Submitted by मिलन टोपकर on 8 September, 2011 - 09:34
ओठ माझे टाकले शिवुनी, अतां..
काय मी मागू मला "तू" पावता?
व्यर्थ मी आव्हान अंधारा दिले
वादळे हसली दिवा मी लावता!
ही धरा आनंदली, उन्मादली
त्या नभाच्या पापण्या ओलावता!
मी दिली आमंत्रणे होती सुखा
दुःखही आले न मी बोलावता!
शोधुनी थकली किती आहे मला
वेदनेला द्या अतां माझा पता!
एकही यावा न मज जिंकावया?
मी स्वतः मजला पणाला लावता!
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
गुलमोहर:
शेअर करा
व्यर्थ मी आव्हान अंधारा
व्यर्थ मी आव्हान अंधारा दिले
वादळे हसली दिवा मी लावता!.....व्वा !!!
केवळ सु रेख!! एकही यावा न मज
केवळ सु रेख!!
एकही यावा न मज जिंकावया?
मी स्वतः मजला पणाला लावता!
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
अख्खी गझलच अप्रतिम आहे, आणि प्रवाही आहे. पण हे तीन शेर कहर आहेत.
प्राजुशी सहमत....खुप ओघवती
प्राजुशी सहमत....खुप ओघवती गझल.
मी न आता एकटा माझ्या घरी आरसे
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
मस्त!
सगळेच शेर सुरेख
सगळेच शेर सुरेख आहेत.....
सांगता समजावता विशेष!!!!
अभिनंदन!!! शुभेच्छा!!
...................................शाम
अप्रतिम.......
अप्रतिम.......
मस्त..
मस्त..
एकही यावा न मज जिंकावया? मी
एकही यावा न मज जिंकावया?
मी स्वतः मजला पणाला लावता!
........व्व्व्वा
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
.. काय सहजता आहे व्व्वा
हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!
......जीवघेणा शेर
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
हा तर अक्षरशः आफाट....
सुंदर गझल.. अप्रतीम
व्यर्थ मी आव्हान अंधारा
व्यर्थ मी आव्हान अंधारा दिले
वादळे हसली दिवा मी लावता!
.
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
हे फार आवडलेत. एवढे आवडले की "शेर असावे तर असे" असे वाटून गेले.
अशी दिलखुलास दाद मिळाली तर
अशी दिलखुलास दाद मिळाली तर आणखी काय हवे? मनःपूर्वक आभार.
आम्हीही आमच्या परीने (आता..!)
आम्हीही आमच्या परीने (आता..!) दाद देण्याचा प्रयत्न केला आहे तो गोड मानून घ्यावा.
जीव जडतो का, कसा, कोणावरी हे
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
मस्त.
वादळ- दिव्याचा शेरही आवडला.
एकूणच सुंदर गझल, मिलनराव.
जीव जडतो का, कसा, कोणावरी हे
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!>>>
आवडले.
दु:ख न बोलावता येणेही आवडले.
(शब्दरचनेचा क्रम किंचित अधिक सहज होऊ शकेल असेही वाटून गेले. 'मी सुखाला धाडली आमंत्रणे' इत्यादी प्रकारे)
खूप सुरेख गझल.
खूप सुरेख गझल.
सुंदर
सुंदर
बेफींशी सहमत, मी सुखाला धाडली
बेफींशी सहमत,
मी सुखाला धाडली आमंत्रणे
दु:खही आलेच, ना बोलावता...वगैरे
तसेच
काय मी मागू मला "तू" पावता?>>>> फक्त परमेश्वरा पुरता मर्यादित वाटतो,
ऐवजी काय मी मागू, मला तू भेटता? विस्तृत अर्थ प्रदान करेल असे वाटते.....
ही फक्त चर्चाच समजावी..सल्ले किंवा दुरुस्त्या नाहीत, कारण गझल मुळतः गुणी आहे... गैरसमज नसावा.
..............................शा
व्वा..व्वा-सुंदर गझल. सारेच
व्वा..व्वा-सुंदर गझल.
सारेच शेर चांगले.
मित्रांनी सुचविलेला बदलही चांगला..
जीव जडतो का, कसा, कोणावरी हे
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
अप्रतिम शेर!
जीव जडतो का, कसा, कोणावरी हे
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
अप्रतिम शेर!
जीव जडतो का, कसा, कोणावरी हे
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
अप्रतिम शेर!
जीव जडतो का, कसा, कोणावरी हे
जीव जडतो का, कसा, कोणावरी
हे न येते सांगता, समजावता!
वाह!!
जीव जडतो - का? कसा? कोणावरी?
यामुळे मिसरा थेट होईल... सध्या जीव जडतो का (की जडत नाही) अशी पुसटशी संदिग्धता वाटते आहे..
हात हाती घ्यायचा होता तुझा
संपले आयुष्य स्वप्ने पाहता!
बहुतेक इथे स्वप्ने पाहता (पाहता) आयुष्य(च) संपलं असं म्हणायचं होतं, ते तितकं थेट येत नाहीये!
मी न आता एकटा माझ्या घरी
आरसे भिंतीस साऱ्या लावता!
वाह! कल्पना छान. दुसरा मिसरा अजून सफाईदार झाला असता...
शुभेच्छा!
खासच.... सगळेच शेर अफाट !
खासच....
सगळेच शेर अफाट !
सुंदर गझल.
सुंदर गझल.