एकट्याच्या या प्रवासा

Submitted by जो_एस on 4 November, 2011 - 08:25

एकट्याच्या या प्रवासा एकट्याने चालतो
साथ नाही दुःखही अन् ना सुखा बोलावतो

एकट्याचा पंथ माझा संथ ही माझी गती
ना कुणाच्या आड येतो अन् कुणा ना ढकलतो

एकट्याने चालताना समजले ना हे कधी
माणसाला माणसांचा का जिव्हाळा लागतो

माणसांना जाणण्याचा यत्न मी केला कधी
समजले इतकेचकी मज संग त्यांचा पोळतो

शांत बसलो मी जरासा हे जनां का ना रुचे
बोलती मजला त्वरेने “हा, न काही बोलतो”

चालल्याने, थांबल्याने फरक कसला अन् कुणा
स्वस्थ बसलोना तरी तो काळ साऱ्यां ढकलतो

संपते जेथे गतीही थांबतो तेथे सुखे
यायचे येथेच होते मी मना समजावतो

सुधीर

गुलमोहर: 

सुधीर, मला कवितेमधले काहीच कळत नाही, पण मनस्वी वागताना, लोक काय बोलतात, याची पर्वा का करावी... मी तरी करत नाही !!

छान.

छान Happy

एकट्याचा पंथ माझा संथ ही माझी गती
ना कुणाच्या आड येतो अन् कुणा ना ढकलतो

एकट्याने चालताना समजले ना हे कधी
माणसाला माणसांचा का जिव्हाळा लागतो>>>>

माणसाला माणसाचा का जिव्हाळा लागतो - व्वा!

संपते जेथे गतीही थांबतो तेथे सुखे
यायचे येथेच होते मी मना समजावतो>>>>

यायचे येथेच होते मी मना समजावतो. वा वा!

अनेक द्विपदी आवडल्या. ही गझल का नाही? Happy

अभिनंदन!

-'बेफिकीर'!

(अवांतर - विपूत बाकीचे लिहितो)

खुप आवडली ..

संपते जेथे गतीही थांबतो तेथे सुखे
यायचे येथेच होते मी मना समजावतो >>
एकट्याने चालताना समजले ना हे कधी
माणसाला माणसांचा का जिव्हाळा लागतो >> खासच !!

आवडेश Happy

आवडेश Happy

छान.

Pages