खाजवल्या खाजेला जागा!!! म्हणजेच उकाळ्या पाकळ्या

Submitted by सत्यजित on 13 March, 2009 - 04:51

खाजवल्या खाजेला जागा!!! म्हणजेच उकाळ्या पाकळ्या

हल्ली माबोवर फक्त वाद चालु आहेत,
नवोदित-निर्वाचीत,
जुने-नवे,
प्रतिभावंत- प्रतिभाखंत,
रोचक-भोचक,
शुद्ध-अशुद्ध,
इंग्रजि-मराठी.
वाद करावेत की करु नयेत
दर्जेदार-महाभिकार..
स्त्रीतारक-स्त्रीमारक
पुरुषतारक-पुरुषमारक
असलेले-नसलेले ..
खाजखुजली-खाजकुठली
यादी संपत नाही- यादी संपली

आधि बरेच लोक इथे येत, नुसते वाचत आनंद घेत निघुन जात. मायबोलीचे गुण गात.
पण पुर्वापार भारतियांचा एक मुलभूत गुणधर्म आहे तो म्हणजे भेद-भाव, उच्च-निचता , स्पृश्य-अस्पृश्य असे गट करणे. कोणी कंपूबाजिस तयार नसेल तर आपणच काही लोकांना हिन तर काहीनां चांगली वागणुक द्यावी आणि आपलं वरच्स्व सिद्ध कराव. मग काही लोक घाबरुन आपल्या गटात येतात तर काही चिडुन दुसर्‍या गटात जातात. मग काय...आपला गट झाला की जोरदार चिखलफेक चालू करावी. आपलं इस्पित साध्य.. साहीत्यिक अत्याचार आणि साहीत्यिक पुलिसींग असं काहीस... शेवटी पोलिस चांगले अस प्रत्येक पोलिसाला वाटतं. पण सगळेच पोलिस नाही होउ शकत त्याला बॅकअप लागतो, मग ज्याची पोलिसात भरती होत नाही ते आपसुक चोर होतात...

बरेच बुद्धू(!!!) लोक येथे,.. येतात इथले वाद, चिखलफेक, वयक्तीगत आकस, आत्मप्रौढी, कंपूबाजी , गटबाजी पाहुन निघुन जातात. पण काही हुश्शार... चातुर्याने एखाद्या गटात शामिल होउन लगेच निर्वाचीत होतात Happy काहींना ते नाही जमत ते वाळीत टाकले जातात, तर काही जण निकाराचा लढा देत निर्वाचीत होतात, काहीनां उबग येतो ते निर्वासित होतात. आजचा नविन उद्या नविन रहात नाही आणि वाद इथले संपत नाही.
रोज मायबोलीवर यायला काहीतरी कारण हव ना... आणि आपण रोज जेथे जातो तिथे आपली स्वतःची एक वेगळी ओळख हवी म्हणुन काहीतर करावं. सु नाही तर कु पण चालेल पण ओळख महत्वाची.
प्रत्येकाचा आनंद वेगळां कुणी सदासंतोषी तर कोणी विघ्नसंतोषी... कुणी आपली गाजवायला येतो, तर कुणी आत कुठतरी खरुज खाजतय म्हणुन खाजवायला येतो.

चार दिवस आपण दुसर्‍याला खरुज होई पर्यंत खाजवल की तो न रहावुन आपल्याला खाजवायला लागतो आणि इतरांनाही खाजवायला लागतो, असं करुन खाज महामारी पसरते, मुळचे खाजाळू खुश. खुजली खुजाओ बत्ती बुझाओ.. काही खाजेला घबरुन निघुन जातात, काहींना मुळात खाज असते (आमच्या सारखे) ते येत रहातात खाजवा खा़जवी बघायला, खाजवल्याने टीआरपी वाढतो रे आधी खाजवलेची पाहीजे...!!!! हा नवा मंत्र शिकतात.

खच खच.. खस खस... मग खसा खस मग...खाचा खाचा...
"ह्या बाफवर ही माझी शेवटची खाज..." १००दा खाजवुन चिघळु लागल की अस करावं म्हणजे दुसरीकडे खाजवायला मोकळे, असे नविन संकेत तयार करावेत म्हणजे समोरचा काही तरी सिद्ध करतो न करतोच तर त्याला ठेचल्याचा आघोरी आनंद मिळवावा . नविन कोणी आला की त्याला खाजवावे.

तर सर्व जुन्या, नव्या, प्रतिभाशाली आणि प्रतिभाखाली माबोकरांन्नो. तुम्हाला जर खजवा खाजवी जमत नसेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही खाजवाखाजवीच्या शिकवण्या चालू केल्या आहेत.
खाजवा खाजवी कार्यशाळा चालू केली आहे..त्यासाठी एका ड्यू आयडी घ्यावा उदा. खाजखुजली, खरुज, खुजवा, खाजाखाजी.. खज्जू, खाज्जूकाका, खाजवुका, खाजानजी, खाजवेन_हां, खाजेरी, खाजुल्या, ई.
येथे नविन स्माइली पण तयार केला जाईल :
:खाखका: -खाजवुन खरुज काढणे
:कखा: कचाकच खाजवतोय
:मखासू: मला खाज सुटलीय
:मखा: मला खाजवा
:खुखाबका: खुप खाजतय बरं का..
:मजुखाआ: मला जुनी खाज आहे
ई...
आता हे लिहायची मला खाज काय? तर इकडेतिकडे खाजवा खाजवी करण्या पेक्षा काय ते समोरासमोर खाजवुया ... ज्यांच्यांत खरिच धमक असेल त्यानी याव आणि खाजवाव इथे... :मजुखाआ:

पण हे ललित? हो ललितच आहे... नसेल तर तस सिद्ध करा...

गुलमोहर: 

हेच तर आधी views and comments इथे वाद होता आता सगळीकडेच होतायत एकजात. <<
जेथे बीबी तेथे वाद Wink
आता इथेच पहायचे तर, तू "ललित" लिहिलेस आणि मग ७.२२ ला नंतर एक तुझे मत मांडणारे पोस्ट इथेच लिहिलेस. त्यामुळे वादही इथेच "गुलमोहरात" सुरू झाला ना? Happy

------------------------------------
"आजकाल हितगुज पुर्वी सारखे राहिले नाही"
असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हितगुजवर "जुने" झालात असे समजा. Happy

त्यामुळे वादही इथेच "गुलमोहरात" सुरू झाला ना? >> त्याच काय आहे माझ्या सारखा पोपट गुलमोहराशिवाय इतर झाडांवर बसत नाही Happy मी कावळा थोडीच आहे. Lol

आता इथेच पहायचे तर, तू "ललित" लिहिलेस आणि मग ७.२२ ला नंतर एक तुझे मत मांडणारे पोस्ट इथेच लिहिलेस. >> बरोबर आहे वरच ललित आहे खालचं फलित आहे . Happy

सत्या, तु इतकं लिहूनही या लेखाचा अनुल्लेख झालाच की, अजून कुठं इथे ते 'ग्रेट' लोक फिरकलेत?
म्हणजे आम्हाला खरंतर निर्व्याज मैत्रीची इच्छा आहे म्हणून >> म्हणुनच दक्श तुला जर खरच त्यानी यावंस असेल तर त्यांच्या विचारपुसीत जाउन त्यानां आग्रहाचे आमंत्रण कर.. दो कदम तुम भी चलो. दो कदम हम भी चले.

गेटची कडी वाजवली कुत्र अंगावर आल तर मात्र मी जबाबदार नाही Lol

गेटची कडी वाजवली कुत्र अंगावर आल तर मात्र मी जबाबदार नाही >>

नुसतं अंगावर येणार असेल तर हरकत नाही, पण सल्ले द्यायला लागलं तर ? Biggrin
____________________________________________

http://maagevalunpahataana.blogspot.com

सत्यजित_म,
माबोच्या भाषेत तूम्हाला १००००००००००००......... (.--> इन्फिनीटी) मोदक.
अतिशय योग्य लिहीले आहे. प्रस्थापित - नवोदित वाद नको म्हणायचे पण काही लोकांच्या गट बाजीनेच इथे हे सर्व चालले आहे. माबो हि आपली प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे असेच ह्या लोकांना वाटत असावे. (असेल देखिल मला ठाउक नाही) पण जरी माबो ह्यांची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल तरी त्यांना हे समजावयास हवे कि त्यांनी आंतरजालावर हे स्थळ सगळ्यांसाठी उपलब्ध केले आहे त्यामुळे इथे हुकुमशाही चालणार नाही. माबोचा वाचक वर्ग वाढावा असे त्यांना वाटत नसेल तर ह्या वेबसाईट वर तसे नमुद करावे कि इथे नविन प्रवेश उपलब्ध नाही. किंवा नविन मेंबरशीप साठी खालील अटी घालाव्यात.
१. इथे ज्याला स्वतःची बुद्धी किंवा मत असेल त्यांना प्रवेश नाही.
२. इथल्या सोकॉल्ड प्रस्थापितांची ज्यांना हाजी हाजी करता येईल त्यांनाच इथे प्रवेश देण्यात येईल.
३. व्यक्तीपूजा करता येत असेल तर उत्तम.
वरचे नियम बंधन्कारक रहातिल आणि वरील नियमांत तूम्ही बसत नसाल तर इथे मेंबरशीप घेउ नका.

त्यासाठी एका ड्यू आयडी घ्यावा उदा. खाजखुजली, खरुज, खुजवा, खाजाखाजी.. खज्जू, खाज्जूकाका, खाजवुका, खाजानजी, खाजवेन_हां, खाजेरी, खाजुल्या, ई. >>>>> Proud Lol

माझा डुआय आहे असे ऑलरेडी काही लोकांचे मत आहे, पण ठिक आहे ह्या साठी मी अजुन एक डुआय घेते.. (कुठला घेउ बरे विचारात बाहुली) खाज्जुका का खोनु का खिंन्ड्रेला का खायोनारा Proud

>>>>माझा डुआय आहे असे ऑलरेडी काही लोकांचे मत आहे, पण ठिक आहे ह्या साठी मी अजुन एक डुआय घेते.. (कुठला घेउ बरे विचारात बाहुली) खाज्जुका का खोनु का खिंन्ड्रेला का खायोनारा

Rofl मला सगळेच आवडले. एक एक घेऊनच टाका. हाकानाका.:फिदी:

बरं एक आगाऊ सल्ला: 'खायोनारा' हा आयडी पार्ल्याच्या खादाड इमेजला अगदी शोभेसा आहे. त्या आयडीने पार्ल्यात येत चला.

Satyajit_m | 13 मार्च, 2009 - 06:22 >> बर्‍याच गोष्टीत अनुमोदन. Happy

विशाल - मग कोण कुठल्या कंपूत आहे हे डायरेक्ट मांड. नुस्तेच कंपू, कंपू असे नको म्हणू. म्हणजे सविस्तर, संगतवार गोष्टी होतील. आणि तुला का वाटते कंपू आहे म्हणून हे आधी मांडायला पाहिजे.
तू मागे जाऊन व्हि अ‍ॅन्ड सी वाच. तुला गुलमोहर काहीही वाटनार नाही. Happy

आणि त्या प्रिन्सेसच्या पाठीमागे का लागलास. तिने सहज लिहीले आहे. (एकदा विरोधी लिहीणारे म्हण्जे विरोधी कंपू असा चश्मा घातला की सगळेच विरोधी वाटतील. तसे नको करु.)

साहित्य दर्जा खरच चांगला आहे असे जर सो कॉल्ड विरोधी लोकांचे मत असेल तर वादासाठी शुभेच्छा. बर्‍याच कविता तर अचाट मध्येच मोडनार्‍या आहेत.

विद्रोही गुलमोहर असाही एक बाफ येउदेत. Happy

खाज्जुका का खोनु का खिंन्ड्रेला का खायोनारा >>> महिन, तुम्ही विरोध करा, पण हा व्यक्ती विरोध होत आहे ह्याचे भान ठेवा. काय आहे की बरेचदा तुमचा मुद्दा बरोबर असला तरी तूम्ही हा जो व्यक्ती विरोध चालविला आहे त्यामुळे तो प्रभावी वाटत नाही. आणि काही लोक ज्यांनी तुम्हाला दुखावले असेल त्यांना डायरेक्ट विचारा. तुम्ही पण मग विरुद्ध कंपूच तयार करत आहात की. Happy

तो पोपट बाफ पाहायचा राहिला, कुणी सेव्ह केला आहे का? ओरिजनल कविराज कोण?

केदार, Happy
आपल्या कवितांना नावं ठेवतात म्हणून रडणारे हेच विशाल कुलकर्णी आता प्रा. चौधरींच्या कवितांना नावं ठेवत आहेत. म्हणजे प्रस्थापितांची पुढची पिढी तयार होते आहे म्हणायचं की काय! Happy
मायबोली सबगोलंकार आहे.

नमस्कार मंडळी,

सत्यजीत ने लिहिलेला मुद्दा मीही काही नव्या लेखकांवर जेव्हा हल्ला झाला तेव्हा प्रत्येक बाफ वर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

वर कुणीतरी लिहिले होते की सुमार दर्जाचे साहित्य लिहुन चांगली प्रतिक्रिया येण्याची अपेक्षा ठेवली जाते असे काहीतरी..अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे हे खरच..पण प्रतिक्रिया देणार्‍यानी थोडीफार दुसर्‍याना दुखावणार नाही अशी प्रतिक्रिया देण्याचे तारतम्य ठेवणे ही अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे का?

सतीश चौधरी, मी_ना आणि काही बाबतीत विशाल कुलकर्णी यांच्या साहित्यावर मी काही प्रतिक्रिया पाहिल्या त्या अतिशय जहाल/उद्धट होत्या. काहीजणानी "फुसका बार" वगैरे वगैरे शब्द ही वापरले आहेत.

आपण सगळे आईच्या पोटातुन उत्कृष्ट लिहायचे शिकुनच येतो का? चुकातुनच आपली प्रगती होत असते ना? मग हळुहळु प्रगती होउद्या की..काय हरकत आहे?

माझ्या आठवणीप्रमाणे 'फुसका बार' हे त्या लेखकाचे जुने लेखन जास्त 'सरस' होते, या संदर्भात वापरले गेले होते. त्या मुळे ती प्रतिक्रिया 'जहाल अन उध्दट' कशी काय होते? उलट जुन्या लेखनाचे कौतूकच त्यात नाही का?

केदार, टण्या अन लालूला शंभर टक्के अनूमोदन. विशालला नेहेमी मी 'इथे फार शहाणे लोक आहेत', 'पंडित लोकांपासून सावध राहा', 'इथे फाल्तू टीका होते' अशा अर्थाचे सल्ले नवीन लोकांना देताना मी पाहतो (म्हणजे सगळेच पाहत असतील. 'विचारपूस' म्हणजे खुप प्रायव्हेट गोष्ट वगैरे नाही!). याच 'शहाण्या' लोकांनी त्याच्या लेखनावर चांगले अभिप्राय दिले, की त्रिवार आभार वगैरे मानले जातात.

इथे नेहेमीच फाल्तू टीका होते हे मान्य होण्यासारखे नाही. बरेच जाणकार मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया खरोखर अभ्यासण्यासारख्या असतात, अन त्यातून इथल्या नवीन माणसाला आपोआपच पुढे जाण्याचा रस्ता मिळतो, हे मी स्वतः अनुभवले आहे.
(मी स्वतःही विशालचे जे लिखाण आवडले त्यावर प्रामाणिकपणे 'आवडले' म्हणून सांगितले आहे. हे उदाहरणादाखल.)

हे 'दुखावणे' वगैरे अजून तरी मला कळलेले नाही. सार्वजनिक ठिकाणी भाषण केल्यावर कुणी फुले देणार अन कुणी चपला, हे आपण गृहित धरत नाही का? मोठे अन जगप्रसिध्द लोक अन महात्मे इथून सुटले नाहीत, तर आपण आपला स्वतःचा अपवाद करावा म्हणताय?

(असे काहीतरी लिहिल्यावर 'च्यायला, तुमच्या बापूची साईट असल्यागत लिहिताय की!!' अशीही प्रतिक्रिया येणे साहजिक आहे, म्हणून मान्यही आहे. मीही क्षणभर माझ्या बापूची साईट असल्याचे स्वप्नरंजन करण्यात कुणाच्या बापूला काय अडचण आहे? Proud )

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

सत्यजित.. >>पण हे ललित? हो ललितच आहे... नसेल तर तस सिद्ध करा...>> Rofl
हे लई भारी. हे सर्वात आवडलं.

बरं शिकवणी साठी माझी विद्यार्थी म्हणुन निवड करा. का काही एन्ट्रन्स एक्झ्याम्स आहेत?
कळावे लोभ असावा हि विनंती. Proud

बरं, एक सांगायचं राहिलं. 'खाज' या शब्दाच्या सर्वात जवळ जाणारा 'खाजिरा' हा आयडी पुर्णतः संरक्षित आहे. पण कुणाला मिलियन डॉलर्सची बोली बोलायची असल्यास कृपया संपर्क करावा.

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

साजिरा,

मी प्रतिक्रियांच्या अनुकूल किंवा प्रतिकूल असण्याबद्दल बोलत नसुन प्रतिक्रियांच्या भाषेबद्दल बोलत आहे.
प्रथितयश मायबोलीकरांचे सल्ले बरोबर असल्याबद्दल दुमत असण्याचे काहीच कारण नाही. फक्त काही प्रतिक्रियांची भाषा मला स्वत:ला (माझ्या लिखाणाबद्दल नसूनही) जहाल/उद्धट वाटली.(वैयक्तीक मत!)

स्वतःला दुसर्‍यापेक्षा उच्च दर्जाचे समजून दुसर्‍याना दुखावेल किंवा वाईट वाटेल असे बोलणे/लिहिणे हे मला स्वतःला पटत नाही म्हणुन कदाचित मला ती भाषा तशी वाटते (परत एकदा वैयक्तीक मत). एक दोन वेळा माझ्याकडुन दुखावणारे लिहिले गेले आहे पण नंतर मला वाईट वाटले आणि मी क्षमा पण मागितली आहे.

असो माझ्या लिहिण्यामुळे तुमच्या कुणा स्नेह्याबद्दल तुम्ही "दुखावले" गेला असाल तर क्षमस्व!:)

धन्यवाद.

माझा स्नेही? मी दुखावलो??
Lol

--
संपलाच नाही, भाकरीचा मार्ग;
ग्रंथातले स्वर्ग, कशापायी?

मानस

अगदी माझ्या मनातलं बोललास (लीस)

शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................

साजिरा उर्फ खाजिरा,
आज बरे सापडलात. तसे पण सत्यजित्_एम ह्यांनी लिहीलेच आहे काय जे असेल ते समोरसमोर सांगा. तेव्हा हे समोरासमोर.
आगाउ , उर्मट, तिखट, वैयक्तिक प्रतिक्रीया देण्यामधे माबोवर तूमचा हाथ कोणी पकडु शकत नाही.
टाकाउ लिखाण, साहित्यिक मूल्य नसलेले लिखाण, निधप ह्यांच्या भाषेतील भयाण, भंपक लिखाण ह्या सर्व प्रकारचे लिखाण इथे आढळते. मग तो नविन आयडी असो किंवा जुना.
आता एखादे लिखाण टाकाउ आहे कि नाही हि खुप सापेक्ष गोष्ट आहे. (जसे अल्ताफ राजा आणि हिमेश रेशममिया ह्यांची गाणी काही लोकांना खूप आवडतात काही लोकं त्या गाण्यांना नाक मुरडतात.) म्हणजे हि सर्व विषेशणं तूमच्या सारखे माबोवरील स्वयंघोषित पंडित लावतात.
तर चला आपण हे मानुन चालु कि तूम्ही म्हणतात त्याप्रमाणे त्या कविता अथवा साहीत्य टाकाउ आहे म्हणुन, त्या साहीत्याची वाहवा करा असे कोणीच म्हणत नाही आहे, पण त्यांच्यावर वैयक्तीक चिखलफेक अथवा ती व्यक्ती अगदी रडकुंडिला येईल अशा प्रतिक्रिया का द्याव्यात.
प्रस्थापित खुप उच्च दर्जाचे साहित्य लिहीतात हा आपल्या सारख्या स्वयंघोषित पंडीतांचा निव्वळ गैरसमज आहे, भ्रम आहे. असे असते तर आज हि मंडळी माबोसोडून बाहेरच्या जगात देखिल नावारुपाला आली असती. ह्या सर्व प्रस्थापितांना माबोसोडुन बाहेर काळे कुत्रे देखिल ओळखत नाही.

इथे गटबाजी आहे, कंपु आहेत हे तूम्हाला देखिल मनातून माहीत आहे, पण उगिचच वादासाठी वाद घालायचे आणि आपण कसे श्रेष्ठ आहोत हे दाखवायचा आटापिटा करायचा. वेड घेउन पेडगावला जायचे.
जरा इन्ट्रोस्पेक्शन म्हणजेच आत्मपरिक्षण करा. तूम्हाला काय वाटते तूम्ही सत्य नाकारुन लोकांना काय सत्य आहे हे माहीत नाही आहे का? सत्य न मरते दळभारी. हे लक्षात घ्या.
तेव्हा उगिचच आपले शेजारील राष्ट्र कसे उघड उघड असत्य बोलते, आणि आपला हेका चालुच ठेवाते, त्याप्रमाणे करु नका. सत्य समोर आल्यावचुन रहात नाही. हे लक्षात असु द्या.

अनंत वेळा हे चर्चिले आहे की चुका सांगाव्यात पण त्या सौम्य भाषेत. इथे प्रत्येकाचा हाच मुद्दा आहे.

शरद,

मनातले बोलला(स) बरोबर आहे:) सॉरी:) (दिवे घ्या!:)

धन्यवाद.

बरं, एक सांगायचं राहिलं. 'खाज' या शब्दाच्या सर्वात जवळ जाणारा 'खाजिरा' हा आयडी पुर्णतः संरक्षित आहे. पण कुणाला मिलियन डॉलर्सची बोली बोलायची असल्यास कृपया संपर्क करावा. >>>

माझं देखिल एक सांगायचं राहिलच, ''खाजिरा'' हा आयडी तूम्हालाच सर्वात जास्त शोभुन दिसतो. कारण खाजवून खरुज तूमच्यापेक्षा जास्त कुणीच काढत नाही. तेव्हा मिलीयन डॉलर काय एक नवा पैसा देखिल ह्या आयडीवर कुणी लावणार नाही. Proud

आता कोणी म्हणेल मी वैयक्तीक आरोप उघड उघड करत आहे पण वरती अनेक वाचकांनी असे लिहीले आहे कि सर्व नावे घेउन स्पष्ट बोलावे. सत्यजित ह्यांनी देखिल सर्व उघड बोलावे असे आवाहन (आव्हान?) केले आहे. म्हणुन हा सर्व खटाटोप.
उदा...
>>विशाल - मग कोण कुठल्या कंपूत आहे हे डायरेक्ट मांड. नुस्तेच कंपू, कंपू असे नको म्हणू. म्हणजे सविस्तर, संगतवार गोष्टी होतील>>>

मला केदार प्रिंसेस शरद यांचे म्हणणे पटले.. ( आणि हो आमचा कंपू नाहीए.. कोणालाही मी नीट ओळखत नाही!)

जुनी मायबोली निश्चित खूप सुंदर होती.. इथे ५-६ वर्षं रजिस्टर करून आले, त्याआधी पासून वर्षं दिड वर्षं मी रोमात असायचे.. आता मलाही कळून चुकले आहे की नेमेचि येतो पावसाळा तसे हे वाद असतात.. कायम कोणा नवोदिताला वाटते की प्रस्थापित त्यांच्यावर अन्याय करत आहेत! हे असं का वाटते कळत नाही ब्वॉ मला! मुळात या साईटवर तुम्ही जर आत्ताच आला असाल तर लगेच तुम्हाला सगळे आपले म्हणतील ही अपेक्षाच का?? (याचा अर्थ आपले म्हणतातही पण अपेक्षा ठेऊन का वागायचे??) पहील्याच प्रयत्नाला सगळे वा वा का करतील?

आणि जर ते वावा करत नसतील तर ते का करत नाही आहेत हे पण पडताळून पाहावे... जुन्या मायबोलीवर काय वातावरण होते, काय उत्कृष्ठ दर्जाचे साहीत्यलेखन यायचे हे माहीत आहे जुन्या आणि प्रस्थापित लोकांना.. दर्जाबद्दल ओरड नव्हती कारण लोकांना जाणीव होती आपली प्रत्येक कविता मायबोलीवर आलीच पाहीजे असा नियम नाहीए !!! आय अ‍ॅम शुअर वैभव जोशींच्या अजुन कित्येक कविता त्यांच्या पोतडीत असतील ज्या त्यांनी इथे आणल्या नसतील .. ( वैभव जोशी एक उदाहरण.. जुन्या मायबोलीत अशी खूप लोकं होती ज्यांच्या कविता वाचावाश्या वाटायच्या, कारण त्यात खरंच काहीतरी असायचे.. आजकाल असा सिनारिओ आहे की कवितांबद्द्ल धडकी भरली आहे!! Sad ) काय तो रेट कविता टाकण्याचा?

बरं पूर्वी कवीतांचा वेगळाच भाग होता! जर तुम्हाला डोक्याला त्रासच करून घ्यायचा नसेल तर तुम्ही तिकडे न जाणे हा पर्याय होता... आता नाहीए ! नवे लेखन मधे दिसतेच अपरिहार्य कारणाने सर्व प्रकार! त्यात कवीता जास्त असल्या आणि त्यांचा दर्जा पाहीला की डोकं सरकणार नाहीतर काय ? तरी मी खूप संयमाने फारफार तर कवीता वाचते आणि सोडून देते. कधीकधीच प्रतिसाद देते.. जे बेहद्द आवडतं त्याला देतेच देते... पण हे प्रत्येकाला कसे जमेल? विशेषतः ज्याला या साहीत्यप्रकाराबद्द्ल खूप गोडी आहे तो नामानिराळा नाही राहू शकत!

आणि मला विशेषतः विशाल कुलकर्णींचे वागणे नाही पटत आहे.. त्यांच्या मनात ठाम भरले आहे की मायबोलीवर त्यांच्यासारख्या लोकांना न्यायच नाही मिळत .. आणि ते सर्व ठीकाणी लिहून हे दाखवून देत आहेत.... कंपूबाजीच्या विरोधात.. आणि मग ते काय करत आहेत? त्यांचे इथे झालेच ना मित्र-मैत्रिणी? ते त्यांना वावा म्हणतात, तो कंपू नाही?? अ‍ॅम क्लुलेस ! किती सोयिस्कर अर्थ तो !? वर सगळे म्हटले ते आहेच, प्राध्यापकांच्या किंवा अजुनही काही कवीता/लेखांवर त्यांचे सद्ध्याचे प्रतिसाद काय असतात? ते नाही का प्रस्थापित काल आलेल्या प्राध्यापकांसमोर?? आणि मग चक्क प्रद्ध्यापक शांत कसे इतके? त्यांनी तर कंपू गोळा करून प्रत्येक ठीकाणी लिहीले पाहीजे.. यांच्या या चुका नाही काढल्या, माझ्याच का???

(विशाल, तुम्हाला वैयक्तिक काहीही नाही जरी मी तुमचे नाव घेऊन लिहीत असले तरी.. पण मला आणि बर्‍याच जणांना हे फार जाणवले असणार आहे... पोळीभाजीवर तुम्ही विनाकारण वाद आणलात बरोबर? मेंदूची किळस वगैरे शब्द तुमचेच! मग तुम्ही का असं एक्स्पेक्ट करता की लोकांनी तसे लागेल असे बोलू नये जेव्हा तुम्ही तेच करता?? मी आयटीगर्लच्या विचारपुशीमधे पाहीले होते. तिनेही तुम्हाला हेच सांगितले होते!!)

मी दुसर्‍या एका साईटवर अशाच विषयासंबंधी लिहीले होते...

कसली घाई आहे इतकी??? आल्या आल्या काहीतरी लिखाण करून (ते चांगले असेल नाहीतर वाईट.. ) पण लगेच सगळ्यांनी तुमचे कौतुकच केले पाहीजे.. लगेच भरपूर प्रतिसाद आलेच पाहीजेत.. याला येतात मग मला का नाही?? एव्हढी काय घाई!? या बसा.. निवांत मजा करा! लोकांना प्रतिसाद द्या.. चर्चांमधून भांडा! त्या भांडणातूनच मैत्री होते.. (काही लोकं त्याला कंपू म्हणतात!) होतेच! इथे कोणीही डुख धरून बसलेले निदान मी नाही पाहीले... तेव्हा सगळे करा.. एकीकडे लेखन करा.. वाट पाहा.. जन्माला आल्या आल्या इंजिनिअर नाही होता येत.. २१ वर्षं वाट पाहावी लागतेच.. तसंच हे आहे..

बरिच गदारोळ सुरु आहे, पहाटे नळा वर पाणी भरायच्या वेळची चर्चेची एक आधुनीक झलक दिसली.

साजिरा उर्फ खाजिरा,
आज बरे सापडलात.
--- अहो माहिन (मी योग्य उच्चार केला आहे ना?), तुमच्या यादीत साजिरांच्या नावाचा क्रमांक काय होता? अजुन कोणा-कोणाला तुम्ही शोधत Happy आहात? यादी किती मोठी आहे?

अनंत वेळा हे चर्चिले आहे की चुका सांगाव्यात पण त्या सौम्य भाषेत. इथे प्रत्येकाचा हाच मुद्दा आहे.
--- पण सौम्य भाषा ही व्यक्ती नुसार बदलणार नाही कां? तुम्हाला जे सौम्य वाटते ते मला नाही वाटत किंवा उलट. मला तुमची भाषा पण खुप जहाल (थोडी वयक्तीक) वाटते आहे... आता सौम्यतेची रेखा, काही खास/ विशिष्ट अशा लोकांसाठी वर न्यावी लागणे योग्य ठरेल कां?

सत्यजितांना धन्यवाद - सर्वांच्या मनात दबा धरुन बसलेल्या भावना व्यक्त करायला एक खास मोकळी तसेच हक्काची जागा निर्माण करुन दिल्याबद्दल.

सत्यजितांना धन्यवाद - सर्वांच्या मनात दबा धरुन बसलेल्या भावना व्यक्त करायला एक खास मोकळी तसेच हक्काची जागा निर्माण करुन दिल्याबद्दल.>>>

Rofl हे बाकी खरे हो!! कित्येक दिवसातल्या गोष्टी खळबळून बाहेर आल्या त्या पोस्ट मधे!

--- अहो माहिन (मी योग्य उच्चार केला आहे ना?), तुमच्या यादीत साजिरांच्या नावाचा क्रमांक काय होता? अजुन कोणा-कोणाला तुम्ही शोधत आहात? यादी किती मोठी आहे? >>>> Rofl Proud Lol

uday321 का घाबरलात काय? कि तूमचे नाव पण यादित आहे का म्हणुन विचार करत आहात. थांबा जरा यादी बघुन सांगते. नसेल तर करुन टाकु अ‍ॅड, हाकानाका. Proud (हा विनोद होता.)

तर लोकहो मी ईथे खुपच नविन आहे. आणि वर पासुन खाली पर्यंत सगळं वाचल्यावर ......कोणाला काही प्रतिसाद देतानाच भिती वाटू लागली आहे. Uhoh

वास्तविक पहाता आतापर्यंत (जुने लेख) मुळ लेखा पेक्षा त्याचे प्रतिसाद वाचुन मी जास्त हसलो आहे. Happy

सगळेच निवांत झाले की कित्ती मज्जा येइल ना.....

धन्यवाद अ‍ॅडमीन तूम्ही साजिरा ह्यांचा इतक्या ग्राम्य आणि असंस्कृत भाषेतील प्रतिसाद उडविल्याबद्दल.

तर लोकहो मी ईथे खुपच नविन आहे. आणि वर पासुन खाली पर्यंत सगळं वाचल्यावर ......कोणाला काही प्रतिसाद देतानाच भिती वाटू लागली आहे.
---- भर रणकंदन सुरु असतांना देखील निवांत (हा ID आहे) तुमचे स्वागत. तुम्ही भारतात रेल्वेच्या जनरल डब्यामधुन प्रवास केला आहे कां?

प्रत्येक स्टेशनवर जेव्हा गाडी थांबते त्यावेळी आत जी माणसे बसलेली आहेत ती आहे त्या उपलब्द जागेत जरा अजुन मोकळी बसतात (काही स्टेशन यायच्या अगोदरच बॅगा ठेवतात, काही मांडीवर झोपलेल्या लहानग्यांना बळेच शेजारी बसवतात) जेणेकरुन नवागतांना बसायला जागाच नाही याची जाणीव व्हावी. नुकतेच अलेले प्रवासी चिवट पणे या प्रवृत्तीचा प्रतिकार करतात. बहुतेक वेळा शब्दाचे वाद होतात तर क्वचीत हाणामारी 'अहो खिडकी कडे सरका जरा, थोडं अंग सावरुन बसा, बॅग खाली ठेवा'. थोड्या काळानंतर नवागतांना कशीबशी जागा मिळण्यात यश मिळते.. सुरवातीला नुसतीच बसायला मग ऐसपैस बसायला. पण मग आता ते नवागत रहात नाही, त्यांची भुमिका (रोल) बदलते.... हा प्रवृत्ती बदल अगदी नकळत होतो. तसे आपल्या माबो आहे. सुरवातीला नवोदितांना त्रास होत असेलही (कारणे अनेक असतील, आहेत) पण प्रस्थापितांवर त्यांना त्यांच्यातील चुकां सकट संभाळुन घेण्याची जबाबदारी (थोडी जास्त) पडते.

महत्वाचे, एखाद्याने जर चुका दाखवल्याच तर त्या सकारात्मक रित्या स्विकारा, नाहीतर सोडुन द्यावे पण उत्तर म्हणुन त्याच्याही (केवळ) चुकाच काढायच्या हा उद्देशाने येथे फिरायला नको (काल पासुन मागणी प्रचंड वाढल्याने बाजारात भिंग पण मिळेनासे झाले).

मी येथे ढोबळ वर्गीकरण करतो आहे, दुखावले गेलेले आणि दुखावणारे. आजवर माबो वर जी मंडळी कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने, जाणता/ अजाणता दुखावले गेले असतील त्या सर्व दु:खी, पिडितांची दुखावणार्‍या सर्वांतर्फे मी मनापासुन क्षमा मागतो.

वेळ मिळाला की इथे यावं. मिळालेल्या वेळात जमेल तितकं वाचावं. जमलं तर प्रतिक्रिया द्याव्यात. कधी कधी ते ही जमत नाही... इतकं छान लिहिलेलं असतं, की शब्दच सुचत नाहीत. कधी इतकं वाईट की, त्यालाही शब्दं सुचत नाहीत. तर कधी वेळ संपतो.
हे "जमलं तितकं" ह्या एकाच भांड्यात मावेल तितकंच आहे.
लिहिण्याचंही माप तितकच.
माझं तरी हेच आहे. इतरांचं माहीत नाही. इतरांचंही हेच असावं असं समजून चालत होते. पण सगळ्यांचच तसं नसावं.
मध्यंतरी मला एक मेल आली. "काय गं, काय त्या अमुकतमुकला प्रतिक्रिया देतेस? मग तो अजूनच लिहीत सुटतो..." अशा अर्थाचं.
त्यानंतरही... अगदी कालच. सतीश चौधुरींच्या एका कवितेतल्या शेवटच्या कडव्यातली एक कल्पना आवडली म्हटलं म्हणून.
तेव्हा लक्षात आलं, की बर्‍याच लोकांना बहुतेक बराच वेळ आहे. आणि त्याचा विनियोग "मायबोली" आपल्यामते साफ्-सुथरी ठेवण्यात करतायत.
कंड! आपल्यालाही असतो आणि दुसर्‍यांनाही. इथे येऊन लिहिणे, प्रतिक्रिया देणे हा सुद्धा त्याच कंडाचा एक भाग.
तो किती वाढू द्यायचा (आपला आणि दुसर्‍यांचाही) ते आपण ठरवायचं.... कुठे थांबायचं हे कळायलाच हवं प्रत्येकाला... ते ही सुरू करण्याआधी. (दुर्दैव हे की, कंडाच्याबाबतीत ते फार फार कठीण आहे. त्यामुळे सुरूच करू नये.)

दाद, तुझं म्हणणं पटलं, आवडलं.

>>>मध्यंतरी मला एक मेल आली. "काय गं, काय त्या अमुकतमुकला प्रतिक्रिया देतेस? मग तो अजूनच लिहीत सुटतो..." अशा अर्थाचं.

कुणी कुणाला काय प्रतिक्रिया द्यावी हा ज्याचा त्याचा प्रश्न नाही का? मेल टाकून विचारण्यासारखं काय आहे त्यात?

काय त्या अमुकतमुकला प्रतिक्रिया देतेस? मग तो अजूनच लिहीत सुटतो >> लोल, धन्य.

काही लोक खूप लिहीतात. मग? त्याने काय फरक पडतो. काय लिहीले हेच महत्वाचे. किती आणि कोणी हे नाहीच.

तात्याने लिहीले होते तो शब्द अचुक आहे. प्रसवक्षमता. काही लोकांची असते जास्त. (प्रसिद्धीलोलूपता असे नाही म्हणता येणार त्याला कारण .. ) आणि तिला बंधन असावे काय?

लिहीनार्‍याने लिहील्यावर मात्र सर्व वाचकांचा हातात. पन इंटेंडेड Happy आवडले नाही, वाचू नका. आणि महिन लिहीतात तश्या जsssरा सौम्य प्रतिक्रिया द्या.

मला एका बर्‍यापैकी जुन्या मायबोलीकराने सांगीतले होते की इथे, पोलींसींग फार वाढले आहे. ते खरे असावे का?

कंड, तो किती वाढू द्यायचा (आपला आणि दुसर्‍यांचाही) ते आपण ठरवायचं >> सही.

(
स्वगत
कंडाबद्दलच तर कळत नाहीये इथे दोन्ही कंपूंना, असे म्हणावे काय? (म्हणजे कंपू आहेत असे लोक म्हणत आहेत म्हणून ... ...)

आणि मी, कोणत्या कंपूत? का भाग्यश्री, उदय, मन्समी, मी , इ इ अशी तिसरी आघाडी Happy निवडनुका आल्या आहेत रे भाऊ. कोण कुठून उभे राहतेय. (व्हि अ‍ॅन्ड सी माझ्यासाठी राखीव, बाकी तुम्हीच ठरवून घ्या.)

(ह्या स्वगताला लाइटली घ्या रे, कारण मी पहिलेंदाच उघड स्वगत लिहीलेय. )
)

Pages