झटपट आकाशकंदिल

Submitted by वर्षा_म on 4 November, 2011 - 02:08

सामान :
१] साधारण ५० प्लॅस्टीकचे डिस्पोजेबल बाउल. [ मी पांढर्‍या रंगाचे प्लॅस्टीकचे वापरलेत ]
२] स्टेपलर
३] नेलपेंट ( मी फॅब्रीकपेंटींगसाठीची कलर ट्युब वापरली आहे)

खर्च : साधारण २५ रुपये
वेळ : मला १५-२० मिनीट लागली.

कृती :
१] फोटोत दिसतात तसे बाउल स्टेपल करत जा. आपोआप बॉल तयार होइल Happy
२] प्रत्येक बाउलच्या मधे नेलपेंटने एक ठिपका काढा.
३] एक दोरी घेउन वर उरलेल्या मोकळ्या जागेत स्टेपलरने बल्बसाठी सोय करा.

Akashkandil_2011.jpg

अधिक माहिती : हा दिवा तयार झाल्यावर सगळ्यांना खुपच आवडला. मग १०० ग्लास आणुन सुरुवात केली पण करताना लक्षात आले २००-२५० तरी ग्लास लागतील. मग कंटाळुन सोडुन दिले करायचे.

ग्लासचा करताना फेवीकॉलने चिकटवुन पाहिले. छान चिकटते. पुढच्यावेळि स्टेपलर एवजी चिटकवनेच ट्राय करेल. ( स्टेपलरमुळे ग्लास / बाउलला चिरा पडतात )

मग "plastic cup lamp" गुगलुन पाहिले तर बॉल बरोबर बरेच वेगवेगळे आकार मिळाले.

फोटो मोबाईलवर काढला आहे. त्यामुळे स्पष्ट नाही Sad

गुलमोहर: 

मस्तच गं वर्षे Happy

बोल्स च्या कडांवर चकचकी किंवा टिकल्या लावता येतिल आणि खाली एखादा झिरमिळ्यांचा गोंडा Happy

सुंदर आयडीया आहे. बल्बमूळे हे बोल्स वितळायची शक्यता असते त्यामुळे आत जागा मोठी हवी तसेच बल्बही गरम न होणारा असावा.

बल्बमूळे हे बोल्स वितळायची शक्यता असते त्यामुळे आत जागा मोठी हवी तसेच बल्बही गरम न होणारा असावा. >> हो म्हणुनच CFL चा बल्ब लावला. ३-४ दिवस तरी रात्रभर चालु होता. काहीही प्रॉबलेम नाही Happy

सुंदर आकाशकंदील, आयडीया पण भारी आहे!!

थ्रीडी पेंट घेऊन वाट्यांवर डिझाइन काढता येईल. करून बघायला हवा.

मस्तच आहे. खूप आवडला.
इथे HGTV चॅनलवर डीझाइन ऑन अ डाइम नावाच्या कार्यक्रमात अगदी कमी किमतीत घराचे इंटेरीअर डेकोरशन करून दाखवतात, तेव्हा डिस्पोजेबल ग्लास्/बोल वापरून असे लॅम्प कसे करायचे ते दाखवले होते. तेव्हा ती कल्पना फार आवडली होती.

त्या स्टीलसारख्या कडा कशाच्या दिसत आहेत ? >> त्या बोलच्या प्लॅस्टिकच्याच आहेत. फक्त जाड असल्यामुले तसे दिसत असेल. मी जमल्यास एका बोलचा फोटो टाकते.
कसं चिकटवलंय हे लक्षात नाही आलं >> मी हे स्टेपल केले आहे. चितकवताना स्टेपल करण्याएवजी फेवीकॉल वापरता येतो.

छान

मस्त दिसतोय एकदम. कड स्टेपल केली का एकमेकींना?

मी शिवलेल्या थर्माकोल ग्लासांचा आकाशकंदील पाहिला. एकदम गोड दिसतो तो ही. त्यात स्टेपल करायच्या ऐवजी चक्क सुई दोर्‍याने शिवले होते ग्लास. आणि ग्लासांना आतून जिलेटिन पेपर लावला होता. मस्त रंगीत दिसत होता. अ‍ॅक्च्युअली, ग्लास/ बोल एकत्र करायची कल्पना एकदा जमली की खूप व्हेरियेशन करता येतील.

वा! मस्तच! आता मला या धर्तीवर इतरही कल्पना सुचायला लागल्या आहेत. लॅम्पशेड म्हणून एरवीही छान दिसू शकेल हा प्रकार. आईसक्रीमचे कप्स, स्टायरोफोमचे कप्स/ ग्लासेस, अ‍ॅल्युमिनियम फॉईलचे तयार बोल्स देखील वापरता येतील बहुतेक.

Pages