कर

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

कर कापलेला, कर वाचलेला
कर दिलेला, कर मारलेला

कर कर म्हणून
काहीच करू नाही दिलं
काहीच न केलेल्या कामाचं
करदायीत्व मात्र कपाळी आलं

कर भरणे ही देशाची सेवा
करामुळे होते देशाची प्रगती
या नसत्या लफड्यापायी
बँकबॅलन्स्ची मात्र होते अधोगती

कर भरावा की न भरावा
नुसत्याच होतात गरम चर्चा
कळत नकळत पेस्लिप मधून
कर होतो मुद्दलातच वजा

म्हणून म्हणतो हे गड्यांनो
कर देणे प्राप्त आहे
आघाडी असो किंवा युती असो
आपल्या करावर त्यांचा डोळा आहे

करकरीत! Proud
----------------------
इतनी शक्ती हमे दे ना दाता मन का विश्वास कमजोर हो ना..

अरेरे! यावर्षी चांगलाच फटका बसलेला दिसतोय तुला.. Proud
असू दे असूदे, तुझ्या दु:खात सहभागी आहे मी...

समदु:खी कुणी पाहीलं कि जरा बरं वाटते ! Biggrin !

आघाडी असो किंवा युती असो
आपल्या करावर त्यांचा डोळा आहे>>>हे मात्र १०१% बरोबर !

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

धन्यवाद मंडळी .......... Happy

विनय : अगदी बरोबर. इतकं दु्:ख पचवायला बुधवारच पाहिजे ना ......... Happy

प्रकाश : म्हणजे तुम्ही पण आमच्यातलेच का ???????? Happy

दक्षिणा : हो. फटका व्यवस्थित बसला आहे ....... Happy

~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे

अरुणराव, मेलवर दोन्ही करांनी केलेली सुचना ऐकुन प्रतिसाद द्यायला आलो. Happy छान आहे कविता. (कोण ते तुम्ही बघा हं)

कराग्रे वसते लक्ष्मी हेच खरे अरुणराव..

कर वाचवण्यासाठी करावर 'कर'डी नजर ठेवावी लागेल. करबचतीसाठी 'कर'बचत. नुसती करकर करू नये.
............................................................................................
"मैं क्यों उसको फोन करूं?
उसके भी तो इल्म में होगा; कल शब, मौसमकी पहली बारिश थी!" 'परवीन शाकर'
..........................................................................................

व्वा ! छान केली की कविता अरुण्राव !

-----------------------------------------
कविता कर ले रे , कविता कर ले रे .... Proud

काय अ. आ. कर कर लावलीये.
चालायचंच . एकंदरीत आयुष्यात दु:खंच फार बघा.
~~~~~~~~~

अरे अरुण थोडाफार कर वाचवता येतो काहि इन्वेस्ट्मेन्ट वैगरे करुन हे तुला माहित नाहि का? तुला कोणि एलआयसि एजंट भेटला नाहि का?

अरे अरुण थोडाफार कर वाचवता येतो काहि इन्वेस्ट्मेन्ट वैगरे करुन हे तुला माहित नाहि का? तुला कोणि एलआयसि एजंट भेटला नाहि का?
>>>> अरुण, तुला एवढंही माहीत नाहीये? अरेरे अरेरे Rofl
-----------------------------------
Its all in your mind!

अरुण, तुला एवढंही माहीत नाहीये? > Rofl
-----------------------------------------
कविता कर ले रे , कविता कर ले रे .... Proud

ह्याला म्हणतात करायला गेला गणपती.....अन झाला मारुती !

Rofl

-प्रकाश
-------------------------------------------------------
दीवाना हुआ बादल !

तुला कोणि एलआयसि एजंट भेटला नाहि का? >>>>>>>>> शीतल : आमच्या एका आज्जींचे आजोबा आहेत ना, तेच येतात आमच्या मदतीला या साठी ................ Happy

वैनी : लगेच काही इतकं हसायला नकोय ................ Lol

दिपुभाव : यू टू ????????? Happy

कराग्रे वसते लक्ष्मी हेच खरे अरुणराव >>>>>>> शास्त्रीबुवा : असं म्हणू नका. केप्या लगेच विचारत येईल की या लक्ष्मीबाई कोण म्हणून ............... Happy

मीन्वाज्जी : खरय हो. एकूणातच दु:ख भरपूर आहेत. काय "कर"णार ???????? Happy
~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे

Rofl
मनोरंजक प्रतिसाद! दुसरे काय? Proud
-----------------------------------------------
स्वतःचा असतो तो स्वाभिमान ,दुसर्‍याचा तो माज! Proud

पूनम Lol

अरुणराव, प्रकाशने काय म्हणले बघा तुमच्या कवितेला. Proud

शास्त्रीबुवा : असं म्हणू नका. केप्या लगेच विचारत येईल की या लक्ष्मीबाई कोण म्हणून ...............
>>>
तरी बरं मी करमध्ये सरस्वती लिहिलं नाही ते.. (करमुले तू गोविंदम् लिहिलं असतं तर केप्या काय विचारत आला असता Proud )

टण्या :d निदान तू तरी लिहिताना 'करमूले' लिही.

प्रकाशने काय म्हणले बघा तुमच्या कवितेला. >>>>>>> वैनी: म्हणजे निदान मारुती तरी जमला ना??????? लई झालं बगा .............. Happy

~~~~~~~~~~~~~~
काटा रुते कुणाला, आक्रंदतात कोणी
मज फुलही रुतावे, हा दैवयोग आहे