तूझं झिंगणं

Submitted by वर्षा_म on 5 October, 2011 - 01:01

स्वतःची क्षमा मागुन Proud
http://www.maayboli.com/node/29417

=================================

आपलं भांडण मिटवायला
तू आलास....कालचं!

अगदी काल आणि परवा,
ज्यावरचे विचार मी
मनातुन काढुन दिले,
तेच पुन्हा पांघरून...

पटकन तोंड दाबुन
उभा झालास पाठमोरा,
पण दारुचा उग्र वास,
आजही आलाच... तुझ्या तोंडातून
भपकन....

तू उभा असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....

मनातून उमटलीच 'तिव्र ईच्छा"
सनकण वाजवण्याची,
पेशन्सने दाबली तिला.....

आजही मी चिडले होते...
आणि;
न वाजवण्याच कारण मात्र

आकलनीयच! ( कोलमडतोयस तू.. साधं उभही रहाता येत नाहीये तुला )

गुलमोहर: 

हे घ्या

"तूझं थिंकणं"

माझी कविता मागायला
तू आलीस....कालची!

अगदी काल आणि परवा,
तूझी विडंबन मी
दुर्लक्षली होती,
तरी पुन्हा वैतागुन...

पटकन डोळे वटारुन
उभी झाले समोर,
पण तुझ्या चेहर्‍यावरचे भाव
आजही तेच... डोळ्यांच्या कडांमधुन
मिश्कीलपणा सांडत....

तू उभी असल्याची जाणीव
होत राहिली कितीतरी वेळ....

मनातून उमटलीच 'क्षीण विनंती'
नवी कविता देण्याची,
बेदरकारपणे पुसलं तिला.....

आज मी वाचले होते...
आणि;
न देण्याचं कारण मात्र

आकलनीयच! ( मला नकोय विडंबन.. माझ्या सुंदर कवितेचे)

कम्मालीचं आहे - इन्स्टंट "थिंकणं".......प्रकाश वेगालाही मागे टाकणारं - अगदी - "वर्षा"वंच की.......
अजून काही राह्यलं असल्यास येउ द्या....लगेच.

व्वा..... हे तर आणखीच छान

म्हणजे कवितेवर विडंबन, त्या विडंबनावर विडंबन,
आणि विडंबनाच्या विडंबनावर आणखी विडंबन ….. ग्रेट

___________/\___________

आजही मी चिडले होते...
आणि;
न वाजवण्याच कारण मात्र

आकलनीयच! >>>>>>>>>>> Rofl Rofl Rofl पहील्या पेक्षा हे सरसय्....वर्षे....