'पाऊलवाट' - घोषणा

Submitted by माध्यम_प्रायोजक on 2 November, 2011 - 02:07

paulwaat-30x40-02.jpg

अनंत देव हा सांगलीहून मुंबईला पार्श्वगायक होण्यासाठी आलेला तरुण. सर्वस्वी एकाकी असणार्‍या गोदूआक्कांकडे अनंता राहायला लागतो, आणि आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी त्याची धडपड सुरू होते. अनंताच्या या प्रवासाची आणि त्याला या प्रवासादरम्यान भेटलेल्या व्यक्तींची हृद्य कथा म्हणजे ’पाऊलवाट’.

ही कथा आहे नात्यांची..ही कथा आहे भोगांची, त्यागाची, अपेक्षांची, स्वप्नांची, स्वप्नभंगांची, जयपराजयाची, वास्तवाची..ही कथा आहे जगण्याची...!

निर्माते - स्टेट ऑफ द आर्ट फिल्म्स
दिग्दर्शक - आदित्य इंगळे
कथा - अभिराम भडकमकर
पटकथा-संवाद - अभिराम भडकमकर, आदित्य इंगळे
छायांकन - पुष्पांक गावडे
कला - एकनाथ कदम
गीते - वैभव जोशी
संगीत - नरेंद्र भिडे

कलाकार - सुबोध भावे, ज्योती चांदेकर, किशोर कदम, मधुरा वेलणकर, आनंद इंगळे, हृषिकेश जोशी, अभिराम भडकमकर, विजय केंकरे आणि पाहुण्या भूमिकेत सीमा देव.

मायबोली माध्यम प्रायोजक असलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होतो आहे...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन!!!! Happy

गीते - वैभव जोशी >>>>> Happy

ही कथा आहे नात्यांची..ही कथा आहे भोगांची, त्यागाची, अपेक्षांची, स्वप्नांची, स्वप्नभंगांची, जयपराजयाची, वास्तवाची..ही कथा आहे जगण्याची...!>>>>> Happy

आज पत्रकार भवनात 'पाऊलवाट'च्या टीमची पत्रकार परिषद आणि दाजीकाका गाडगीळांच्या हस्ते वेबसाईट लाँचिंगचा कार्यक्रम झाला.
वेबसाईट प्रसाद शिरगावकरने केली आहे- www.paulwaatthefilm.com
गीते वैभवची आहेतच. हे दोघे मायबोलीकर अर्थातच हजर होते.

अभिनंदन.......!!

जिप्स्या, तू आता प्रकाशचित्र स्पर्धेत प्रिमियरची तिकिटं बक्षीस मिळवणे आणि तिथे सेलिब्रिटींचे फोटो काढणे हा नवा छंद जोपासायला हरकत नाही Wink Light 1