जंजिरा - दर्या दरवाजा

Submitted by डेविल on 3 October, 2011 - 06:15

जंजिरा. नाव ऐकल्याबरोबर कान उभे राहतात. एकाचवेळी कुतूहल आणि राग यांचे मिश्रण होते. ३५० वर्ष अजिंक्य किल्ला यासाठी कुतूहल आणि सिद्दीने केलेले अत्याचार, मराठ्याना न जिंकता आल्याचा राग.
मराठयानी महाराष्ट्रावर, भारतावर सत्ता गाजवली. जमीन आणि सागरावर नियंत्रण मिळवले, पण जंजिराने कायमच मराठ्याना हुलकावणी दिली. २ वेळा(?) तर पूर्ण विजय नजरेत होता, पण नाही जिंकता आला. अशा किल्ल्याला मागच्या विकंताला भेट दिली.

ऑफिसच्या १२ नमुन्याबरोबर + मी १३ वा. अलीबागला पिकनिकसाथी जायला निघालो होतो. २ दिवस एकाच जागी राहून काय करायचे म्हणून जंजिरा भेट आणि सायंकाली काशिद बिचला भेट द्यायचे ठरवले होते. या अगोदर १ अपूर्ण आणि २ पूर्ण जंजिरा स्वार्या झालेल्या होत्या. ऑफिसमधील २/३ सोडले तर कोणीच जंजिरा बघितला नव्हता. बोट मधून किल्ल्यावर जाताना नेहमीप्रमाने बोटवाल्याने स्वताची जाहिरात सुरु केलि. गाइड नसेल तर किल्ला नित बघता येणार नाही. ४५ मिनिटमधे परत यावे लागेल. बाकि सर्वजन गाइड करायच्या मताचे होते म्हणून त्यांच्यासाठी गाइड केला. पण मला निराळेच वेध लागले होते. आतापर्यंत गाइड दाखवतात तेवढाच जंजिरा बघितला होता. यावेळी मला तटावरुन फेरी मारायची होती, तसेच जंजिराचा समुद्राच्या बाजुचा दर्या दरवाजा बघायचा होता.

100_1707.jpg100_1711.jpg100_1714.jpg

त्यामुळे गाइडला पैसे द्यायच्या अगोदर त्याच्याकडून दर्या दरावाज्याचा रस्ता नक्की करून घेतला आणि एकटाच पुढे निघालो. तेवढ्यात मागुन एक सहकार्याचा आवाज आला. गाइडच्या शेरोशायरिला कंटाळून तोपण माझ्याबरोबर यायला निघालो. जायच्या आधीच कल्पना दिली कि बाबारे! जायचा रस्ता मलापण नीट माहिती नाही आणि झाडी पण बरीच असेल तरीपण तयार झाला.

100_1726.jpg100_1749.jpg

या मागील बाजूला बर्याच तोफा पडलेल्या दिसतात.

समोरील मुख्य दरवाजा बुरुजांच्या आड लपवलेला आहे. तर हा मागील दर्या दरवाजा पूर्ण मोकळा आहे. सह्याद्रीच्या किल्ल्यामध्ये जशी तटबंदीमध्ये एखादी चोरवाट असते तसाच हा आहे. फरक एवढाच कि हि चोरवाट नसून भव्य दरवाजा आहे. असा मोकळा / कोणत्याही संरक्षण शिवाय ठेवण्याचे प्रयोजन माहिती नाही.

100_1733.jpg
दर्या दरवाजा

100_1734.jpg
धक्क्यावरील तोफ आणि मागे लांबवर पद्मदुर्ग.

100_1740.jpg100_1743.jpg100_1746.jpg100_1749_0.jpg100_1750.jpg100_1752.jpg

वाटेमधील प्रत्येक बुरुजांवर कित्येक तोफा पडलेल्या आढळल्या.

100_1753.jpg100_1756.jpg100_1757.jpg100_1759.jpg100_1760.jpg100_1761.jpg100_1766.jpg100_1767.jpg100_1769.jpg100_1770.jpg
दमलो! एवढ्या धावत-पळत फेरी मारून.

प्रदक्षिणा दरवाज्याजवळ येऊन संपली. आता बाकीच्या मित्रांची वाट बघत बसलो. ५ मिनिटामध्ये तेपण आले, त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळले कि शायरीचा ओवेरडोस झाला आहे.

100_1782.jpg100_1845.jpg100_1848.jpg

हा महाराज्यांचा पद्मदुर्ग.

किल्ल्या फिरून झाल्यावर मुरुड ला मासळी खरेदीच्या नादामध्ये मुरूडच्या पाटील खानावळीमध्ये जेवायचं बेत रद्द करावा लागला.

विशेष टीप: सध्या या भागातले रस्ते एवढे उखडले आहेत कि अंदाजे वेळेमध्ये २ तास अधिक धरून चला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अनोखी माहिती.
प्रकाशचित्रांबद्दल मदतपुस्तिकेत व्यवस्थित माहिती आहे.

जॉनी, वेताळ, रैना >> धन्यवाद.
सारन्ग >> मायबोली कराकडुन प्रेरणा घेतली आहे.

सुपर्ब!!! Happy

अनोखी माहिती.>>>अगदी अगदी Happy

शेवटुन दुसरा फोटो ख ल्ला स!!!!

डेव्हील - मस्तच रे....दर्या दरवाजा पाहायचा योग आणलास...आम्ही पण गाईडबरोबर फिरलो त्यामुळे तुमच्या मित्रांसारखेच झाले...

ऱोमा, जिप्सी , यो >> धन्युवाद Happy

आशु >> गाईडची शायरी आणि शिट्टी थोड्यावेळाने डोक्यात जाते. तसेच सान्गितलेली अर्धि माहीति.

डेविल,
मस्तच सफर आणी प्रचि... जंजिर्‍याचे पावसाळ्यातले फोटो पहिल्यांदाच बघीतले..शेवटचे २ प्रचि तर खासच...

बोट मधून किल्ल्यावर जाताना नेहमीप्रमाने बोटवाल्याने स्वताची जाहिरात सुरु केलि. गाइड नसेल तर किल्ला नित बघता येणार नाही. ४५ मिनिटमधे परत यावे लागेल.>>>>> हे तर मला बिझिनेस गिमिक्स वाटते, जास्तीत जास्त फेर्‍या करण्यासाठी...मी स्वतः जंजिरा दोन वेळा केलाय आणी दोन्ही वेळा जाताना वेगळ्या होडीतून गेलो आणी येताना वेगळ्या होडीतून आलोय...सगळा जंजिरा भटकुन झाल्यावर सगळ्या बुरुजावरून फिरून परत येताना समोर दिसल्या त्या होडीतून किनार्‍यावर आलोय Happy
गाईडचेही तसेच.. घोकवलेली माहीती फक्त सांगतात त्यात किल्ल्याचा २५ % पण इतिहास येत नाही...त्यापेक्षा पुस्तकांमध्ये बराच आणी सत्य इतिहास आहे...अर्थात हे माझे वैयक्तिक मत.

तिथले गाईड शिवाजी महराजांना हा किल्ला जिंकता आला नाही हे आवर्जून सांगतात... अजूनही तो शिवाजी महाराजांच्या ताब्यात नाहिच.. भगवा दिसत नाही.. Sad ... तिथे जाऊन मला एकदा घोषणा द्यायची आहे...

स्वछंदी >>>>>>>>> तुमच्या वैयक्तिक मताशी एकदम सहमत
आनंद >>>>>>>>>> कधी जायचं सांग घोषणा द्यायला
अजून एक माहिती ............ जंजिरा हा एकमेव किल्ला आहे जिथून आपण शिवजयंतीला ज्योत घेऊन येऊ शकत नाही .... ज्योत बाहेर पेटवून आणावी लागते इतर गडा सारखी आणता येत नाही

जंजिरा हा एकमेव किल्ला आहे जिथून आपण शिवजयंतीला ज्योत घेऊन येऊ शकत नाही .... ज्योत बाहेर पेटवून आणावी लागते इतर गडा सारखी आणता येत नाही

कळले नाही...थोडे तपशिलात सांगणार का???

डेविल, व्व्वा! १ नं. फोटोझ!!! शेवटचे २ फोटो म्हणजे झळाळ..!! क्या बात है! एका सूर्यानेच निर्मिलेल्या पद्मदुर्गावर असलेला सूर्य व सुवर्णझळाळी अप्रतिम टिपलेय...
माझ्या पद्मदुर्गाच्या धाग्यात शेवटचा फोटो समुद्रातून टिपलेल्या दर्या दरवाजाचा आहे.
http://www.maayboli.com/node/26001

जंजिरा हा एकमेव किल्ला आहे जिथून आपण शिवजयंतीला ज्योत घेऊन येऊ शकत नाही .... ज्योत बाहेर पेटवून आणावी लागते इतर गडा सारखी आणता येत नाही >>>>>>
आशु दा अरे जसे आम्ही दरवेळेस शिवजयंतीला वेगवेगळ्या किल्ल्यांवरून ज्योत घेऊन यायचो ,, साधारण रायगड , राजगड , प्रतापगड इत्यादी किल्ल्यांवर गडावरील मंदिरात पुजारी अथवा आम्ही स्वतः ज्योत पेटवून घ्यायचो पण जंजिर्या वरून ज्योत आणताना गडावरून ज्योत पेटवून घेऊन येता येत नाही अस तिथल्या लोकांनी सांगितलं ,,, आम्ही ज्यावेळी ज्योत आणली त्यावेळी आम्हाला बाहेरूनच पेटवून आणावी लागली.

एका सूर्यानेच निर्मिलेल्या पद्मदुर्गावर असलेला सूर्य व सुवर्णझळाळी अप्रतिम टिपलेय...>>>> खरचं
सुरेख आहे. Happy

मी स्वतः जंजिरा दोन वेळा केलाय आणी दोन्ही वेळा जाताना वेगळ्या होडीतून गेलो आणी येताना वेगळ्या होडीतून आलोय...सगळा जंजिरा भटकुन झाल्यावर सगळ्या बुरुजावरून फिरून परत येताना समोर दिसल्या त्या होडीतून किनार्‍यावर आलोय >> स्वच्छंदी, चांगली कल्पना आहे. पुढच्या वेळेला मीपण असेच करेन.

आनंद >>>>>>>>>> कधी जायचं सांग घोषणा द्यायला + १

हेम >> आपल्या लेखातले फोटो बघूनच हा दरवाजा नीट बघायचे नक्की केले.

सारन्ग >> आपला उपक्रम अतिशय चांगला आहे.

शेखर, इंद्रा, गणेश, ईनमीन तीन >> धन्यवाद.