कशास त्याची वाट पहावी... (तरही)

Submitted by आनंदयात्री on 23 September, 2011 - 13:52

कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव
उत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव

या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव

पत्राचा मायना तसाही बदलावा लागणार तुजला
(फक्त बदललेल्या पत्त्यावर आता सारी पत्रे पाठव)

इथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो
माझ्या नशिबातील पोकळी भाळी चंद्रामागे गोंदव

अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव

जगता ते लिहिलेच पाहिजे असली काही सक्ती आहे?
सोडुन जावे काळापाशी दुखलेल्याही श्वासाचे शव

वाट एकही कधीच बहुधा मुक्कामाला पोचत नाही
प्राण थांबती अर्ध्यावरती, पुढे भटकती नुसते अवयव

कविता म्हणते - "ऐक जरासे! पाठलाग शब्दांचा थांबव!
माझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव!"

- नचिकेत जोशी

गुलमोहर: 

मतला कातिल!!

अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव .... >>> आहाहाहा!!

वाट कुठलीही कधीच बहुधा मुक्कामाला पोचत नाही
प्राण थांबती अर्ध्यावरती, पुढे भटकती नुसते अवयव >>> वाह!

कविता म्हणते - "ऐक जरासे! शब्दांचा पाठलाग थांबव!
माझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव!">>> मस्त!!

एक सुचवणी.. शब्दांचा पाठलाग असं म्हणताना.. थोडं अडखळायला होतंय. तिथे पाठलाग शब्दांचा असं केलं तर कसं वाटेल??

पत्राचा मायना तसाही बदलावा लागेल तुला
>>

नीट पाहिलेले नाही, पण कदाचित दोन मात्रा कमी असाव्यात! Happy (एखादा टायपो असेल)

==========================

कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव
उत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव>>> आशाळू! मस्त! Happy

या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव>> मस्त मस्त!

पत्राचा मायना तसाही बदलावा लागेल तुला
(फक्त बदललेल्या पत्त्यावर आता सारी पत्रे पाठव)>> वा वा

इथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो>>> तुझे चांदणे - मस्त

अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव>>> व्व्वा! तिला वगळुनी तिची सावली - सुपर्ब कल्पना नचिकेत!

जगता ते लिहिलेच पाहिजे असली काही सक्ती आहे?
सोडुन जावे काळापाशी दुखलेल्याही श्वासाचे शव>>> सुप्पर्ब!

वाट कुठलीही कधीच बहुधा मुक्कामाला पोचत नाही> (येथेही बहुधा 'कुठलिही' असे करावे लागेल) Happy
प्राण थांबती अर्ध्यावरती, पुढे भटकती नुसते अवयव>> Happy

कविता म्हणते - "ऐक जरासे! शब्दांचा पाठलाग थांबव!
माझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव!">> आवडला.

आपली ही गझल खूपच सुरेख आहे. गझलेतील जवळपास सगळेच शेर चांगले असणे हे दुर्मीळच! खूप खूप शुभेच्छा व अजून वाचायला मिळूदेत!

-'बेफिकीर'!

प्राण थांबती अर्ध्यावरती, पुढे भटकती नुसते अवयव..आहाहा...
पुढे भटकती नुसते अवयव.................!!!

या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव....व्वा!!

साखर-शैशव.........अप्रतिम उपमा.

इथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो
माझ्या नशिबातील पोकळी भाळी चंद्रामागे गोंदव...सुरेख.

भाळी चंद्रामागे गोंदव........लजवाब!!!

पत्राचा मायना तसाही बदलावा लागेल तुला
(फक्त बदललेल्या पत्त्यावर आता सारी पत्रे पाठव).....खुप खुप आवडला शेर!

अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव

तिला वगळुनी तिची सावली...सही सही एकदम!

परत परत वाचली...परत परत वाचत रहावी अशी गझल

धन्यवाद!

कशास त्याची वाट पहावी, जे घडणे आहेच असंभव
उत्तर बदलत नाही, तरिही, करते मन आशाळू आर्जव

अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव

जगता ते लिहिलेच पाहिजे असली काही सक्ती आहे?
सोडुन जावे काळापाशी दुखलेल्याही श्वासाचे शव
सही लिहिलय!!!
bolted specially!

n last तर्_आम्हाला आमचं उत्तर मिळालं!

कविता म्हणते - "ऐक जरासे! पाठलाग शब्दांचा थांबव!
माझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव!"

अप्रतिम!!!!!!

काय काय उद्धृत करणार? एकापेक्षा एक जबरदस्त शेर आहेत!

शेवटचा तर अफाट! [अगदी हेच माझीही कविता म्हणत असेल, असं वाटलं. Happy ]

कविता म्हणते - "ऐक जरासे! पाठलाग शब्दांचा थांबव!
माझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव!"
देवा,खुप म्हणजे खुपच छान!

सर्वांचे मनापासून आभार.. Happy

प्राजू, सुचवणी पटली. बदल केलाय.
बेफिकीर, तिथे २ मात्रा कमी झाल्या होत्या. Sad
बदल केलाय.
धन्यवाद दोघांचेही.. Happy

निशिकांतजी, Happy

इथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो
माझ्या नशिबातील पोकळी भाळी चंद्रामागे गोंदव

अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव

जगता ते लिहिलेच पाहिजे असली काही सक्ती आहे?
सोडुन जावे काळापाशी दुखलेल्याही श्वासाचे शव

कविता म्हणते - "ऐक जरासे! पाठलाग शब्दांचा थांबव!
माझ्यामध्ये उतरत नाही हल्ली अपुल्या नात्याची चव!"

हे अतिशय आवडलेले शेर ! संपूर्ण गझलच अत्युत्तम झाली आहे, हेच म्हणतो.
अशा गझला पुन्हा पुन्हा वाचायला मिळॉत, हीच प्रार्थना आहे.

या तरहीत भाग घेतलेल्या बहुतेक सगळ्यांच्याच गझला फार चांगल्या झाल्या आहेत. सगळ्यांचेच अभिनंदन करतो !

सुरेख... अनेक ओळी आवडल्या...

या काठावर जसे पोचलो, त्यांच्यासाठी परके झालो
मुठीत अजुनी धरले आहे पैलतिराचे साखर-शैशव >>> मस्त..

साखर-शैशव - सुरेख शब्द आहे

इथून वाटा वेगवेग़ळ्या - तुझे चांदणे सोबत नेतो >>>मस्त

अवचित स्मरते कातरवेळी तिला वगळुनी तिची सावली >>> मस्तच
जीव तिथे अडकून राहतो धरून काळोखाचा विस्तव >>> पण काळोखाचा विस्तव समजले नाही Sad

जगता ते लिहिलेच पाहिजे असली काही सक्ती आहे?
सोडुन जावे काळापाशी दुखलेल्याही श्वासाचे शव >> मस्त

शेवटचा पण आवडला..