हितगुज दिवाळी अंक २०११ - नियमावली

Submitted by संपादक on 6 September, 2011 - 17:04

१. दिवाळी अंकासाठी पाठवायचे साहित्य रविवार ९ ऑक्टोबर २०११ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत] संपादक मंडळाकडे पोहोचले पाहिजे.

२. दिवाळी अंकासाठी स्वलिखित आणि संपूर्णपणे अप्रकाशित साहित्य पाठवावे. साहित्य सॉफ्ट-कॉपीस्वरूपात आणि देवनागरी लिपीमध्येच पाठवावे. देवनागरीत नसलेले साहित्य स्वीकारले जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

३. साहित्य पाठवताना शक्यतो व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्या नियमांत बसेल असे पहावे.

४. साहित्य स्वीकारण्याचे किंवा नाकारण्याचे सर्वाधिकार संपादक मंडळ राखून ठेवत आहे. साहित्य नाकारण्याचे कारण किंवा स्पष्टीकरण देण्यास संपादक मंडळ बांधील नाही. याबाबत संपादक मंडळाचा निर्णय अंतिम राहील.

५. आपल्या दिवाळी अंकात याही वर्षी काही साहित्यकृतींसोबत रेखाटने असतील. रेखाटन समिती आणि संपादक मंडळ रेखाटनासाठी साहित्य निवडण्याबाबतचा निर्णय घेतील आणि तो अंतिम असेल.

६. अंकासाठी कोणत्या प्रकारचे आणि किती साहित्य पाठवायचे यावर अर्थातच बंधन नाही. परंतु पाठवलेले सर्व साहित्य स्वीकारले जाईलच असे नाही. कृपया पूर्ण लेख / ललित / कथा / कादंबरी / कविता एकाच पोस्टमध्ये पाठवावे.

७. आपण जे साहित्य पाठवू इच्छिता त्याचा आकार जर मोठा असेल आणि ते मायबोलीवरून पाठवणे शक्य होत नसेल तर कृपया संपादक मंडळाशी संपर्क साधावा.

८. ज्या नावाने आपले साहित्य दिवाळी अंकात प्रसिद्ध करायचे असेल ते नाव साहित्य पाठवताना त्याखालीच नमूद करावे. (उदाहरणार्थ पूर्ण नाव / फक्त नाव / नाव आणि आडनाव / फक्त मायबोलीवरील आयडी इत्यादी).

९. साहित्य मिळाल्याची पोच पाठवली जाईल.

१०. प्रकाशचित्रांवर वॉटरमार्क घालणे अनिवार्य आहे.

११. प्रताधिकारांसंबंधी नियमावली

* पाठवलेल्या साहित्यात गरजेनुसार अंतर्भूत केलेले अवांतर साहित्य (छायाचित्रे, मजकूर, रेखाटने / आकृत्या, इत्यादी सर्व) हे शक्यतो प्रताधिकारमुक्त असावे व तसे लेखाच्या शेवटी नमूद करावे.

* प्रताधिकार असलेले साहित्य वापरले गेले असल्यास संबंधित व्यक्ती/संस्थेची लेखी/इमेलद्वारे परवानगी घेतलेली असावी व लेखाच्या शेवटी तसा स्पष्ट निर्देश असावा.

* 'कॉपीलेफ्ट' असाही एक प्रकार आजकाल प्रचलित आहे. जेव्हा 'कॉपीलेफ्ट' प्रकारातले साहित्य तुम्ही वापरता, तेव्हा ते वापरून तयार केलेले तुमचे साहित्यही तुम्ही 'कॉपीलेफ्ट' प्रकारान्वये प्रताधिकारमुक्त करत असता.

*आपण वापरत असलेले साहित्य प्रताधिकारमुक्त आहे किंवा नाही, याची खातरजमा करण्यासाठी खालील दुवे संदर्भ म्हणून वापरता येतील.
- भारतीय प्रताधिकार कायदा
- प्रताधिकार: नेहमी विचारले जाणारे प्रश्न

१२. दृकश्राव्य विभागासंबंधी नियमावली

या वर्षीच्या मायबोलीच्या दिवाळी अंकातही दृक-श्राव्य कार्यक्रम अंतर्भूत आहेत. या विभागात आपण विविध कलाकौशल्यांचे दृक-श्राव्य सादरीकरण करू शकता किंवा गाणी, कविता यांसारखे श्राव्य कार्यक्रमही सादर करू शकता. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. मायबोलीकरांनी आतापर्यंत तुमच्या कलेचे अंतिम रूपच पाहिले आहे किंवा त्याबद्दल फक्त ऐकले आहे. या निमित्ताने तुमच्या कलेचे प्रत्यक्ष सादरीकरण / कलाकृतीची निर्मितीप्रक्रिया बघण्याचा आनंद सर्व मायबोलीकरांना लुटता येईल.

ह्यासंबंधी अधिक माहिती पुढील प्रमाणे:
* दृक-श्राव्य सादरीकरण १० मिनिटांपेक्षा जास्त नसावे. श्राव्य कार्यक्रमांना अशी कालमर्यादा नाही.

* चित्रफितीचा आकार 2GB पेक्षा जास्त नसावा.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणे याआधी इतरत्र प्रकाशित झालेली नसावीत. तसेच, सादरीकरणात अथवा चित्रीकरणात मायबोलीकरांचा सहभाग असावा.

* चित्रीकरण, संकलन, ध्वनिमुद्रण इ. सादरकर्त्यानेच करायचे आहे. चित्रफिती व ध्वनिमुद्रणे संपादकांकडे पाठवताना प्रकाशनास योग्य असावीत. संपादक या चित्रफितींत दिवाळी अंकाचे मुखपृष्ठ व मायबोलीचा लोगो घालणे, असे किरकोळ संस्कार करतील.

* चित्रफितींत अथवा ध्वनिमुद्रणांमध्ये वापरलेलं संगीत हे प्रताधिकारमुक्त असावं, अथवा, ते वापरण्यास अधिकृत परवानगी घेतलेली असावी. चित्रफितींत तसा स्पष्ट उल्लेख केलेला असावा.

* आपली फीत .avi, .mpeg, .wmv, .wma, .camrec, .mpg, .wav यांपैकी एका format मध्ये असावी.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणे आपण http://www.yousendit.com या संकेतस्थळावर upload करू शकता. [ह्या साईटवर गेल्यानंतर डाव्या बाजूला Send a File Try it now असे लिहिलेले आढळेल. तिथे वर पाठवणार्‍याचा पत्ता आणि त्याच्या खाली संपादकांचा पत्ता (sampadak@maayboli.com) लिहावा. मग योग्य ती फाईल upload करावी. आणि SEND IT ची कळ दाबावी.]

* चित्रफीत http://www.yousendit.com वर upload करताना आपण फितीचा आकार कमी करण्यासाठी WinZip® अथवा WinRAR® या सॉफ्टवेअरांचा उपयोग करू शकता. तसेच कमी आकाराच्या format चाही वापर करू शकता. चित्रीकरण केल्यानंतर Camtasia Studio, Adobe® Premier® यांसारख्या सॉफ्टवेअरांचा वापर करून आपण अगोदर संकलन करू शकता व नंतर फितींमध्ये आवाज घालू शकता. यामुळे चित्रफिती अधिक देखण्या होतील. ही सॉफ्टवेअरं आंतरजालावर उपलब्ध आहेत.

* ध्वनिमुद्रणांवर संस्कार करण्यासाठी आपण आंतरजालावर उपलब्ध असलेले Audacity® हे सॉफ्टवेअर वापरू शकता.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं संपादक मंडळाकडे पाठवण्याची शेवटची तारीख रविवार २ ऑक्टोबर २०११ [पॅसिफिक (अमेरिका) प्रमाणवेळेनुसार रात्री बारापर्यंत] ही आहे.

* या चित्रफिती आपण www.youtube.com वर upload करणार आहोत, याची नोंद घ्यावी. याविषयीची अधिक माहिती http://www.google.com/support/youtube/bin/topic.py?hl=en&topic=16560 इथे मिळू शकेल.

* चित्रफिती व ध्वनिमुद्रणं यांचा दिवाळी अंकात समावेश करायचा की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.

आपले साहित्याभिलाषी,
- संपादक मंडळ

विषय: 

subjectDelivery Status Notification (Failure)
mailed-bygooglemail.com
Important mainly because of the words in the message.

hide details 3:39 AM (1 minute ago)

Delivery to the following recipient failed permanently:

sampadak@maayaboli.com

Technical details of permanent failure:
DNS Error: Domain name not found

साहित्य पाठवितांना वरील एरर येते आहे.

पाषाणभेद,

आपणाला साहित्य (टेक्स्ट) पाठवायचे आहे की एखादी फाईल?

नुसते टेक्स्ट असेल तर आपण ते या दुव्यावर इथे देऊ शकता.

एखादी टेस्ट ईमेल पाठवून बघता का sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर .. आम्हाला ह्या पत्त्यावर बाकी सभासदांच्या ईमेल्स येत आहेत.

आशा आहे की ह्याची आपणाला मदत होइल. ह्यानंतरही काही शंका, प्रश्न असल्यास आम्हाला जरूर विचारा.

आपले,
संपादक मंडळ

कॉपी पेस्टची माया अगाध आहे. मायाविरहीत ईमेल आयडीला ईमेल पाठविला आहे. तो बाऊन्स झालेला नाही.

तत्राप आपल्या मुळ पोस्टमध्ये 'माया' अजून आहे ती काढून टाकावी म्हणजे असा गोंधळ होणार नाही.
संपादक अन anudon यांचे आभार.

पाषाणभेद, मूळ घोषणेत दिलेला ईमेल आयडी दुरुस्त केला आहे. चूक ध्यानात आणून दिल्याबद्दल तुमचे खुप आभार तसंच आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल क्षमस्व.

मी एक ध्वनिचित्र फित वरील पद्धतीने पाठवली आहे. आपणास ती मिळाली का ? मला त्याची पोच कशी मिळेल ? धन्यवाद !