झटपट आकाशकंदिल

Submitted by वर्षा_म on 4 November, 2011 - 02:08

सामान :
१] साधारण ५० प्लॅस्टीकचे डिस्पोजेबल बाउल. [ मी पांढर्‍या रंगाचे प्लॅस्टीकचे वापरलेत ]
२] स्टेपलर
३] नेलपेंट ( मी फॅब्रीकपेंटींगसाठीची कलर ट्युब वापरली आहे)

खर्च : साधारण २५ रुपये
वेळ : मला १५-२० मिनीट लागली.

कृती :
१] फोटोत दिसतात तसे बाउल स्टेपल करत जा. आपोआप बॉल तयार होइल Happy
२] प्रत्येक बाउलच्या मधे नेलपेंटने एक ठिपका काढा.
३] एक दोरी घेउन वर उरलेल्या मोकळ्या जागेत स्टेपलरने बल्बसाठी सोय करा.

Akashkandil_2011.jpg

अधिक माहिती : हा दिवा तयार झाल्यावर सगळ्यांना खुपच आवडला. मग १०० ग्लास आणुन सुरुवात केली पण करताना लक्षात आले २००-२५० तरी ग्लास लागतील. मग कंटाळुन सोडुन दिले करायचे.

ग्लासचा करताना फेवीकॉलने चिकटवुन पाहिले. छान चिकटते. पुढच्यावेळि स्टेपलर एवजी चिटकवनेच ट्राय करेल. ( स्टेपलरमुळे ग्लास / बाउलला चिरा पडतात )

मग "plastic cup lamp" गुगलुन पाहिले तर बॉल बरोबर बरेच वेगवेगळे आकार मिळाले.

फोटो मोबाईलवर काढला आहे. त्यामुळे स्पष्ट नाही Sad

गुलमोहर: 

Pages