगणतीतही नव्हत्या. किंवा प्रा. बद्दल कुणालाही सहानुभुती नव्हती. माझ्याबद्दलच जर बोलायचे असेल तर प्रा. च्या विपु मध्ये जावुन बघा. माझे त्यांच्याबद्दल काय मत आहे ते तिथे कळेल. माझा प्रश्न असा आहे की अचानक प्रो. चा पुळका यायचे कारण काय?

आणि इथे मी माझ्यावर आरोप करणार्‍या यच्चयावत मित्रमंडळींना आव्हान देतो की त्यांनी प्राध्यापकांच्या कुठल्याही कवितेवरची माझी फक्त एक अपमानास्पद वाटणारी पोस्ट शोधुन दाखवावी. माझ्या किंवा इतर नव्या कविंच्या लेखावर, कवितेअवर पडलेल्या अशा शेकड्यानी पोस्ट मी दाखवुन देइन.

लालु, आता तुम्ही माझे नाव घेवुन हल्ला केलाच आहे तरीही सांगतो, तिथे तुमच्यावर माझी पोस्ट नव्हती. तुम्हाला कृपया पर्सनली घेवु नका म्हणुन मी कळकळीची विनंतीही केली होती. कंपुबाजी नाही म्हणणार्‍यांना मी विचारतो की अज्ञात, कौतुकच्या कवितेवर जेव्हा नंदिनी, श्रद्धा के,अज्जुका, साजीरा, आय टी गर्ल आणि इतर जेव्हा संगनमत केल्यासारखे तुटुन पडले होते. तेव्हा तेही एकेकटेच होते का? मी प्रा च्या कवितेवर लिहीले म्हणुन हळहळणारे याच मंडाळींनी एकत्रितपणे प्रा च्या कवितेवर चढवलेला हल्ला विसरले का ? आणि तरी म्हणायचं इथे कंपुबाजी नाही ?

एक गोष्ट मी आधीच स्पष्ट करायला हवी होती ती झाली नाही त्यामुळे गैरसमज झाले असण्याची शक्यता आहे. कदाचित मी नवे आणि जुने हा सरसकट शब्द वापरण्यात चुक केली असेल तर खरेच क्षमस्व. पण प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास जुने म्हणताना सरसकट सगळ्यांनाच टार्गेट करण्याचा हेतु नव्हता माझा. कारण अगदी सत्या, आगावु, केदार, योग, टन्या, विल्लप, दक्षीणा, आणि अजुनही कीतीतरी जुन्यांनी माझी पाठराखणच केलेली आहे, चुकाही दाखवुन दिल्या आहेत. पण मी जेव्हा जुन्या-नव्यांचा वाद म्हणतो तेव्हा मला काय म्हणायचे आहे हे या सर्व मंडळींना चांगले ठाऊक आहे. इथे माझ्या प्रतिसादावर तुटुन पडलेल्या माझ्या इतर मित्रांनाही ते कळले नसेल असे मला वाटत नाही. पण.. शेवटी त्यांची इच्छा !

धन्यवाद.
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

नंदिनी, श्रद्धा के,अज्जुका, साजीरा, आय टी गर्ल > काय निवडुन नावे घेतलीस रे ! Lol

इतर जेव्हा संगनमत केल्यासारखे तुटुन पडले होते. ) खरय Happy अजून नावं विसरलास रे - तो एक डाफरणारा आहे त्याचं नाव नाही घेतलस ते Lol

आता ते केदारजोशी म्हणतायत तसं कंपू पण सांग कुठले कुठले ते Happy

मी नवीन असताना बरेच दिवस रोमात होतो , असच कट्ट्यावरच्या नेहमीच्या गमतीत मी तिथल्याच एका माबोवर्च्या मैत्रीणीची दुसर्‍या बाफवर उडवण्यात आलेली खिल्ली तिच्या खरडवहीत सांगितली , विशालने वर सांगितलेल्या एका आयडी बद्दल होती , त्या आयडीने तिची खरडवही वाचुन मला एक धमकीची खरड टाकली ! मी ओळखलय तुला तु ड्यु आय आहेस , मी बघुन घेइन तुला असलच काहीतरी बरळत होती ती आयडी ! Sad मी दुर्लक्ष केले ! तसेही मायबोलीवर नियमीत यायला जमत नाही (सध्या जमतेय कारण बॉस आठ दहा दिवसांसाठी ऑफीसात नाहीये Happy )

आपल्याशी वाकडेपणा करणार्‍या व्यक्तीला जास्त महत्व देउ नये , आकस ठेउ नये हे आता अश्वीनीच्या सल्ल्यानी चांगलच कळलय , आणि तिने माझ्या चांगल्यासाठीच हा सल्ला दिलाय व तो मला मान्य आहे Happy

पण ... जर ते एका मर्यादेच्या बाहेर जाणारे असेल तर मी त्याला त्याची जागा नक्कीच दाख्वुन देइन .

अन हा बाफ चालु केल्याबद्दल सत्याचे त्रिवार आभार Wink
-----------------------------------------
- सक्षम दळवी

माझ्या मते प्रतिक्रिया जहाल असायला हरकत नाहीए, पण त्याच लेखकाचा एखादा चांगला प्रयत्न ही तितक्याच ताकदीने वाखाणला जावा, इतकंच... इथे मात्रं हात आखडता...

बरेच जण प्रतिक्रिया देतायत आणि खिजगणतीत नव्हत्या? बर.
प्रो. च्या बाजूने काहीच लिहिलेले नाही मी, म्हणजे सहानुभूती वगैरे प्रश्नच नाही. तुम्ही 'प्रस्थापित' होत आहात एवढाच अर्थ त्यात आहे.

>>तिथे तुमच्यावर माझी पोस्ट नव्हती
ती कोणावर होती हे तुम्ही अजून सांगितलेले नाही. राहू दे! चुका सांगण्यात पक्षपातीपणा वगैरे जे आरोप केलेत ते माझ्यावरच होते असे मी समजून चालते. विषय संपला.

>>कंपुबाजी नाही म्हणणार्‍यांना मी विचारतो की अज्ञात, कौतुकच्या कवितेवर जेव्हा नंदिनी, श्रद्धा के,अज्जुका, साजीरा, आय टी गर्ल आणि इतर जेव्हा संगनमत केल्यासारखे तुटुन पडले होते. तेव्हा तेही एकेकटेच होते का?
ही जी नावे लिहिली आहेत त्या लोकांचा कंपू आहे की नाही याबद्दल मला काही कल्पना नाही. त्यामुळे 'एकत्रितपणे' हल्ला होता का वगैरे प्रश्नांची उत्तरे तीच मंडळी देऊ शकतील.
नंदिनी, श्रद्धा के,अज्जुका, साजीरा, आय टी गर्ल.

विशाल, अज्ञात यांनी जेव्हा स्वतःच्या कवितांची ज्ञानेश्वरीशी तुलना केली, तेह्वा मी जरुर तिथे लिहिले, पण तुम्ही म्हणता तसे कंपूबाजी करुन मी कोणालाच काही कवितांवरुन म्हटलेले नाही. हा तुम्हीच माझ्या विपु मधे टाकलेला एक प्रतिसाद पहा, अजूनही विपुमधे आहे -

"पण तुम्ही माझ्या देखील कविता व इतर लेखन वाचता , प्रांजलपणे प्रतिसाद देता म्हणुन"

विपुमधे माझे प्रतिसाद तुम्ही प्रांजल म्हणता आणि इथे मला कंपूबाज म्हणता, तेह्वा तुमचे कोणते लिखाण प्रांजळ म्हणावे? की प्रसंगानुसार तुमचे लिखाण बदलते?

अर्थात जिथे तुमचा प्रतिसाद प्रांजळ होता तिथे तो कबुल करण्याचे धैर्य आणि मोठेपणा माझ्यात निश्चित आहे. तुम्हालाच काय अज्जुकाला सुद्धा तिच्या एका पोस्टसाठी मी असाच प्रतिसाद आणि आभार दिले आहेत. पण म्हणुन तुमच्या सगळ्याच पोस्टस अशा असतात असं म्हणण्याचा मुर्खपणा मी करणार नाही. माझ्या हिरवाई या कवितेवर मला तर बाई प्रकाशचित्रच आवडले म्हणुन कुजकट प्रतिसाद देणार्‍या तुम्हीच होता ना ?
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

तुम्हाला प्रत्येक गोष्टीतून चुकीचाच अर्थ काढायचा असला, अन स्वतःचेच बरोबर असे म्हणायचे असेल तर चालूदेत तुमचे.

ITgirl | 11 डिसेंबर, 2008 - 09:43
सुरेख फोटो.
ते कवितांच तुम्हीच पहा...

हा तो प्रतिसाद ! बघा कशी मुजोर भाषा Sad
-----------------------------------------
- सक्षम दळवी

कंपुबाजी नाही म्हणणार्‍यांना मी विचारतो की अज्ञात, कौतुकच्या कवितेवर जेव्हा नंदिनी, श्रद्धा के,अज्जुका, साजीरा, आय टी गर्ल आणि इतर जेव्हा संगनमत केल्यासारखे तुटुन पडले होते.
>>>>>
पण ह्या सगळ्या लोकांना अज्ञात व कौतुक ह्यांच्या कविता आवडत नाहीत व हे लोक केवळ कंपू करून त्यावर टिका करतात ह्या गृहीतकाचा आधार काय? की अज्ञात ह्यांच्या कविता सर्वांना आवडायलाच पाहिजेत असे तुमचे मत आहे?

तुम्ही व्ही एन सी वगैरेवर फारसे वावरलेले दिसत नाही. तिथे वेगवेगळ्या राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारांची माणसे एकमेकांवर हल्ले चढवतात, अधिक जहाल भाषेतून आपले मत मांडतात. एका बाफवर विरोधात असलेले लोक दुसर्‍या बाफवर एकमेकांचे समर्थन करतात. तिथे तुम्हाला हेच लोक दिसतील. जर व्ही एन सी च्या बाफंवर जहाल आणि प्रत्यक्ष भाषा वापरुनसुद्धा लोकं तिथे लिहित राहतात ह्याचा अर्थ ते लोक त्यांच्या मतांशी प्रामाणिक आहेत. तसेच त्या लोकांना हे संकेतस्थळ सामाजिक असून इथे प्रत्येकाला आपले मत आपल्या पद्धतीने मांडण्याचा अधिकार आहे ह्या दोन्ही गोष्टींची जाणीव आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्हाला ह्याच (तुमच्या भाषेत इथल्या प्रस्थापित) लोकांचा पाठिंबा का हवा आहे? तुम्हाला लिहिण्यापासून कुणीही रोखलेले नाही. माझ्या मते तुम्ही (म्हणजे व्यक्तिशः तुम्ही) गुलमोहराचा ब्लॉग केला आहे. मी हे मत मांडू शकतो. पण तुम्हाला लिहायला मी रोखत नाही ना? तुम्ही लिहितच आहात. जर लेखकाची कलाकृती ही इतरांसमोर मांडण्याच्या लायकीची आहे असे त्याचे/तिचे प्रामाणिक मत असेल तर अनुकूल अथवा प्रतिकूल टिकेचा का फरक पडावा? ज्यांना इथल्या टिकेमुळे क्लेश होतात, मनस्ताप होतो, वाइट वाटते व त्यामुळे ते इथे लिहायचे बंद होतात ह्याचा अर्थ ते इथे लिहायला पात्र नाहित असा होतो (दर्जाच्या दृष्टीने नव्हे तर समाजात एखादी गोष्ट मांडण्याच्या दृष्टिकोणातून).

खरेतर यंदा शिमगोत्सवासाठी गावी जायला न मिळाल्याने थोडा नाराज होतो. पण तमाम हितगुजकरांनी Myबोलीवर उडवीलेल्या धुळवडीने मजा आली. Happy
अजुन किती दिवस सुरु राहणार आहे ? कारण अजुन माझ्या मते so called प्रस्थापीतांकडुन counter attack अपेक्षित आहे. बुरा न मानो होली है |
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

माझ्या हिरवाई या कवितेवर मला तर बाई प्रकाशचित्रच आवडले म्हणुन कुजकट प्रतिसाद देणार्‍या तुम्हीच होता ना

>>>>

हा प्रतिसाद तुम्हाला कुचकट तर मला उपहासात्मक वाटू शकतो. आयटीगर्ल ह्यांना ती कविता आवडली नाही व त्यांनी त्या कवितेची उपहासात्मक निर्भत्सना केली असा ह्याचा अर्थ असु शकतो. (मी ही सगळी विधाने गृहितके म्हणुन वापरत आहे. सत्य म्हणुन नव्हे.) मग तुमच्या (अथवा इतरांच्या) कवितेवर अशी टिप्पणी करुच नये असे आपले मत आहे का?

नंदिनी, श्रद्धा के, अज्जुका, साजीरा, आय टी गर्ल>>>

आयला, काय पण 'कंपू' तयार केला आहे! आम्हालाच माहिती नव्हते, अशा काहीतरी एका कंपूत आम्ही सामील आहोत, म्हणून!!

विशाल, प्रो. च्या (काही) कविता 'दखल घेण्याजोगे' ही नव्हत्या, म्हणून नाही दिल्या प्रतिक्रिया, तर त्याचा अर्थ प्रो.चा पुळका आला- असा होतो? प्रतिक्रिया गोड असो, की तिखट- ती आली याचा अर्थ कवितेची 'दखल' घेतली गेली- असाच होतो. तर, तुझ्या कवितांवर वरील्पैकी बर्‍याच जणांच्या 'चांगल्या' व 'आवडली' म्हणूनही प्रतिक्रिया आहेतच की. तेव्हा तिथं कुठं दिसली कंपूबाजी? माझ्यापूरतं म्हणशील तर कवितेतले 'ओ का ठो' मला कळत नाही. दुसर्‍यांनी टर उडवायला सुरूवात केली की मीही करतो, असे म्हण हवे तर! Proud पण हे टर उडविणारे माझ्या कंपूतले नसले तरी मला चालतं हो!

सोयीस्कररीत्या तू बरेच गैरसमज करून घेतले आहेस. तू ज्यांच्यासोबत वरती माझे नाव घेतले आहेस, त्यांच्यापेक्षा मी खूप नवीन आहे. (तुझ्याबरोबरचाच असेन कदाचित, मायबोलीवर Happy ) शिवाय 'लिहिण्याच्या' बाबतीतही माझ्यापेक्षा वरचे आहेत. डोक्यानं काम घेणारा कुणीही 'कंपूबाज मनोवृत्तीने वागत असेल असे मला वाटत नाही. बाकीचे तुझे आरोप खरे की खोटॅ ते मी कोण सांगणारा? पण हे कंपूबिंपू अतिशय मुर्खपणा आहे हे प्रामाणिकपणे सांगू इच्छितो.

याउप्पर तुझी मर्जी. काहीच लॉजिक नसताना कुणी तरी एकाच विषयावर बरळत राहिला तर त्यात कुणाला काय तोटा यायचे कारण नाही; तसा मलाही येणार नाही. Happy

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

स्लार्ट्या, अनुमोदन! Happy
सतिश, थाम्बा नि वाट पहा!
(खर तर मी पाणी टाकल होत विझायला म्हणून, पण एकतर ते पालथ्या घड्यावर पडल असेल, किन्वा मी टाकलेल्या पाण्यात देखिल "ज्वलनशील" गुणधर्म तयार होत असेल! Proud लेटस सी)
...;
आपला, लिम्बुटिम्बु

टण्याच्या आख्ख्या पोस्टला अनुमोदन.. माझा किबोर्ड चोरला ! Happy

सक्षम, मला तरी त्या वाक्यातून असं वाटलं, की एखादा कविता वगैरे न कळणारा माणूस सांगतोय की मला चित्रंच आवडलं , कवितांचे तुम्ही पहा कारण मला त्यातलं कळत नाही..

किती साधा अर्थ आहे यात? मुजोरी शोधायचीच झाली तर सगळीकडे दिसते! ती आपण का जिकडे तिकडे शोधावी ?? (आयटीला काय म्हणायचे आहे मला माहीत नाही, पण त्यातून मुजोरच अर्थ निघतो हे कुठून कळले?!)
------------------------------------------------------------
www.bhagyashree.co.cc
आमचा कोठेही, कोणाबरोबरही कंपू नाही!

चला आता आपण हे बंद करूया. भरपूर चर्चा झालीये !

Pages