जाहले बघ लग्न जेव्हा..!

Submitted by A M I T on 29 September, 2011 - 08:04

सुप्रियाताईंनी आपल्या लेखणीला बोल लावलेले पाहून आम्ही आमच्या दू:खास आवरू शकलो नाही.

मीच माझ्या बायकोला फोन होते लावले
पण तिने या याचकाचे एक नाही ऐकले

वाढदिवसाला तुझ्या मी, आणली साडी तरी
सांगते शेजारिणीला काय नव्हते आणले!

चादरीत शोधताना कैक राती जागल्या
बघ तरीही ढेकणाला ठार नव्हते मारले.

फोडणी देवून बघ तू, डाळ जेव्हा रांधली
चिरताना आज वांगी बोट माझे कापले

त्या तुझ्या डोळ्यांत लाल, रोखूनी मी पाहता
कोथळा काढील माझा आज ऐसे वाटले

जाहले बघ लग्न जेव्हा, हाय ती अशुभ घडी!
मीच माझ्या पायांवर दगड तेव्हा मारले

* * *

http://kolaantudya.blogspot.com/

गुलमोहर: 

Proud
बघ तरीही ढेकणाला ठार नव्हते मारले.>>
दुसर्‍यांदा दिसला(ढेकूण) तुझ्या काव्यरचनेत!
फार त्रास देतोय का? Proud

अमित _________/\_________ Lol मस्त आहे विडंबन.
अमित, आता ढेकणावर कादंबरी का? Proud

<<फोडणी देवून बघ तू, डाळ जेव्हा रांधली
चिरताना आज वांगी बोट माझे कापले<<

मस्त रे अमित!!! Rofl