हॉलंडमधलं आयुष्य

Submitted by webmaster on 26 March, 2009 - 13:04

हॉलंडमधलं रहाणीमान

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साधारण माहिती -
हॉलंडची एक वसाहत त्सुरीनाम ह्या प्रशांत महासागरातील बेटावर आहे. तिथे बरेच भारतीय वंशाचे लोक रहातात. त्यातले बरेच जण हॉलंडमध्ये रहातात. तसेच बरेच इन्डोनेशिअन, मोरोक्कन आणि तुर्की लोक देखिल येथे रहातात. हे सगळे सांगण्याचे खरे कारण म्हणजे त्यांचे आहारमान आपल्यासारखेच आहे.

त्यामुळे बरेचसे जेवण आपल्यासारखे मिळते. डाळ, तांदूळ, उसळी, भाज्या, वै. सामान मिळते. मसाले - हळद, तिखट मिळते सहज. पण एम डी एच ब्रँडचे त्यामुळे वेगळे काही हवे तर घेउन जावे. ह्या सगळ्या त्सुरीनामी दुकानातून पोहे, रवा, सेरेलॅक (दुबईचे), मिरची, कडीपत्ता, रेडी टू ईट वै. मिळते.

अल्बर्ट हाईन, सी१००० ही रोजच्या खरेदीची दुकाने आहेत. ह्यात देखिल मसाले मिळतात पण भारतीय प्रकारचे नव्हेत तर स्पॅनिश/ईटालिअन प्रकारचे. युत्रेक्थ (= मुंबईतले दादर) हे बरेच भारतीय एकत्र सापडायचे ठिकाण, पण रहाण्यासाठी बर्‍यापैकी सुरक्षित आणि तेवढेच महाग. इथून अख्ख्या हॉलंडमध्ये कुठेही ट्रेनने जाता येते. रॉतरडॅम, दे हेग, ह्या त्यातल्या त्यात स्वस्त जागा आहेत (जिथे इतर भारतीय दिसू शकतात).

भारतात फोन करण्यासाठी सिम/कॉलिन्ग कार्ड मिळतात.. जीटी, लायका ही काही नावे. बसप्रवासासाठी १ झोन, २ झोन असा पास काढावा. अनपेक्षित बस प्रवासासाठी स्ट्रिपन कार्ड वापरावे, बस मध्ये तिकिट काढण्यापेक्षा स्वस्त पडते. ट्रेन प्रवासासाठी कंपनी एन एस कार्ड देते. जर अशी सोय होणार नसेल तर ट्रेन कंपनीचे एक डिस्काऊंट कार्ड असते (३ महिने वैधता, १५ युरो), प्रत्येक प्रवासी तिकिटावर ४०% पर्यंत सूट मिळते (ह्या कार्डवर अजुनही काही सोयी असतात, ज्या मला नक्की माहित नाहीत).

बाहेर कितीही थंडी असली तरी घरात २० डिग्रीच्यावर हिटींग ठेवु नये, एक तर हिटींग बिल कमी येते आणि घराबाहेरच्या थंडीत अ‍ॅडजेस्ट होता येतं. घराबाहेर पडताना तापमान १५ वैगेरे करुन जाव.. म्हणजे घरात आल्यावर थोड्याचवेळात आपलं डिहायड्रेशन होत नाही.

इलेक्ट्रॉनिक वस्तू तिथे महाग आहेत. कॅमेरा वै. भारतात घ्यावेत. मिडीया मार्केट हे इथले साखळी दुकान आहे. कूकर आणि हँड मिक्सी भारतातून न्यावेत हे आयटेम्स तिथे २० युरोला घ्यायला जीवावर येते. अपार्टमेंटमध्ये घर असेल तर इलेक्ट्रीक/इन्डक्शन स्टोव्ह असतो (ज्यावर आपली भांडी चालत नाहीत)

महत्त्वाचा भाग -
१. इथे बरेच जण इंग्लिश बोलतात. पण तुमच्याशी बोलतीलच असे नव्हे. भारतीय दिसणारे सगळे भारतीय असतीलच असे नव्हे.
२. ९० दिवस इथे रहयचे असेल तर इथल्या नगरपालिकेत (टाऊन हॉल), पोलिसांकडे जाऊन नोंदणी करावी(च) लागते. हे विनाशुल्क होते.
३. ३ महिन्यांच्या वर रहायचे असेल तर स्थलांतर मंत्रालयात(IND) जाऊन नोंदणी करावी लागते, आवेदन पत्र द्यावे लागते. त्यासाठी नगरपालिकेतून नोंदणी झाल्याची पावती न्यावी लागते, जी दर डोई १०.५५ युरोल मिळते.
४. लहान मुलांसाठी विमा लागत नाही व सरकारमार्फत त्यांना लसीकरण कार्यक्रमात विनाशुल्क सामील केले जाते.
५. देश सोडून जाताना हे सगळे परवाने, नोंदी रद्द करुन घ्याव्या लागतात(च).

सुंदर नी उपयुक्त माहिती!!! Happy
तुमच्या गटग मधून लिंक मिळाली....

जाइजुई, छान आहे माहीती.
मी माबो चा नविन सभासद आहे. सध्या माझे पण बस्तान अ‍ॅमस्टर्डॅमला आहे.
अजून कोन कोन मायबोलीकर आहेत नेदरलॅन्ड मधे?

मि माय् बोली चा नविन सभासद आहे , सध्या मी देन हाग ला राहात आहे.

फक्त छान माहिती नाही तर फार दुर्मिळ माहिती! मी हॉलंडला जाण्यापुर्वी तिथली बरीच माहिती गोळा केली होती पण त्सुरीनाम ही वसाहत तिथे आहे हे माहिती नव्हते. नाहीतर नक्कीच भेट दिली असती.

जाई, जर ही लोकं भारतीय वशांचे आहेत तर त्यांचा इतिहास काय आहे? त्यांची किंवा त्यांच्या पुर्वजांची मातृभाषा कुठली आहे हेही जर माहिती असेल तर लिहि.

बी सुरीनाम वसाहत डच लोकांची वसाहत होती (जशी भारत ही इंग्लिश लोकांची). पण सुरीनाम भौगोलिक दृष्ट्या युरोपात नाही. माझ्या गावातून जाणार्‍या बसलाइनवर एक बिहारी/सुरीनामी ड्रायव्हर होता.

एडीझेड आणि समीर, मी आता परत आलेय मुम्बैला, पण किट्टू म्हणून एक माबोकर आहे सध्या अ‍ॅम्स्टरडॅमला!

अरे बी, त्सुरीनाम हे अमेरिकेजवळ असलेलं एक छोटसं बेट आहे. डच लोकांनी भारतातल्या बिहारच्या आसपासचे बरेच लोक इथे गुलाम म्हणून आणले तसेच इंडोनेशिया, चायना अश्या ठिकाणाहुनही आणले.
ह्या सगळ्यांना त्यांनी यथावकाश वेगळी वसाहत करून दिली त्या छोट्याश्या बेटावर. पण हे सगळे पण डच नागरिक आहेत. सो ते हॉलंड्मध्ये ये जा करतात, रहातात.

बापरे... सुरीनामी लोकांवर भारी चर्चा चालु आहे. सुरीनामी लोकं आपल्या देवांना देखिल मानतात..जसे साईबाबा, शंकर..

दरवर्षी इथे 'Queen's Day' ला कार्यक्रमात ते लोकं साईबाबांचे भजन देखिल म्हणतात...

माझा भाउ कनसल्टंट म्हणून अमेरिकेतून हॉलंडला गेला होता. सहा महिन्यानंतर त्याला सांगण्यात आले की, तुम्ही सहा महिन्यापेक्षा जास्त रहात असलात तर तुम्हाला आयकर द्यावा लागेल. त्याच्या पगाराच्या ५० टक्के पैसे आयकरासाठी आकारले होते! ते जरी मागून परत मिळणार असले तरी त्याला ते परवडण्यासारखे नव्हते.
त्याने ताबडतोब तेथून गाशा गुंडाळला. आता परत अमेरिकेत आला. इथे कसे सगळे जीवन शांत चालते, कसल्याहि प्रकारे डोक्याला त्रास नाही!!

मी फक्त एक महिना जकार्ता मधे राहिलो. पुढे पाच वर्षे माझ्या कंपनीने माझा आयकर फॉर्म भरला. दरवर्षी सगळे कागदपत्र त्यांच्या हवाली करायचे, नसता ताप!! मुळात भरपूर पैसे मिळाल्याने मी काही तक्रार केली नाही.

भारतात सहा महिने होतो. पगारातून कर कापून घेतला. वर्षाच्या शेवटी ते पैसे परत मिळणार होते, पण त्यासाठी जे भयानक काहि काही करावे लागेल ते सांगितल्यावर म्हंटले राहूदे ते पैसे भारत सरकारलाच देणगी म्हणून. एकतर मला पगार एखाद्या चपराशासारखा होता. तेंव्हा तो सगळा पगार जरी त्यांनी ठेवून घेतला असता तरी मला काही फरक पडत नव्हता!! जेव्हढ्या उत्साहाने गेलो, तितकाच वैतागून परत आलो.
भारतीयांचे बरे असते. घरी बक्कळ पैसा असतो, पगार वगैरे म्हणजे नुसता हातखर्च. परदेशी जाणे म्हणजे नुसती गंमत.

Happy Light 1

हाय zakki,

हॉलंडला खरंच ४२% कर दर महिन्याला भरावा लागतो.पण तुम्ही जितका कर देता तितकी इथली 'govt' सोयी पण करुन देते...

>>>>>>>भारतीयांचे बरे असते. घरी बक्कळ पैसा असतो, पगार वगैरे म्हणजे नुसता हातखर्च. परदेशी जाणे म्हणजे नुसती गंमत.

मी तुमच्याशी याबाबत तरी सहमत नाही.....

झक्की,

आमच्या पीढीतले (अजूनही) भारतीय (असलेले लोक) असेच देशोदेशी फिरून पैसे कमवून आपल्या देशात आणतात. आम्ही परदेशात जातो ते चलन कमवून परत येण्यासाठी त्यामुळे परदेश प्रवास ही आमच्यासाठी गम्मतच असते. तिथेच आयुष्य काढायचे झाले तर मग आम्हाला सेंट सेंट्चा हिशेब ठेवावा लागेल.

आमच्या आधीच्या पीढीने प्रसन्गी मन मारून, पोटाला चिमटा घेऊन आम्हा मुलांना शिकवलेय आणि घर - गाडी असे जमेल तसे केलेय. इतके दिवस त्या हातखर्चातूनच (आधीच्या पीढीसाठी हातखर्च = हातात आला की संपला खर्चात) सगळ्या जबाबदार्‍या पेलेल्या की त्यांनी? भारतातच राहून भरपूर कष्ट केलेयेत त्यासाठी. आज स्थिरस्थावर झाल्यावर, (आईवडील-सासू सासरे आणि मुले बाळे ह्यांच्या दुहेरी)जबाबदार्‍या संपल्यावर परदेश प्रवासाची गम्मत केली तर बिघडले कुठे?

हा धागा हॉलंडमधल्या जीवनमानाविषयी आहे.. भारतातल्या नव्हे.. नाही का? Happy Light 1

जाईजुई, अहो ती पोस्ट झक्कींची आहे.. हॉलंड मधले असुदे नाहीतर होनोलुलुमधले आयुष्य असुदे, ते घूम फिरके भारतावर टीका करायला येणार.. द्या सोडून..

देवश्री, मी हॉलंड मधे नाही, पण तुझ्या कडून त्या देशाची ओळखं करून घ्यायला खूपचं आवडेलं.
तुझे मायबोली वर स्वागत. कसा काय आहे तो देश? राहणीमान कसे आहे? घरं कशी असतात?
तिथल्या विंडमिल्स खेरिज जास्ती काही माहिती नाही/आठ्वत नाही. म्हणून तू रोज इथे येऊन लिहित जा. फोटो पण टाक, म्हणजे आम्हाला पण घर बसल्या हॉलंड ची सफर घडेल.:)

अजून संपूर्ण देश बघून झालेला नाही पण Amsterdam आणि आजूबाजूच्या परिसराबद्दल काही लिहू शकेन... अर्थात तेही based on my observations.

in general Netherlands बद्दल लिहायचे झाले तर, हा संपूर्ण देश man-made आहे. म्हणजे काहीही उभं करण्यासाठी reclamation must. एकट्या Amsterdam मध्ये ६०० कालवे आणि १२७६ काल्व्यावरचे पूल आहेत. संपूर्ण शहर सपाट आहे त्यामुळे चढाव उतार फक्त पूल पार करण्यापुरताच Happy आणि म्हणूनच इथे सायकली चालवणे सोपे आणि खूप सोयीस्कर आहे. बोटी सुद्धा सायकली एवढ्याच सोयीस्कर आणि बरेचसे लोकं स्वतःच्या बोटी घेऊन संपूर्ण family सह सगळीकडे फिरताना दिसतात. अशा बोटी rent वर सुद्धा मिळतात.

मी इथे येईपर्यंत माझ्याही डोक्यात Netherlands = windmills आणि tulips च्या बागा एवढेच होते. पण इथे आल्यावर कळले की त्यापलीकडेही इथे बरेच काही आहे. हा Europe मधला आकाराने बऱ्यापैकी लहान पण prosperous देश आहे. वर लिहिलेय तसे taxes बरेच आहेत पण तेवढ्याच सोयी देखील आहेत. डच लोकं त्यांच्या कंजूषपणाबद्दल प्रसिद्ध आहेत. उगीच काही फुकट घेत नाहीत आणि देत ही नाहीत Happy Taxes च्या बदल्यात उत्तम शिक्षण (आपल्या सारखाच science/ maths वर जोर), उत्तम public transport आणि राहायला सुरक्षित वातावरण.

pleasant उन्हाळा, bearable हिवाळा असे normal European हवामान असले तरी इथे प्रचंड windy असते त्यामुळे थंडी जास्त वाटते. पण अर्थातच windy आहे म्हणूनच windmills आहेत आणि electricity generation पण. Amsterdam ला विमान उतरताना आधी समुद्रातल्या modern windmills दिसतात. तसेच जागोजागी साधारण १७ व्या शतकातल्या जुन्या windmills पण खूप उत्तमरीत्या preserve केलेल्या दिसतात. जश्या windmills तशीच tulip fields, Gouda cheese आणि लाकडाचे बूट, या गोष्टींचाही Dutch लोकांना अभिमान आहे, आणि tourist ना कौतुक.

Netherlands जगातला सर्वाधिक फुले निर्यात करणारा देश आहे. साधारण १५ मार्च ते १५ मे पर्यंत इथली Keukenhof park (tulip/ सिलसिला ची बाग) खुली असते. तसेच मार्च ते जून इथल्या bulb district मध्ये tulip ची रंगीबेरंगी शेते रस्त्याच्या आणि रेल्वेच्या दोन्ही बाजूना लांब लांब पर्यंत पसरलेली दिसतात.

नंतर Amsterdam बद्दल लिहीन.

हे काही photos.DSC02809.JPGDSC02811.JPGDSC02823.JPGDSC02910.JPGDSC02913.JPGDSC02979.JPGDSC03038.JPGDSC03492.JPG

देवश्री किती सुंदर फोटो आहेत.फुलांच्या रंगांची उधळण.
छोटे बूट , मोजड्याचे रंग पण किती गोड आहेत.
वर्णन पण छान Happy

फुलांच्या रंगांची उधळण... अगदी खरं.
आणि ते छोटे बूट अखंड लाकडात कोरलेले असतात त्यामुळे पायाला थंडी वाजत नाही Happy

देवश्री, सहज डोकावले ह्या धाग्यावर Happy फोटो अतिशय सुंदर आहेत. तू 'गुलमोहर' मधल्या ललित / प्रकाशचित्र विभागात फोटो अपलोड कर आणि तिथल्या आयुष्याबद्दल, लोकांबद्दलही लिही. खूप लोकं वाचतील गं आणि मायबोलीकरांना नक्की आवडतील फोटो आणि वर्णन Happy

अगो, +१

गुड.. बर्‍याच दिवसांनी हा धागा हालता बघून बरं वाटलं. मला यायचय हॉलंडला मित्राच्या मुलाला बघायला.. बघू कधी जमते ते.. Wink

मस्त फोटो..

एक दुरुस्तीवजा सुचना:
>>
in general Netherlands बद्दल लिहायचे झाले तर, हा संपूर्ण देश man-made आहे.
>>>
हे बहुतेक पश्चिम किनार्‍याबद्दलच खरे आहे. अ‍ॅमस्टरडॅम/रॉटरडॅम हा गोल परिसर सोडल्यास, पुर्वे-उत्तरेकडचे हॉलंड ही मूळचीच जमिन आहे. विशेषतः गेल्डरलांडच्या परिसरात तुम्हाला जाणवणार पण नाही की समुद्र जवळ आहे असे.. फ्रिसलांडला तर स्वतःची एक बोलीभाषा पण आहे (डच भाषेचीच उपभाषा पण बर्‍यापैकी वेगळी आहे म्हणे)..

बाकी काय? ऑल एस खूड?

Pages