बत्तीस तारखेला

Submitted by अभय आर्वीकर on 20 September, 2011 - 19:39

बत्तीस तारखेला

भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला

                                 - गंगाधर मुटे
------------------------------------------

गुलमोहर: 

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?>>>

स्वच्छ व प्रामाणिक! अभिनंदन! Happy

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला>>>>>>>>. हे विशेष आवडले. पण सम्पूर्ण गझल भारी आहे.

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला>>>>>>>>>> ही वस्तुस्थिती आहेच

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला>>>>>>> क्या बात है क्या बात है

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

मुटे सर , प्रत्येक द्वीपदीतला विचार सुचक आणि थेट आहे .गझल खुप छान.

हे खालचे शेर खूप आवडले.

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला... क्लास!

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?... मस्त

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला........ सणसणित.

छान

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

क्या बात है ...व्व्व्वाहवा... मुटे साहेब...पुन्हा एकदा मुटे शैली असलेली पल्लेदार गझल..

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला >>> मस्त

प्रवाही गझल...

बत्तीस तारखेची मजा आवडली...

"लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला"

"राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला"

खूप सुन्दर.

प्रतिसादाबद्दल सर्वांचे धन्यवाद. Happy

मिलिंदजी, कारण माहिती नाही पण तुमचे प्रतिसाद मला नेहमीच बळ देत आले आहेत.

मिलिंदजी, कारण माहिती नाही पण तुमचे प्रतिसाद मला नेहमीच बळ देत आले आहेत.>>>

कारण समजले तर बळ जाऊही शकेल. Lol (दिवा - गंमतीने म्हणालो)

-'बेफिकीर'!

<<<कारण समजले तर बळ जाऊही शकेल.>>>

सर्वच तर्‍हेचे बळ कमजोर असतेच असे नाही,
त्यामुळे खरेच बळ हे जर बलवान असेल तर

कारण कळल्यामुळे ते बळ अधिक बलवान होईल, नाही का? Happy

गंगाधर

भन्नाट एकदम ! मस्त गझल आहे...
( टीप : तू नक्की पैसे उसने घेण्यात माहीर असावास. त्याशिवाय बत्तीस तारीख असा शब्दप्रयोग तुला आठ्वला नसता Happy )

<<<तू नक्की पैसे उसने घेण्यात माहीर असावास.>>> Lol

जेव्हा उसनेवार घेण्याची गरज होती तेव्हा कोणी उसने देतच नव्हते. आता उसने द्यायला तयार आहेत तर मला गरज नाहिये.

विचित्र असते सगळे. नाही काय? Happy