शिकागोत पहाण्यासारखे

Submitted by webmaster on 27 January, 2010 - 18:46

शिकागोत पहाण्यासारखे

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिकागो मंडळी, शिकागो downtown फिरायला काही tours packages माहित असल्यास लिहा प्लिज. फक्त १ दिवसाकरता, मार्च च्या शेवटी.

पॅकेज अशी काही नाहीत पण डाउनटाऊन च्या आजुबाजूलाच सर्व पाहण्यासारखे आहे. आर्ट म्युझियम, रिव्हर टूर, मिशीगन अ‍ॅव्हेन्यू (मस्ट), कारजं वगैरे.

ही लिंक बघा.

http://www.google.com/search?hl=en&source=hp&q=chicago+attractions&aq=0&...

शिकागो सिटीपास हा चांगला पर्याय आहे. $६९ प्रत्येकी मध्ये पाच महत्वाची ठिकाणे बघता येतात. तसेच कुठेही रांगेत (तिकीटासाठी) थांबावे लागत नाही. अधिक माहिती इथे: http://www.citypass.com/city/chicago.html

http://www.smartdestinations.com/chicago-attractions-and-tours/_d_Chi-p1...

गो शिकागो कार्ड पण चांगले आहे, व शिकागो सिटीपास पेक्शा स्वस्त आहे. पण या कार्डचा तोटा एकच कि सकाळी ९ ला चालु करुन ५ च्या आत सगळी attractions पहावी लागतात, जे एका दिवसात होत नाही.

वरील २ ही कार्डच्या साईट् वर तुम्हाला लिंक भेटेल, काय काय पहावे त्याची...sort करा आणी काही अडलेच तर ईकडे प्रश्न टाका...

थँक्स मंडळी.
मी १ पुर्ण दिवस पण तिथे नसेन. म्हणजे ११ वाजता पोचेन. व दुसर्या दिवशी दुपारपर्यंत आहे. त्यामुळे ते citypass/card अवघड दिसते आहे. त्या यादी पैकी कोणतीही ५-८ attractions सांगु शकाल का जी पहायलाच हवीत. बरोबर २ लहान (६ व १०) अशा मुली आहेत. त्यांना मजा आली म्हणजे छान.
go card वर यादी आहे.
असे पण काही ठिकाण आहे का जे त्या यादीत नाही पण पहायलाच हवे? ते मिलेनियम पार्क काय आहे?

आधीच धन्यवाद.

मी आई-वडील आले होते तेन्व्हा हे पाहिले एका दिवसात,
- Navy Pier ह्याच्या बाजुलाच जवळपास सर्व attractions आहेत. लहान मुलांसाठि खेळ, giant wheel, botanical garden, imax thetare आहे. एथे दर शनिवारी रात्री ९ च्या सुमारास fireworks असतात, चुकवु नका. http://www.navypier.com/

- 875 N Michigan Ave, Chicago, IL 60611 (John Hancock Center) ईथुन शिकागोचा view sears tower पेक्शा चांगल्ल दिसतो.

-sears tower, अमेरिकेच्या या भागातली सर्वात उंच ईमारत, जम्ल्यास पाहा.

- 201 E Randolph St, Chicago, IL 60601-6530 (Millenium Park) हे फ्री आहे, live shows, music sathi famous

- Adler Planetarium, Shedd Aquarium, The Field Museum ही ठिकाणे पण छान आहेत, लहान मुलांचीहि करमणुक होईल.

- http://www.seadogcruises.com/chicago/ChicagoRiverAndLakeArchitect.cfm
रिवर टुर हे ***must attraction ***आहे, पण समर मध्ये फक्त open असते.

- ओपन्डेक बसपण आहे, पण करु नका. बराच वेळ जातो आणी $$$ पण.

अर्थांत तुम्ही मार्च्मध्ये येताय तेन्व्हा थंडी बरीच असेल, तर मग वर दिलेल्या पैकी जमेल तेव्हढे cover karaa

$$$ वाचवायचे असेल तर १ दिवसात सर्व attraction (ज्याला टिकीट लागत्तात ) अशी go chicago ने करा.

माझ्या आवडीची काही ठिकाणे:

१) जॉन हॅनकॉक टॉवर (सिअर्स पेक्षा चांगला व्ह्यु). सिअर्स पेक्षा गर्दीही कमी असते. पन सिअर्स वरचे नविन आकर्षण (ग्लास बॉक्स) तुम्हाला उंचिची भिती नसेल तर बघता येईल.
२) नॉर्थ मिशीगन अवेन्यु (मॅग्निफीसंट माईल) वर फेरफटका.
३) मिलेनियम पार्क मधील क्लाउडगेट (द बीन) - हे मात्र नक्की चुकवू नका.
४) बहाई मंदीर (डाउनटाउन पासुन लांब) पण नितांत सुंदर.
५) स्वामीनारायण मंदीर. बार्टलेट येथील.
६) अ‍ॅक्वेरीयम फारच सुंदर आहे. लहान मुले असतील तर न चुकवण्यासारखे.
७) थंडी सहन होणार असेल तर संध्याकाळी नेवी पियर वर फेरफटका (आणी जायंट व्हील).
८) डेवॉन अवेन्यू: फार प्रेक्षणीय/स्वछ नसला तरी भेट देण्यासारखा (विशेषतः जर तुम्ही फार भारतीय नसणार्‍या भागातून आला असाल तर).

Hindu Temple of Lake County-छान आहे. पण मंदिरच का?

कल्पु, माझी मूल लहान आहेत. थंडी आहे आता, म्ह्णून closed place. कार मधून लगेच मंदिरात. आणि संस्कार ही होतात. त्याना पण देवाला मोर्या कराय्ला आवडतो. अजून काही option असेल तरि सांगा. पण open air नको.

avdhut, काही मंदीर खूप सुन्दर आहेत. आणि मूलांना आपल्या संस्कृतीची माहिती होते. Happy

@सखुबाई.. तुम्ही लेमाँट येथील हिंदु टेंम्पल ऑफ ग्रेटर शिकागो मधे जाऊन येऊ शकता..
आय - ५५ वर एक्सीट च्या जवळच आहे..
तिकडे पोटोबा आणी विठोबा दोन्ही व्यवस्थीत होईल.. फक्त मंदिराच्या वेळा बघुन जा..

साईबाबाचे पण एक मंदिर आहे बार्टलेट्/अरोरा येथे.. तिकडे पण खुप प्रसन्न वाटते..
अवास्तवः तिथला पुजारी मराठी आहे Happy

@आवळा
अवास्तवः तिथला पुजारी मराठी आहे .

अहो तुम्हाला "अवांतर" म्हणायच का? Happy

असो. तुमची पोस्ट बघून बर वाटल. या बाफवर स्वागत. गटग ला या ना! शिकागोलँड मधे कुठे राहता?

लोकहो, शिकागो डाऊन टाऊन सोडून आसपास ५०-१०० मैलात काही निसर्गसुंदर, २-३ दिवस जाऊन आराम करावा, भटकावं - अशी काही ठिकाणं सुचवाल का? एप्रिल च्या पहिल्या आठवड्या करीता.

रायगडः
१. St. Loius आर्च ५ तासावर आहे
२. Louisville kentucky mammoth caves ४ तासावर आहे
3. Michigan Bear Sand Dunes साधारण ८ तासावर आहे (Best to visit during summer)
४. Wisconsin Dells - Lots of fun activities and water sports (Best to visit during summer)

मज्जा करा... Happy

लेक जेनेवा
सिल्व्हरलेक सेंड दुन्स