ईशिकाचा द्विमिती बाप्पा

Submitted by uju on 10 September, 2011 - 01:33

रविवारच्या बालरंगमध्ये वाचल्यापासून लेकीला त्यातील जाड दोर्यांचा द्विमिती बाप्पा बनवायचा होता. त्यात स्कूलमध्येपण क्राफ्ट प्रोजेक्ट्साठी दोन ग्रीटिंग कार्ड बनवून आणायला सांगितले.
मग काय काम सूरू.
साहित्य--- हँड्मेड किंवा कार्ड्बोर्ड पेपर, ग्लू, पेन्सिल, जाड दोरा, कात्री.
10092011687.jpg

मग काल मॅडमनी बसून हा बाप्पा बनवला.हँडमेड पेपर हव्या त्या आकारात कापून घेतला व त्यावर बाप्पांचे चित्र पेन्सिलने काढून घेतले . नंतर त्या स्केचवर फेविकॉल लावून जाड दोरा त्यावर चिकटवत चित्र पूर्ण केले. मी देखिल दोरा हव्या त्या मापात कापून देऊन फोर्थमधल्या चिमूरडीची शाबासकी मिळ्वली, यावरून तूम्ही माझ्यातल्या कलाकाराला ओळ्खले असेलच.
09092011664.jpg

आणि हे पूर्ण बनलेले बाप्पा
10092011689.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आकार सुंदरच काढलाय. आता वेगवेगळ्या रंगाचे दोरे किंवा पांढरा दोरा रंगवून हातात दिला पाहिजे.

Pages