खाजवल्या खाजेला जागा!!! म्हणजेच उकाळ्या पाकळ्या
हल्ली माबोवर फक्त वाद चालु आहेत,
नवोदित-निर्वाचीत,
जुने-नवे,
प्रतिभावंत- प्रतिभाखंत,
रोचक-भोचक,
शुद्ध-अशुद्ध,
इंग्रजि-मराठी.
वाद करावेत की करु नयेत
दर्जेदार-महाभिकार..
स्त्रीतारक-स्त्रीमारक
पुरुषतारक-पुरुषमारक
असलेले-नसलेले ..
खाजखुजली-खाजकुठली
यादी संपत नाही- यादी संपली
आधि बरेच लोक इथे येत, नुसते वाचत आनंद घेत निघुन जात. मायबोलीचे गुण गात.
पण पुर्वापार भारतियांचा एक मुलभूत गुणधर्म आहे तो म्हणजे भेद-भाव, उच्च-निचता , स्पृश्य-अस्पृश्य असे गट करणे. कोणी कंपूबाजिस तयार नसेल तर आपणच काही लोकांना हिन तर काहीनां चांगली वागणुक द्यावी आणि आपलं वरच्स्व सिद्ध कराव. मग काही लोक घाबरुन आपल्या गटात येतात तर काही चिडुन दुसर्या गटात जातात. मग काय...आपला गट झाला की जोरदार चिखलफेक चालू करावी. आपलं इस्पित साध्य.. साहीत्यिक अत्याचार आणि साहीत्यिक पुलिसींग असं काहीस... शेवटी पोलिस चांगले अस प्रत्येक पोलिसाला वाटतं. पण सगळेच पोलिस नाही होउ शकत त्याला बॅकअप लागतो, मग ज्याची पोलिसात भरती होत नाही ते आपसुक चोर होतात...
बरेच बुद्धू(!!!) लोक येथे,.. येतात इथले वाद, चिखलफेक, वयक्तीगत आकस, आत्मप्रौढी, कंपूबाजी , गटबाजी पाहुन निघुन जातात. पण काही हुश्शार... चातुर्याने एखाद्या गटात शामिल होउन लगेच निर्वाचीत होतात
काहींना ते नाही जमत ते वाळीत टाकले जातात, तर काही जण निकाराचा लढा देत निर्वाचीत होतात, काहीनां उबग येतो ते निर्वासित होतात. आजचा नविन उद्या नविन रहात नाही आणि वाद इथले संपत नाही.
रोज मायबोलीवर यायला काहीतरी कारण हव ना... आणि आपण रोज जेथे जातो तिथे आपली स्वतःची एक वेगळी ओळख हवी म्हणुन काहीतर करावं. सु नाही तर कु पण चालेल पण ओळख महत्वाची.
प्रत्येकाचा आनंद वेगळां कुणी सदासंतोषी तर कोणी विघ्नसंतोषी... कुणी आपली गाजवायला येतो, तर कुणी आत कुठतरी खरुज खाजतय म्हणुन खाजवायला येतो.
चार दिवस आपण दुसर्याला खरुज होई पर्यंत खाजवल की तो न रहावुन आपल्याला खाजवायला लागतो आणि इतरांनाही खाजवायला लागतो, असं करुन खाज महामारी पसरते, मुळचे खाजाळू खुश. खुजली खुजाओ बत्ती बुझाओ.. काही खाजेला घबरुन निघुन जातात, काहींना मुळात खाज असते (आमच्या सारखे) ते येत रहातात खाजवा खा़जवी बघायला, खाजवल्याने टीआरपी वाढतो रे आधी खाजवलेची पाहीजे...!!!! हा नवा मंत्र शिकतात.
खच खच.. खस खस... मग खसा खस मग...खाचा खाचा...
"ह्या बाफवर ही माझी शेवटची खाज..." १००दा खाजवुन चिघळु लागल की अस करावं म्हणजे दुसरीकडे खाजवायला मोकळे, असे नविन संकेत तयार करावेत म्हणजे समोरचा काही तरी सिद्ध करतो न करतोच तर त्याला ठेचल्याचा आघोरी आनंद मिळवावा . नविन कोणी आला की त्याला खाजवावे.
तर सर्व जुन्या, नव्या, प्रतिभाशाली आणि प्रतिभाखाली माबोकरांन्नो. तुम्हाला जर खजवा खाजवी जमत नसेल तर आम्हाला संपर्क साधा आम्ही खाजवाखाजवीच्या शिकवण्या चालू केल्या आहेत.
खाजवा खाजवी कार्यशाळा चालू केली आहे..त्यासाठी एका ड्यू आयडी घ्यावा उदा. खाजखुजली, खरुज, खुजवा, खाजाखाजी.. खज्जू, खाज्जूकाका, खाजवुका, खाजानजी, खाजवेन_हां, खाजेरी, खाजुल्या, ई.
येथे नविन स्माइली पण तयार केला जाईल :
:खाखका: -खाजवुन खरुज काढणे
:कखा: कचाकच खाजवतोय
:मखासू: मला खाज सुटलीय
:मखा: मला खाजवा
:खुखाबका: खुप खाजतय बरं का..
:मजुखाआ: मला जुनी खाज आहे
ई...
आता हे लिहायची मला खाज काय? तर इकडेतिकडे खाजवा खाजवी करण्या पेक्षा काय ते समोरासमोर खाजवुया ... ज्यांच्यांत खरिच धमक असेल त्यानी याव आणि खाजवाव इथे... :मजुखाआ:
पण हे ललित? हो ललितच आहे... नसेल तर तस सिद्ध करा...
सत्या...
सत्या... खिखिखि...
मी पण नवोदित - प्रस्थापित यावर काहीतरी लिहिणार होते.... पण तू मस्तच लिहिलय...... एकदम खुजखुजीत
मी माबोवर पहिल्यांदा आले तेव्हापासुन आजपर्यंत मला कधीही नवे- जुने जाणवले नाही.... काही लोकांनाच असे कसेकाय जाणवते कुणास ठाउक.... की पूर्वग्रह ठेवुन लोक इथे येतात कुणास ठाउक्....असो
माबोवर पूर्वी मिळायचा तसा निर्भेळ आनंद मात्र आजकाल मिळत नाही
सगळीकडे तेच एक दळण्....तुम्ही असे आम्ही तसे.... वैताग आहे.
-प्रिन्सेस...
"ह्या
"ह्या बाफवर ही माझी शेवटची खाज..." १००दा खाजवुन चिघळु लागल की अस करावं म्हणजे दुसरीकडे खाजवायला मोकळे, असे नविन संकेत तयार करावेत म्हणजे समोरचा काही तरी सिद्ध करतो न करतोच तर त्याला ठेचल्याचा आघोरी आनंद मिळवावा . नविन कोणी आला की त्याला खाजवावे.
येकदम पट्या !
<<मी माबोवर पहिल्यांदा आले तेव्हापासुन आजपर्यंत मला कधीही नवे- जुने जाणवले नाही.... काही लोकांनाच असे कसेकाय जाणवते कुणास ठाउक.... की पूर्वग्रह ठेवुन लोक इथे येतात कुणास ठाउक्....असो
माबोवर पूर्वी मिळायचा तसा निर्भेळ आनंद मात्र आजकाल मिळत नाही सगळीकडे तेच एक दळण्....तुम्ही असे आम्ही तसे.... वैताग आहे.>>
वा वा, नशीबवानच की तुम्ही !!
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
विशल्या
विशल्या एवढ्या सगळ्या खाजीत तुला हीच खाज पटली का रे?
-----------------------------------------
- सक्षम दळवी
काय करणार
काय करणार बाबा, आम्ही पडलो खाजवादी , माजवादी नाय काय !!
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
सत्या- हो
सत्या- हो ललितच आहे हे ! काही शंका नको!
:मजुखाआ: >> --१ वर्ष झाले !
प्रकाश
-------------------------------------------------------
Learn Guitar Online @ www.justinguitar.com
माबोवर
माबोवर पूर्वी मिळायचा तसा निर्भेळ आनंद मात्र आजकाल मिळत नाही
>>>
१६ आना सच...
_______
धूम मचाले...!!!
या सगळ्या
या सगळ्या प्रकारच्या खाजांवर काही जालिम उपाय आहे का, सांगा कुणी तरी. पुन्हा कुठलीच खाज उपटली नाही पाहिजे. सगळ्यांची कांती नितळ झाली पाहिजे
अँकी, मी कालपासून हेच सांगायचा प्रयत्न करतेय रे !
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
एकदम सही
एकदम सही <<<खाजवल्याने टीआरपी वाढतो रे आधी खाजवलेची पाहीजे...!!!! हा नवा मंत्र शिकतात.>>>
भारीच, सत्यजित ह्यावर एखादी कविता पण ?
विशाल - <<<काय करणार बाबा, आम्ही पडलो खाजवादी , माजवादी नाय काय !!>>> एकदम भन्नाट
एकदम सही
एकदम सही <<<खाजवल्याने टीआरपी वाढतो रे आधी खाजवलेची पाहीजे...!!!! हा नवा मंत्र शिकतात.>>>
भारीच, सत्यजित ह्यावर एखादी कविता पण ?
ग्रेट, सत्या खरेच येवुदे एक कविता, हे तुच करु शकतोस !
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
ड्यू आयडी
ड्यू आयडी घ्यावा उदा. खाजखुजली, खरुज, खुजवा, खाजाखाजी.. खज्जू, खाज्जूकाका, खाजवुका, खाजानजी, खाजवेन_हां, खाजेरी, खाजुल्या, ई.>>>>>>>>>>>>>

-प्रिन्सेस...
माबोवर
माबोवर पूर्वी मिळायचा तसा निर्भेळ आनंद मात्र आजकाल मिळत नाही
>> खरं आहे पण त्यात नविन मायबोलीकरांचा दोश नक्कीच नाही. आधी सगळ्यांना एकत्र घेउन जाण्याची एक वृत्ती होती, कोणी चुकलच तर एक टपली मारली जायची, पण आजकाल जोरदार चमाट मारली जाते, झोडपला जात. आधीही झोडपल जायच पण कुणाला रक्तबंबाळ केलं गेल नाही.
आधी दर्जा नावाचा जर्दा अती चघळला नाही जायचा. सगळं कसं हलकं फुलक घेतल जायच, अन्नुलेख, तिखट प्रतिक्रिया, जळजळित अंजन आशा आयुधांचा तेंव्हा शोध लागला नव्हता.कुणी फारचं चुकला तर कुजबुजीवर चिमटे काढले जायचे.किस पाडुन पाडुन भुगा केला जायचा पण एक घाव दोन तुकडे कधी केले जायचे नाहीत. नविन येणारा प्रत्येक जण अलिखित संकेत पाळायचा, संकेत नाहीच कळले तर ते समजुन घ्यायचा. टींगल टवाळी तेंव्हाही होती, नविन लोकांना छळायच काम तेंव्हाही होत होतं. पण त्याना लवकरच आपलसं केल जायच, जस नविन येणार्या सुने कडुन काही चुकलं आणि ओरड पडली तरी कुणाचा ना कुणाचा मायेचा हात पाठीवरुन फिरला जायचा, हळुवार समज दिली जायची. स्वागत समिती आणि जुनी मंडळी पुष्पगुच्च्छ देउन स्वागत करायची आणि नवेपण नकळत विरघळुन जायचं. खरं सांगायच तर जुनी मायबोली हा एक वाडा कींवा एक वाचाळ चाळ होती सगळं कस मोकळ ढाकळं होत. आता मायबोलीत वेगळे वेगळे फ्लॅट तयार झाले प्रत्येकाला स्वतंत्र जागा मिळाली आणि आपल्या जागे भोवती कुंपण घातली जाउ लागली. वरच्या मजल्यावाले खालच्या मजल्यावाल्याशी भांडू लगले.. "ओ पाणी जरा बंद ठेवा तुमच्या मुळे आमच्या ईथे पाणी येत नाही आहे." आधी सार्वजनिक नळावर होणारे वाद आता दोन मजल्यांमध्ये होउ लागले आणि फुटीच राजकारणा चालू झालं. दोन मजल्यांचे वाद आता गच्चीवर होउ लागले, पटांगणात होउ लागले, मग बाकीच्यांना कोण कोणाशी का भांडतो आहे हे न कळुन नविनच भाडंण जन्म घेउ लागलं.
जुन्या मायबोलीकरांना हा गोधळ न उमगल्याने, त्यानी ह्या साठी नविन मायबोलीकरांना दोषी ठरवायला सुरवात केली. आणि नविन लोकांना वाटु लागल की भांडण हीच इथली प्रथा आहे आणि कंपुबाजी हा इथला धर्म. मग काय..प्रत्येकानी आपला धर्म स्विकारला आणि रोज नवि धर्म युद्ध होउ लागली. कथांनी कविंतावर, कविंतांनी विडंबनावर, विडंबनांनी चित्रकारांवर तोफ डागण्यात सुरवात केली आणि नविन गट तयार झाले. "आपला तो बाळं" ह्या नियमाने कंपुबाजी फोफावली आणि मायबोलीच्या डेरेदार वृक्षाला कडु फळं धरू लागली. कंपूबाजी मध्ये बाब्यालापण बाळ्या म्हंटल जाउ लागलं आणि सगळ्या बाब्यांना हे नंदनवन वाटु लागल. काही बाब्यांनी तर फारच गैरसमज करुन घेतला, त्यांना इथे मी म्हणजेच बाळ्या आहे असं वाटु लागल आणि बाब्यांनी बाळंस धरलं. ह्या सगळ्या गदारोळात आपण इथल्या किती बाळांन मुकलो हे कळल सुद्धा नाही. इथे आनंदानी बागडणारी कितीतरी बाळं कधी बागडेनाशी झाली हे आपल्याला समजल सुद्धा नाही, आजही काही बागडणार्या बाळांना साद्य परिस्थितीला कारणीभुत धरुन हेटाळलं जातयं फुटीच राजकारण खेळल जातय.
बरेच दिवसानी परतलेली बाळं त्यांची जुनी चाळ जाउन आलेले नविन फ्लॅटस पाहुन गोंधळात पडतात. जुन्या मित्रांना भेटण्या साठी जुना कट्टा शोधु पहातात, पण "छे... ही ती जागा नाहिच ज्या साठी मी परत आलो" असं म्हणत परत जात आसावित. पण काही मात्र काही ओळखीच्या आवजाचा वेध घेत आत शिरत असतिल आणि ह्या नविन वातावरणातिल घुसमट सहन न होउन पुन्हा अनोळखी गावाला निघुन जात असतिल.
इथली ओढ मोठी, ती सगळी पुन्हा येतिल, येत रहातिल, आपलेपण जुन शोधत रहातिल नविन मित्र करतिल नविन नाती बनतिल. आपलेपण जपावं लगत नाही आपलेपण मुरावं लागतं. ते पुन्हा येतिल कारण एकदा मुरलेलं कधी सरत नाही.
मायबोलीच्या ह्या मोरावळ्याचा स्वाद नवे आवळे पण कितीपटीने वाढवता आहेत अजुनही वाढवतिल आणि जुन्यां आवळ्यां सोबत साटलोट करत मुरतिलही पण तोवतच जोवर इथला आपलेपणाचा पाक अबाधित आहे..
कोण चुकतय हे शोधणं हीच आपली मोठी घोडचुक आहे, मायबोलीही माझी नाही. आपली आहे..!!!!
करायची का
करायची का पुन्हा नव्याने सुरुवात ?... आधीच्या पाट्या कोर्या करुन.
... खरंच खुप आवश्यकता आहे त्याची. नाहीतर एक चांगला प्लॅटफॉर्मही बघता बघता हातातुन निसटुन जायचा....
हो हो. चला
हो हो. चला सगळी जळमटं, कचरा साफ करायला घेवूया
संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान.
************
अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग
सत्यजीत
सत्यजीत अगदी मनातले लिहिलसं....
आधी दर्जा
आधी दर्जा नावाचा जर्दा अती चघळला नाही जायचा.
>>>
हे विधान बिनबुडाचे वाटले. पुढची जवळपास सर्व पोस्ट ह्या विधानापासून सुरु होत असल्याने ती देखील हवेतली वाटली.
एक सांगा,
एक सांगा, नवोदितांना चुका दाखवल्यात तर राग का येतो? चुका दुरुस्त करेन म्हणायचे आणि पुढे चालायचे...हे जास्त सोपे नाही का?
बरे नवोदित म्हणवुन घेणारे, त्यांच्यापेक्षा नंतर आलेल्यांना कशी वागणुक देताय????
प्राध्यापक साहेबांच्या कवितांवरचे अभिप्राय वाचले तर "सो कॉल्ड" नवोदित लोक तिथे मात्र त्यांच्या चुकांना, कल्पनांना, कवितेला खदाखदा हसत असतात, ते चालते का? की आपल्यापेक्षा नव्याने येणार्यांना छळायचे हाच पायंडा पडतोय इथे?
ह्या सगळ्या गदारोळात आपण इथल्या किती बाळांन मुकलो हे कळल सुद्धा नाही.>>>>>>>>>> १०० % अनुमोदन.
इथली ओढ मोठी, ती सगळी पुन्हा येतिल, येत रहातिल, आपलेपण शोधत रहातिल.>>>>>> आमेन !!!
-प्रिन्सेस...
>>>>> आधी
>>>>> आधी दर्जा नावाचा जर्दा अती चघळला नाही जायचा.
>>> हे विधान बिनबुडाचे वाटले
नाही रे भो टण्या,
ते वाक्य अस लिहायच असेल त्याला
आधी दर्जा नावाचा जर्दा अती चघळून "गिळला" नाही जायचा!
(जर्दा गिळला की वान्त्या होतात हे माहितच असेल सर्वान्ना)
तर
अशी सुधारणा करुन बघा बर काही सन्गती लागते का?
...;
आपला, लिम्बुटिम्बु
राजकुमारी
राजकुमारीजींना नवोदितांचं चांगलंच अजीर्ण झालेलं दिसतय. बरोबर आहे म्हणा !!
बरं प्राध्यापकांच्या कुठल्याही कवितेवरच्या नवोदितांच्या आणि जुन्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बघा एकदा नीट. फरक तिथेच लक्षात येइल.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
(जर्दा
(जर्दा गिळला की वान्त्या होतात हे माहितच असेल सर्वान्ना) >> खरय तुझ माला जस्त अनुभव नाही... एकदा खाल्ला होता अख्ख जग फिरलं होत
मी इथे तसा
मी इथे तसा नवीनच आहे. पण तरी गेल्या महिन्याभरात जे जाणवलं ते लिहितोय.
१. अत्यंत सुमार दर्जाचं साहित्य प्रकाशित करून त्याला सर्वांनी चांगलं म्हणावं असा आग्रह धरला जातो. प्रोफेसरांची शेवटची एखादी कविता सोडल्यास त्यांचं इतर सर्व साहित्य याच सदराखाली मोडतं.
२. अत्यंत अशुद्ध लेखन करून वर चुका दाखवल्या (अगदी मेल आय्.डी. वर जाऊनसुद्धा) तरी त्या दुरुस्त करण्याची तसदी न घेणे.
३. कंपूबाजी.
४. नवीन लिहिणार्यांना सांभाळून न घेणे.
५. नवीन लिहिणार्यांना प्रोत्साहन न देणे.
६. एखाद्याच्या पाठीमागे हात धुवून लागणे. (उदा. मीनाबाई आणि प्रोफेसर)
वरच्या १ व २ या चुका नवोदितांकडून होतात तर ३ ते ६ या जुन्या सभासदांकडून होतात. कुणी कुणाला काय बोलायचं? सगळेच 'शिकलेले' आहेत. (शिकलेले म्हणण्यापेक्षा 'पोचलेले' म्हणायला पाहिजे)
विनम्र
शरद
.............................
"तुजसारखे कवी जे येतात रोज 'खावर'
बसतात गप्प सारे कोलाहलात इथल्या!"
............................
अरे काय
अरे काय करणार भो! मागल्या रविवारी जीटीजीला गेलेलो! च्यामारी साडेआठ ते बारा, तब्बल साडेतीन तास सलग मला पुडी लावता आली नाही!


तरी वैशालिच्या गच्चीवर देखिल भिन्तीकडेला झाड लावुन "मातीची" सोय केलि आहे! पण माझ धाडस झाल नाही हेच खर!
असो
विषयान्तर नको!
...;
आपला, लिम्बुटिम्बु
शरद,
शरद,
अनुमोदन...
३. कंपूबाजी.>>>>>>>>> याचा मात्र अनुभव नाही.
-प्रिन्सेस...
कुणी
कुणी कुणाला काय बोलायचं? >> कोण बरोबर कोण चुक हा वादच नको... असं माझ मत आहे... प्रतिक्रिया या प्रतिक्रिया राहु देत... चिखलफेक नको.
<<कंपूबाजी.>>
<<कंपूबाजी.>>>>>>>>> याचा मात्र अनुभव नाही. >>
आश्चर्यजनक ........
अज्ञातांच्या, कौतुकच्या कवितेवर तुटुन पडलेले कंपु बघितले नाहीत की सोयिस्कर दुर्लक्ष करताय.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
कुणी फारचं
कुणी फारचं चुकला तर कुजबुजीवर चिमटे काढले जायचे. << हे वाक्य कुजबुज नामक अनियतकालिका संदर्भात वापरले असेल तर माझा आक्षेप आहे या विधानाला. हे अनियतकालिक केवळ खिल्ली उडवण्या साठी, चिमटे काढण्या साठी लिहिले गेले आहे, कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे कुजबुज ठरवत नाही.
बाकी या सर्व विषयावर चर्चा वाद आणि भांडणे दर काही वर्षांनी होतच असतात, (उत्सुकता असल्यास जुन्या हितगुज मधील views and comments मधे मायबोली नावाचे फोल्डर बघा. विषय, मुद्दे सगळे तेच फक्त दर वेळा आयडी वेगळे दिसतील)
(अर्थात काय लिहायचे काय नाही हा तुझा प्रश्न आहे.)
सत्या हे सगळे वाद या आधी सुद्धा केले/बघितले असुन पुन्हा तुला यावर लिहावेसे वाटले याचे मला आश्चर्य वाटले.
------------------------------------
"आजकाल हितगुज पुर्वी सारखे राहिले नाही"
असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हितगुजवर "जुने" झालात असे समजा.
चुका
चुका काढण्याबद्दल काही नाही हो, पण मनाला लागतील असे शब्द थोडे आवरते घ्यायला हवेत ना? आणि सर्वांना समान वागणूक हवी. आपल्या कंपुतल्या लोकांना फक्त चुचकारायचं आणि नवोदितांना किंवा बाहेरच्यांना मात्रं घालून पाडून बोलायचं हा कुठला न्याय?
दक्स, अगं
दक्स, अगं इथे कंपुबाजी नाहीच आहे मुळी, आपल्याला उगीचच तसं वाटतय.
____________________________________________
http://maagevalunpahataana.blogspot.com
कुणी फारचं
कुणी फारचं चुकला तर कुजबुजीवर चिमटे काढले जायचे. << हे वाक्य कुजबुज नामक अनियतकालिका संदर्भात वापरले असेल तर माझा आक्षेप आहे या विधानाला. हे अनियतकालिक केवळ खिल्ली उडवण्या साठी, चिमटे काढण्या साठी लिहिले गेले आहे, कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे कुजबुज ठरवत नाही. >> हवे मले शानपना शिकवु नको, तुला येवढ वाटतय तर होउन जाउ दे नवी कुजबुज
कोण चूक आहे आणि कोण बरोबर आहे हे कुजबुज ठरवत नाही.>> मी कुठे म्हटलं की कुजबुज ते ठरवत म्हणुन मी फक्त चिमट्यांबद्दल बोलतोय.
(उत्सुकता असल्यास जुन्या हितगुज मधील views and comments मधे मायबोली नावाचे फोल्डर बघा. >> हेच तर आधी views and comments इथे वाद होता आता सगळीकडेच होतायत एकजात.
सत्या हे सगळे वाद या आधी सुद्धा केले/बघितले असुन पुन्हा तुला यावर लिहावेसे वाटले याचे मला आश्चर्य वाटले. >> :मजुखाआ: हा स्माईली नाही बघितलास का?
नविन पेक्षा जुनेच वाद बरे...आपली जुनी मज्जा... 
सत्या, तु
सत्या, तु इतकं लिहूनही या लेखाचा अनुल्लेख झालाच की, अजून कुठं इथे ते 'ग्रेट' लोक फिरकलेत?
म्हणजे आम्हाला खरंतर निर्व्याज मैत्रीची इच्छा आहे म्हणून आम्ही इथे येऊन निदान मनातलं बोलतोय तरी.. इथे न आलेल्यांना जे सध्या सुरू आहे तेच हवंय असा सोयिस्कर अर्थ काढुयात का आता?
विशाल
विशाल कुलकर्णी, प्रो सतिश चौधरींच्या ज्या ज्या कविता ज्यांना ज्यांना चांगल्या वाटल्या त्यांनी त्यांनी तिथे प्रतिसाद दिलेला आहे. त्यात जुने,नवे अनेक आयडी दिसतील.. त्याच आयडींमधील काहिंनी अज्ञातांच्या कवितांवर प्रतिकूल प्रतिसाद दिले आहेत. आता एखाद्या माणासाची प्रत्येक साहित्यकृती ही एखाद्याला आवडत नसेल व प्रत्येक साहित्यकृतीवर प्रतिकूल प्रतिसाद दिले तर ते आक्षेपार्ह कसे ठरते? आपल्याच कवितांवर प्रतिकूल प्रतिसाद देणारे आपल्या ललित-गद्य लेख-कथांवर अनुकूल प्रतिसाद देखील देतात. त्याचे काय? तिथे ते कंपुबाज नाहीत पण तुमच्या इतर कलाकृतींवर अथवा तुम्ही ज्यांना चांगले म्हणता त्यांच्या कलाकृतींवर जर हेच लोक चांगले नाही असा प्रतिसाद देतात किंवा प्रतिसाद देत नाहीत, तर ते कंपूबाज कसे ठरतात?
>> चुका काढण्याबद्दल काही नाही हो, पण मनाला लागतील असे शब्द थोडे आवरते घ्यायला हवेत ना? >>> दक्षिणा, मला तुमच्या विरुद्ध पोस्टलेल्या पोस्ट्स आठवतात, ज्या माझ्या मते टार्गेट करणार्या होत्या. मी तिथे तसे लिहिल्याचे देखील आठवते. पण त्या पोस्ट्स पोस्टायचा अधिकार त्या लोकांचा होता हे नाकारता येणार नाही कारण त्या सर्व पोस्ट्स ह्या तुमच्या पोस्ट्सना अनुसरुनच होत्या. राहिला 'प्रश्न मनाला लागतील असे शब्द' वापरण्याचा. मुळात ही गोष्ट तौलनिक आहे. तुमच्या मनाला जे लागते ते दुसर्या एखाद्याला तसे वाटणार नाही.
हहने लिहिल्याप्रमाणे असे वाद नेहेमीच होत आले आहेत. आणि व्ही एन सी वर अधिक बोचर्या शब्दात, एकमेकांच्या श्रद्धास्थानांना उद्देशून, बुद्धीची लायकी काढून देखील वाद झालेले आहेत. तुम्हाला जर सार्वजनिक संकेतस्थळांवर वावरायचे असेल तर ते 'सार्वजनिक' आहे हे सत्य नाकारुन चालणार नाही.
Pages