विधीलिखित..

Submitted by poojas on 9 May, 2008 - 16:37

अक्षम्य चुका टाळता आल्या असत्या तर..
किती बरं झालं असतं..
तुला भेटणंच मी सर्वात आधी टाळलं असतं !
मग....
सगळे संदर्भ आपोआपच टळले असते.
छे..
पण असं ठरवल्या प्रमाणे घडतं का कधी..?
अगदी मोजून मापून... पाउल पडतं का कधी..?
नियतीच्या भेटीगाठी विधीलिखित असतात म्हणे..
म्हणूनच की काय..
आयुष्यात फक्त लिहिता येतं..
पुसता नाही.. !!!

गुलमोहर: 

छान. फारच समर्पक आहे काव्यलिखाण. विधीलिखीत...

पूजा, सुंदर!
आयुष्यात फक्त लिहिता येतं..
पुसता नाही..

(किती दिवसांनी बघतेय तुला इथे? लिहीत रहा गं... इथेही)

खुपच छान
प्रेमात अस चालायच

तिचि होनरि भेट हिच मोठि चुक आहे का ?.....
आनि तिच्य्वर केलेले प्रेम हि देखिल चुक आहे का ?.....
चुका नकळत घड्तात त्या टाळुन टळत नसतात.

कविता फारच छान आहे.