untitled

Submitted by sanky on 18 August, 2011 - 10:01

boy2.JPG

water colour on handmade paper with ball pen rendering..

मी ह्या चित्रातुन काहीतरी मांडायचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला ह्या चित्रातुन काय संदेश मिळतोय हे जरुर लिहा.

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

काय दिसतय या चित्रात फॉर अ लिस्ट अर्थ नंतर लावता येईल.
उघ्ड्यावर विधिला बसलेला माणूस हातात काठी जनावरांना हाकलवण्यासाठी, त्याचं तोंड गाढवा सारखं तोंडाला कुलुप आणी किल्ली त्याच्या डोक्यावर, डोक्यात वळवळणारे साप, बाजूला पडलेली हत्तीची सोंड, बाजूला बघणारा हत्ती ...
Uhoh ह्म्म इंट्रेस्टींग ...

शँकी, अनुमोदन.
त्याचं डोकं शिरस्त्राण घातल्यासारखं दिसतंय. बुद्धीच्या चावीने तोंडाला कुलुप लावलंय म्हणजे गप्प बसण्यातच शहाणपणा आहे असं काहीतरी सुचवायचंय का? त्याचा एक डोळा मोठ्ठा आहे व एक नॉर्मल. अर्धवट विशाल दृष्टीकोन ! Proud

तिथे आसपास हत्तीच येतात बहुतेक. त्यांना एका छोट्या काठीने कसे हाकलतोय तो?

कैमाहित्कायाहेते?

किमान नैसर्गिक उत्सर्जनाचे विधी करताना तरी बाकी इनटेक/आऊटटेक थाम्बवावे अर्थात तोन्डाला कुलुप लावावे अशा काहीसा वागणूकीबाबतचा नैतिक सन्देश दिल्यासारखे वाट्टय! Wink Proud
हत्ती किंकारणे कळ्ळ नाही!

या चित्रातुन मी जंगले वाचवा हा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय.... उघड्यावर शौचाला बसलेली एक व्यक्ती तिच्या बादली कडे वळलेल्या दोन हत्तींच्या सोंडा.. हातात अपुरी असणारी काठी घेउन स्वताच्या वाट्याच पाणी वाचवताना गाढवासारखी झालेली अवस्था.. तरीही काही बोलता येउ शकत नाही कारण या अवस्थेला तोच कारणीभुत आहे म्हणुन तोंडाला लागलेल कुलुप आणी स्वताची बुद्धी वापरुनच तोडगा काढता येईल हे दर्शवणारी डोक्यावरची चावी..
पाठी दुरवर वसलेली वस्ती... उदास भकास वातावरण.... ह्या सर्व सांकेतिक मांडणीतुन हा संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे....