|| बाप्पा मोरया २०११ (मुंबई) || — "दर्शन" (अक्षरधाम प्रतिकृती - टिळक नगर - चेंबूर)

Submitted by जिप्सी on 7 September, 2011 - 23:27

कॅमेर्‍यातील तांत्रिक बिघाडामुळे प्रतिकृतीचे बाहेरील फोटो काढता आले नाही. Sad सह्याद्री मंडळाने नेहमीप्रमाणेच अप्रतिम देखावा सादर केला आहे. जरूर बघावा. Happy

जिप्सी, मी टीळ्क नगर ची आहे. अमेरिकेत असते गेली बरीच वर्श. ३-४ वर्शातून एकदा जाण होत. तूम्ही एकदम मला माझ्या माहेरी नेलत. मी मायबोलि वर लिहित नाही कधी फक्त ROM मध्येच. आज लिहिल्या शिवाय रहावल नाही. एकदम nostalgic झाल. गेली १७-१८ वर्श तरी हा आमचा सहयाद्री चा गणपती मी पाहिलेला नाही . गणपती चे फोटो खूप छान आहेत.

सह्याद्रि मित्र मंडळ (राजन नायर) च्या खुप पुर्विपासुन टिळक नगरमध्ये महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाचा गणपती असायचा. राजनच्या गणपतीच्या झगमगाटासमोर बहुतेक झाकोळला गेला असावा. महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळ गणेशोत्सवाच्या अकरा दिवसात एकापेक्षा एक सरस नाटकं/ऑर्केस्ट्रा सादर करायचे. मंडळ अजुन तग धरुन आहे अशी आशा करतो.

वा!

सुंदर.

सुंदरच!

जिप्सि, फोटो पाहिले... प्रतिक्रिये मध्ये मनिशा चि प्रतिक्रिया इतकि बोलकि आहे! तु खुप काहि जिंकल एका साता समुद्रापलिकडे असलेल्या स्त्रीला माहेराचि आठवण करुन दिलि....

काय सुंदर प्रतिकृती उभारलीये!
बापा पण एकदम देखणे आहेत Happy
धन्स रे जिप्स्या इथे फोटो टाकल्याबद्दल Happy

मिही टिळकनगरचीच.. दरवर्षी नवनविन देखावे छान सादर करत मंडळ. बर्‍याच दिग्गज मंडळींची हजेरी लागत असते इकडे.
राज.. अजुन आहे टिकुन ऐक्यवर्धक चा गणपती.. अन अजुनहि तसेच प्रोग्राम होतात तिकडे.